Top Marathi News Updates, 01 September 2026 : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरू आहेत. विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण चांगलचं तापलेलं आहे. यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषणाचा आणि डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. पुण्यात विद्यानंद बापट यांनी डीजेचा वापर व त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा मांडल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला असून यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील एका महाविद्यालयात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्यासह मनसेच्या २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Marathi News Live Updates : राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

19:38 (IST) 1 Sep 2026

'सीजेपीचे नेते संत नाहीत', सोनम वांगचुक यांच्या विधानावर आता अभिजीत दिपके यांची मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाले?

Abhijit Dipke on Sonam Wangchuk: सोनम वागंचुक यांच्या त्या मुलाखतीमधील ९९ टक्के भाग वगळून केवळ एक टक्के भागाची क्लीप तयार करण्यात आली, असे अभिजीत दिपके म्हणाले. ...वाचा सविस्तर
18:22 (IST) 1 Sep 2026

जेवणात पाल, आश्रमशाळेतील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांमध्ये संताप

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील श्री अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत दुपारच्या जेवणात पाल पडल्याने २९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...अधिक वाचा
18:15 (IST) 1 Sep 2026

एमपीएससीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह; यूपीएससीपेक्षा २०० गुणांनी जास्त ‘कटऑफ’ असल्याची चर्चा, विद्यार्थ्यांमध्ये दोन बाजू…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावर आणि निष्पक्षतेवर रोज नव-नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, आयोगाच्या भोंगळ व्यवस्थापनामु‌ळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. अन्न व औषध प्रशासनातील ‘ड्रग इन्स्पेक्टर’ परीक्षेचा पेपर थेट ‘एमपीएससी’च्या अवर सचिवासह दोन कर्मचाऱ्यांनीच विकल्याचे उघडकीस आले असतानाच, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अचाट आणि अशक्यप्राय ‘कटऑफ’ने संपूर्ण उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहेत. त्यानंतर आता राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच पुन्हा एकदा विविध प्रश्न उपस्थित झालेले आहेत. यूपीएससीपेक्षा २०० गुणांनी जास्त ‘कटऑफ’ कसा? असा संभ्रम काही विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित झाला आहे. नेमका काय गोंधळ झाला बघा.

सविस्तर वाचा

18:08 (IST) 1 Sep 2026

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर तपासणीमध्ये घोळ? राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेवरून रोहित पवार आक्रमक

"राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपर तपासणीमध्ये घोळ असल्याबाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे असून अनेक विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये अगदी २, ४, ६ इतके नगण्य गुण देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. याबाबतही MPSC च्या सचिवांसोबत चर्चा झाली आणि याची त्यांनी गंभीर दखल घेऊन चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं. याशिवाय कृषी आणि FSO पदाच्या मुख्य परीक्षेच्या पेपर तपासणीबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात मोठी शंका आहे. पेपर तपासताना ते योग्य पद्धतीने तपासले गेले नसल्याचे काही पुरावे आम्ही एमपीएससीला सादर केले असून विद्यार्थ्यांनीही त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर तेही एमपीएससीला ई-मेल करुन कळवावेत. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, यासाठी आपण लढत राहू", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2094728458081616129

18:06 (IST) 1 Sep 2026

‘‘पगारी सुटी द्या, खाण्या-पिण्याची सोय करा”, ग्राहक पंचायतीकडून ‘शहराबाहेर जा’ म्हणणाऱ्यांना खणखणीत उत्तर! थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील गणेशोत्सवात 'डीजे'चा त्रास सहन होत नसेल तर शहराबाहेर जा असा सल्ला देणाऱ्यांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने खणखणीत उत्तर दिले आहे. ...वाचा सविस्तर
17:52 (IST) 1 Sep 2026

१३ लाखांचे व्हेंटिलेटर २२.५ लाख रुपयांत? जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराचा कळस: माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुखांचा आरोप

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी झालेल्या २० व्हेंटिलेटरच्या खरेदीत तब्बल २ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. ...वाचा सविस्तर
17:39 (IST) 1 Sep 2026

मोठी बातमी! पुण्यात ‘सीएनजी’ दोन रुपयांनी महागला

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसरातील वाहनधारकांसाठी मोठा झटका बसला आहे. ...सविस्तर वाचा
17:28 (IST) 1 Sep 2026

मालेगाव महापालिकेतील उपमहापौर दालनातील ‘टिपू सुलतान’ यांचा फोटो हटवला

मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात लावण्यात आलेल्या ‘टिपू सुलतान’ यांच्या फोटोवरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत हा फोटो हटवण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अखेर उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांचा फोटो हटवला आहे. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी याबाबत माहिती दिली असून, पोलिसांनीही फोटो हटवण्यात आल्याला दुजोरा दिला आहे.

16:10 (IST) 1 Sep 2026

वीज गेली अन् घात झाला! उकळते पाणी अंगावर सांडल्याने ८ वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू

नागपुरातील जरीपटका परिसरातील अशोक नगर येथे वीज गेल्यामुळे अंधारात उकळत्या पाण्याच्या बादलीला धडक लागून ८ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 1 Sep 2026

अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवल्यानंतर वाद पेटला; मनसे अन् भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात बेकायदा प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी अमित ठाकरे आणि मनसैनिकांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला होता. यावरून आता भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी एकत्र आले आहेत, तर मनसेचे देखील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत मनसे अन् भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

15:44 (IST) 1 Sep 2026

भर पावसाळ्यात गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागात पाणी नाही; शुक्रवारीही कमी दाबाने पुरवठा

गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित; शुक्रवारी सकाळी कमी दाबाने होणार पुरवठा. ...वाचा सविस्तर
15:29 (IST) 1 Sep 2026

१३ हजार किमीची भरारी! पाकिस्तान व्याप्त काश्मीरपर्यंत पोहोचलेले ‘एन-०९’ गिधाड पुन्हा हिमाचलमध्ये

पिंजोर येथील जटायू संवर्धन केंद्रात जन्मलेल्या ‘एन-०९’ नावाच्या पांढऱ्या पाठीच्या गिधाडाने तब्बल १३ हजार किलोमीटरची अभूतपूर्व भ्रमंती केली आहे. ...सविस्तर बातमी
15:21 (IST) 1 Sep 2026

डोंबिवलीत अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा संवादाचे प्रमाणपत्र वाटप

रिक्षाचालकांना प्रवाशांशी सहजगत्या मराठीतून संवाद साधता यावा यासाठी रिक्षा चालक मालक संघटनेने अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा संवाद कार्यशाळेचे दोन महिन्यांपासून आयोजन केले होते. ...अधिक वाचा
15:20 (IST) 1 Sep 2026

ठाणे : शेतकऱ्यांना घरबसल्या खत नोंदणीची सुविधा; जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ कार्यान्वित

खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची शेतकऱ्यांची अडचण आता कमी होणार आहे. ...सविस्तर वाचा
15:19 (IST) 1 Sep 2026

मेट्रोच्या दोन टप्प्यांना मंजुरी; भिवंडी-कल्याण-उल्हासनगरचा प्रवास अधिक वेगवान

मागील पाच ते सहा वर्षात ठाणे शहर परिसरातील मेट्रो मार्गिका विस्तारण्याचे बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. ...अधिक वाचा
15:19 (IST) 1 Sep 2026

कोण आहेत डॉ. महेश बेडेकर? उत्सवातील डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे ठाण्यातील हे डाॅक्टर चर्चेत का आहेत ?

Noise Pollution PIL High Court: नियमांची ऐशीतैशी करणाऱ्या या दणदणाटाविरोधात ठाण्यातील डाॅ.महेश बेडेकर यांनी मोठा न्यायालयीन लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयात ध्वनी प्रदुषण नियम अंमलबजावणी, रस्ते अडवून साजरे होणारे सण-उत्सवांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेली याचिका गाजली. ...सविस्तर वाचा
15:15 (IST) 1 Sep 2026

अमित ठाकरेंविरोधात भाजपा युवा मोर्चा आक्रमक, मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी 'शिवतीर्थ' बाहेर आंदोलनाचा इशारा

गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात बेकायदा प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावेळी अमित ठाकरे आणि मनसैनिकांनी पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला होता. यावरून आता भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते आता राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी एकत्र जमले आहेत.

14:16 (IST) 1 Sep 2026

पोलिसांनी ओबीसी मोर्चा दौंडमध्ये रोखला, आंदोलकांची घोषणाबाजी; लक्ष्मण हाके मोर्चावर ठाम, नेमकं काय घडलं?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. पुणे ते मुंबई मोर्चा काढणार आहेत. मात्र, त्यांचा हा मोर्चा पोलिसांनी पाटस टोलनाक्यावर अडवला आहे. तसेच मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी सांगत हा मोर्चा थांबवला आहे. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत.

14:04 (IST) 1 Sep 2026

प्रभादेवी रेल्वे उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर २०२६पर्यंत पूर्णत्वास

मध्य व पश्चिम रेल्वेवरील ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन प्रभादेवी उड्डाणपूल पाडून त्याजागी १६७.३५ कोटी रुपये खर्चाचा नवा दुमजली पूल उभारण्याचा निर्णय ‘महारेल’ने घेतला आहे. ...अधिक वाचा
13:52 (IST) 1 Sep 2026

यंदा भुलेश्वरच्या राजाची छोटी मूर्ती; गणेशोत्सव ११ दिवस, मिरवणूकही साधीच

भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत २२ फूट गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत अध्यक्षांसह दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
13:31 (IST) 1 Sep 2026

“पाच कोटी न दिल्यास खोटा ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करणार”, नाशिकमध्ये भूमाफियांची दादागिरी

जमीन मालकाच्या मानेवर पाय ठेवून एक लाख रुपये लुटले; जीवे मारण्याची आणि ॲट्रासिटीच्या गुन्ह्याची धमकी. ...सविस्तर वाचा
13:25 (IST) 1 Sep 2026

कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांना दिलासा; एप्रिल २०२४ ते मार्च २०२७ दरम्यानचे सेवाशुल्क माफ

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आकारण्यात येणारे अव्वाच्या सव्वा सेवाशुल्क अखेर १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी माफ करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
12:58 (IST) 1 Sep 2026

आरोपीच्या अटकेची माहिती समाज माध्यमातून दिल्याने पोलीस अडचणीत; न्यायालयाचे आरोपीला सोडून देण्याचे आदेश

पुण्यातील बावधन पोलिसांनी साखळी चोरीच्या प्रकरणात केलेली अटक पौड न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे. ...सविस्तर वाचा
12:57 (IST) 1 Sep 2026

Dombivli Crime News: टिटवाळ्याच्या सराफाची डोंबिवलीतील निखील भोईरकडून १८ लाखांची फसवणूक

टिटवाळा येथील नांदप गावातील एका सराफाकडून डोंबिवलीच्या निखील भोईर यांनी जूनमध्ये सोन्याचे १८ लाख ९१ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. ...सविस्तर वाचा
12:48 (IST) 1 Sep 2026

वर्धा: एसआयआरची मतदार यादी: १५ टक्के मतदार गळले; लवकर आक्षेप घ्या अन्यथा मुंबई गाठावी लागणार

नागरिकांना प्रारूप मतदार यादीवर आपले दावे आणि आक्षेप नोंदवण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी खालील फॉर्म भरून आवश्यक ती स्वयंप्रमाणित कागदपत्रे सादर करावी लागतील. ...अधिक वाचा
12:47 (IST) 1 Sep 2026

SIR: नागपूर जिल्ह्यातील १४.४३ लाख मतदार वगळले, ८.६५ लाख मतदारांना जाणार नोटीस! ही आहे प्रारूप यादी, येथे शोधा तुमचे नाव…

मॅपिंग न झालेले आणि माहितीतील तफावत असलेल्या ८.६५ लाख मतदारांना व्हॉट्सॲप आणि प्रत्यक्ष घरपोच मिळणार नोटीस. ...वाचा सविस्तर
12:46 (IST) 1 Sep 2026

विमानाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट; जुलै महिन्यात ४ टक्के प्रवासी कमी

पावसाळा आणि विमानांच्या क्षमतेतील व्यवस्थापनामुळे ही घसरण झाली आहे. ...सविस्तर बातमी
12:44 (IST) 1 Sep 2026
पोलिसांनी ओबीसी मोर्चा दौंडमध्ये रोखला, आंदोलकांची घोषणाबाजी; लक्ष्मण हाके मोर्चावर ठाम, नेमकं काय घडलं?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. पुणे ते मुंबई मोर्चा काढणार आहेत. मात्र, त्यांचा हा मोर्चा पोलिसांनी पाटस टोलनाक्यावर अडवला आहे. तसेच मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी सांगत हा मोर्चा थांबवला आहे. पण ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत.

12:35 (IST) 1 Sep 2026

Teacher Recruitment: गणेशोत्सवापूर्वीच श्री गणेशा! शिक्षक भरती उमेदवारांच्या नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर… पात्र उमेदवार कधी रूजू होणार?

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी ७,५४१, सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ४,२०७, नववी ते दहावी या वर्गांसाठी १,११९, अकरावी ते बारावी या वर्गांसाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. आता या उमेदवारांना रुजू करून नियुक्त केले जाणार आहे. ...अधिक वाचा
12:32 (IST) 1 Sep 2026

वैमानिकांचे नोएल टाटांना पत्र; एअर इंडियात अनुभवी वैमानिक नोकरी सोडण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती

अनुभवी वैमानिकांचे जाणे ही केवळ मनुष्यबळाची समस्या नसून थेट विमान प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न; वैमानिकांच्या संघटनेचे नोएल टाटांना पत्र. ...सविस्तर वाचा

Maharashtra Breaking News Live

इंधनाचे नवे दर जाहीर! महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा की खिशाला कात्री? वाचा!, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)