Marathi News Updates, 09 June 2026 : जून महिना उजाडला तरीही पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह शहरातील नागरिकही हैराण झाले आहेत. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन सुरू असल्याने नागरिकांना उकाडा असह्य होऊ लागला आहे. त्यामुळे पाऊस कधी बरसणार याचीच सर्वांना आता चिंता वाटू लागली आहे. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची धामधुमी सुरू असून काहीजण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळी महाविकास आघाडी की महायुती जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Live Updates
Mumbai Maharashtra Latest News Updates, 09 June 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
जळगाव शहरात आणखी एक बाह्यवळण रस्ता… महापालिका प्रशासनाकडून हालचालींना वेग
महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जमीन मालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनामूल्य जमिनीऐवजी टीडीआर स्वीकारून प्रकल्पासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. ...सविस्तर वाचा
आगारामधील अधिकाऱ्यांकडून कंत्राटी बसची तपासणी
कंत्राटदारांना कामगार कायदे आणि किमान वेतन नियमांचे पालन करणे बंधनकारक; बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांचे आदेश. ...सविस्तर वाचा
तीन महिन्याच्या बाळाचा ताबा आईकडेच हवा , उच्च न्यायालयाचे आदेश ; पित्याच्या कृतीमुळे बाळाचे कधीही भरून न येणारे नुकसान
न्यायालयाने शब्द फिरवणाऱ्या पतीला ठोठावला १ लाखांचा दंड; पत्नी आणि बाळाच्या देखभालीसाठी दरमहा ४५ हजार देण्याचे आदेश. ...सविस्तर वाचा
विधानपरिषदेच्या सर्व जागा महायुती जिंकणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; खा. चव्हाण व राजूरकरांनी घेतली भेट
नांदेडमधील भाजप-महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक तयारीची सविस्तर माहिती दिली. ...वाचा सविस्तर
वंशाचा खरा दिवा ‘मुली’च
मुलगा फक्त घराण्याचे नाव पुढे नेतो. खरी परंपरा पुढे नेण्याचे काम या मुलीच करतात. तेदेखील मायटोकॉनड्रीयल डीएनएमुळे.
...वाचा सविस्तर
ठाणे-घोडबंदर मार्गावरील प्रवास सुसाट; गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल...
ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि भाईंदर उन्नत पूल प्रकल्पांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजुरी दिली. ...अधिक वाचा
आंतरराष्ट्रीय मार्गावर इंडिगो पहिल्या क्रमाकांवर
एअर इंडिया समूहाला (एअर इंडिया + एअर इंडिया एक्स्प्रेस) मिळाला दुसरा क्रमांक; उड्डाणांच्या संख्येतही इंडिगो ७ टक्क्यांनी पुढे. ...सविस्तर वाचा
नायगाव बीडीडी चाळीच्या पुनर्विकासित इमारतींमध्ये तीव्र पाणीटंचाई, रहिवासी हवालदिल; अपुरा पाणीपुरवठा असताना चावी वाटप का, रहिवाशांचा सवाल
दररोज केवळ १० ते १५ मिनिटेच पाणी; बाटलीबंद पाणी विकत घेण्याची रहिवाशांवर ओढवली वेळ. ...वाचा सविस्तर
मोठी बातमी: गायीला राष्ट्रीय पशू घोषित करा! नागपुरात मुस्लिम समाजाचे अनोखे आंदोलन
केवळ घोषणाबाजी नाही; मुस्लिम बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष गाय सप्रेम भेट ...सविस्तर बातमी
सरसकट कर्जमाफीसाठी सत्ताधारी शिवसेनेचे अहिल्यानगरमध्ये रास्तारोको आंदोलन
शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळावी यासाठी सत्ताधारी शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेने अहिल्यानगरमधील राहुरी येथे तीव्र रास्तारोको आंदोलन केले. ...अधिक वाचा
दुचाकीला ठोकरुन मोटार शिरली थेट घरात
मिरजेतील महात्मा गांधी चौकात साप्ताहिक बाजाराच्या दिवशी नियंत्रण सुटलेली एक इलेक्ट्रिक मोटार दोन दुचाकींना ठोकरून थेट नागरिकाच्या घरात घुसली. ...अधिक वाचा
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेवर आता तीन सदस्यीय प्रशासकीय मंडळ
फेब्रुवारी २०२६ मध्ये संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर आणि आचारसंहितेमुळे निवडणूक रखडल्याने बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल करण्यात आला. ...सविस्तर वाचा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चार मेट्रो मार्गिका सज्ज ; २,४९६ सीसी टीव्ही कॅमेरे, ३० पंप आणि इतर यंत्रणा कार्यान्वित
संवेदनशील परिसरात ३० पंप तैनात; वीज आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी १,०७० इन्सुलेटरची तपासणी पूर्ण. ...अधिक वाचा
दिव्यात खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू
दिवा येथील बेतवडे भागात खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय मोनू सोलंकी नावाच्या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ...वाचा सविस्तर
उलवेत दारू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर थेट बुलडोझरची कारवाई
उलवे नोडमध्ये पानटपऱ्यांच्या आडून चालणाऱ्या बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यांवर आणि विनापरवाना बांधकामांवर सिडकोने थेट बुलडोझर फिरवून धडक कारवाई केली. ...सविस्तर वाचा
पाणी गळती चाचणीत नवीन विद्युत बस नापास
जुन्या डागडुजी केलेल्या बसमध्येही गळती कायम; दरवाजे बंद न होणे व हँडब्रेकच्या तांत्रिक त्रुटी उघड. ...अधिक वाचा
Indian Post Grievances : टपाल तक्रारींसाठी ‘डाक अदालत’; सहा आठवड्यांपासून रखडलेल्या प्रकरणांना सुनावणीची संधी
Dak Adalat : टपाल सेवांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारतीय टपाल विभागातर्फे ३० जून रोजी नवी मुंबईतील वाशी येथे पहिल्यांदाच 'डाक अदालत' भरवली जाणार आहे. ...वाचा सविस्तर
ठाण्यात राष्ट्रवादीत मोठा फेरबदल! अपयशानंतर जुनी कार्यकारिणी बरखास्त; नजीब मुल्लांकडून नव्या टीमची घोषणा
निवडणुकीत अवघ्या नऊ जागा मिळाल्याने संघटनात्मक फेरबदल करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादीने नवी फळी मैदानात उतरवली आहे. ...अधिक वाचा
वाहतळावरील अतिरिक्त वसूली भोवणार; अंबरनाथमधील वाहनतळ कंत्राटदाराला काळ्या यादीत… गुन्हा दाखल करण्याचे नगराध्यक्षांचे आदेश
अंबरनाथमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या वाहनतळावर ४०० रुपयांऐवजी ७०० रुपये बेकायदेशीर वसूल करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
G. Sreekanth, IAS : शासकीय कर्मचार्यांच्या सेवाविषयक अडचणींचा निपटारा करण्यासाठी ‘कर्मचारी समाधान शिबिर’! विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे सर्व विभागांना आदेश
Divisional Commissioner Chhatrapati Sambhajinagar : किरकोळ कामांसाठी कर्मचाऱ्यांना मंत्रालयापर्यंत मारावे लागणारे हेलपाटे थांबवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जिल्हा आणि तालुका पातळीवर विशेष तक्रार निवारण शिबिरे होतील. ...वाचा सविस्तर
सीईटी प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्तीची माहिती विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरच मिळणार ; प्रत्येक जिल्ह्यात सीईटी कक्षाकडून विद्यार्थी सहाय्यता केंद्र
मुंबईत ३, पुण्यात २ आणि नागपुरात २ केंद्रे; ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. ...सविस्तर वाचा
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा किती?,जाणून घ्या नियम, 'या' पेक्षा जास्त खर्च केला तर…
लोकसभा व विधानसभासह महापालिकापासून ते ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवासाठी आयोगाकडून खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. या मर्यादेच्यावर खर्च करणाऱ्याचे सदस्यत्वच धोक्यात येते. ...अधिक वाचा
अतिरिक्त निवासी युनिट्सच्या नियमितीकरणाला सिडकोची मंजुरी; पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
अशा अतिरिक्त निवासी युनिट्सना दंडात्मक शुल्क आकारून नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता व्यवहारांना आणि पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...अधिक वाचा
‘टकटक टोळी'च्या दोघांना जेरबंद करून वाहतूक पोलिसांची धाडसी कारवाई
ठाण्यात वाहनांच्या काचेवर ‘टकटक’ करून वाहनचालकांचे महागडे मोबाईल पळवणाऱ्या कुख्यात टोळीच्या दोघांना वाहतूक पोलिसांनी साकेत परिसरात थरारक पाठलाग करून जेरबंद केले. ...सविस्तर बातमी
दिल्लीच्या सत्ताकेंद्रात प्रफुल पटेलांची नवी 'खेळी'; राजू जैन ठरणार विदर्भातील पुढचे 'पॉवर सेंटर'?, राज्यसभेच्या मैदानात…
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल पटेल यांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांना राज्यसभेच्या मैदानात उतरवून विदर्भाच्या राजकारणात मोठी राजकीय चाल खेळली आहे. ...सविस्तर वाचा
आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाजावर परिणाम
आधीच मर्यादित मनुष्यबळ असलेल्या या कार्यालयातील ७ शिल्लक कर्मचारीही संपावर गेल्याने वाहन नोंदणी, परवाने आणि इतर प्रशासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली ...सविस्तर बातमी
विरार मध्ये आरएमसी प्लांटजवळील तलावात पडून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू
तो गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता, चक्कर आल्याने तो तलावात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ...सविस्तर वाचा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूखंड प्रकरण; पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील वृक्षतोड, बांधकामाप्रकरणी ठाणे महापालिका, वन विभागाला वनशक्ती संस्थेची कायदेशीर नोटीस
राष्ट्रीय उद्यानाच्या अंतिम सीमारेषा आणि बफर झोन निश्चित होईपर्यंत येथील सर्व विकासकामे तातडीने थांबवण्याची मागणी वनशक्ती संस्थेने वकील रोनिता भटाचार्या यांच्यामार्फत केली आहे. ...वाचा सविस्तर
एसटीच्या १०० टक्के ई-बसांचे स्वप्न; पण अडथळा कुठे? महाराष्ट्र एसटी काँग्रेस म्हणते…
‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेअंतर्गत सन २०२९ पर्यंत एसटीच्या ताफ्यात ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के आणि २०४७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक बसांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. ...सविस्तर बातमी
दोन वर्ष फरार असलेला कल्याणचा सराईत भूमाफिया सलमान डोलारे अटकेत
गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात भूमाफियाला कल्याण गुन्हे शाखा आणि बाजारपेठ पोलिसांनी दुधनाका भागातील एका सदनिकेच्या कपाटातून शिताफीने अटक केली. ...सविस्तर वाचा
Mumbai Maharashtra Latest News Updates, 09 June 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
