Mumbai Pune Nagpur News Updates in Marathi, 21 April 2026: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठीदेखील येत्या २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठ्या पक्षांनी उमेदवार न देता निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्याविरोधात २३ इतर उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालं. दुसरीकडे महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या तीन दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे यांच्या 'नरो वा कुंजरो वा' भूमिकेमुळे समर्थक द्विधा मनस्थितीत
कॉर्पोरेटमध्ये अचानक तपासणी मोहीम
विरारमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; पतीसह दुसरी पत्नी फरार
Dombivli News: डोंबिवलीत पाथर्ली नाका येथे भरधाव रिक्षेच्या धडकेत वृध्देचा मृत्यू
Dombivli News: डोंबिवली कोपर येथील बेकायदा चाळींवरील कारवाईसाठी पालिकेसमोवर बेमुदत उपोषण
शरद पवार बारामती पोटनिवडणुकीत मतदान करणार नाहीत; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली मोठी माहिती
नवी मुंबई अतिक्रमण उपायुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महापालिकेत धडक कारवाई
सीएसएमटीमध्ये मोठा अपघात टळला; लोकल समोरासमोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Water Cut News: कळवा, मुंब्रा दिवा भागात चोवीस तास पाणी नाही, जलवाहीनी दुरुस्तीसाठी एमआयडीसीचा पाणी पुरवठा राहणार बंद
Road Accident: ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील बेकायदा वाहनतळांमुळे उल्हासनगरच्या रिक्षा चालकाने गमावला जीव
घराघरात उभी राहतेय शिक्षणाची नवी शाळा, सरस्वती शाळेचा अनोखा उपक्रम
Central Railway Updates: मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, CSMT स्थानकावर रेल्वे गाड्या खोळंबल्या!
सोमवारी मध्य रेल्वेवर धीम्या मार्गावर डोंबिवलीजवळ लोकलचा डबा घसरल्याने बराच काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी पुन्हा एकदा असाच खोळंबा मध्य रेल्वेवर झाला असून सीएसएमटी स्थानकावर लोकल गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. मस्जिद बंदर स्थानकाजवळ डाऊन मार्गावरची जलद गाडी बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
VIDEO : रायगड जिल्ह्यात बेमोसमी पावसाची हजेरी; विजांच्या कडकडाटासह गारपिट आणि पावसाच्या सरी...
"मी पोलीस झालोय!"; बतावणी करत तरुणाने वाटले पेढे, अभिनंदन करण्यासाठी पोलीस घरी पोहोचले अन्…
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कामकाजावर परिणाम
PCMC Water Supply : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंद
आयटीनगरी हिंजवडीत यात्रेतील वादातून तरुणाकडून हवेत गोळीबार
व्हायरल व्हिडिओचा पोलिसांना फायदा; आंतरजिल्हा टोळी जेरबंद, घरफोडीचे गुन्हे उघड…
संपाला मोठा प्रतिसाद…. शासकीय कार्यालयांत शुकशुकाट; घोषणाबाजी करीत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मुख्यमंत्री महोदय, तुम्ही १ कोटी महिलांच्या सह्या घ्या किंवा २ कोटी महिलांच्या सह्या घ्या पण खोटं सांगून महिलांच्या सह्या घेऊ नका, त्यांना खरं सांगा.. महिलांच्या सह्या घेताना तुम्ही सांगा की या सह्या महिला आरक्षण विधेयकासाठी नसून परिसीमन विधेयकासाठी आहेत, त्यांना सांगा की २०२३ ला महिला विधेयक मंजूर झाले असताना त्याची अंमलबजावणी न करता हे नवीन विधेयक कशासाठी आणले होते ? त्यांना सांगा की महिला सन्मानाची बाता मारत असताना तुमच्या पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत किती महिलांना तिकीट दिले ? ज्या भाजपचे तुम्ही प्रतिनिधीत्व करता त्या भाजपने कधी एका महिलेला राष्ट्रीय अध्यक्ष नेमले आहे का ? त्यांना सांगा मणिपूरमधील महिलांची सध्या परिस्थिती काय आहे ? देशभरातील महिला सुरक्षेबाबत परिस्थिती काय आहे ? तुमच्या राज्यात एका महिला खेळाडूला कशी वागणूक कशी मिळते ? तुमच्या सहीने नेमलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काय प्रताप केले, त्यात किती महिलांचे शोषण झाले? हे सगळं तुम्ही सांगा... तुम्ही खरं सांगून सह्या मागितल्या तर एकही महिला सही करणार नाही! - रोहिणी खडसे, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस
