Mumbai Maharashtra News Updates : राज्यात आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार? महायुती आणि महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ आणि लहान भाऊ याकडे सर्वांचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महायुतीची खलबतं झाल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. परंतु, या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. दुसरीकडे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तसंच, मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण यावरूनही वाद सुरू झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण मिळालं तर ओबीसींचं आरक्षण जाणार का? या चर्चेलाही जोर आला आहे. दरम्यान, राज्यातील वातावरणही बदलत जात आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडला असून पेरण्यांना सुरुवात झाली आहे. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

17:50 (IST) 18 Jun 2024
नागपूर मेट्रोचे तिकीट आता व्हॉट्सऍपवर! गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर : दररोज व नियमित पणे मेट्रोची प्रवाशी संख्या दररोज वाढत असून अनेकदा तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. ही बाब टाळण्यासाठी मेट्रोने कॅशलेसची सुविधा सुरू कली. आता यापुढेचे पाऊल मेट्रोने नवीन व्हॉट्सऍप तिकीट प्रणाली सुरू केली आहे.

वाचा सविस्तर...

17:48 (IST) 18 Jun 2024
निवासी डॉक्टर आक्रमक, सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने ‘मार्ड’चा आंदोलनाचा इशारा

मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली असून याप्रकरणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सविस्तर वाचा...

17:32 (IST) 18 Jun 2024
पुणेरी मेट्रोला गती! हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर‘थर्ड रेल’ विद्युतीकरण कार्यान्वित होणार

पुणे : हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ म्हणजेच पुणेरी मेट्रो प्रकल्पाला आणखी गती मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये विद्युत पुरवठ्यासाठी अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’चा वापर केला जाणार आहे.

सविस्तर वाचा...

17:23 (IST) 18 Jun 2024
वसई हत्येप्रकरणात राज्य महिला आयोगाच्या वतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1803032315419037763

17:20 (IST) 18 Jun 2024
"लक्ष्मण हाकेंच्या शरीरात साखरेचं प्रमाण कमी, उपचार घेण्यास नकार", डॉक्टरांनी दिली माहिती

"ब्लडप्रेशर चांगलं आहे. शुगरचं प्रमाण कमी झाल्याने चक्कर येत आहे. त्यामुळे त्यांना विनंती केली आहे की पाणी घ्या किंवा सलाईन लावा. परंतु, उपचार घेण्यास त्यांनी विरोध केला आहे" - राजेंद्र पाटील, जिल्हा शल्य चिकित्स, जालना</p>

17:08 (IST) 18 Jun 2024
राज्यातील शेकडो शिक्षकांवर पुन्हा अतिरिक्त होण्याची वेळ, काय आहे कारण वाचा

नागपूर : शालेय शिक्षण, क्रीडा विभागाने मार्च २०२४ मध्ये सुधारित संचमान्यतेचा नियम काढला आहे. यामध्ये आधीच्या तुलनेत विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात आली. मात्र, त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या जैसे थे ठेवण्यात आली आहे. यामुळे शेकडो शिक्षकांवर पुन्हा अतिरिक्त होण्याची वेळ आली आहे.

वाचा सविस्तर...

17:07 (IST) 18 Jun 2024
नागपूर- आरमोरी महामार्गाच्या रुंदीकरणाला वनखात्याचा विरोध, काय आहेत कारणे?

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंग देव अभयारण्य आणि मध्यप्रदेशातील खवासा येथील मोगली लँड व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या नागपूर ते अलाहाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, उमरेड-क-हांडला अभयारण्यातून जाणाऱ्या नागपूर ते आरमोरी या महामार्गाचे काम करणे केंद्र सरकारला जड जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाचा सविस्तर...

17:01 (IST) 18 Jun 2024
कर्नाळा किल्ल्यावर नवे भुयार सापडले

पनवेल : पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर रविवारी (ता. १६) प्राचीन भुयार आढळली आहे. गडकिल्ल्यांचे अभ्यासक व सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य गणेश रघुवीर व सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे सदस्य मयूर टकले यांच्या पाहणीत हे भुयार आढळले.

सविस्तर वाचा...

17:00 (IST) 18 Jun 2024
पनवेल : करंजाडेवासियांचे पाणी प्रश्नासाठी आंदोलन

पनवेल : लाखो रुपये किमतीची घरे खरेदी केली मात्र पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने वर्षभरात करंजाडेवासियांना दीड कोटी रुपयांचे टँकरचे पाणी खरेदी करुन प्यावे लागले. अशी संतापजनक परिस्थिती करंजाडेची असल्याने करंजाडेवासियांना दुसऱ्यांदा मोर्चाचे हत्यार उपसावे लागले.

सविस्तर वाचा...

16:47 (IST) 18 Jun 2024
तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू, डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील सुमा्रे ४५ रासायनिक कंपन्यांना शासनाने बंद करण्याच्या दिलेल्या नोटिसा आणि त्यात एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या कंपनी स्फोटांंच्या मालिका, या सगळ्या प्रकाराने सरळमार्गी काम करणाऱ्या उद्योजकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. कंपनी चालक असलेल्या आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला होत असलेला हा त्रास पाहून त्यांच्यासोबत काम करणारी त्यांची मुले म्हणजेच, युवा उद्योजकांनी उव्दिग्न होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंंद करू, असा सल्ला वडिलांना दिला आहे.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 18 Jun 2024
तुळजाभवानी मंदिरातील ५५ संचिका गायब, घोटाळा दडपण्याचा प्रयत्न, जिल्हाधिकार्‍यांचेही दुर्लक्ष

धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे गोपनीय अहवाल, अशा एक ना दोन तब्बल ५५ संचिका तुळजाभवानी मंदिरातून गायब झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 18 Jun 2024
‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या आसपास वृक्षारोपण करा, एमएमआरसीचे नागरिकांना आवाहन

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेलगतच्या परिसरात वृक्षारोपण करावे असे आवाहन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नागरिकांना केले आहे. नागरिकांनी लावलेल्या झाडांची तीन वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 18 Jun 2024
कोल्हापुरात मोठ्या भावासाठी ठाकरे गट आतापासूनच प्रयत्नशील

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला राज्यात चांगले यश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला गत वैभवप्राप्त करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

सविस्तर वाचा..

16:14 (IST) 18 Jun 2024
Marathi Live News : "नीट परीक्षा पुन्हा घ्या, हाच एक मार्ग", गुजरातचा उल्लेख करत अरविंद सावंतांचा हल्लाबोल

सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो की नीट परीक्षा पुन्हा घ्या. हाच एक मार्ग आहे. कारण, हा फार मोठा घोटाळा आहे. याची सुरुवात गुजरातपासून झाली आहे.

https://twitter.com/ANI/status/1802976345309192318

15:33 (IST) 18 Jun 2024
NEET परीक्षा कधी होणार ‘नीट’? निकालातील घोळ व गैरव्यवहाराविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

चंद्रपूर: नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या घोळाविरूध्द चंद्रपूर शहरात दोन हजार विद्यार्थी व पालक रस्त्यावर उतरले. यावेळी गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काळे कपडे लावून विद्यार्थ्यांनी मुक मोर्चा काढून केंद्र सरकारकडे न्याय देण्याची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. नीट परीक्षेच्या निकालात झालेल्या घोळाची व गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली.

वाचा सविस्तर...

15:32 (IST) 18 Jun 2024
नागपूर : जलकुंभासाठी जााग दिली, पण पाणीही मिळाले नाही अन्…

नागपूर : पाणी पुरवठ्यात वाढ होईल, या अपेक्षेने वस्तीतील मैदानाची जागा नव्या जलकुंभ उभारणीसाठी दिली. पण जलकुंभ पूर्ण झाल्यावर त्यातून इतर वस्त्यांना पाणी पुरवठा हे स्पष्ट झाले. ऐवढेच नव्हे तर पूर्वीपेक्षा कमी पाणी पुरवठा होऊ लागला. दुसरीकडे मुलांना खेळण्यासाठीच्या मैदानाचही दुरावस्था झाली. त्यामुळे नागपुरातील दक्षिण-पश्चिम नागपुरातील गणेश कॉलनी, शांती निकेतन या वस्त्यांची ‘तेलही गेले आणि तुपली’ अशी अवस्था झाली.

वाचा सविस्तर...

14:39 (IST) 18 Jun 2024
बापरे! जागा ६६ अन् उमेदवार ९ हजार; पोलीस भरतीचे दिव्य कोण पेलणार?

यवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस भरतीच्या ६६ जागांसाठी तब्बल आठ हजार ८९४ अर्ज दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात मैदानी चाचणीला उद्या बुधवारी सुरूवात होणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

वाचा सविस्तर...

14:38 (IST) 18 Jun 2024
मुक्ताईमातेची पालखी निघाली विठुरायाच्या भेटीला, पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान; उद्या मलकापुरात…

बुलढाणा: तब्बल तीनशे पंधरा वर्षांची वारीची आणि अध्यात्मिक परंपरा असलेल्या आणि श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेल्या मुक्ताईच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले. तब्बल शंभर दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची आकर्षक जोडी, रथाला करण्यात आलेला फुलांचा साज, विठ्ठल-रुखमाई आणि आदिशक्ती मुक्ताईमातेचा जयघोष करणारे शेकडो वारकरी, विदर्भ-खान्देश-मराठवाडा ते मध्यप्रदेशातील हजारो भाविकांची मांदियाळी, असा पायदळ वारीचा थाट आहे.

वाचा सविस्तर...

14:27 (IST) 18 Jun 2024
मतमोजणीतील वादावर रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

फोनमुळे ईव्हीएम हॅक होतं का? हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं. मोदीही म्हणाले होते की ४०० पार करणार. जर तुम्ही सिद्ध केलं तर देशात नाही तर जगात कळेल. ते कोर्टात जाणार आहे, लोकशाहीत हा अधिकार आहे. मतमोजणीदरम्यान किती लोकांकडे मोबाईल होते हेही पाहावं लागेल. मी सकाळपासून पाहत होतो. सायंकाळी ५.४१ वाजता अमोल किर्तीकर विजयी असल्याचं घोषित केलं होतं. आमच्याकडचा कोणी मोबाईल नेला नव्हता. हे जगाला कळलं तर बाकीच्यांना कळलं तर बरं होईल. मतमोजणी बाकी असताना जिंकल्याचे वृत्त यायला लागले. मग मी ६ वाजता पोहोचलो. हे कसं चाललं आहे. ते म्हणाले आमची प्रक्रिया सुरू आहे, आम्ही जाहीर केलेलं नाही असं ते म्हणाले. एव्हीएम चेक करायला गेलो तेव्हा किर्तीकर एका मताने पुढे होते. हॅक केलं असतं तर मी पुढे गेलो असतो. मला बॅलेट पेपरने वाचवलं. त्यातून ४८ मतांनी प्लस झालं. प्रत्येक टेबलचं कॅलक्युलेशन असतं. त्यामुळे हॅक केला जाऊ शकतो का नाही, हा प्रश्न उरतो - रवींद्र वायकर

https://www.youtube.com/watch?v=QVa4ZtlyQ9E&t=317s

13:53 (IST) 18 Jun 2024
धारावीकरांच्या पुनर्वसनाला कुर्ल्यातून विरोध, ‘डीआरपीपीए’ला जागा देण्याचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची स्थानिकांची मागणी

मुंबई : धारावी पुनर्विकास योजनेअंतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन कुर्ल्याच्या मदर डेअरीच्या ८.५ हेक्टर जागेवर करण्यास स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी जोरदार विरोध केला आहे.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 18 Jun 2024
अकोला : कार्यकर्त्याने चक्क नाना पटोले यांचे पाय धुतले, नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा...

13:26 (IST) 18 Jun 2024
“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…”

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. कार्यकर्ते देखील तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोचरी टीका केली आहे.

वाचा सविस्तर...

13:25 (IST) 18 Jun 2024
कल्याण-डोंबिवलीत साथरोग नियंत्रणासाठी फवारणी मोहीम

कल्याण : पावसाळा सुरू झाल्याने विविध प्रकारचे साथरोग या काळात डोके वर काढतात. या साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने शहराच्या विविध भागात विशेष जंतुनाशक, धूर फवारणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे.

वाचा सविस्तर....

13:12 (IST) 18 Jun 2024
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त

ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या महत्व वाढले आहे. या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे.

वाचा सविस्तर...

12:58 (IST) 18 Jun 2024
ठाणे : रेल्वे प्रवाशांकडून दिव्यांगास मारहाण, दिव्यांग असल्याची विचारणा केल्याने मारहाण

ठाणे : दिव्यांग असल्याचा जाब विचारल्याने दोन रेल्वे प्रवाशांनी दिव्यांगालाच मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

12:33 (IST) 18 Jun 2024
अकोला : गरिबांच्या साड्यांमध्ये देखील दलाली, नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; अपशब्दांचा वापर

अकोला : गरिबांना वाटप करण्यात येणाऱ्या साड्यांमध्ये देखील त्यांनी दलाली केली, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नाना पटोले यांनी काही अपशब्दांचा देखील वापर केला. जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

वाचा सविस्तर...

12:08 (IST) 18 Jun 2024
Maharashtra Live News : तृणमूल काँग्रेसचे खासदार शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंतही उपस्थित

एक्झिट पोलदरम्यान शेअर मार्केटने उच्चांक गाठला होता. याप्रकरणी सेबीने चौकशी करावी अशी मागणी करण्याकरता तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले, कल्याण बॅनर्जी आणि सागरिका घोष मुंबईत आले आहेत. या मागणीकरता शरद पवार गटानेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यानिमित्ताने शरद पवारांनी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण उपस्थित होत्या.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1802949462534541509

11:58 (IST) 18 Jun 2024
आधी म्हणतात पेरणीला लागा, आता म्हणतात घाई करू नका; हवामान खात्याचे चालले तरी काय?

नागपूर : भारतीय हवामान खात्याने मोसमी पावसाचा अंदाज देताना यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वी येणार, पाऊस मोठ्या प्रमाणात होणार असे सांगून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या. आता मात्र हेच हवामान खाते शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नका असा सल्ला देत आहे. खात्याच्या या अंदाजाने शेतकरी देखील चक्रावला असून नेमके करायचे काय, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.

वाचा सविस्तर...

11:40 (IST) 18 Jun 2024
अकोला : कार्यकर्त्याने चक्क नाना पटोले यांचे पाय धुतले, नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा...

11:40 (IST) 18 Jun 2024
चंद्रपूर : धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने केली मारहाण

चंद्रपूर : महावितरणच्या कर्मचाऱ्याला विद्युत खांबाला बांधून सरपंचाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा....

Maharashtra Live Updates

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Live : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर