Maharashtra Political News, Weather Update Today नव्या संसद भवनाचं उद्घाटन थाटामाटात पार पडलं आहे. मात्र हा लहरी राजाचा सोहळा होता. महाल बांधण्यासाठी १ हजार कोटी खर्च करण्यात आला असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. तर महाविकास आघाडीचा उमेदवार तोच असेल ज्याच्यात जिंकण्याची क्षमता असेल असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. पुणे लोकसभेच्या निवडणुकीविषयी हे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या सगळ्या घडामोडींसह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे.

Lost intellectually-challenged boy reunited with parents via QR code on pendant
खेळता खेळता हरवला १२ वर्षाचा चिमुकला! QR code पेंडेंटमुळे पुन्हा पालकांना भेटला! ८ तासात पोलिसांनी लावला शोध
menstrual leave policy marathi news, menstrual leave marathi news
राष्ट्रीय विधी संस्थेचे मासिक पाळीकरता रजा धोरण…
chargesheet files against elvish yadav
युट्यूबर एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी दाखल केलं १२०० पानांचं आरोपपत्र
nashik water crisis marathi news, nashik water scarcity marathi news
नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी
Live Updates

Marathi News Live Today: महाविकास आघाडीचा उमेदवारी देण्याचा फॉर्म्युला ठरला?

18:42 (IST) 29 May 2023
मनमाड: वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

मनमाड: शहर आणि परिसरात सोमवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना आणि वादळी वार्यासह सुमारे तासभर या पावसाने मनमाडकरांना चिंब केले.

सविस्तर वाचा...

18:28 (IST) 29 May 2023
खासदार धानोरकर रुग्णालयात असताना विरोधकांनी साधला डाव; चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती

चंद्रपूर: राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर दिल्लीत खासगी रुग्णालयात असताना पक्षातील त्यांचे विरोधक सक्रिय झाले आहेत.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 29 May 2023
एपीएमसीत कोथिंबीर वधारली; घाऊकमध्ये प्रतिजुडी २५ ते ३० रुपयांवर

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कोथिंबीर आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. नाशिकची कोथिंबीर जुडी मागील आठवड्यात १५-१८ रुपयांवरुन आता २५-३० रुपयांवर वधारली आहे.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 29 May 2023
नागपुरातील गिर्यारोहकांची उत्तुंग कामगिरी; १३,८०० फूट उंच ‘पठालसू’ शिखर सर

नागपूर: सात दशकांपूर्वी २९ मे रोजी भारतातील माऊंट एव्हरेस्ट शिखर पहिल्यांदा सर करण्यात आले. शेर्पा तेन्सिंग नोर्गे व सर एडमंड हिलरी यांनी पहिल्यांदा जगातील सर्वोच्च शिखर सर केले होते.

सविस्तर वाचा...

17:33 (IST) 29 May 2023
विशेष रेल्वेने महाराष्ट्राला गुजरात, राजस्थानशी जोडणार

मध्य रेल्वेने पुणे-बिकानेर ही नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे महाराष्ट्राला गुजरात आणि राजस्थानशी जोडले जाणार आहे. पुण्यातून पहिली गाडी उद्या (मंगळवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी रवाना होईल. पुणे-बिकानेर ही विशेष गाडी साप्ताहिक असेल. ही गाडी दर मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून रवाना होईल.

सविस्तर वाचा

17:08 (IST) 29 May 2023
शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी बैलगाडी आंदोलन; मातृतीर्थात बळीराजाचा एल्गार!

बुलढाणा: सिंदखेडराजा येथे आज सोमवारी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी जन आंदोलन केले. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या लखोजी राजे जाधव राजवाडा येथे काही वेळ धरणे देण्यात आले.

सविस्तर वाचा...

16:20 (IST) 29 May 2023
पुणे: महाविद्यालयीन युवतीकडून प्रियकराचा खून

पुणे: प्रियकराशी झालेल्या वादातून महाविद्यालयीन युवतीने त्याच्यावर स्वयंपाक घरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली परिसरात घडली.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 29 May 2023
अवैध धंदे रोखण्यासाठी महिला शांतता दारुबंदी समिती, गोळशी भागासाठी पोलिसांचा उपक्रम

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध धंद्यांचा जोर पुन्हा वाढल्याचे लक्षात येताच जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात प्रथमच दिंडोरी तालुक्यातील उमराळे दूरक्षेत्राच्या गोळशी बीट पोलीस ठाण्याचे हवालदार बाळकृष्ण पजई यांनी महिला शांतता व दारूबंदी समिती स्थापन केली आहे.

सविस्तर वाचा

15:34 (IST) 29 May 2023
स्वाधार योजनेपासून ओबीसी वंचित; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात होणार उपोषण

वर्धा: नागपूर अधिवेशनात २९ डिसेंबर २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीस हजार सहाशे ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वाधार योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली होती.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 29 May 2023
कुनोच्या जंगलात आणखी एक चित्ता; आता इतर चित्त्यांचे काय…?

मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एक चित्ता जंगलात सोडण्यात आला. त्यांची संख्या आता एकूण सात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन ते चार वर्षे वयोगटातील ‘नीरवा’ या मादी चित्त्याला रविवारी सायंकाळी कुनोतील एका मोठ्या खुल्या पिंजऱ्यातून जंगलात सोडण्यात आले.

सविस्तर वाचा

15:12 (IST) 29 May 2023
आनंदवार्ता! सैन्यभरतीची तारीख ठरली, तरुणांनो तयारीला लागा..

नागपूर : सैन्यदल भरती नागपूर कार्यालयाने वेगवेगळ्या पदांसाठी अग्निवीर भरतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. जनरल ड्युटी, तांत्रिक आणि लिपिक पदासाठी १० जून २०२३ पासून नागपुरात भरती मेळावा होत आहे. पहिल्या फेरीत पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी २५ ते १७ जून २०२३ दरम्यान घेतली जाईल.

सविस्तर वाचा..

14:43 (IST) 29 May 2023
डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील इमारत नियमानुकूल करण्याची रहिवाशांची मागणी

डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिरा जवळ उभारण्यात आलेली इमारत ही आम्ही ५० वर्षापासून राहत असलेल्या ‘निवासी अतिक्रमणे’ या १६१२ चौरस मीटर जागेवर उभी आहे. या जमिनीचा बगीचा आरक्षणाशी कोणताही संबंध नसल्याने पालिकेने आवश्यक ते बांधकाम परवानगीचे दर आकारून ही इमारत नियमानुकूल करावी आणि आम्हाला आमची हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी डोंबिवलीतील चार रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

सविस्तर वाचा

14:35 (IST) 29 May 2023
“करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल

अकोला : रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवायला जाणे चार ग्राहकांना चांगलेच भोवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत हॉटेल रेस्टॉरंट सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक व चार ग्राहकांवर विविध कलमान्वये शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 29 May 2023
अकोला : गोदामाच्या चौकीदाराला धमकावून तब्बल ५० लाखांच्या सिगारेट लंपास; चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

अकोला : राष्ट्रीय महामार्गावर राधास्वामी सत्संग केंद्राजवळील गोदामातून सुमारे ५० लाख रुपयांच्या सिगारेटने भरलेल्या पेट्या तीन चोरट्यांनी लंपास केल्या. परिसरातील चौकीदाराला धमकावून त्यांनी हे कृत्य केले. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा..

14:14 (IST) 29 May 2023
जेएनपीटी, उरणसह नवी मुंबई परिसरात जैविविधतेचा ऱ्हास, जनता आणि अधिका-यांचे दुर्लक्ष; पर्यावरणवाद्यांचा आरोप

जेएनपीटी बंदर आणि उरणसह नवी मुंबईतील विविध भागात पर्यावरणासह, जैवविविधतेचाही वेगाने ऱ्हास होत आहे. त्याला येथील जनता आणि अधिकारी यांच्याकडून होणारे सातत्याचे जणीवपूर्वक दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

वाचा सविस्तर...

13:51 (IST) 29 May 2023
ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी

ठाणे: वागळे इस्टेट येथील किसननगर भागात जुन्या इमारतीच्या प्लास्टरचा भाग डोक्यात पडल्याने आठ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली.

सविस्तर वाचा...

13:46 (IST) 29 May 2023
नागपूर : नितीन गडकरींच्या कार्यकर्तृत्वावर ‘पीएचडी’; प्रा. मारोती कंधारे लवकरच प्रबंध सादर करणार

नागपूर : राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वातून यशाचे अनेक टप्पे गाठणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यकर्तृत्वावर नाशिकमधील प्रा. मारोती जनार्दन कंधारे पीएचडी करत असून लवकरच ते शोधप्रबंध विद्यापीठाला सादर करणार आहेत.

सविस्तर वाचा...

13:43 (IST) 29 May 2023
डोंबिवलीतील वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर पडलेला पैशाचा बटवा कल्याणमधील महिलेला परत

डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील एका वृत्तपत्र विक्रेत्याने आपल्या वृत्तपत्र विक्रीच्या मंचकासमोर वर्दळीच्या रस्त्यावर पडलेला कल्याण मधील एका महिलेचा पैशाचा बटवा संबंधित महिलेला प्रामाणिकपणे परत केला. या वृत्तपत्र विक्रेत्याचे परिसरातील व्यापाऱी, पादचाऱ्यांनी कौतुक केले. अलीकडे भुऱट्या चोऱीच्या घटना घडल्या आहेत.

सविस्तर वाचा

13:42 (IST) 29 May 2023
दहशतीच्या सावटाखाली ‘त्या’ने गाठली यशाची वाट; वाचा यूपीएससीत सातवा रँक मिळवणाऱ्या वसीमची प्रेरणादायी कथा

नागपूर: चारही बाजूला दहशतीचे वातावरण. कधी, कुठे गोळीबार होईल आणि जीव गमवावा लागेल याचा काही नेम नाही. अशा दहशतीच्या अंधारातही स्वतःच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वसीम अहमद भट याने यशाची वाट गाठली.

सविस्तर वाचा...

13:38 (IST) 29 May 2023
प्रकल्पाच्या जाहिरातीत आता क्युआर कोड बंधनकारक; महारेराचा निर्णय, १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

नवीन, महारेरा  नोंदणीकृत गृहप्रकल्पांना आता १ ऑगस्टपासून प्रकल्पाच्या जाहिरातीत क्युआर कोड ठळकपणे नमुद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्या माहितीच्या बाजूलाच क्यूआर कोड ठळकपणे दाखवणे अत्यावश्यक असणार आहे. ग्राहकांना प्रकल्पाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी या उद्देशाने महारेराने हा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 29 May 2023
कल्याणमध्ये इमारत बांधकामासाठी परवानगी न घेता विकासकाने जुनाट झाडे तोडली, उद्यान विभागाची नोटीस

कल्याण – कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात एका विकासकाने इमारत बांधकामासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू केले आहे. हे काम करताना लगतच्या पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणाच्या भूखंडावरील चार जुनाट झाडांच्या मुळाची माती जेसीबी चालकाने उकरून काढली. या झाडांना आधार न राहिल्याने ही चारही झाडे कोसळली आहेत.

सविस्तर वाचा..

13:26 (IST) 29 May 2023
खडसे यांच्या स्वार्थीपणामुळेच जावई विनाकारण तुरुंगात; गिरीश महाजन यांचा आरोप

महाजन यांनी माझ्यामागे ईडी लावली म्हणून त्यांच्यामागे मोक्का लागला, असा आरोप खडसेंनी केला होता. भुसावळ येथे एका उद्घाटन सोहळ्याला मंत्री महाजन यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खडसे यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा

13:25 (IST) 29 May 2023
पिंपरी : तोंडी तलाक देऊन दुसरे लग्न करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

तीनवेळा तलाक बोलून घटस्फोट देत दुसरे लग्न करणा-याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथे घडला. याप्रकरणी पती अकीब आसिफ खान (वय ३१), सासरे आसिफ अब्दुल्ला खान (वय ६२, दोघे रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांच्यासह तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

13:21 (IST) 29 May 2023
Video : पुण्यात भरधाव दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील कर्वेनगर भागात पायी चालत जाणाऱ्या महिलेला एका दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रंजना प्रकाश वसवे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

13:11 (IST) 29 May 2023
नागपूर : कोराडी वीज प्रकल्पाला विरोध, सुनावणी सुरू होण्यापूर्वीच तणाव; पोलीस बंदोबस्तात सुनावणी सुरू

नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाची जनसुनावणी कोराडी प्रकल्प परिसरात सुरू झाली आहे. सुनावणी सुरू होण्यापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाच्या सदस्यांनी मंच परिसरात प्रकल्पाला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.

सविस्तर वाचा...

12:59 (IST) 29 May 2023
नागपूर : दोन महिन्यांवर परीक्षा, ‘बार्टी’चे प्रशिक्षण मात्र बंदच; अधिकाऱ्यांच्या मनमानीचा विद्यार्थ्यांना फटका

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी बँक, रेल्वे, एलआयटी आदी पदभरतींचे प्रशिक्षण दिले जाते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कर्मचारी निवड आयोग (एसएससी) आणि बँकेच्या परीक्षा होणार आहेत. असे असतानाही सामाजिक न्याय विभागातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अद्यापही प्रशिक्षण सुरू झालेले नाही.

सविस्तर वाचा...

12:45 (IST) 29 May 2023
नाशिक: अनधिकृत शाळेप्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा

नाशिक: जेलरोड परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावूनही ही शाळा अनधिकृतपणे चालवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तिरुपती एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

12:44 (IST) 29 May 2023
नागपूर : “ती” मान्सूनपूर्व पावसाचीच वर्दी; विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मेपर्यंत पावसाचा तडाखा

नागपूर : मे महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा खाली येत असला तरी उष्णतेच्या झळा मात्र अजूनही कायम आहेत. त्यातच आता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाड्यात ३१ मे पर्यंत पावसाचा तडाखा बसेल.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 29 May 2023
भंडाऱ्यात भरचौकात हत्येचा थरार; लस्सी सेंटर चालकाची चाकू भोसकून हत्या; तणावाचे वातावरण

भंडारा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या गांधी चौकात काल दि. २८ मे रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान हत्येचा थरार उडाला. भर चौकात दुर्गा लस्सी सेंटर चालक अमन नंदुरकर या २३ वर्षीय (रा. गांधी चौक) तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली.

सविस्तर वाचा..

12:31 (IST) 29 May 2023
बच्‍चू कडू व रवी राणा पुन्‍हा एकदा आमने-सामने

काही महिन्‍यांपुर्वी अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍यातील आरोप-प्रत्‍यारोप गाजले. हा वाद नंतर शमला. पण, आता अमरावती लोकसभा मतदार संघावर बच्‍चू कडू यांनी दावा सांगितल्‍याने उभय नेत्‍यांमध्‍ये पुन्‍हा एकदा संघर्ष पेटण्‍याची चिन्‍हे आहेत.

सविस्तर वाचा

12:28 (IST) 29 May 2023
वाशीम: कुटुंबातील तीन भावंडांनी जिद्दीने मिळविले यश; पोलीस होण्याचे स्वप्न साकार, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज

वाशीम: आई-वडिलांकडून प्रेरणा घेत जिद्द, चिकाटीने सराव केला आणि तीन भावंडांनी पोलीस होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. हा संघर्षमय प्रवास नंदा वानखडे, वैभव वानखडे आणि शीतल वानखडे यांच्यासाठी कठीण होता.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 29 May 2023
पुणे लोकसभेवरुन मविआत नव्या वादाची ठिणगी? संजय राऊत-अजित पवार यांच्या दाव्यानंतर जयंत पाटील म्हणतात...

भाजपा नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या एका जागेसाठी महाविकास आघाडीत चढाओढ पाहायला मिळतेय. मोठा भाऊ या नात्याने राष्ट्रवादीने या जागेवर दावा ठोकला आहे तर, जिंकेल त्याची जागा असं सूत्र संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि संजय राऊत आमने सामने आले असून महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयमाची भूमिका घेतली आहे.

सविस्तर वृत्त वाचा

12:00 (IST) 29 May 2023
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; भरधाव कार सिमेंट रेलिंगला धडकली, दोन ठार

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर आज, सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन प्रवासी ठार झाले. भरधाव कार सिमेंट रेलिंगला धडकल्यावर वाहनाने पेट घेतला. त्यात दोघे जण होरपळल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

सविस्तर वाचा...

12:00 (IST) 29 May 2023
भंडारा: तरुणाने वाढदिवसाला तलवारीने कापले तब्बल ११ केक, व्हीडिओ व्हायरल

भंडारा: सध्या वाढदिवसाला काहीतरी वेगळे करण्याच्या नादात तरुण भलतेच धाडस करताना दिसत आहेत. त्यात बंदूक, तलवार , चाकू अशा शस्त्रानी केक कापून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याचे प्रकार हल्ली वाढत आहेत.

सविस्तर वाचा...

11:58 (IST) 29 May 2023
पिंपरी : लग्नास नकार दिल्याने तरुणीचे नग्न फोटो व्हायरल

फिर्यादी तरुणीने आरोपी रोहित याच्यासोबत राहण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला, शिवीगाळ केली. धमकी दिली आणि मारहाण केली. तसेच नग्न फोटो फिर्यादीच्या बहिणीच्या व्हॉटसॅपवर पाठविले. नग्न फोटो व्हायरल करून फिर्यादीची बदनामी केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 29 May 2023
“नालेसफाईची कामे व्यवस्थित केली नाही, तर…”, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा

नाले सफाईची कामे ठेकेदारांनी व्यवस्थितरीत्या करावी. या कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाची देयके काढली जाणार नाहीत, असा इशारा आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदारांना दिला. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ९५ किमी लांबीचे ९७ नाले आहेत.

सविस्तर वाचा

11:43 (IST) 29 May 2023
अमरावतीत बच्‍चू कडूंचा लोकसभेचा उमेदवार कोण? कोणाचे नाव चर्चेत, जाणून घ्या..

अमरावती : राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे जिल्‍ह्यातील आमदार बच्‍चू कडू आणि रवी राणा यांच्‍यात अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नवा सामना रंगला आहे. बच्‍चू कडूंनी अमरावतीच्‍या जागेवर दावा केला असताना त्‍यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संभाव्‍य उमेदवार म्‍हणून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वैद्य यांचे नाव चर्चेत आले आहे.

सविस्तर वाचा..

11:42 (IST) 29 May 2023
नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, गांजाप्रकरणी कर्मचाऱ्यांना नोटीस

सूत्रांच्या माहितीनुसार, मो. सानू आणि अमित सोमकुंवर हे दोघेही कारागृहात बंद आहेत. त्यांना गांजाची सवय आहे. कारागृहात मोबाईल आणि गांजा बिनधास्त मिळत असल्यामुळे दोघांनीही प्रयत्न केला. दोघांनीही त्याच्या एका मित्राला मोबाईल फोन आणि दोन सीमकार्ड आणि ६ बँटरी आणि ३४६ ग्रँम गांजा एका पिशवीतून कारागृहात फेकण्यास सांगितले होते.

सविस्तर वाचा

11:42 (IST) 29 May 2023
विखे-पाटील यांचे भाजपमध्येही खटके आणि संघर्ष सुरूच

पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री राम शिंदे या भाजप नेत्यांमधील खटके जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. विखे काँग्रेसमध्ये असताना जे चित्र ते व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामधील वैमनष्याचे होते, तेच चित्र आज विखे व शिंदे या दोघा नेत्यांतील संबंधात निर्माण झालेले दिसतात. हे खटके एकाएकी उडालेले नाहीत, त्याला पूर्वसंदर्भ आहेत.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 29 May 2023
iCNG vs petrol पैकी कोणत्या व्हेरिएंटमध्ये आहे टाटा अल्ट्रोझ बेस्ट

Tata Motors ही देशातील एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेटेड मॉडेल्स लॉन्च करत असते. तसेच कंपनी त्यात ग्राहकांच्या सुरक्षेची खास काळजी घेते. टाटाने नुकतीच भारतीय बाजारपेठेमध्ये आपली टाटा अल्ट्रोझला नवीन फीचर्ससह लॉन्च केले आहे. बातमी वाचा सविस्तर

11:38 (IST) 29 May 2023
Weekly Tech Updates: मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या ‘जुगलबंदी’ चॅटबॉटपासून ते रिलायन्स जिओचा फॅमिली रिचार्ज प्लॅन

सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टने भारतामध्ये आपला नवीन AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. चॅटजीपीटीमध्ये अनेक नवीन अपडेट येत आहेत. तसेच अनेक स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, टीव्ही अशी प्रॉडक्ट्स लॉन्च होत आहेत. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काय-काय घडामोडी झाल्या आहेत ते जाणून घेणार आहोत. बातमी वाचा सविस्तर

11:20 (IST) 29 May 2023
Video : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाईंचा पुतळा हटवला, एकनाथ शिंदे म्हणाले…

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जंयतीकरता महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

सविस्तर वाचा

11:20 (IST) 29 May 2023
अमरावती : घोषणेत अडकले रिद्धपुरातील मराठी विद्यापीठ; समितीची स्थापना कधी? वाचा सविस्तर…

अमरावती : जिल्‍ह्यातील रिद्धपूर या महानुभाव पंथाच्‍या प्रमुख केंद्राचे मराठी साहित्‍याच्‍या विकासातील महत्त्वाचे योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी विद्यापीठाच्‍या स्‍थापनेची घोषणा यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात करण्‍यात आली. तज्‍ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्‍याची घोषणा तीन वेळा करण्‍यात आली, पण अद्यापही समिती स्‍थापन न करण्‍यात न आल्‍याने विद्यापीठाच्‍या स्‍थापनेत नमनालाच अडथळे निर्माण झाले आहेत.

सविस्तर वाचा..

11:20 (IST) 29 May 2023
“अहो, आमचा सावरकरांच्या कार्यक्रमाला विरोध नाही, पण…”, ‘त्या’ प्रकारावर छगन भुजबळांचं टीकास्र; म्हणाले, “..याचं मला नवल वाटतंय!”

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जंयतीकरता महाराष्ट्र सदन सजवण्यात आलं होतं. यावेळी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे तात्पुरते हटवण्यात आल्याची बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ माजली. तसंच, या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडलं आहे.

सविस्तर वाचा

11:08 (IST) 29 May 2023
चंद्रपूर : खासदार धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक; दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू

चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. रविवारी खासदार धानोरकर यांची प्रकृती खालवल्याने त्यांना नागपूर येथील अरिहंत रुग्णालयातून विशेष एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे पुढील उपचारासाठी वेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते.

सविस्तर वाचा..

10:57 (IST) 29 May 2023
नागपूर : विद्युत प्रकल्पांमधील राख ही किरणोत्सर्गी तरीही लोकवस्तीजवळ प्रकल्पाचा अट्टाहास का ?

नागपूर : औष्णिक विद्युत प्रकल्पांमधील राख ही किरणोत्सर्गी असते. त्यामुळे लोकवस्तीजवळ असे प्रकल्प नसावे, असे तज्ज्ञांचे मत आहे, तरीही कोराडी येथे अतिरिक्त प्रकल्प उभरण्याचा अट्टाहास का, असा सवाल जनमंचने केला आहे.

सविस्तर वाचा..

10:55 (IST) 29 May 2023
ठाणे : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून बेदम मारहाण

ठाणे – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आकाश मराठे याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

10:30 (IST) 29 May 2023
मूल होत नसल्याने पत्नीची हत्या, अंबरनाथमधील घटना, आरोपी पतीला अटक

अंबरनाथ : विविध औषधोपचार करत असूनही लग्नाच्या १२ वर्षांनंतरही मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथच्या पश्चिमेतील आयुध निर्माण संस्थेच्या निवासी वसाहतीत हा प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

सविस्तर वाचा..

10:30 (IST) 29 May 2023
नागपूर : कोराडी वीज प्रकल्प सुनावणीपूर्वीच आदित्य ठाकरेंचे ट्वीट, काय म्हणाले?

नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेससह विविध पर्यावरणवादी आणि स्वंयसेवी संघटनांचा विरोध आहे. आज (२९ मे) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोराडी औष्णिक वीज केंद्र परिसरात दुपारी १२ वा. जनसुनावणी आयोजित केली आहे. सूनवणीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सूनवणीच्या स्थळाबाबत शासनाला चिमटा काढला.

सविस्तर वाचा..

10:29 (IST) 29 May 2023
नागपूर : “त्या” माकडाचा पिलासाठी टाहो.. चारचाकीने उडवले, आता या वाहनांनाच केले लक्ष

नागपूर : माकडाच्या पिलाला एका चारचाकी वाहनाने उडवले आणि ते वाहन सुसाट वेगाने पळाले. माकडीणीने टाहो फोडला, पण पिलाला वाचवायला कुणीही आले नाही. तिने त्या मृत पिलाला जवळच्या झुडपात नेले. पालपाचोळ्याने त्याला झाकून ठेवले आणि आता ते माकड येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी वाहनांवर हल्ला करते. सोनेगाव परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून या माकडामुळे त्रस्त आहेत.

सविस्तर वाचा...

uddhav thackeray pm narendra modi

<br />उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करण्यात आली आहे.