scorecardresearch

Premium

Maharashtra News: जितेंद्र आव्हाडांनी खरंच सिंधी समाजाचा अवमान केला? स्वत: ट्वीट केले भाषणाचा मूळ व मॉर्फ्ड व्हिडीओ, म्हणाले…!

Mumbai Updates, 01 June 2023: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

jitendra-awhad-1-1
जितेंद्र आव्हाड (संग्रहित छायाचित्र)

Maharashtra News Update Today: राज्य सरकारने नुकतीच अहमद नगरचं नामांतर अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी आपल्याला भाजपाबरोबरच्या युतीमध्ये सापत्न वागणूक मिळाल्याच्या केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:23 (IST) 1 Jun 2023
मंदिरामध्ये वस्त्र संहिता: सर्व मंदिरांमध्ये लागू करण्यासाठी विहिंपचा पुढाकार

नागपूर: महाराष्ट्रामधील सर्वच मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. याबाबत सर्व धार्मिक संस्थानी जनजागृती करून अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

सविस्तर वाचा…

18:07 (IST) 1 Jun 2023
गोरेवाड्यातील ‘ते’ अनाथ बछडे आईच्या प्रतीक्षेत आजारी

नागपूर: वाघिणीपासून दूरावलेल्या पेंच व्याघ्रप्रकल्पातील बछड्यांना नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात हलवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करत आहेत.

सविस्तर वाचा…

17:40 (IST) 1 Jun 2023
स्माशनभूमीच्या जागेत सभागृहाची उभारणी नको; कोपरीकरांची पालिकेकडे मागणी

ठाणे : कोपरी स्मशानभूमीच्या नुतनीकरणामध्ये सभागृहाची उभारणी करण्यात येणार असून, यामुळे स्माशनभूमीची जागा कमी होणार असल्याने त्यास कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ व कोपरी संघर्ष समितीने विरोध केला आहे. स्माशनभूमीच्या जागेत सभागृहाची उभारणी नकोच अशी भूमीका घेत ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

17:39 (IST) 1 Jun 2023
शिवसेनेच्या ठाकरे गटाची कार्यकारिणी जाहीर, शिवसेनेच्या नियुक्त्या मात्र रखडलेल्याच

अंबरनाथः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अंबरनाथ शहरातून दोन टप्प्यांत त्यांना पाठिंबा मिळाला. अंबरनाथ शहरात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाल्याने शिवसेनेचा (उबाठा गट) सुपडा साफ झाल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनाच्या (उबाठा) शहर कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. शहरप्रमुखांसह इतर पदे बहाल करण्यात आली आहेत. दुसरीकडे शिवसेनेची कार्यकारिणी मात्र प्रतिक्षेत आहे.

सविस्तर वाचा…

17:30 (IST) 1 Jun 2023
दक्षिण अमेरिकेत ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार! कार्यक्रम काय?

नागपूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवछत्रपती राज्याभिषेक दिन ६ जुनला दक्षिण अमेरिकेतील त्रिनिदाद आणि टोबॅगो देशातही साजरा होईल.

सविस्तर वाचा…

17:28 (IST) 1 Jun 2023
Maharashtra Live News Today: पोलिसांनी अशोकचक्र काढावं आणि धनुष्यबाण लावावं खांद्यावर – जितेंद्र आव्हाड

मला पोलिसांना विचारायचं आहे की जितेंद्र आव्हाडवर ३५४ चा गुन्हा दाखल करताना तपासणीही केली नाही. जितेंद्र आव्हाड काही तुमचा शत्रू नाहीये. एवढंच आहे, तर माझं पोलिसांना म्हणणं आहे की तुम्ही खांद्यावरून अशोकचक्र काढा आणि ज्यांचं सध्या धनुष्यबाण आहे, त्यांचं धनुष्यबाण लावून टाका – जितेंद्र आव्हाड

17:05 (IST) 1 Jun 2023
स्माशनभूमीच्या जागेत सभागृहाची उभारणी नको; कोपरीकरांची पालिकेकडे मागणी

ठाणे : कोपरी स्मशानभूमीच्या नुतनीकरणामध्ये सभागृहाची उभारणी करण्यात येणार असून, यामुळे स्माशनभूमीची जागा कमी होणार असल्याने त्यास कोपरी स्मशानभूमी हितचिंतक नागरिक संघ व कोपरी संघर्ष समितीने विरोध केला आहे. स्माशनभूमीच्या जागेत सभागृहाची उभारणी नकोच अशी भूमीका घेत ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा…

16:47 (IST) 1 Jun 2023
अमरावती: अश्‍लील व्हिडीओ बनवून महिलेच्‍या होणाऱ्या पतीला पाठवले

अमरावती: एका विधवेला विवाहाचे प्रलोभन दाखवून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपीने फसवणूक केल्‍याचे लक्षात येताच तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्नसंबंध जुळवला, पण आरोपीने तिचे अश्लील व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीसह त्याच्या भावाला देखील पाठविल्‍याची घटना धारणी येथे उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

16:46 (IST) 1 Jun 2023
Maharashtra Live News Today: जितेंद्र आव्हाडांनी खरंच सिंधी समाजाचा अवमान केला?

जितेंद्र आव्हाडांनी खरंच सिंधी समाजाचा अवमान केला? स्वत: ट्वीट केला भाषणाचा व्हिडीओ, म्हणाले…!

https://twitter.com/Awhadspeaks/status/1664222155910041600

16:35 (IST) 1 Jun 2023
डोंबिवलीत बेधुंद वाहन चालकाची १२ वाहनांना धडक, १० जण जखमी

डोंबिवली – येथील पश्चिमेतील रस्त्यांवर मद्यपान करून इनोव्हा मोटार चालविणाऱ्या एका वाहन चालकाने विविध रस्त्यांवर मोटार नेऊन एकूण १२ वाहनांना धडका दिल्या. यामध्ये १० जण जखमी झाले आहेत. मद्यधुंद मोटार चालकाला इतर नागरिकांनी पकडून त्याला विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. काल रात्री हा प्रकार घडला.

सविस्तर वाचा…

16:29 (IST) 1 Jun 2023
बनावट प्रमाणपत्र प्रकरण: पुणे पोलिसांकडून आणखी एका दलालाला अटक

पुणे: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळ म्हणजेच दहावी तसेच वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री करणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे.

सविस्तर वाचा…

16:12 (IST) 1 Jun 2023
नाशिक: अवैद्य व्यवसाय प्रतिबंध पथकावर सहा संशयितांचा हल्ला

नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वेगवेगळी पथके गठित करण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा…

15:37 (IST) 1 Jun 2023
नंदुरबारमध्ये भाजप-शिंदे गटातील वादाचा काँग्रेसला लाभ

नंदुरबार – राज्यात सत्तेसाठी एकमेकाच्या हातात हात घेऊन चालणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये नंदुरबार जिल्ह्यात विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारमधील सत्तेच्या संघर्षात भाजप-शिंदे गट परस्परांची उणीदुणी काढण्यात मग्न असल्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होत आहे.

सविस्तर वाचा…

15:35 (IST) 1 Jun 2023
जळगावातील स्टेट बँक शाखेत भरदिवसा दरोडा; १५ लाखांची रोकड लंपास

जळगाव: शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी सकाळी दरोडा टाकून सुमारे १५ लाखांच्या रोकडसह लाखोंचे सोने लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली.

सविस्तर वाचा…

15:11 (IST) 1 Jun 2023
पुणे: महिलेच्या नावे खरेदी केलेली सदनिका कधीही विकता येणार; महिलेलाच सदनिका विक्रीची अट रद्द

मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळविण्यासाठी महिलांच्या नावावर सदनिका खरेदी केल्यावर १५ वर्षांपर्यंत त्या सदनिकेची विक्री करता येत नव्हती. आता मात्र राज्य सरकारने या जाचक अटीतून महिलांची सुटका केली आहे. त्यामुळे आता कधी आणि कोणालाही या सदनिकेची विक्री करणे शक्य होणार आहे. सविस्तर वाचा…

15:10 (IST) 1 Jun 2023
‘नदीसुधार’साठी एकही झाड तोडू नका! एनजीटीचे पुणे महापालिकेला निर्देश

नदीसुधार प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड तोडू नये, असे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) बुधवारी दिले. प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीवेळी एकही झाड तोडणार नाही, अशी कबुली देऊनही आता तुम्ही झाडे का तोडत आहात, असा सवालही न्यायाधिकरणाने केला. सविस्तर वाचा…

15:09 (IST) 1 Jun 2023
शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच; वळसे पाटील यांची चर्चा असतांना आता ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार  विलास लांडे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. माजी आमदार विलास लांडे यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स भोसरीमध्ये लावण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 1 Jun 2023
पुणे: मटण केले नाही म्हणून पतीकडून महिलेच्या डोक्यात विळ्याने वार

मटण न केल्याने दारु पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीच्य डोक्यात विळ्याने वार केल्याची घटना येरवड्यातील सुभाषनगर भागात घडली. भाग्यश्री संदीप मोरे (वय २९) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

15:05 (IST) 1 Jun 2023
पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेची चंद्रकांत पाटील यांनी घेतली अखेर दखल; म्हणाले ‘पुणेकर आणि नाट्यकलावंतांच्या सूचना…’

शहरातील नाट्यगृहांचे नूतनीकरण करण्यासाठी जून अखेरपर्यंत नागरिक तसेच नाट्यकलावंतांकडून सूचना मागवाव्यात आणि १५ जुलैपर्यंत दुरुस्तीची कामे सुरू करून ऑगस्ट अखेरपूर्वी ती पूर्ण करावीत, असे आदेश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सविस्तर वाचा…

15:03 (IST) 1 Jun 2023
मुंबई: डंपरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू

पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर सर्कल येथे बुधवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. सविस्तर वाचा…

14:46 (IST) 1 Jun 2023
“आमच्यावर सरकारचा राग का?”; संतप्त ओबीसींचा नागपूरच्या संविधान चौकात ठिय्या

वर्धा : बाहेरगावी शिकण्यासाठी वार्षिक साठ हजार रुपये देणारी ज्ञानज्योती स्वाधार योजना इतरांप्रमाणे ओबीसी घटकास का नाही, असा सवाल महात्मा फुले समता परिषदेने केला आहे. विधिमंडळात या योजनेस मंजुरी देत एकवीस हजार विद्यार्थ्यांना लाभ देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर २०२३ रोजी सभागृहात केली. त्याचे स्मरण देत संघटनेने आता आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सविस्तर वाचा..

14:38 (IST) 1 Jun 2023
घराची मंजुरी आणण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच; ग्रामसेवक जाळ्यात

नाशिक: गरीबांसाठी घरकुल मिळावे म्हणून शासन एकीकडे प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे काही शासकीय लोकसेवक या कामात लाच मागून अडथळे निर्माण करीत आहेत.

सविस्तर वाचा…

14:37 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

संसद भवनाबाहेरच्या महिला कुस्तीपटूंची लढाई आणि माझी लढाई सारखीच आहे – सुषमा अंधारे

14:36 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: सुषमा अंधारेंचे देवेंद्र फडणवीसांना सवाल…

संजय शिरसाट यांना क्लीनचिट मिळाल्याप्रकरणी सुषमा अंधारेंची टीका. म्हणाल्या, “क्लीनचिट मिळाल्याचं स्वत: आरोपी कसं सांगू शकतो? ही बाब सगळ्यात आधी तपास अधिकाऱ्यांनी सांगायला हवी. महत्त्वाचं म्हणजे हा अहवाल त्यांनी महिला आयोगाकडे सादर करायला हवा. पण तो महिला आयोगाकडे आलाच नाहीये. मग आधीच तो लीक कसा झाला? यासाठी संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांचं निलंबन व्हायला हवं. मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय की जर एखाद्या प्रकरणात चौकशी समिती नेमली असेल, ज्या फिर्यादीच्या म्हणण्यावर ती समिती नेमली असेल, तर त्या फिर्यादीला त्याची माहिती का देण्यात आली नाही? मला माहिती नाही याबाबत काही. यात फिर्यादीचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. मला का बोलावलं नाही. मला बोलावलं असं त्यांचं म्हणणं असेल, तर कसं बोलावलं? मला काहीही न विचारता एकांगी निर्णय का घेतला? हेच करायचं होतं, तर चौकशीचं नाटक का केलं? फडणवीसांचं असं काही ठरलंय का की ज्या ४० लोकांच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार चालू आहे, अशा लोकांना काहीही करून वाचवायचंच असं ठरलंय का? फडणवीसांनी काय ती उत्तरं द्यायला पाहिजे”.

14:31 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: जयंत पाटलांचा भाजपाला खोचक टोला!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजप सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे – जयंत पाटील

https://twitter.com/NCPspeaks/status/1664163414334398464

14:12 (IST) 1 Jun 2023
शासकीय योजनांच्या प्रचारार्थ शिवदूत; शिवसेनेचे नियोजन

नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घटकांसाठी घेतलेले निर्णय आणि शेतकरी हिताच्या राबविलेल्या योजना यांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरात विभागनिहाय शिवदुतांची नेमणूक करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

13:59 (IST) 1 Jun 2023
बुलढाण्याच्या जागेवरून आघाडी तसेच युतीतही चढाओढ

बुलढाणा : महाविकास आघाडीत राज्य स्तरावर ‘मोठा भाऊ’ कोण यावरून वादंग उठला आहे. तिन्ही मित्र पक्षांत कलगीतुरा रंगला असतानाच दूरवरच्या बुलढाण्यातदेखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर तिन्ही मित्र पक्षांकडून आत्तापासूनच दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. दुसरीकडे ‘मिशन-४५’ मध्ये समाविष्ट असलेल्या मतदारसंघावर भाजपनेही दावा केल्याने युतीतही सर्वच आलबेल नसल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 1 Jun 2023
कपाशी लागवड चक्क वाजतगाजत; शेतकर्‍याचा नादच खुळा

जळगाव: पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथील प्रगतिशील तरुण शेतकर्‍याने चक्क शेतात वाजतगाजत कपाशी लागवडीला सुरुवात केली.

सविस्तर वाचा…

13:43 (IST) 1 Jun 2023
नागपूर रेल्वे स्थानकात वाद; प्रवाशाच्या नातेवाईकाने बॅटरी कारचालकावर थेट उगारली तलवार, कारण काय..

नागपूर : एका वयोवृद्ध प्रवाशाला बॅटरी कारने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावार जायचे होते. त्यांच्यासोबत एक नातवाईक होते. बॅटरी कार चालकाने तिकडे जाण्यास नकार दिल्याने प्रवाशाच्या नातेवाईकाने तलवार काढली. ही थरारक घटना मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी घडली.

सविस्तर वाचा…

13:34 (IST) 1 Jun 2023
नागपूर : आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाख, उच्च शिक्षित शेतकऱ्याची किमया

नागपूर : शेतीत विविध प्रयोग केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे शक्य आहे. फक्त गरज आहे कल्पकतेची आणि कष्ट करण्याची. ही किमया साधली एका उच्च शिक्षित शेतकऱ्याने. पाच एकराच्या शेतीत दहा लाखांचे आंब्याचे उत्पन्न घेऊन.

सविस्तर वाचा..

13:30 (IST) 1 Jun 2023
सावधान! फसवणुकीचा नवा फंडा, ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावे पर्यटकांना गंडा; वाचा काय आहे प्रकार…

वर्धा: उन्हाळी सुट्टीत मुलाबाळांसह सहलीस निघण्याचा बेत आखण्याचे हे दिवस. ट्रॅव्हल्स कंपन्या ग्राहक हेरण्यासाठी टपूनच बसल्या असतात. मात्र, त्यांनीच फसवणूक केली तर करायचे काय, असा प्रश्न पोलिसांकडे दाखल तक्रारीतून पुढे आला.

सविस्तर वाचा…

13:29 (IST) 1 Jun 2023
दहावीचा निकाल उद्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.

वाचा सविस्तर…

13:28 (IST) 1 Jun 2023
मुंबईतील मॉडेलवर रांचीत बलात्कार, मग धर्मांतरासाठी दबाव; ‘द केरला स्टोरी’ पाहून पीडितेची थेट पोलीस ठाण्यात धाव

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना मुंबईतून समोर येत आहे. एवढंच नव्हे तर पीडिता मॉडेल असून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले असल्याचाही प्रकार उजेडात आला आहे. पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

वाचा सविस्तर

13:26 (IST) 1 Jun 2023
Video : “कायदा सर्वांसाठी समान, खेळाडूंचा मान-सन्मान…”, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर क्रीडामंत्री अनुराग ठाकूरांचं वक्तव्य; म्हणाले, “मोदी सरकारने…”

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. गेल्या महिन्याभरापासून याप्रकरणी कुस्तीगीरांनी जंतरमंतर दणाणून सोडले आहेत. २८ मे रोजी जंतरमंतरहून नव्या संसद भवनाच्या दिशेने जाताना पोलिसांनी या आंदोलकांवर बळाचा वापर केला. यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आज मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना याप्रकरणी विचारण्यात आले. देशातील सर्वांना कायदा समान आहे, असं म्हणत आम्ही खेळांडूंचा सन्मान करतो असंही ते म्हणाले.

सविस्तर वाचा

13:25 (IST) 1 Jun 2023
“शिंदेंची सत्ता आहे, ते मुख्यमंत्री असेपर्यंतच…”, जयंत पाटलांचा मिश्किल टोला; म्हणाले, “आमच्या एका कार्यकर्त्यानेही…”

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. गृहपक्षांना राजीनामा देऊन मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. यावरून पत्रकारांनी आज जयंत पाटलांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी दिली. आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा

13:23 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: कुठे आणि कसा पाहणार निकाल?

कुठे पाहाणार दहावीचा निकाल? खालील लिंक कॉपी करून तुमच्या वेब ब्राऊजरच्या यूआरएल बॉक्समध्ये टाका!

१. mahresult.nic.in

२. https://ssc.mahresults.org.in

३. http://sscresult.mkcl.org

13:19 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता पाहाता येणार मिळालेले गुण!

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढता येणार आहे.

13:14 (IST) 1 Jun 2023
पुणे: महिलेच्या नावे खरेदी केलेली सदनिका कधीही विकता येणार; महिलेलाच सदनिका विक्रीची अट रद्द

मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळविण्यासाठी महिलांच्या नावावर सदनिका खरेदी केल्यावर १५ वर्षांपर्यंत त्या सदनिकेची विक्री करता येत नव्हती. आता मात्र राज्य सरकारने या जाचक अटीतून महिलांची सुटका केली आहे. सविस्तर वाचा…

13:09 (IST) 1 Jun 2023
पुणे: महापालिकेतील ३२० पदांच्या भरतीसाठी १० हजार अर्ज; जाणून घ्या परीक्षेचे वेळापत्रक

महापालिकेच्या आस्थापनावरील वर्ग एक ते वर्ग तीन संवर्गातील रिक्त ३२० पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. या रिक्तपदांच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ जून आणि २ जुलै रोजी परीक्षा तीन सत्रात होणार आहे. सविस्तर वाचा…

13:08 (IST) 1 Jun 2023
राष्ट्रवादीत शिरूर लोकसभेसाठी रस्सीखेच; विलास लांडेंचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार  विलास लांडे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघात भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत. सविस्तर वाचा

13:06 (IST) 1 Jun 2023
मुंबई: जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल

जे.जे. रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. तात्याराव लहाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (एनएमसी) नियमाचे उल्लंघन करीत असून निवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यापासून दूर ठेवत आहे.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 1 Jun 2023
अकोला परिमंडळात वीजचोरांना महावितरणचा शॉक; ९२ जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल

अकोला: अकोला परिमंडळांतर्गत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या दोन लाख ३९ हजार ग्राहकांच्या तपासणीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली.

सविस्तर वाचा…

12:40 (IST) 1 Jun 2023
Maharashtra News Update: सरकारला उपरती झाली – संजय राऊत

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात अहिल्यादेवींचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर सरकारलाही उपरती झाली. त्यांच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो.

12:36 (IST) 1 Jun 2023
छत्तीसगड सीमेवर नक्षल्यांचा हैदोस; तेंदूफळींची जाळपोळ, नागरिकांमध्ये दहशत

गडचिरोली : काही काळ शांत बसलेल्या नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढले असून बुधवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सिमवेरील गावात नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदूपानांची जाळपोळ केली. यावेळी आढळून आलेल्या पत्रकात तेंदूपानांचा भाव वाढवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 1 Jun 2023
नागपूर : आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्या नाकारल्यामुळे न्यायालयाकडून सरकारची कानउघाडणी

नागपूर : खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्यांसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारही पात्र असतात, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा एकदा एका प्रकरणावरील निर्णयात सांगितले.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 1 Jun 2023
वाशीम: महिन्याभरानंतरही चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागेना! कामरगाव ज्वेलर्स चोरी प्रकरण

वाशीम: कारंजा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कामरगाव येथील हिरुळकर ज्वेलर्स मध्ये ८ मे २०२३ रोजी चोरट्यांनी शटर ताडून ७ लाख १५ हजार रूपये लंपास केल्याची घटना घडली होती.

सविस्तर वाचा…

12:12 (IST) 1 Jun 2023
‘कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सचिन तेंडुलकर गप्प का?’ काँग्रेसच्या ‘त्या’ बॅनरबाबत संजय राऊत म्हणतात…

सचिन तेंडुलकर महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर गप्प का? असा प्रश्न विचारणाऱ्या बॅनरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

वाचा सविस्तर

12:02 (IST) 1 Jun 2023
अवैध वाळू वाहतुकीवरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप

जळगाव: शहरासह जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू असून, त्यात प्रशासकीय यंत्रणेसह पालकमंत्र्यांचाही सहभाग आहे. त्यांचीच वाहने धरणगाव तालुक्यात धावत आहेत.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 1 Jun 2023
भाजपच्या दोन देशमुखांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार ?

सोलापूर : कांद्यामुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसह शेजारच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. तर करमाळा कृषिउत्पन्न बाजार समितीची मुदतही ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने यापूर्वीच दिले आहेत.

सविस्तर वाचा..

11:41 (IST) 1 Jun 2023
शासकीय महाविद्यालयाकडे नंदुरबार जिल्हा रुग्णालय हस्तांतरीत न झाल्याने रुग्णांचे हाल

नंदुरबार: नंदुरबारच्या कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनाने चार वर्षांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. परंतु, चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे.

सविस्तर वाचा…

Maharashtra Live Blog

महाराष्ट् न्यूज

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Latest Comment
View All Comments
Post Comment
First published on: 01-06-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×