Premium

Maharashtra News : निलेश राणेंना इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण; ट्वीटमध्ये म्हणाले, “मी कधीच खासगी आयुष्याबद्दल…!”

Maharashtra Political News Live Update, 13 September 2023: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

nilesh rane influenza
निलेश राणेंना इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra Live News Today: मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील पक्षफुटीच्या सुनावणीची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेतील दोन्ही गटांची सुनावणी लवकरच होणार असून त्याअनुषंगाने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत.

Live Updates

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

19:40 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: निलेश राणेंना इन्फ्ल्युएन्झा व्हायरसची लागण

१० तारखेला अचानक ताप भरला आणि हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट मध्ये influenza virus डिटेक्ट झाला. हा व्हायरस आणि होणारा त्रास हा फुफ्फुसावर (lungs) हल्ला करतो ज्यामुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते. ताप येण्याअगोदर कसलेही लक्षण नाही, काही क्षणात ताप भरतो. आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, खाजगी आयुष्यातलं मी कधीच ट्विट करत नसतो पण आपल्याला सगळ्यांना अगोदर माहिती असावं म्हणून सांगितलं. नेमकं कशामुळे हे इन्फेक्शन झालं हे अद्याप कळू शकलं नाही – निलेश राणे

18:55 (IST) 13 Sep 2023
पोळा सामूहिक ऐवजी घरगुती पद्धतीने; काय आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश वाचा…

बुलढाणा: कृषिप्रधान जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि त्यांच्या ‘सर्जा- राजा’ साठी एक ‘बॅड न्यूज’ आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा सण असलेला पोळा साजरा करता येणार नाही.

सविस्तर वाचा…

18:26 (IST) 13 Sep 2023
‘मोक्का’ कारवाई केलेल्या आरोपीचा येरवडा कारागृहात मृत्यू

पुणे: येरवडा कारागृहात पक्षाघाताचा झटका आलेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय ६०, रा. उरखेडकर मळा, ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 13 Sep 2023
नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर! सहलीसाठी ‘डबल डेकर’ ग्रीन बस

नागपूर: अशोक ले- लँड आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून (१६ सप्टेंबर) ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत ‘डबल डेकर’ इलेक्ट्रीक बस (ग्रीन बस) येत आहे. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या बसचे लोकार्पण त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थान परिसरात होईल.

सविस्तर वाचा…

17:13 (IST) 13 Sep 2023
फेसबुकवरील मैत्री भोवली, पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला अन्य पुरुषावर ठेवलेला विश्वास भोवला, आर्थिक फसवणूक

मैत्री विनंती महिलेने मान्य केली व दोघांची मैत्री झाली दरम्यान ही महिला आजारी पडली. त्यावेळी रुग्णालयात ने-आण करणे व इतर मदत जाधवने केली.

सविस्तर वाचा…

16:55 (IST) 13 Sep 2023
आश्चर्य! जिल्ह्यात कांदा उत्पादन नाही, तरीही ६७६ शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे दोन कोटी तीस लाख रुपये जमा…

यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश आहे, याची कल्पना अनेक शेतकऱ्यांना नव्हती. आता २ कोटी ३० लाखाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले, ते अनुदान परत मागितले जात आहे.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 13 Sep 2023
डोंबिवली नागरी सहकारी बँकेत भुरट्याकडून ग्राहकाची फसवणूक

डोंबिवली: येथील पश्चिमेतील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या विष्णुनगर शाखेत एका भुरट्या चोराने एका बँक ग्राहकाची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा…

16:45 (IST) 13 Sep 2023
मनोज जरांगेंनंतर आता नागपुरात बबनराव तायवाडे यांचे अन्नत्याग आंदोलन; काय आहे मागणी, वाचा…

नागपूर : मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्याचा पण ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध कुणबी आणि ओबीसी समाजात होत आहे.

सविस्तर वाचा…

16:32 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्र!

३७०० अधिसंख्य पदांवर नियुक्त्या देण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. आम्ही तो निर्णय घेतला. आज तरुण त्या पदांवर काम करत आहेत. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत प्रामाणिक आहे. म्हणून त्या दिवशी आपण सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेला बोलवलं. काही लोक जाणीवपूर्वक खोडसाळपणा करून मराठा समाजातल्या लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला कुणी बळी पडू नका. आमच्या सगळ्यांची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची स्पष्ट आहे – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

16:31 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला जाणार नाहीत?

मनोज जरांगे पाटलांबरोबर चर्चा चालू आहे. आमचं शिष्टमंडळ तिथे जाऊन सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर पुढचा निर्णय मी घेईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

16:22 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेव्हा नेमकं काय घडलं…

सह्याद्रीमध्ये आम्ही बैठक घेतली. आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वपक्षीय बैठक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली, जालन्याच्या जरांगे पाटलांच्या उपोषणाविषयी. त्या बैठकीत साधक-बाधक चर्चा झाली. राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे, राज्यात सर्व जातीधर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने राहात आहेत. शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हिताचं आहे. त्यासाठी आंदोलनाबाबत सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर आम्ही तिघं आपल्याशी चर्चा करायला आलो. चर्चेपूर्वी आम्ही बोलतच येत होते. पण सकारात्मक मुद्द्यांवरच बोलू, कोणतंही राजकीय बोलणं नको अशी आमची चर्चा चालू होती. तेवढं बोलून आपण निघू असं आम्ही बोललो. कोणतंही राजकीय भाष्य नको अशी आमची चर्चा होती. पण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक त्या शब्दाचे पुढचे-मागचे शब्द काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, मराठा समाजात संभ्रमाचं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न केला गेला. विघ्नसंतोषी लोकांकडून हे प्रयत्न झाले. मी तर एवढंच सांगेन की जेव्हा फडणवीसांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं, उच्च न्यायालयात ते टिकलं. पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही. कुणामुळे त्यावर आज मी बोलू इच्छित नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

16:19 (IST) 13 Sep 2023
डोंबिवली नागरी सहकारी बँकेत भुरट्याकडून ग्राहकाची फसवणूक

डोंबिवली: येथील पश्चिमेतील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या विष्णुनगर शाखेत एका भुरट्या चोराने एका बँक ग्राहकाची फसवणूक केली आहे.

सविस्तर वाचा…

15:59 (IST) 13 Sep 2023
डोंबिवलीत सुनीलनगरमध्ये ‘ग’ प्रभाग कार्यालयासमोर बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात एका भूमाफियाने पालिकेच्या ग प्रभाग कार्यालया समोर बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. दिवसाढवळ्या पालिका अधिकाऱ्यांसमोर भूमाफियांकडून बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू असताना ग प्रभागाचे बीट मुकादम, नियंत्रक कनिष्ठ अभियंता यांना हे बेकायदा बांधकाम दिसत नाही का, असे प्रश्न परिसरातील रहिवासी करत आहेत.

सविस्तर वाचा

15:59 (IST) 13 Sep 2023
‘अमर जवान’च्या घोषणा देत समृद्घी महामार्ग रोखला; नेमके कारण काय, जाणून घ्या…

वाशीम : समृध्दी महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील वारंगी टोल नाका येथे वीर जवान आकाश अढागळे यांचे पार्थिव आज दुपारी १२ वाजे दरम्यान दाखल झाले. मात्र, यावेळी प्रशासनाचे कुठलेच अधिकारी, लष्करी अधिकारी उपस्थित नव्हते.

सविस्तर वाचा

15:44 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला!

“बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशिलता? खरतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गॅंगच्या भूलथापा ऐकून घेतंय. ह्या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का? तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय!

15:43 (IST) 13 Sep 2023
शेतकऱ्यांना एफआरपी अधिक ४०० रुपये न मिळण्यास राज्य शासन जबाबदार; राजू शेट्टी यांचा आरोप

कोल्हापूर : राज्य शासन कोणत्याच बाबतीत गंभीर नाही. अगदी मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावू असा वारंवार इशारा देऊनही उसाची एफआरपी आणि प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्य सरकार बेजबाबदार काम करत आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे केला.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 13 Sep 2023
अवघ्या ६ रुपयांत नागपूरचे तीन जण कोट्यधीश! लॉटरीची क्रेझ आणि…

नागपूर : नागपूरसह महाराष्ट्रात सरकारची लॉटरी लोकप्रिय होत आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. अवघ्या काही महिन्यांतच नागपुरातील तिघे केवळ ६ रुपयांत कोट्यधीश झाले आहेत. संपूर्ण राज्यात मागील ६ वर्षांत १००, तर देशभरात २४०० लॉटरी शौकीन कोट्यधीश झाल्याने लॉटरीची लोकप्रियता सतत वाढत आहे.

सविस्तर वाचा…

15:18 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: भिडे गुरुजी सरकारचा सांगकाम्या – विजय वडेट्टीवार

अनेक ठिकाणी ओबीसी समाजाचे तरुण उपोषणाला बसले आहेत. तिथेही जाऊन मुख्यमंत्र्यांनी तेही आंदोलन सोडवावं. राज्यभरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडवावं. काल भिडे गुरुजींनी शिष्यांना प्रमाणपत्र दिलं. 'तुमची फसवणूक करणार नाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा' वगैरे. गुरुजींनी वकिली करून शिष्यांवर विश्वास ठेवायला सांगितलं आहे. गुरुजी तर अजित पवारांच्या काळजात घुसून आले आहेत. भिडे गुरुजी हा सरकारचा सांगकाम्या म्हणून फिरतो का? हा प्रश्न होता. आता त्याचं उत्तर मिळालं आहे – विजय वडेट्टीवार

15:17 (IST) 13 Sep 2023
एमपीएससीचा लिपीक व टंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर; उमेदवारांना सुखद धक्का

वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब व गट क परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.चार महिन्यानंतर हा निकाल जाहीर झाला.मात्र हा निकाल जाहीर करतांना सुखद धक्काही दिला.या विविध गटातील ८ हजार १६९ पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 13 Sep 2023
कोल्हापूर: विश्व हिंदू परिषद संघटन, सेवा क्षेत्राचा देश- विदेशात विस्तार करणार ;महामंत्री मिलिंद परांडे

कोल्हापूर – विश्व हिंदू परिषद भारतातील सर्व राज्यात आणि तालुका स्तरापर्यंत पोहोचली आहे. यंदा हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना संघटनेचा देश-विदेशात विस्तार करणार आहे, अशी माहिती केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी बुधवारी येथे दिली.

सविस्तर वाचा

14:33 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: मुख्यमंत्र्यांचा व्हायरल व्हिडीओ…

मुख्यमंत्र्यांचा व्हायरल व्हिडीओ

14:29 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

14:19 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: सुप्रिया सुळेंची पुणे पोलिसांना विनंती…

बारामतीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली चिंता!

14:11 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: रोहित पवारांचा सरकारला सवाल

सरकारने अतिशय गांभीर्याने विचारविनिमय करून कंत्राटी पद्धतीने भरती सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून या ऐतिहासिक अशा कंत्राटी भरतीसाठी सरकारने नऊ खाजगी कंपन्यांची निवड केली आहे.या ऐतिहासिक भरतीसाठी निवडण्यात आलेल्या कंपन्या कोणाच्या आहेत? त्या कंपन्या कोणत्या पक्षाच्या नेत्यांशी निगडीत आहे? हे माहितीय का? माहित असेल तर कमेंट करा.

13:51 (IST) 13 Sep 2023
चोरीच्या मुरूमाचा जप्त ट्रॅक्टर तलाठी कार्यालयातून पळवला, अट्टल चोरट्यांचा प्रताप

वर्धा: कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन नेणारे अट्टल ऐकले असतील, पण आता जप्त केलेला ट्रॅक्टर थेट तलाठी कार्यालयातून पळवून नेत धूम ठोकणारे सेलू तालुक्यात आढळून आले आहेत.

सविस्तर वाचा…

13:50 (IST) 13 Sep 2023
पिचकारीबहाद्दरांकडून पाच महिन्‍यांत ७.८१ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई

अमरावती : रेल्वेला खासगी मालमत्ता समजून पान, तंबाखू खाऊन गाड्या, प्लॅटफॉर्म, रुळांवर थुंकण्याऱ्या तसेच कचरा करणाऱ्या प्रवाशांवर रेल्‍वेने कारवाईची गती वाढवली आहे. रेल्वे स्टेशन परिसर अस्वच्छ करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर कारवाई करताना मध्‍य रेल्‍वेने गेल्‍या पाच महिन्‍यांत ७.८१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 13 Sep 2023
गोंदिया : झाडाखाली बसून विद्यार्थी घेताहेत शिक्षण; गोंदेखारी येथील शाळेची इमारत जीर्ण, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

गोंदेखारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या जीर्ण असल्यामुळे शाळेतील ४८ विद्यार्थी निंबाच्या झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे घेत आहेत.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 13 Sep 2023
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सकाळच्या सुमारास झाला अपघात

मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा…

13:20 (IST) 13 Sep 2023
मुंबई: ३८८ पुनर्रचित इमारतींना जुन्या नियमावलीतील ९० टक्के लाभ देण्याची शासनाची तयारी; रहिवाशांना १०० टक्के लाभ हवा

मुंबई : दक्षिण मुंबईत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने म्हणजेच म्हाडाने पुनर्बाधणी केलेल्या, परंतु ३० वर्षे पूर्ण न झालेल्या विनाउपकरप्राप्त ३८८ इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(७) नुसार लाभ देण्याचे मान्य झालेले असतानाही शासन निर्णय जारी करण्यात विलंब होत असल्याचे म्हाडा संघर्ष कृती समितीचे म्हणणे आहे.

सविस्तर वाचा

13:19 (IST) 13 Sep 2023
बुलढाणा : मराठा मोर्चासाठी निघालात? मग वाहनतळ व्यवस्था व आचारसंहितेबाबत जाणून घ्याच…

बुलढाणा : आज १३ सप्टेंबरला सकल मराठा क्रांतीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी तेरा तालुक्यातून येणाऱ्या बांधवांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय घोषणांसह अनुषंगिक आचारसंहिता ठरविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: रोहित पवारांनी केला मुख्यमंत्र्यांचा निषेध

हा विषय फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीतला नाही. त्या व्हिडीओचा आम्ही निषेध करतो. समाजाच्या हक्कासाठी कुणीतरी उपोषणाला बसलं आहे. त्या व्यक्तीची प्रकृती खालावली आहे. अशा स्थितीत तुम्ही जर फक्त म्हणत असाल की बोलून मोकळं व्हायचं, याचा अर्थ तुम्ही त्यात राजकारण करत आहात. या सामान्य लोकांच्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करत असाल तर लोकांना सगळ्या गोष्टी कळत आहेत – रोहित पवार

12:52 (IST) 13 Sep 2023
एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय…

12:47 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: रोहित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

हा विषय फक्त मराठा आरक्षणाच्या बाबतीतला नाही. त्या व्हिडीओचा आम्ही निषेध करतो. समाजाच्या हक्कासाठी कुणीतरी उपोषणाला बसलं आहे. त्या व्यक्तीची प्रकृती खालावली आहे. अशा स्थितीत तुम्ही जर फक्त म्हणत असाल की बोलून मोकळं व्हायचं, याचा अर्थ तुम्ही त्यात राजकारण करत आहात. या सामान्य लोकांच्या प्रश्नावर तुम्ही राजकारण करत असाल तर लोकांना सगळ्या गोष्टी कळत आहेत – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी

12:38 (IST) 13 Sep 2023
“आजपर्यंत कोणता उच्चवर्णीय…”, जितेंद्र आव्हाडांचं राज्य सरकारवर टीकास्र; म्हणाले, “कसलं आरक्षण मागताय?”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “खासगी शाळेची फी परवडते का? मागासवर्गीय घरातली मुलं पुढे शिकणारच नाहीयेत. त्यामुळे नव्याने…!”

वाचा सविस्तर

12:30 (IST) 13 Sep 2023
पालखेडचे पाणी वाघदर्डी धरणात, मनमाडकरांना दिलासा

भर पावसाळ्यात तीव्र टंचाई सोसणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या पूर पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 13 Sep 2023
पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या सोसायटींचा शोध; दरडोई २०० लिटरहून अधिक वापराच्या वसाहतींचा नव्याने शोध

ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेली ओढ आणि सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाणीपुरवठा विभागाची चिंता वाढली आहे.

सविस्तर वाचा…

12:28 (IST) 13 Sep 2023
एपीएमसीत आगीशी खेळ; ज्वलनशील पदार्थ, बेकायदा बांधकामे, सुरक्षेची ऐशीतैशी

बाजारपेठ अग्निकल्लोळाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: …तर हा देश पेटेल – जितेंद्र आव्हाड

इंडिया शब्द काढायला तुम्हाला संविधान बदलावं लागेल. यावर चर्चा झाली आहे. हे शब्द कसे आणायचे याबाबतचे आक्षेपांवर चर्चा करून त्यावर एकमताने संविधानावर सह्या करण्यात आल्या. संविधानाच्या कलम १ मध्ये आहे इंडिया, दॅट इज भारत.. त्यामुळे हे बदलण्यासाठी तुम्हाला संविधान बदलावं लागेल. जर संविधान बदललं तर हा देश पेटेल – जितेंद्र आव्हाड

11:42 (IST) 13 Sep 2023
नागपुरात हरवलेला तेलंगणातील रुग्ण दीड महिन्यांनी घरी; निराधार म्हणून मेडिकलमध्ये उपचार आणि…

नागपूर: ताजबागच्या ऊर्समध्ये सहभागी होण्यासाठी दीड महिन्यापूर्वी तेलंगणातील कुटुंब नागपुरात आले होते. त्या कुटुंबातील मानसिक आजार असलेला एक सदस्य हरवला.

सविस्तर वाचा…

11:41 (IST) 13 Sep 2023
नाशिक शहरातील बस, रिक्षा आंदोलनांमागे श्रमिक सेनेचा असाही योगायोग

नाशिक: वेतन आणि दंडात्मक कारवाईच्या मुद्यावरून मध्यंतरी वाहकांनी संप पुकारून मनपाची सिटीलिंक बस सेवा तीन दिवस बंद पाडली होती.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 13 Sep 2023
नागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा! सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

नागपूर: उड्डाण पुलांचे शहर अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये या पुलांवरून धावणाऱ्या सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात चिंतेचा विषय ठरत आहेत.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 13 Sep 2023
नाशिक शहरात माफक दरात शाडू मूर्ती उपलब्ध करण्याची तयारी; महापालिका विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा

नाशिक: गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर रोखण्यासाठी महापालिकेकडून शाडू मातीपासून मूर्ती निर्मितीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 13 Sep 2023
आमदार रोहित पवार… रोहित पाटील.. आणि नागपूरचे झणझणीत तर्री चणा पोहे; काय आहे वाचा…

नागपूर: सावजी आणि तर्री पोहे ही खाद्य संस्कृतीमधील नागपूरची एक वेगळी ओळख आहे. त्यातही नागपुरातील तर्री पोहे प्रसिद्ध आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 13 Sep 2023
आमदार रोहित पवार… रोहित पाटील.. आणि नागपूरचे झणझणीत तर्री चणा पोहे; काय आहे वाचा…

नागपूर: सावजी आणि तर्री पोहे ही खाद्य संस्कृतीमधील नागपूरची एक वेगळी ओळख आहे. त्यातही नागपुरातील तर्री पोहे प्रसिद्ध आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 13 Sep 2023
मराठा आरक्षण क्रांती मोर्चा: बुलढाण्यात येणाऱ्या मार्गांवर तगडा पोलीस बंदोबस्त

बुलढाणा: बुलढाण्यात आज बुधवारी सकल मराठा समाजतर्फे आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गासह शहर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

11:37 (IST) 13 Sep 2023
नागपूर : ‘आरटीओ’कडून चार खासगी वाहन प्रशिक्षण केंद्रांवर कारवाई, काय आहे कारण जाणून घ्या…

नागपूर : येथील वेगवेगळ्या भागात संपर्क कार्यालय अथवा ‘पिक अप पाॅईंट’च्या नावाने व्यवसाय करणाऱ्या चार खासगी वाहन प्रशिक्षण केंद्रांवर (ड्रायव्हिंग स्कूल) नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मंगळवारी कारवाई केली.

सविस्तर वाचा…

11:36 (IST) 13 Sep 2023
‘बीआरएस’ही मैदानात! मराठा आरक्षणावर सुचविला ‘हा’ तोडगा

बुलढाणा : मराठा आरक्षण व जालना लाठीमार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी इतर राजकीय पक्षाप्रमाणेच जिल्ह्यात चंचू प्रवेश करणारी भारत राष्ट्र समितीदेखील सरसावली आहे. पक्षाचे जिल्हा समन्वयक भैय्यासाहेब पाटील यांनी डोणगांव (तालुका मेहकर) येथे साखळी उपोषण सुरू केले आहे.

सविस्तर वाचा..

10:47 (IST) 13 Sep 2023
आमदार गणपत गायकवाड हे कर्तृत्व शून्य आणि पोपटपंचीच जास्त, कल्याण मधील शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांची टीका

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी आ. गायकवाड यांचे कर्तृत्व एकदम शून्य आणि ते फक्त पोपटपंची करत बसतात. लोकांना भुलभुलय्या दाखवितात, अशी टीका केली आहे.

सविस्तर वाचा…

10:32 (IST) 13 Sep 2023
Maharashtra Live News Today: जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर हल्लाबोल!

शरद पवारांना आव्हान दिलंय की तुम्ही इमानदार आहात हे सिद्ध करा. या नेत्यांना शायरी किती समजते माहिती नाही. तुमची एवढी लायकी आहे का की तुम्ही शरद पवारांना इमानदारी सिद्ध करा सांगण्याची. शायरी म्हणायला मजा येते. पण अर्थ काय निघतो ते तरी बघा. शरद पवारांना इमानदारी सिद्ध करून दाखवायला आख्खा महाराष्ट्र पडलाय – जितेंद्र आव्हाड

मनोज जरांगे पाटील

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची प्रत्येक अपडेट

Web Title: Maharashtra news live maratha reservation manoj jarange patil loksabha election 2024 india meeting sharad pawar pmw

First published on: 13-09-2023 at 10:31 IST