Latest Marathi News Updates, 16 June 2026 : कॉक्रोच जनता पार्टीचे आज नागपूर येथील संविधान चौकात सायं ४ वाजता अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी असणार आहे. शिवसेना (ठाकरे) गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत या चर्चावर शिवसेनेचे ९ खासदार एकत्र आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची आज अमरावती मध्ये बैठक होत आहे. ह्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार आहे. तसेच विविध ठिकाणी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या हालचाली बाबत अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सत्र चालूच आहे. तर दुसरीकडे पुण्यात CNG प्रति किलो ९५.७५ पैसे तर PNG ५३.५० पैसे अशी दरांमध्ये वाढ झाली आहे. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रातील ठळक घडामोडी, गुन्हे, पर्यटन, कला – क्रीडा – संस्कृती- हवामान यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Marathi Batmya Live News Updates, 16 June 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…
विद्युत बस आहेत, पण चार्जिंगसाठी जागा नाही, पन्नास टक्के बस जागीच उभ्या, प्रवाशांचे हाल
पुन्हा सल्लागाराच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव, दहिसर - भाईंदर उन्नत मार्गासाठी सल्लागाराला ५२ कोटी
कल्याणमध्ये हुंड्यासाठी सुनेच्या डोक्याचे केले टक्कल, सासू, नणंदेसह पती अटकेत
वीजपुरवठा, बससेवा गुरुवारपासून बंद, प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता
पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वेची सिग्नल यंत्रणा सज्ज, २३९ डिजिटल ॲक्सल काउंटरची उभारणी, पाणी साचून होणारे ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
मुंबईतील वीज ग्राहक स्मार्ट, साडेपाच लाख ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर, सवलतीपोटी ग्राहकांना बेस्टचे साडेपाच कोटींचे वाटप
अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळा नक्की काय आहे? कोट्यवधींच्या देणगी गायब झाल्या? वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीसांच्या शहरात उद्धव ठाकरेंना धक्का? नागपुरातील शिवसेना ठाकरे गटाचा प्रमुख नेता शिंदेसेनेत
“पैशांचा उघडपणे वापर कधीही पाहिला नाही, भाजपने लोकशाही व्यवस्थेलाच…” माजी मंतत्री डॉ. सुनील देशमुख यांची टीका
Video : ‘मुंडें’ची खुर्ची, संगणक जप्त! नामुष्कीमुळे प्रशासन हादरले; पाहा काय घडलं?
मेट्रोच्या कामांमुळे बेस्टचे ४० कोटींचे नुकसान; बस थांबे हटवल्याने महसूलात घट
Video : दैवाने छत्र हिरावले, आज निसर्गाने छप्पर उडवले! तरीही या ‘पंचकन्यां’चा लढा सुरूच; आभाळमाया हाच आधार की शासन…
पवई तलाव परिसराचा १८ वर्षांनंतर पुनर्विकास होणार; पर्यटकांसाठी तिकीट आकारणीचा मुंबई महापालिकेचा विचार
कळवा खाडीत बुडणाऱ्या तरुणाचे अग्निशमन दलाकडून प्राणरक्षण; अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांची कामगिरी
सपकाळांचा अभाविपशी संबंध जोडणार्या शिष्टमंडळास पक्षाध्यक्षांनी खडसावले?
राज्यात नव्या RTO कार्यालयांची घोषणा; परिवहन विभागाने निश्चित केलेले 'हे' कडक निकष
अभिजीत दीपकेंची बेरोजगारीवरून काँग्रेसवर टीका, ‘काँग्रेस अपयशी ठरली म्हणूनच जनतेकडून भाजपाला संधी, पण शेवटी'…
घोडबंदर रस्त्याला मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पांचे नाव द्या, भाजपने पालिकेच्या सभेत प्रस्ताव
आंबिवलीत १० खोल्या खरेदी करा, १ खोली मोफत मिळवा जाहिरातप्रकरणी कडोंमपाची पोलीस ठाण्यात तक्रार
सीईटी २०२६-२७ च्या केंद्रीभूत प्रवेश नोंदणीस सुरुवात; तीन वर्षीय विधि, बीपीएड व एमपीएडच्या प्रवेश नोंदणीसाठी ३० जून अंतिम मुदत
पेरणीची घाई संकटात नेई! हवामान विभागाच्या अंदाजाने वाढवली चिंता, प्रशासनाचा शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला…
चंद्रपूर काँग्रेसमधील वडेट्टीवार-धानोरकर संघर्ष पुन्हा ऐरणीवर, १६ नगरसेवकांचे विभागीय आयुक्तांना पत्र
गुन्हे दाखल होऊनही उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट;पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
वालधुनी जागेच्या वादामुळे २०० कोटींचा उड्डाणपूल रखडला; कल्याण शहराच्या वाहतुकीसाठी महत्वाचा प्रकल्प
तानसा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा ४० वर्षीय व्यक्तीचा प्रयत्न; मांडवी पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरण: "तिचा मानसिक छळ केला जात होता", कुटुंबीयांचे गंभीर आरोप; सखोल तपासाची मागणी
राजकीय पक्ष काढण्याबाबत अभिजीत दीपकेची नागपूरमध्ये मोठी घोषणा, कॉक्रोच पार्टीला जर…
अमित शहा यांच्या दौऱ्याकडे साखर उद्योगाचे लक्ष; आजारी उद्योगास मदतीची अपेक्षा
यंदाचा पावसाळा आव्हानात्मक; जूनच्या पंधरवड्यात देशात सरासरीच्या केवळ ३२ टक्केच पाऊस, राज्यातील स्थिती काय ?
कर्जमुक्तीच्या अटींच्या विरोधात शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
