Maharashtra Political News Updates, 20 May 2026 : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेले लातूरमधील आरसीसी क्लास या शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची मंगळवारी चौकशी करण्यात आली. यासह सीबीआयने देशभरातील चौकशीला गती दिली आहे. त्यामुळे रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. पक्षीय बलाबलनुसार उमेदवारी मिळणार की घोडेबाजार होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच, राज्यातील तापमानही दिवसेंदिवस वाढत असून उन्हाळा असह्य झाला. आज महत्त्वाचं म्हणजे देशभर औषध दुकानदारांनी संप पुकारला असल्याने औषधांच्या खरेदी-विक्रीवर मर्यादा येणार आहेत. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Marathi News Live Updates, 20 May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

18:59 (IST) 20 May 2026

जळगावात लाचखोरीचा कहर… सहकारी संस्था उपनिबंधकासह खासगी इसम दीड लाखांची लाच स्वीकारताना जाळ्यात!

अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी ५ लाखांची लाच मागून ३ लाखांत तडजोड करण्यात आली होती, ज्याचा पहिला हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. ...सविस्तर बातमी
18:28 (IST) 20 May 2026

सावघान ! पुढील दोन-तीन दिवस अत्यंत धोकादायक, हवामान तज्ज्ञांनी असा का दिला इशारा?

२१ मे रोजी रेड अलर्ट तर २२-२३ मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
18:16 (IST) 20 May 2026

डॉ.आनंद नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी ठाण्यात शोकसभा

डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी, १५ मे रोजी पहाटे उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...सविस्तर वाचा
17:52 (IST) 20 May 2026

वरळी बीडीडीतील आणखी ८२७ रहिवाशांची स्वप्नपूर्ती; घराच्या ताबा प्रक्रियेला गुरुवारपासून सुरुवात

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील ८२७ घरांची ताबा प्रक्रिया गुरुवारपासून (२१ मे) सुरू होत आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत इमारत क्रमांक १ मधील एफ, जी, एच विंगमधील पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या सदनिका सुपूर्द केल्या जातील. ...वाचा सविस्तर
17:40 (IST) 20 May 2026

Bandra Demolition: वांद्र्यात लाठीचार्ज; रेल्वेच्या अतिक्रमण हटाव अभियानाला नागरिकांचा तीव्र विरोध

पश्चिम रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेला कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी (१९ मे) सुरुवात करण्यात आली. दरम्यान, या कारवाईला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून, यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

17:35 (IST) 20 May 2026

ठाणे रेल्वे स्थानकात यंदा पावसाळ्यात रुळांवर पाणी तुंबणार नाही; खासदार नरेश म्हस्के व डीआरएम यांच्याकडून कामांची संयुक्त पाहणी

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सॅटीस प्रकल्पाची कामेही लवकरच पूर्ण करणार असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ...वाचा सविस्तर
17:23 (IST) 20 May 2026

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सज्ज; गैरसोय टाळण्यासाठी तयारी

पशुवधगृहात व्यापारी आणि ग्राहकांची होणारी गर्दी, तसेच मोठ्या संख्येने आणण्यात येणारे बकरे यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये यादृष्टीने मुंबई महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहे. ...वाचा सविस्तर
17:12 (IST) 20 May 2026

तांत्रिक सापळ्यात अडकला आदिवासी; वनहक्क मिळूनही शेतकरी दर्जापासून शेकडो बांधव वंचित!

प्रशासकीय अनास्था आणि तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल ९८ टक्के आदिवासी बांधवांची नोंदणी रखडली असून, त्यांच्यावर होणाऱ्या या अन्यायाविरोधात श्रमिक मुक्ती संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांकडे पत्राद्वारे दाद मागितली आहे. ...सविस्तर वाचा
16:57 (IST) 20 May 2026

शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम चौकातील वाहतूक सिग्नलचा ट्रकच्या धडकेत चक्काचूर

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम चौकातील वाहतूक सिग्नलला एका मालवाहू ट्रकने पाठीमागे घेताना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत सिग्नलचा खांब कोसळून दिव्यांचा चक्काचूर झाला आहे. ...वाचा सविस्तर
16:43 (IST) 20 May 2026

ड्रोन प्रशिक्षणातून रोजगार संधी !, विशेष योजनेतून ड्रोन प्रशिक्षण आणि उड्डाण परवाना

प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
16:34 (IST) 20 May 2026

मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर आंदोलनादरम्यान बस अपघातात जखमी महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाबाहेर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आशा सहाणे या महिला सफाई कर्मचाऱ्याचा बस अपघातातील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
15:39 (IST) 20 May 2026

जनाई-शिरसाई पाणीप्रश्नी रोहित पवार आक्रमक; लेखी आदेश मिळेपर्यंत सिंचन भवनातून न हलण्याचा इशारा

जनाई-शिरसाई, सीना, कुकडी आणि पुरंदर योजनांच्या पाणीप्रश्नी प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नसल्याच्या निषेधार्थ आमदार रोहित पवार आज सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांसह सिंचन भवनात दाखल झाले. त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. अतिरिक्त पाणी न देण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी सिंचन भवनात आंदोलन सुरू केले आहे.

"आम्ही पाणी वाढवून देण्याची मागणी केली होती, ती प्रशासनाने मान्य केली आहे. मात्र त्यांनी अद्याप लेखी आदेश दिलेले नाहीत. जोपर्यंत लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही", असं रोहित पवार म्हणाले.

15:10 (IST) 20 May 2026

‘सुपर एल निनो’चा इशारा! ठाण्यात उष्णतेविरोधात ‘व्हाईट पेंट’ मोहीम, पाणी चोरीवरही कारवाई

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी “सुपर एल निनो” मुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला. ...सविस्तर वाचा
14:59 (IST) 20 May 2026

स्वावलंबी शेतीसाठी कृषी विभागाच्या दोन महत्त्वाच्या योजना

राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध तसेच आदिवासी शेतकरी अजूनही सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, आर्थिक मर्यादा आणि आधुनिक कृषी साधनांच्या अभावामुळे शेतीत मागे असल्याचे चित्र आहे. ...अधिक वाचा
14:50 (IST) 20 May 2026

LIVE : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणाबाबत काय ठरलं? शशिकांत शिंदे म्हणाले...

महाराष्ट्रातील सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याबाबत बैठक होती. नेते, पदाधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले आहेत. विलीनीकरणाचा विषय संपला आहे. यापुढे विलीनीकरणाचा चर्चा होणार नाही. पवारांच्या नेतृत्त्वाखाली आमच्याकडे नेता म्हणून चेहरा आहे, तो चेहरा महाराष्ट्रभर घेऊन जाणार -शशिकांत शिंदे

14:27 (IST) 20 May 2026

२० डॉलर दाखवले, हातावर 'साबण' टेकवला! पलावातील व्यावसायिकाला कळंबोलीत २ लाखांना गंडा

कल्याण जवळील पलावा येथील एका व्यावसायिकाला २० अमेरिकन डॉलरच्या ५०० नोटा देण्याचे आमिष दाखवून २ लाख रुपयांना गंडवल्याची घटना समोर आली आहे. ...अधिक वाचा
14:17 (IST) 20 May 2026

ठाणे-पालघर मतदार संघावर भाजपचा दावा, स्थानिक नेते वरिष्ठांकडे करणार मागणी

ठाणे जिल्ह्यात भाजपचे एकूण १८ आमदार आहेत. त्यापैकी भाजपचे नऊ तर, शिंदे सेनेचे सहा आमदार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र आहे. ...सविस्तर वाचा
14:13 (IST) 20 May 2026

नांदेडमध्ये युवा सेनेचे आरसीसी कोचिंग क्लासेसवर शाईफेक आंदोलन

आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या वतीने आरसीसी कोचिंग क्लासेसवर शाईफेक आंदोलन करण्यात आले.

14:03 (IST) 20 May 2026

राहुल गांधी रिजेक्टेड माल - मुख्यमंत्री फडणवीस

राहुल गांधी यांच्यावर मागच्या वेळेस मी टीका केल्यामुळे शरद पवार यांना राग आला होता. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत. मात्र आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर अश्लाघ्य शब्दांत टीका केली आहे. त्यामुळेच मी राहुल गांधी यांना रिजेक्टेड माल असल्याचे म्हणतो. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाचे शरद पवार यांनी कौतुक केल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

13:46 (IST) 20 May 2026

"संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलू नका" शासनाच्या नामांतराच्या प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध

कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे नाव १९८१ साली उद्यानाला देण्यात आले. तर गेल्या ४५ वर्षांपासून उद्याची ही ओळख तशीच कायम आहे. ...सविस्तर वाचा
12:53 (IST) 20 May 2026

"आधीच पेट्रोल-डिझेल कमी, त्यात तुम्ही कशाला पेटवा-पेटवी करता?", सुनील तटकरेंच्या नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

सुनील तटकरे नाराज आहेत का? म्हणून ते कोणत्याच बैठकांना येत नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर छगन भुजबळ म्हणाले, "मी, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी आताच एकत्र दोन ते तीन तास चर्चा केली. आधीच इंधन कमी आहे, त्यात तुम्ही कशाला पेटवापेटवी करता?"

12:50 (IST) 20 May 2026

मिरा भाईंदर महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय झाले डिजिटल; पेपरलेस कारभाराकडे वाटचाल

मागील काही वर्षांत रुग्णालयाचे मजले वाढवणे, वैद्यकीय उपकरणे बसवणे तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
12:50 (IST) 20 May 2026

"शरद पवार चांगल्याला चांगलं म्हणतात", छगन भुजबळांचं विधान

मोदींच्या परदेश दौऱ्यावर शरद पवारांनी समर्थन केल्यावर छगन भुजबळ म्हणाले, "शरद पवार चांगल्याला चांगलं म्हणतात. स्वतः मोदी म्हणाले आहेत की राजकारणात पवार मार्गदर्शक राहिले आहेत. पवार कृषीमंत्री असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हाही पवारांनी गुजरातच्या उन्नतीसाठी मार्गदर्शन केलं आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्ष म्हणून समजतात, शत्रू पक्ष समजत नाहीत. -छगन भुजबळ

12:19 (IST) 20 May 2026

विरार मध्ये जर्जर इमारतीचा स्लॅब कोसळला; महिला गंभीर जखमी

सोसायटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...सविस्तर वाचा
12:19 (IST) 20 May 2026

कल्याणमधील दोन सेवानिवृत्तांना केवायसी, टर्म पाॅलिसीच्या नावाने भामट्यांचा ५६ लाखाचा गंडा

कल्याणमध्ये सायबर गुन्हेगारांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून तब्बल ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. ई-केवायसी आणि टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ६ भामट्यांनी ही फसवणूक केली ...सविस्तर वाचा
11:53 (IST) 20 May 2026

"केंद्रीय अर्थमंत्री कुठे आहेत?", मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

रुपया प्रचंड घसरत आहे आणि आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन ठरले आहे… उद्योगधंद्यांना फटका बसत आहे, देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) बंद पडत आहेत, नागरिकांना महागाईचा सर्वाधिक फटका बसत आहे… जे सरकार ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत होते आणि निवडणुकीपूर्वी ‘सगळं ठीक आहे’ असे म्हणत होते, तेच आता अचानक नागरिकांना सोने खरेदी करणे थांबवून काटकसर करण्यास सांगत आहे… आजचा खरा प्रश्न हा आहे की, अर्थमंत्री कुठे आहेत? त्यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे का दिली नाहीत? - आदित्य ठाकरे</p>

https://twitter.com/AUThackeray/status/2056979338910933174

11:51 (IST) 20 May 2026

रोहित पवार खरंच नाराज? बैठकीला गैरहजर राहण्याबाबत म्हणाले, "पक्ष आणि वरिष्ठ नेते..."

https://twitter.com/RRPSpeaks/status/2056978122030088454

11:35 (IST) 20 May 2026

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात कोकणातील चार हजार औषध विक्रेत्यांचा संप; रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील औषध दुकाने बंद

ऑनलाईन औषध विक्री आणि घरपोच औषध वितरणाला दिलेल्या विशेष सवलतीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आज देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे चार हजार औषध विक्रेते सहभागी झाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल सातशे पन्नास औषध दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी चोवीस तासांचा बंद पाळला.

11:34 (IST) 20 May 2026

धुळे जिल्ह्यातील १८०० औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे आज बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये धुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे १८०० औषध विक्रेते सहभागी झाल्याची माहिती जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली आहे. शिरपूर शहरातील औषध विक्रेत्यांनी आज करवंद नाका येथून तहसील कार्यालयापर्यंत हातात फलक घेऊन तसेच काळ्या पट्ट्या बांधून पायी मूक मोर्चा काढला.

11:29 (IST) 20 May 2026

Motegaonkar class sealed : मोठी बातमी : पुण्यातील मोटेगावकर क्लासला महापालिकेने ठोकले टाळे! डेक्कन परिसरात कुठे सुरू होता क्लास?

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील जंगली महाराज (जेएम) रस्त्यावरील आरसीसी मोटेगावकर क्लासला पुणे महापालिकेने टाळे ठोकले आहे. भोगवटापत्र (ऑक्यूपेशन सर्टिफिकेट) आणि अग्निशमन दलाची 'एनओसी' नसतानाही हा क्लास बेकायदेशीरपणे सुरू होता. ...सविस्तर वाचा

Sanjay Raut Live: संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र Live|PK5

Marathi News Live Updates, 20 May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा