scorecardresearch

Premium

Maharashtra Breaking News : वसतीगृह हत्याप्रकरण : समाजकल्याण विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Mumbai News Updates, 08 June 2023 महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी

Mumbai News Live Updates
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Maharashtra Mumbai News Today : औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवल्याप्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर अशांत आहे. बुधवारी कोल्हापुरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी तिथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावरून राज्याच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी विरोधक याप्रकरणी आमने सामने आले असून एकमेकांवर आगपाखड केली जात आहे. दरम्यान, औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवणारे हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Live Updates

Maharashtra News Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

20:02 (IST) 8 Jun 2023
पुणे: पक्के लायसन्स काढताय? RTOच्या कामकाजातील बदल जाणून घ्या…

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कामकाजात बदल केला आहे.

सविस्तर वाचा…

19:43 (IST) 8 Jun 2023
मुंबईत विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे: मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील शासकीय वसतिगृहांचा सुरक्षा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती वसतिगृहांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहे.

सविस्तर वाचा…

18:51 (IST) 8 Jun 2023
Mira Road Murder : सरस्वतीची हत्या करणारा मनोज साने दुर्धर आजाराने त्रस्त

अत्यंत क्रूरपणे सरस्वती वैद्यची हत्या कऱणारा मनोज साने हा आरोपी दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरस्वतीला घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडायचा. त्यावरून त्यांच्यात भांडणे होत असल्याचेही समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

18:48 (IST) 8 Jun 2023
नवी मुंबई : शहराच्या सौंदर्याला हरताळ, नेरुळमध्ये उद्यान-सभागृहाच्या संरक्षक भिंती बनल्या आहेत कपडे वाळत टाकण्याच्या जागा

नवी मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छतेमधील मानांकनात महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्यासह स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नवी मुंबई स्वच्छतेत अग्रभागी राहिलेली आहे.

सविस्तर वाचा…

17:56 (IST) 8 Jun 2023
सावधान! शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फसवणुकीचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

नागपूर: बँकेचा व्यवस्थापक असल्याचे सांगून सामान्य नागरिकांना फोन करायचा आणि त्यांच्याकडून बॅंक खात्याचा तपशील घेऊन त्यांचे बॅंक खाते रिकामे करायचे. हा प्रकार नित्याचा झाला आहे. पण आता फसवणूक करणाऱ्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलली आहे.

सविस्तर वाचा…

17:43 (IST) 8 Jun 2023
वसतीगृह हत्याप्रकरण : समाजकल्याण विभागाचा अक्षम्य हलगर्जीपणा, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

“मुंबईतील वसतिगृहात एका विद्यार्थिनीसोबत झालेल्या प्रकाराबद्दल मरीन लाईन्स पोलिस स्टेशन येथे तपास अधिकाऱ्यांशी आणि विद्यार्थिनीच्या कुटुंबाशी चर्चा केली. घडलेल्या प्रकारात वॉर्डनचीही चौकशी करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. एकूण प्रकारात मुंबईच्या समाजकल्याण विभागाने अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे. बेजबाबदार अधिकाऱ्यांवर उचित कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असं ट्वीट वंचित बुहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1666779313780445185?s=20

17:41 (IST) 8 Jun 2023
Mira Road Murder : किचन मध्ये मृतदेह शिजवायचा आणि जेवायला बाहेर जायचा; मनोज सानेचे अंगावर शहारे आणणारे क्रोर्य

लिव्ह इन मध्ये राहणार्‍या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे कऱणार्‍या मनोज साने याला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्या करून ज्या प्रकारे त्याने मृतदेहाचे असंख्य तुकडे केले ते क्रोर्य अंगावर शहारे आणणारे आहे.

सविस्तर वाचा…

17:35 (IST) 8 Jun 2023
अमरावती : अपत्यप्राप्तीसाठी पूजा मांडली, ७० हजार उकळले आणि लैंगिक शोषण, भोंदूबाबा पोहोचला थेट कारागृहात

अमरावती : अपत्‍यप्राप्‍तीसाठी पूजा करावी लागेल, असे सांगून एका भोंदूबाबाने महिलेचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्‍याची घटना दर्यापूर तालुक्‍यातील कुकसा येथे उघडकीस आली. या भोंदूबाबाने पीडित महिलेकडून ७० हजार रुपयेदेखील उकळले. या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली आहे.

सविस्तर वाचा…

17:31 (IST) 8 Jun 2023
नेवाळी नाका कारवाई: कल्याण पूर्वेतील नेवाळी नाका परिसरातील बेकायदा बांधकामे भुईसपाट

कल्याण: कल्याण पूर्वेतील नेवाळी नाका परिसरातील गाव, पाड्यांवर मोकळ्या माळरानांवर सुरू असलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे बुधवारी आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली.

सविस्तर वाचा…

16:52 (IST) 8 Jun 2023
पटोले समर्थकांचीही दिल्लीवारी, खरगेंच्या भेटीत काय झाली चर्चा?

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधकांनी दिल्लीवारी केल्यानंतर आता पटोले समर्थकही दिल्लीत धडकले असून, त्यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली.

सविस्तर वाचा…

16:45 (IST) 8 Jun 2023
दहावी, बारावी परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांनाे एक अर्ज करा, दहा हजार रुपये मिळवा

नागपूर: जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्यांनी त्यांच्या शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातून सन २०२३-२४ या सत्रातील फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव निकाल कळल्यानंतर सादर करावे.

सविस्तर वाचा…

16:43 (IST) 8 Jun 2023
मुंबई: नालेसफाईच्या कामांबाबत तक्रारी फक्त १५ जूनपर्यंतच; पाच दिवसात १०२ तक्रारी

मुंबई: नालेसफाईच्या कामांबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई महानगरापालिकेने आता १५ जूनपर्यंतची मुदत दिल्याचे जाहीर केले आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी पालिकेने १ जूनपासून ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली होती.

सविस्तर वाचा…

16:40 (IST) 8 Jun 2023
श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क अभियानात ठाकरेंच्या अपयशावर अधिक टीका

ठाणे : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू केलेल्या शाखा संपर्क अभियानात रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांसह शहर आणि उपनगरात रखडलेले झोपडपट्टी तसेच म्हाडाचे पुर्नविकास प्रकल्प, संक्रमण शिबीरातील रहिवाशांचे होणारे हाल, क्लस्टर योजनेतील अडथळे यासारख्या मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रभाव क्षेत्र असलेल्या भागात या संपर्क अभियानाची व्याप्ती ठरवून वाढवली जात आहे.

सविस्तर वाचा…

15:52 (IST) 8 Jun 2023
मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात मात्र अजूनही घामाच्या धारा

नागपूर : राज्याच्या किनारपट्टी भागांवरून घोंगावणारे वादळ पुढे सरकत असतानाच विदर्भात मात्र तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढत चालला आहे. विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान ४३ अंशाच्याही पलीकडे गेले आहे. आता केरळमध्ये मान्सूनची घोषणा हवामान खात्याने केल्यानंतर महाराष्ट्रालाही पावसाचे वेध लागले आहेत.

सविस्तर वाचा…

15:45 (IST) 8 Jun 2023
नागपूर : जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू

नागपूर : नागपुरातील जेष्ठ पत्रकार अरुण फणशीकर (७०, आदित्य अपार्टमेंट, गिरीपेठ) यांचा आज संशयास्पदरित्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

सविस्तर वाचा…

15:43 (IST) 8 Jun 2023
अकोला: चोरट्याच्या कबुलीने फिर्यादीचे पितळ उघडे पडले; वाचा कसे ते…

अकोला: मोबाइल दुकानाच्या गल्ल्यातून पैशांची चोरी झाली. दुकानदाराने तक्रार दिल्यावर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत चोरट्याला गजाआड केले. मात्र, चोरट्याच्या कबुली जबाबाने चक्क फिर्यादी दुकानदाराचेच पितळ उघळे पडल्याचा अजब प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

15:28 (IST) 8 Jun 2023
नागपूर : ‘मेमू’ ट्रेन म्हणजे काय? कुठे धावणार

नागपूर : मध्य रेल्वेने एक्स्प्रेस गाड्यांना ‘मेमू’मध्ये रुपांतरित करण्यास सुरुवात केली असून, आता अजनी ते अमरावती एक्सप्रेस ही गाडी ‘मेमू’ म्हणून धावणार आहे.

सविस्तर वाचा..

15:15 (IST) 8 Jun 2023
मुंबई : राज्यात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत घट

राज्यात २०२१ मध्ये १२ हजार ७२० डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर ४२ जणांचे मृत्यू झाले होते. मात्र २०२२ मध्ये राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. २०२२ मध्ये राज्यात ८ हजार ५७८ डेंग्युचे रुग्ण आढळले तर २७ जणांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

14:48 (IST) 8 Jun 2023
गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गतच्या श्रीनगरातील चंद्रशेखर वॉर्ड येथील रहिवासी महिलेचा तिच्याच मुलाने खून केला. कुणीतरी अज्ञाताने आईचा खून केला आणि आपल्यालाही मारहाण केली, असा बनाव त्याने रचला. मात्र, पोलीस चौकशीत त्याचे बिंग फुटले. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वाचा…

14:37 (IST) 8 Jun 2023
मुंबई ATS कडून अकोला दंगल प्रकरणात गोपनीय चौकशी; शासनाला अहवाल सादर करणार

अकोला: शहरातील दंगल प्रकरणाची मुंबई एसटीएसकडून गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्या अहवालावरून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

14:29 (IST) 8 Jun 2023
मोसमी वारे केरळमध्ये दाखल, हवामान विभागाकडून आनंदाची बातमी

मोसमी वारे अखेर केरळमध्ये दाखल झाले. हवामान विभागाने आनंदाची ही माहिती दिली आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस केरळमध्ये पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने काल, बुधवारी जाहीर केले होते. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोसमी वारे आज, गुरुवारी केरळमध्ये दाखल झाले आहे.

सविस्तर वाचा

14:29 (IST) 8 Jun 2023
धुळ्यातील रस्त्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या श्रेय वादात स्थानिकांना मनस्ताप

धुळे – एकीकडे रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा खासदार, आमदारांकडून केला जात असला, तरी दुसरीकडे पांझरा नदीकाठच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येकी साडेपाच किलोमीटरच्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

सविस्तर वाचा..

14:27 (IST) 8 Jun 2023
Kolhapur Violence :कोल्हापूर गदारोळप्रकरणी छत्रपती शाहू महाराज म्हणाले, “यापुढे पोलिसांनी…”

कोल्हापुरात धार्मिक अशांतता निर्माण झाली आहे. औरंगजेबाचे फोटो काही तरुणांनी व्हॉट्स अॅप स्टेटसला ठेवल्याने गेल्या दोन दिवासंपासून कोल्हापुरात राडा सुरू आहे. याविरोधात हिंदुत्त्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. बुधवारी कोल्हापुरात कडकडीत बंदही ठेवण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराज यांनी पोलिसांना मोलाचा सल्ला दिला आहे.

सविस्तर वाचा

14:20 (IST) 8 Jun 2023
नाशिक: जिल्ह्यात जलकुंभ स्वच्छता, हातपंप शुध्दीकरण मोहीम

नाशिक: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून जिल्ह्यात जलकुंभांची स्वच्छता व शुद्धीकरण तसेच हातपंपांचे शुद्धीकरण करण्याच्या विशेष मोहिमेस सुरुवात झाली. जिल्ह्यात १५ जूनपर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा येथील जलकुंभ, टाक्यांची स्वच्छता तसेच हातपंप शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

वाचा सविस्तर

14:17 (IST) 8 Jun 2023
नॅक मूल्यांकन केले नाही म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय!

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. नॅक मूल्यांकन ही अनिवार्य प्रक्रिया असूनही राज्यातील अनेक महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

सविस्तर वाचा

14:11 (IST) 8 Jun 2023
पुणेकरांसाठी ‘पीएमपी’ बसची रातराणी सेवा; जाणून घ्या मार्ग

कात्रज शिवाजीनगर सेवेचा मार्ग स्वारगेट, शनिपार, महापालिका भवन असा आहे. तर स्वारगेट, नाना पेठ, रास्ता पेठ मार्गे कात्रज ते पुणे रेल्वे स्थानक रातराणी धावणार आहे. हडपसर ते स्वारगेट गाडीचा मार्ग वैदूवाडी, रामटेकडी, पुलगेट असा असून हडपसर ते पुणे रेल्वे स्थानक गाडी पूलगेट, बाॅम्बे गॅरेज, वेस्ट एंड टाॅकिज मार्गे धावणार आहे.

सविस्तर वाचा

14:11 (IST) 8 Jun 2023
आळंदी: राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन!

पुण्याच्या आळंदीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्याचे पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे यांनी गाथा परिवाराने आयोजित केलेल्या कीर्तन आणि प्रवचन प्रशिक्षणाच्या सांगता समारंभास हजेरी लावली होती. टाळ मृदुंगाच्या गजरात कीर्तन सादर झाल्यानंतर सुप्रिया सुळे कीर्तनात तल्लीन झाल्या. 

सविस्तर वाचा

14:07 (IST) 8 Jun 2023
भाजप मावळ, शिरूरवर दावा करणार का? बाळा भेगडे म्हणाले, “जर भाजप आणि…”

मावळ, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वेक्षणाच्या माध्यमातून आमचे काम सुरू आहे. ज्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल. त्याबाबत वरच्या पातळीवर बोललो तर त्या पक्षाला जागा मिळतील. सर्वेक्षणामध्ये भाजप विजयी होईल असे दिसत असेल तर भाजप त्या ठिकाणी ताकदीने लढेल.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 8 Jun 2023
भंडारा डेपोमधून १० हजार १६५ ब्रास वाळू विक्री; ऑनलाईन विक्रीला प्रतिसाद

भंडारा: नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासोबतच अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या दृष्टीने नवीन वाळू धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ४७३ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी १० हजार १६५ ब्रास वाळू विक्री झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:06 (IST) 8 Jun 2023
पुणे : पालखी सोहळ्यासाठी पीएमपीकडून आजपासून विशेष बस सेवा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी आणि देहू येथे उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी पीएमपीने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. ही सेवा गुरुवारपासून (८ जून) सुरू होत असून येत्या सोमवारपर्यंत (१२ जून) ती सुरू असेल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा

14:04 (IST) 8 Jun 2023
अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; पिंपरीतून ४१ किलो गांजा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाण या ठिकाणी आरोपी संजय मोहन शिंदे हा गेल्या काही महिन्यापासून राहत असून त्याने ३१ किलो गांजाचा साठा जमा केला होता अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पथकाने त्या ठिकाणी छापा मारून त्याच्याकडून ३१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

14:02 (IST) 8 Jun 2023
Metro 3: आरे ते बीकेसी टप्प्याचे ८८ टक्के काम पूर्ण; बीकेसी ते कफ परेड टप्पाही वेगात

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे (एमएमआरसी) लक्ष्य आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्याच्या कामाला एमएमआरसीने वेग दिला असून आतापर्यंत या टप्प्याचे ८८.२ टक्के काम पूर्ण झाल्याचे एमएमआरसीने जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा

14:00 (IST) 8 Jun 2023
पुण्यात ‘या’ भागात दिवसाआड पाणीपुरवठा

शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार शहरात सध्या दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४, खराडी मधील काही भागात अपुऱ्या पाणीपुरवठा विषयक तक्रारी येत आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने खराडीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

13:59 (IST) 8 Jun 2023
श्री जेजुरी देवस्थानचा वाद मिटला, घेतला ‘हा’ निर्णय

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळावर सातपैकी बाहेरील पाच विश्वस्त नेमल्याने सुरू असलेले आंदोलन स्थानिक चार विश्वस्तांची नेमणूक करण्याच्या निर्णयानंतर मागे घेण्यात आले. त्यामुळे जेजुरीमधील तणाव निवळला असून स्थानिक चार विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार असल्याने विश्वस्तांची संख्या ११ होणार आहे.

सविस्तर वाचा

13:55 (IST) 8 Jun 2023
गिरीश कुबेर यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह मजकुराचे प्रकरण: बदनामीकारक मजकूर हटवण्याचे स्प्राऊट्सला आदेश

इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूह आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याविषयी उन्मेश गुजराथी आणि स्प्राऊट्स प्रकाशनाने त्यांचे संकेतस्थळ आणि विविध समाजमाध्यम व्यासपीठावर प्रसिद्ध केलेला आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचा अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने गुजराथी आणि स्प्राऊट्स प्रकाशनाला दिला आहे.

सविस्तर वाचा

13:34 (IST) 8 Jun 2023
“मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले आणि…”, मीरा रोडमधील महिलेच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले.

सविस्तर वाचा

13:33 (IST) 8 Jun 2023
पुणे : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सायबर चोरट्यांचे फसवणुकीचे प्रकार सुरूच; निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे ‘असे’ गेले दोन कोटी

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

13:32 (IST) 8 Jun 2023
पुणे महापालिकेतील मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना दिलासा; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

या पदांची समाज विकास विभागाला आश्यकता असल्याने महापालिकेने या पदांची निर्मिती करणे आणि त्या पदांवर सेवकांना सामावून घेण्यास मान्यता दिली होती. महापालिका प्रशानसाने १८७ पदांची निर्मिती करून त्यावर १६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.

सविस्तर वाचा

13:27 (IST) 8 Jun 2023
नवी मुंबई : चोरट्यांना मातीही पुरेना! तीन लाख २५ हजारांची माती चोरी, गुन्हा दाखल

नवी मुंबई : चोरटे तेच चोरी करतात ज्याला भाव चांगला मिळतो. फार झाले तर ज्याची गरज आहे, अशी वस्तू चोरी करतात, असे नेहमीच पोलीस वर्तुळात म्हटले जाते. शहरी भागात मातीला आता मोठी किंमत मिळत असली तरी माती चोरी हा प्रकार समोर आला नाही. मात्र नवी मुंबईतील एन.आर.आय पोलीस ठाणे हद्दीत मोठा खड्डा खोदून मागणी असलेली लाल माती चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 8 Jun 2023
मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…

मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपी मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघेही अनाथ असल्याचं निमित्त होत ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहू लागल्याची माहिती समोर आली आहे.

वाचा सविस्तर….

13:16 (IST) 8 Jun 2023
ठाणे: शिळफाटा येथे रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

ठाणे: शिळफाटा येथील शेळ महापे रोड परिसरात रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 8 Jun 2023
आश्चर्य! एकाच डहाळीला तब्बल दोन डझन आंबे

भंडारा : साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 8 Jun 2023
आश्चर्य! एकाच डहाळीला तब्बल दोन डझन आंबे

भंडारा : साकोली तालुक्यातील पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे.

सविस्तर वाचा..

13:06 (IST) 8 Jun 2023
वर्धा : मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर असुरक्षित खाद्यपदार्थ, अनेकांवर कारवाई

वर्धा : जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आकस्मिक तपासणी करीत खाद्य विक्रेत्यांचा धांडोळा घेतला. त्यात काही गाड्यांमध्ये खाण्यास अयोग्य पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच मान्यताप्राप्त नसलेल्या पेयजल बॉटल, फ्रूट ज्यूस जप्त करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 8 Jun 2023
महंताचा उल्लेख करीत मंत्री संजय राठोड यांची सावध खेळी

यवतमाळ – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी, ‘गेल्या वर्षी राज्यात राजकीय उलथापालथ झाली तेव्हा आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत राहावे लागेल, असा सल्ला समाजातील संत, महंतांनी दिला. त्यामुळे अखेर गुवाहाटीला शिंदे यांच्या गटात गेलो’, असे वक्तव्य बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बंजारा समाज मेळाव्यात केले.

सविस्तर वाचा…

13:05 (IST) 8 Jun 2023
पवारांवरील ‘ते’ ट्वीट निलेश राणेंनी जबाबदारीने केलं असेल, नितेश राणेंची प्रतिक्रिया

“निलेश राणे जबाबदार नेते आहेत. माजी खासदार आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाचा त्यांना अभ्यास आहे, अनुभव आहे. त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्विटरवरून ते ट्वीट आल्यामुळे त्यांनी जबाबदारी ते ट्वीट केलं असेल असा मला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

12:53 (IST) 8 Jun 2023
समीर वानखेडे यांना दिलासा, २३ जूनपर्यंत अटक नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

आर्यन खान ड्रग्सप्रकरणी एनसीबीचे विभागीय माजी संचालक समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान, त्यांना २३ जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले आहेत. त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. हा जामीन आता २३ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच, त्यांच्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी समीर वानखेडे यांच्या वकिलाने केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1666705344960270337?s=20

12:50 (IST) 8 Jun 2023
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा?

गोंदिया: गोंदियातील बाई गंगाबाई महीला रुग्णालय व गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयातील रक्तपेढीमध्ये २०७५ युनिट इतका मोठ्या रक्तसाठ्याची क्षमता असून सुद्धा बुधवार ७ जून २०२३ पर्यंत फक्त ८८ युनिट रक्त साठा उपलब्ध आहे, तर दररोज २० ते २५ युनिट रक्ताच्या पिशव्या रुग्णांसाठी आवश्यक असतात.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 8 Jun 2023
Video : सोशल मीडिया अकाऊंट्स डिलिट, ४०० जणांवर गुन्हे, ३६ जण अटकेत; कोल्हापूर दंगलीप्रकरणी पोलीस म्हणाले…

Kolhapur Riots : कोल्हापुरात गेले दोन दिवस अशांतता आहे. काही मुलांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर ओरंगजेबाचे फोटो ठेवल्याप्रकरणी हा राडा सुरू झाला. मंगळवारी कोल्हापुरात दंगल उसळल्यानंतर बुधवारी कोल्हापूर बंद पाळण्यात आला. आताही कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ३६ जणांना अटक केली असून यामध्ये तिघेजण अल्पवयीन आहेत. त्यांना आज बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

सविस्तर वाचा

12:29 (IST) 8 Jun 2023
वर्धा: मान्यता रद्द करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काय होणार?

वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक ‘नीट’ परीक्षेच्या निकालाची इच्छुकांना प्रतीक्षा आहे. असे असतांनाच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने देशभरातील ३८ वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द केली आहे.

सविस्तर वाचा…

Updates in Maharashtra

महाराष्ट् न्यूज

Maharashtra News Today

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra news live marathi batmya monsoon updates pune mumbai nagpur kolhapur breaking today 8 june 2023 sgk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×