Maharashtra Political News Live Updates, 15 April 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच बारामती विधानसभा पोटनिवडणूकदेखील जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार चालू असून दोन्ही राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राज्यातल्या राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra Mumbai Pune News Live Updates, 15 April 2026: महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा

19:47 (IST) 15 Apr 2026

अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? एकाचा मृतदेह आढळला; जगातील सर्वाधिक तापमान…

शहरातील अगरवेस भागात बुधवारी एका मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा घातपात नसून उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज जुने शहर पोलिसांनी व्यक्त केला. ...सविस्तर बातमी
19:18 (IST) 15 Apr 2026

६०५ कोटींच्या रस्त्यांवर दोन वर्षातच खोदाई; ठाणेकरांची फसवणुक केल्याचा मनसेचा आरोप

ठाणेकरांचा प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी दोन वर्षांपुर्वी ६०५ कोटी रुपये खर्चून काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले. ...वाचा सविस्तर
18:26 (IST) 15 Apr 2026

रेल्वेत प्रवाशांचे दागिने चोरी करणारा सराईत चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या; उत्तरप्रदेशातून चोरटा अटकेत

फुरकान उर्फ मुल्ला सुखे अन्सारी (४५) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ...वाचा सविस्तर
18:01 (IST) 15 Apr 2026

Navneet Rana on Amravati Paratwada Viral Video Case: अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणावर नवनीत राणांचा संताप...

अमरावतीमध्ये परतवाड्यात एका मुलाने पीडित मुलींवर अत्याचार करून त्याच्या १५० हून जास्त व्हिडीओ क्लिप तयार केल्या आणि सर्व सोशल मीडियावर व्हायरल केल्या. मला धर्मनिरपेक्ष राजकारण्यांना प्रश्न विचारायचाय. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? बुरखेवाली एकही महिला त्या १५० व्हिडीओंमध्ये नाहीये. आमच्याच मुली तिथे आहेत. या देशात ही सगळ्यात दुर्दैवी आहे की या मुली आमच्या आहेत हे विरोधी पक्षांना कळत नाहीये. फक्त नावापुरतं आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी त्या मुलींच्या भविष्याशी खेळ करता कामा नये. आज अचलपूर मतदारसंघात त्या आरोपीचे घर पाडले जात आहे. मी सरळ विनंती करेन पोलिसांना. आम्हाला तारीखही नको, कोर्टही नको.. त्या आरोपीचं सरळ एन्काऊंटर करायला हवं. त्या लोकांचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे. त्यांना या देशातून हाकलून लावलं पाहिजे - नवनीत राणा, भाजपा नेत्या

18:00 (IST) 15 Apr 2026

Indian Railway History: भारतीय रेल्वे १७३ वर्षांची! बोरिबंदर ते ठाणे... पहिल्या ट्रेनपासून मध्य रेल्वेच्या विस्ताराची रंजक माहिती

Indian Railways 173 Years: भारतातील पहिल्या रेल्वेगाडीची सुरुवात ही १६ एप्रिल १८५३ मध्येच झाली. याचा मान मुंबई-ठाण्याला मिळतो. ...वाचा सविस्तर
17:54 (IST) 15 Apr 2026

दुष्काळात तेरावा ! १० टक्के हंगामी भाडेवाढ, प्रवाशांचा वैताग, पहिल्याच दिवशी एसटी बसमध्ये 'तू तू - मैं मैं'

ST Bus Fare Hike: एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी. २ रुपये स्वच्छता अधिभार आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांनाही भुर्दंड; वाचा सविस्तर बातमी ...सविस्तर वाचा
17:42 (IST) 15 Apr 2026

Indian Railway : ठाणे रेल्वे स्थानकाचा उद्या होणार '१७३वा' वाढदिवस साजरा

173rd Anniversary : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सुवर्णक्षण असलेल्या पहिल्या रेल्वे धावण्याच्या ऐतिहासिक घटनेला उद्या १७३ वर्षे पूर्ण होत असून ठाणे स्थानकात मोठा उत्सव साजरा होणार आहे. ...सविस्तर वाचा
17:13 (IST) 15 Apr 2026

आता महिन्यातून एक दिवस तपासणी अन् उपचार मोफत! पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी मोहिमेची पुण्यातून सुरूवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पुण्यात ‘जन सेहत सेतू’ मोहिमेला सुरुवात झाली असून, आता दर महिन्याच्या ९ तारखेला रुग्णांना मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध होणार आहेत. ...सविस्तर बातमी
17:06 (IST) 15 Apr 2026

कल्याणमध्ये आजी, आजोबांना ऑनलाईन माध्यमातून फसविण्याचे प्रमाण वाढले; सलग सात दिवसाच्या कालावधीत कोट्यवधी रूपयांचा गंडा

कल्याणमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 'दहशतवादी' आणि 'मनी लाँड्रिंग'ची भीती घालून लुटण्याचे सत्र सुरू असून टिळक चौकातील एका ७५ वर्षीय आजोबांना २५ लाखांचा गंडा बसला आहे. ...वाचा सविस्तर
17:02 (IST) 15 Apr 2026

‘एचपीव्ही’ लसीमुळे मासिक पाळीत अनियमितता की गर्भधारणेत अडचणी? आरोग्य विभागाचे गैरसमज दूर करण्यासाठी मोठे पाऊल…

आरोग्य विभागाने पुणे महापालिकेच्या हद्दीत ३३ हजार मुलींना ही लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यात १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण नसलेल्या मुलींना लस देण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
16:52 (IST) 15 Apr 2026

ठाण्यातही अशोक खरात प्रकरण, गोव्यात लपलेल्या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या, वाचा सविस्तर…

ठाणे पोलिसांनी मंजूनाथ भोंदूला गोवा राज्यातून अटक केली. त्याने ठाणे, मुंबई, वसई भागात अनेकांची फसवणूक, लैंगिक शोषण केल्याचा संशय असल्याने त्याच्याविरोधात महिलांच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर बातमी
16:32 (IST) 15 Apr 2026

धक्कादायक! मालेगावात किरकोळ वादातून मित्राची हत्या; दोघा संशयीतांना अटक

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे किरकोळ वादातून अनिल जाधव या तरुणाची त्याच्याच मित्रांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या केली. याप्रकरणी छावणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना तत्काळ अटक केली ...अधिक वाचा
16:32 (IST) 15 Apr 2026

'अमरावतीत बुलडोझर, मग नाशिकमध्ये का नाही?'; लैंगिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी भाजप आमदाराचा थेट सवाल

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर, भोंदूबाबा अशोक खरात आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडे या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपींच्या घरांवर देखील बुलडोझर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ...सविस्तर बातमी
16:11 (IST) 15 Apr 2026

Watch Comet : धूमकेतू पाहायचाय? साधा संधी...

Comet C/2025 R3 : १७ एप्रिल रोजी पहाटेच्या वेळी 'सी/२०२५ आर ३ पॅनस्टार्स' हा दुर्मिळ धूमकेतू मीन राशीजवळ उघड्या डोळ्यांनी पाहण्याची सुवर्णसंधी खगोलप्रेमींना उपलब्ध होणार आहे. ...वाचा सविस्तर
16:03 (IST) 15 Apr 2026

रायते अपघातानंतर प्रवाशांना ‘इको व्हॅन’ची धास्ती; एसटीकडे वाढला ओढा, मुरबाड स्थानकावर गर्दी

खासगी व्हॅनमधील जीवघेणी गर्दी आणि वेगवान प्रवासापेक्षा उशिरा का होईना पण सुरक्षित प्रवासासाठी मुरबाड स्थानकावर एसटी बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...सविस्तर बातमी
15:53 (IST) 15 Apr 2026

खबरदार! या नवरी मुलीशी करू नका लग्न; अन्यथा होणार लाखोचे नुकसान

लग्नानंतर काही दिवसांतच घरातील दागिने घेऊन फरार झालेल्या नवरीसह तिच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांनी मुंबई आणि अहिल्यानगरमध्येही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...वाचा सविस्तर
15:53 (IST) 15 Apr 2026

Maharashtra Medical Council (MMC) : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतून निर्वाचित प्रतिनिधी हद्दपार! निवडणूक सुरू असतानाच शासनाचा नवीन निर्णय

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील निर्वाचित प्रतिनिधींना नामनिर्देशित सदस्यांद्वारे बदलण्याचा राज्य सरकारचा निर्णय लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया वैद्यकीय क्षेत्रातून उमटत आहे. ...वाचा सविस्तर
15:46 (IST) 15 Apr 2026

ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बदलणार? १० मेपर्यंत नवीन अध्यक्षांच्या नियुक्ती होण्याची शक्यता…

काँग्रेस सचिव नदीम जावेद यांनी ठाण्याचा दौरा करून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्या आणि संघर्षाची तयारी असलेल्या नेतृत्वाला संधी दिली जाणार आहे. ...वाचा सविस्तर
15:39 (IST) 15 Apr 2026

Heat Wave News: राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट;' पुण्यात उष्णतेच्या लाटेसदृश्य तापमान

राज्यात विदर्भात उष्णतेची लाट आलेली असताना पुण्यातही उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील लोहगाव येथे सलग तीन दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले गेले. ...अधिक वाचा
15:35 (IST) 15 Apr 2026

कल्याण-डोंबिवलीत धूळ, हवा प्रदूषण रोखण्यासाठी ५ हायटेक संयंत्रे तैनात; रस्त्यांवरील धूळ आता यंत्रात जमा होणार

टाटा पॉवर नाका आणि डोंबिवलीतील टिळक पुतळा यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बसवलेली ही स्वयंचलित सयंत्रे हवेतील घातक रासायनिक घटक आणि धूळ ओढून परिसर स्वच्छ ठेवणार आहेत. ...अधिक वाचा
15:35 (IST) 15 Apr 2026

Paratwada Case SIT Formation: अमरावती जिल्ह्यातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा SIT करणार तपास; परतवाडा अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे आता उलगडणार

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
15:20 (IST) 15 Apr 2026

शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत लढा सुरूच; राजू शेट्टी यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील सभेत इशारा

आजरा येथे झालेल्या महामेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग हा निसर्ग आणि शेतकऱ्यांचा घोट घेणारा प्रकल्प असल्याचे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा इशारा दिला. ...वाचा सविस्तर
15:06 (IST) 15 Apr 2026

नगररचना विभागाचा 'आशीर्वाद' की डोळेझाक? डोंबिवली टेल्कोसवाडीत फायर 'एनओसी'विनाच इमारतीची उभारणी…

अग्निशमन विभागाची परवानगी नसताना आणि पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात येत असलेली ही बेकायदा इमारत तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. ...सविस्तर बातमी
15:03 (IST) 15 Apr 2026

President Draupadi Murmu Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा डॉक्टरांना महत्त्वाचा संदेश

President Draupadi Murmu Nagpur Visit: एम्स नागपूरच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींचे संबोधन. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करत डॉक्टरांना संवेदनशील राहण्याचे आवाहन. ...वाचा सविस्तर
14:25 (IST) 15 Apr 2026

Aaditya Thackeray on Party Working President Post: आदित्य ठाकरेंनी कार्याध्यक्षपदाचं वृत्त फेटाळलं!

आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे. ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही. कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी!

https://twitter.com/AUThackeray/status/2044330620214751615

14:24 (IST) 15 Apr 2026

कोल्हापुरात पाण्यासाठी रणरागिणी आक्रमक; तळपत्या उन्हात महिलांचा रस्ता रोको

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने कोल्हापुरातील महिलांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ...अधिक वाचा
14:17 (IST) 15 Apr 2026

नांदेड जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदार यादीपासूनच ‘लक्ष्मीदर्शन’! संस्था सभासदांचे ठराव मागविण्याची मुदत संपली

सेवा सहकारी सोसायट्यांचे ठराव मिळवण्यासाठी दिग्गज नेत्यांनी कंबर कसली असून अनेक गावांत मतदारांच्या प्रतिनिधींना चक्क 'भाव' फुटल्याने सहकारातील निवडणुका चर्चेचा विषय ठरत आहेत. ...वाचा सविस्तर
14:16 (IST) 15 Apr 2026

MNS on Goregao Drugs Concert Case: पोलिसांसमोरच ड्रग्ज विक्री चालू होती का? - संदीप देशपांडे

कॉन्सर्टची परवानगी दिली जाते तेव्हा त्या ठिकाणी पोलीस उपस्थित असतात. याचा अर्थ पोलिसांच्या समोरच ड्रग्जचं सेवन चालू होतं. मग तिथले पोलीस झोपले होते का? याची चौकशी झाली पाहिजे - संदीप देशपांडे, मनसे नेते

14:16 (IST) 15 Apr 2026

MNS on Goregao Drugs Concert Case: गोरेगाव ड्रग्ज प्रकरण माध्यमांपासून ४ दिवस लपवलं गेलं - संदीप देशपांडे

गोरेगावमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन मुलांचा बळी गेला. चार दिवस ही बातमी लपवली गेली. बातमी नंतर फुटल्यानंतर त्यात गुन्हा दाखल झाला. अटक केलेल्या अनंत पटेलच्या वडिलांचा इतिहास मोठा रंजक आहे. त्याचे वडील मोक्काखाली अटकेत होते. ड्रग्ज पेडलिंगच्या अनेक केसेस त्यांच्यावर आहेत. त्यांना अजून अटक का झाली नाही? - संदीप देशपांडे</p>

14:15 (IST) 15 Apr 2026

MNS on Goregao Drugs Concert Case: "शाहरूखच्या मुलाकडचं ड्रग्ज दिसलं, पण खुलेआम विक्री दिसत नाही?"

गोरेगावमध्ये एका कॉन्सर्टमध्ये खुलेआम ड्रग्जविक्री झाल्याचा प्रकार समोर आला असून अती ड्रग्ज सेवनामुळे दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणावरून मनसेकडून प्रशासनाला परखड शब्दांत सवाल केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत राज्याच्या अंमली पदार्थविरोधी विभागाला जाब विचारला आहे. "तुम्हाला पार बोटीत जाऊन शाहरूख खानचा मुलगा ५-१० ग्रॅम ड्रग्ज घेतोय हे दिसतं आणि इथे खुलेआम ड्रग्ज विक्री होते ते नार्कोटिक्स डिपार्टमेंटला दिसत नाही?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

Baramati Assembly Bypoll Candidates | Sunetra Pawar vs Karuna Munde | Baramati Election 2026 Updates | Maharashtra Political News

बारामती पोटनिवडणूक: ५३ उमेदवार रिंगणात, सुनेत्रा पवारांसमोर आव्हान

Maharashtra Mumbai Pune News Live Updates, 15 April 2026: राज्यभरातली बितंबातमी जाणून घ्या एकाच ठिकाणी