Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Update: लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आलेल्या असताना महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात आहेत. त्याचवेळी विधानसबा निवडणुकांसाठीची रणनीती सर्वपक्षांकडून आखली जाऊ लागली आहे. दुसरीकडे मनुस्मृतीविरोधातील आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. सत्ताधारी गट आव्हाडांना लक्ष्य करत असताना छगन भुजबळांनी मात्र आव्हाडांची बाजू घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणेला सुरुवात केल्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातूनही त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Live Updates

Marathi News Updates 31 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा!

20:09 (IST) 31 May 2024
सातारा: मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीच्या भागीदारीतील अनधिकृत पंचतारांकीत हॉटेल सील

१९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटामधील आरोपी समीर शिंगोरा यांची भागीदारी अस्लेले हे हॉटेल आहे. नऊ वर्षे शिक्षा भोगून ते बाहेर आले आहेत.

सविस्तर वाचा...

19:51 (IST) 31 May 2024
जून उजाडत आला तरी कोल्हापूर महापालिकेची नाले सफाईची कामे गाळातच

नालेसफाईच्या कामाचा आजपर्यंतचा आढावा घेता हे काम अजूनही कूर्मगतीने सुरू आहे. जून महिना उजाडत आला तरी नालेसफाईचे काम गाळातच अडकले आहे.

सविस्तर वाचा...

19:39 (IST) 31 May 2024
मुंबई: ‘बी.ए.’च्या ६ व्या सत्र परीक्षेमध्ये ४९.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, ५०.६९ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष ‘बी.ए.’च्या सहाव्या सत्र परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला.

सविस्तर वाचा...

19:29 (IST) 31 May 2024
एमएमआरडीएचा पावसाळी नियंत्रण कक्ष आजपासून कार्यान्वित

पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी एमएमआरडीएने सर्व कंत्राटदारांना पावसाळ्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

सविस्तर वाचा...

19:24 (IST) 31 May 2024
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची पोलिसांनी परवानगी

पुणे अपघात प्रकरणील अल्पवयीन आरोपीच्या चौकशीची परवानगी पुणे पोलिसांनी देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1796533624281649648

19:19 (IST) 31 May 2024
मुंबई: ‘अभियांत्रिकी’ सत्र ८ आणि ‘बीएमएस’ सत्र २ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

४३ परीक्षांवर मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आलेल्या ‘जम्बो ब्लॉक’चा कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली.

सविस्तर वाचा...

19:07 (IST) 31 May 2024
कोल्हापुरात लाच प्रकरणी मंडल अधिकारी, खासगी व्यक्तीवर कारवाई

सातबारा पत्रकी नाव नोंद करून दाखला देण्यासाठी खासगी व्यक्ती रणजीत पाटील याने मंडल अधिकारी अभिजीत पवार यांच्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली.

सविस्तर वाचा...

18:54 (IST) 31 May 2024
छत्रपती संभाजीनगर: ‘माजलगाव पाटबंधारे’तील कार्यकारी अभियंत्याकडे दीड कोटींचे सोने

राजेश सलगरकर याला शेतकऱ्यांकडून गाळ काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना २२ मे रोजी पकडले होते.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 31 May 2024
कोल्हापुरातील पासिंग दंडावरील कारवाई थांबवा; परिवहन अधिकाऱ्यांकडे ‘आप’ची मागणी

रिक्षा पासिंग करण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रूपये इतका दंड आकारण्यास परिवहन कार्यालयाने सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा...

18:32 (IST) 31 May 2024
२५ मते जास्त आढळली, मतदानातील फरकाबाबत अखेर नोटीस; वाचा कुठे घडला हा प्रकार?

२६ जूनपर्यंत दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयात उत्तर सादर करायचे आहे.

सविस्तर वाचा...

18:08 (IST) 31 May 2024
छत्रपती संभाजीनगर: पन्नास हजारांची मागणी; सहकार अधिकारी सापळ्यात

भारत झुंजारेविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

17:59 (IST) 31 May 2024
सांगली: सागरेश्वरमध्ये १७१ चितळ, २२० सांबर

सागरेश्वर अभयारण्यामध्ये २२ मे रोजी बौध्द पौर्णिमेच्या रात्री आठ पाणवठ्यावर प्राणीगणना करण्यात आली.

सविस्तर वाचा...

17:46 (IST) 31 May 2024
उस्मानाबाद लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण, विधानसभानिहाय १४ टेबलवर १५५ फेर्‍या

आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण १५५ मतमोजणीच्या फेर्‍या होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

सविस्तर वाचा...

17:08 (IST) 31 May 2024
Maharashtra Breaking News Live: मोदींच्या ध्यानधारणेवर सुषमा अंधारेंची खोचक पोस्ट!

हमारा राजा संसारका पहला ध्यानी है, जौ ध्यान के चारों रूप एकसाध साध रहा है - सुषमा अंधारेंचं खोचक ट्वीट!

https://twitter.com/andharesushama/status/1796500684407447916

17:06 (IST) 31 May 2024
तुळजाभवानीच्या पुरातन दागिन्यांची तपासणी ‘इनकॅमेरा’; पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाचे पथक तुळजापुरात

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील शिवकालीन पुरातन दागिने गहाळ झाल्याचे मंदिर समितीने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 31 May 2024
Maharashtra Breaking News Live: फडणवीसांनी विरोधकांसाठी जाहीर केली आकडेवारी...

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी क्रमांक 1 वर ! एफडीआय आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये क्रमांक 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने काल 30 मे रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षांत : ₹ 1,18,422 कोटी 2023-24 या आर्थिक वर्षांत : ₹ 1,25,101 कोटी या आर्थिक वर्षांतील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसर्‍या क्रमांकावरील गुजरात आणि तिसर्‍या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो - देवेंद्र फडणवीस</p>

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1796469889865064613

16:27 (IST) 31 May 2024
उमरेडमधील मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू , झाले असे की...

नागपूर: उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाणे हद्दीतील  एक कुटुंब, नातेवाईकांसह  आंबे खाण्यासाठी एका शेतात गेले. पण  झाडाला आंबे नसल्याने कुटुंबाने शेजारील मटकाझरी तलावाशेजारी डब्बा खाण्यासाठी गेले. तलावातील पाणी पाहून काहींना पोहण्याचा मोह झाला. ते तलावात उतरले पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने  तिघांचा बुडून मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

15:55 (IST) 31 May 2024
पनवेलच्या ‘इंटरनेट’ लेडीजबारवर पोलिसांची धाड

पनवेल : पुणे येथील अपघात प्रकरणानंतर सर्वत्र लेडीज सर्व्हीसबारची झाडाझडती घेण्याचे काम पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू झाले आहे. परंतू अनेक दिवस उलटले तरी पनवेलमधील ऑक्रेस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालविणाऱ्यांकडे सरकारी यंत्रणेने लक्ष्य केंद्रीत केले नव्हते.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 31 May 2024
नागपुरात चक्क् ५६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद..! नागरिकांमध्ये गोंधळ

नागपूर : राजधानी दिल्लीने दोन दिवसांपूर्वी तापमानाने पन्नाशी ओलांडत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता नागपूर शहरातही तापमानाने पन्नाशी ओलांडली. शहराचे तापमान ५६ अंश सेल्सिअसवर गेल्याची माहिती समाजमाध्यमावर पसरली आणि नागपुरात नागरिकांमध्ये खळबळ माजली.

सविस्तर वाचा

15:24 (IST) 31 May 2024
जम्बो ब्लॉक काळात घरून काम करण्याची मुभा, ऑफिसमध्ये राहण्याची दक्षता

मुंबई : मध्य रेल्वेने फलाटाच्या विस्ताराची कामे हाती घेण्यासाठी ३० मे रोजी मध्यरात्रीपासून ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या जम्बो ब्लॉक काळात ९०० हून अधिक लोकल गाड्या रद्द होणार आहेत.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 31 May 2024
Pune Porsche Accident Case: विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

15:06 (IST) 31 May 2024
दक्षिण मुंबईत अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित. मंत्र्यांच्या बंगल्यातही बत्ती गुल!

दक्षिण मुंबईत अर्ध्या तासापासून वीज पुरवठा खंडित. मंत्र्यांच्या बंगल्यातही बत्ती गुल!

15:03 (IST) 31 May 2024
जिल्हा प्रशासनात 'लेटर बॉम्ब' : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंचे राजकीय नेत्यांची घनिष्ठ संबंध; खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाला पत्र

पुणे : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे खेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदारांसोबत घनिष्ठ राजकीय संबंध असून ते त्यांच्या प्रभावाखाली काम करत आहेत, असा आरोप खेडचे प्रांताधिकारी तथा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी करत मतमोजणीपूर्वी डॉ. दिवसे यांची बदली करावी.

सविस्तर वाचा

14:56 (IST) 31 May 2024
भाजपच्या दोन गटात दगडफेक, पोलिसांचा लाठीमार; बिहारच्या राजकारणात शोभेल असा प्रकार महाराष्ट्रात…

बुलढाणा : तगडा पोलीस बंदोबस्त, एकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन गट, दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार, अशा ताणतणावात मलकापूर बाजार समितीच्या सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव आज बहुमताने पारित झाला.

सविस्तर वाचा...

14:55 (IST) 31 May 2024
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृत

कल्याण : शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तीन शाळा अनधिकृत म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने घोषित केल्या आहेत. या तीन शाळा टिटवाळा भागात आहेत. या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.

सविस्तर वाचा...

14:54 (IST) 31 May 2024
कल्याण शहराला कोंडीचा विळखा

कल्याण : कल्याण शहरातील वाहन कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने प्रवासी हैराण आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कल्याण पूर्व, पश्चिमेतील बहुतांशी रस्ते वाहन कोंडीत अडकत असल्याने यामध्ये कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

सविस्तर वाचा...

14:49 (IST) 31 May 2024
ठाणे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

नेहमी रिक्षाची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेले होते. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा...

14:43 (IST) 31 May 2024
मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना २०१३ मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर न्यायालयात हजर झाले आहेत.

सविस्तर वाचा

13:34 (IST) 31 May 2024
मध्य रेल्वे जम्बो ब्लॉक : रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे रुग्ण सेवा सुरळीत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासून घेतलेल्या जम्बो ब्लॉकमुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. मात्र मुंबईतील रुग्णालयांमधील रुग्ण सेवेवर फारसा परिणाम जाणवलेला नाही.

सविस्तर वाचा...

13:26 (IST) 31 May 2024
३१ मे रोजी मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील सायंकाळच्या वेळेतल्या या लोकल फेऱ्या होणार रद्द

ठाणे : मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तृतिकरणाचे काम हाती घेतले आहे. तसेच ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra News Today in Marathi

लोकसभा निवडणूक २०२४

Marathi News Live Updates 31 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह सामाजिक-आर्थिक घटना जाणून घ्या एका क्लिकवर!