Mumbai Maharashtra News Updates, 06 September 2024 : राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे सध्या राज्यभरात सुरु आहेत. तर महायुतीचे नेते 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून सरकारमधील नेते राज्यव्यापी दौरे करत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या यात्रा सुरू केल्या आहेत. यातच काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. यासह सर्व राजकीय घडामोडींवर आपलं या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून लक्ष असेल. याबरोबरच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तर चाकरमान्यांची गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची स्थिती पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील आणि देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडी येथे जाणून घ्या…