scorecardresearch

Premium

Maharashtra News: ईद-ए-मिलादच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर; राज्य सरकारची घोषणा

Mumbai Maharashtra News, 27 September 2023: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

Cm Eknath shinde live speech in sambhajinagar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो-ट्विटर/एकनाथ शिंदे)

Mumbai Maharashtra News: एकीकडे गणरायाच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्रातलं वातावरण भक्तीमय झालेलं असताना राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. ठाकरे गट व शिंदे गट यांनी एकमेकांच्या आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली असून त्यावरील विधानसभा अध्यक्षांसमोरच्या सुनावणीच्या निमित्ताने दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

rupali chakankar
Maharashtra News: “आपण प्रचंड आगतिकतेचे शिकार झाला आहात याची…”, रुपाली चाकणकरांची सूचक पोस्ट!
raj thackeray on nanded hospital death case
Maharashtra Hospital Death: “तीन तीन इंजिनं लागूनही…”, राज ठाकरेंचा नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर हल्लाबोल!
raj thackeray
Maharashtra News : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले “पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे…”
Manoj Jarange
Maharashtra News : “तर आपली सोयरीक मोडलीच म्हणून समजा”, उपोषण मागे घेण्याची तयारी दाखवत जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Live Updates

Marathi Live News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!

18:37 (IST) 27 Sep 2023
Marathi Live News Today: ईद-ए-मिलादच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर!

महाराष्ट्र सरकारने ईद-ए-मिलाद अर्थात २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1707006242714173665

18:03 (IST) 27 Sep 2023
ठाणे, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली

ठाणे: ठाणे जिल्हयातील शहरांमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सायंकाळी कामावरून घरी परतत असलेल्या नोकरदार वर्गासह नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 27 Sep 2023
वेगळ्या विदर्भासाठी परिस्थिती अनुकूल, ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग…

वाशीम : लहान लहान राज्ये झाल्यास विकासाला चालना मिळते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. वेगळा विदर्भ व्हावा. ही फार जुनी मागणी आहे. अनेकांनी अनेकवेळा लढा दिला आहे. परंतु, वेगळा विदर्भ म्हटले की, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचाच विरोध असतो. परंतु, भाजपा सरकारमुळे सध्या अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भासाठी लोकतांत्रिक मार्गाने लढा उभारू, असे प्रतिपादन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले.

सविस्तर वाचा…

17:39 (IST) 27 Sep 2023
माजी गृहमंत्री पोहोचले शेताच्या बांधावर, तिथे जे दिसले….

नागपूर: सोयाबीन पिकावर सध्या ‘येलो मोझेक’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दरवर्षी या रोगाने शेतकऱ्यांचे नुकसान होते.

सविस्तर वाचा…

17:35 (IST) 27 Sep 2023
वडेट्टीवार स्पष्टच म्हणाले, “भागवत आणि मोदींवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये…”

चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची हाफ पँट व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. त्यांनीच आतापर्यंत तीन वेळा पक्ष बदल केला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे केली. कारागृहात जाणे पसंद करील पण भाजपात जाणार नाही, असा पुनरुच्चार पुन्हा एकदा वडेट्टीवार यांनी केला.

सविस्तर वाचा…

17:30 (IST) 27 Sep 2023
पुणे : सिंहगड रस्ता भागात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पती गेल्या काही महिन्यांपासून छळ करत होता

पतीच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. नेहा प्रणय ठाकूर (वय २६ ,रा. जिजाई विहार, मानाजीनगर, नऱ्हे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नेहाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती प्रणय याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

17:26 (IST) 27 Sep 2023
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात गणेश दर्शनावरून स्पर्धा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील वातावरण ढवळून काढले. मागील आठवडाभर दोन्ही पवारांचीच शहराच्या राजकारणात चर्चा सुरू असताना केंद्रात, राज्यात सत्तेत असलेल्या शहर भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत मात्र शांतता दिसून येते.

सविस्तर वाचा…

17:26 (IST) 27 Sep 2023
चंद्रपूर : श्रीगणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ईरई धरणातून अतिरिक्त पाणी

शहरात गुरुवार २८ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने विसर्जन स्थळी तयारी पूर्ण केली असुन इरई नदीवर होणाऱ्या विसर्जनासाठी पाण्याची पातळी चांगली राहावी यादृष्टीने ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. सविस्तर वाचा…

17:13 (IST) 27 Sep 2023
खारघर उपनगरामधील खड्डे बुजविण्याची मागणी

खारघर उपनगरामधील १८ वेगवेगळ्या चौकांमध्ये खड्डे पडले असून या खड्ड्यात जिवघेणा अपघात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

17:12 (IST) 27 Sep 2023
नवी मुंबई : पावसामुळे पालेभाज्यांचे दर चढेच राहणार, बाजारात ३० ते ४० टक्के आवक घटली

घाऊक बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 27 Sep 2023
संसद भवनात पत्रकार गॅलरीशिवाय इतर ठिकाणी आता पत्रकारांना….

केंद्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य देण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे.

सविस्तर वाचा…

17:11 (IST) 27 Sep 2023
बुकी सोंटू जैनने नागपूर पोलिसांना बनवले ‘मामा’, पोलिसांना गुंगारा देऊन झाला फरार; वेश बदलून…

सोंटू जैन जामीन फेटाळल्याची माहिती मिळताच वेश बदलून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. त्यामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.

सविस्तर वाचा…

17:08 (IST) 27 Sep 2023
गोंदिया: जीव मुठीत घेत पुराच्या पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास!

गोंदिया: देवरी तालुक्यातील कन्हाळगाव या मुख्य मार्गावरून असलेल्या नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी थोडाफार पाऊस पडला की पुलाला पूर येतो.

सविस्तर वाचा…

16:55 (IST) 27 Sep 2023
येऊरमधील बेकायदा बंगल्यांवरील कारवाई थांबली; कारवाईसाठी तक्रारदाराचे येऊरमध्ये उपोषण सुरू

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील येऊर परिसरात उभारण्यात आलेल्या सात बेकायदा बंगल्यांविरोधात सुरू केलेली कारवाई ठाणे महापालिका प्रशासनाकडून थांबविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

16:45 (IST) 27 Sep 2023
रेल्वेत ३१०० जागांसाठी मेगाभरती, बेरोजगारांना सरकारी नोकरीची संधी!

नागपूर : सरकारी नोकरी आणि ती ही रेल्वेत म्हटल्यावर बेरोजगार युवकांना सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने बेरोजगार युवकांसाठी विविध शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पूर्व रेल्वेत सुमारे ३१०० शिकाऊ पदांसाठी ही भरती होणार आहे.

सविस्तर वाचा..

16:06 (IST) 27 Sep 2023
Marathi Live News Today: वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरेंची एक्सवर (ट्विटर) विशेष पोस्ट

वहिदा रहमान ह्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. १९५६ ला राज खोसला ह्यांच्या 'सीआयडी' सिनेमातून करिअरला सुरुवात करत ते आजच्या तारखेपर्यंत सक्रिय असणाऱ्या वहिदाजी ह्या भारतीय सिनेमाचा जवळपास ६० वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही जे निवडता, त्यावर तुमची श्रद्धा असेल आणि कामाप्रती निष्ठा असेल तर तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून तुमचे नियम लोकांना स्वीकारायला लावू शकता हे वहिदाजींनी दाखवून दिलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी एका सीनसाठी मी वेडेवाकडे कपडे घालून शॉट देणार नाही असं ठासून सांगितलं. पहिलाच सिनेमा आहे, डायरेक्टर जे सांगेल ते ऐकलं पाहिजे इत्यादी गोष्टींना बाजूला सारत, मी जर ह्या क्षेत्रांत टिकणार असेन तर माझ्या तत्वांशी मी तडजोड करणार हे नाही हे सांगणं सोपं नाही, पण ते वहिदाजींना जमलं. स्वतःचं मुस्लिम नाव आडनाव पण लपवण्याच्या भानगडीत त्या कधी पडल्या नाहीत आणि त्यांचं हिंदुस्थानीपण इतकं पक्क होतं की त्यांचा धर्म लोकांच्या मनाला शिवलं पण नाही. अशा व्यक्तीला हा सन्मान मिळणं ह्यासारखी आनंदाची गोष्ट नाही, अर्थात वहिदाजीच नाहीत तर कुठल्याही कलाकाराला हे पुरस्कार थोडे आधी मिळायला काहीच हरकत नाही. पण असो. वहिदाजींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतफे मनःपूर्वक शुभेच्छा !

https://twitter.com/RajThackeray/status/1706972223238549545

15:55 (IST) 27 Sep 2023
चार दिवसांनी घरचा चहा प्यायले! मुलीने किराणा ऑनलाईनद्वारे पाठवला; पूरग्रस्तांची व्यथा

नागपूर : नाग नदीवर प्रशासनानेच अनधिकृत बांधकाम केल्याने सधन वस्त्यांमध्ये कधी नव्हे एवढे पुराचे पाणी आले. शुक्रवारच्या पहाटे हे संकट कोसळले. परंतु, अद्याप सरकारी मदत पोहोचलेली नाही, अशा शब्दात डागा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुरानंतर आज चौथ्या दिवशीदेखील घरातील खराब झालेल्या वस्तूंची विल्हेवाट लावणे सुरूच होते.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 27 Sep 2023
धुळ्यात विसर्जन मिरवणुकीवर सातशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

अनुचित प्रकार घडू नये म्हणून ७०० सीसीटीव्ही कॅमेरे, पाच ड्रोन कॅमेरे मिरवणुकीवर नजर ठेवणार असून पुरेसा बंदोबस्त असेल, अशी माहितीही बारकुंड यांनी दिली.

सविस्तर वाचा…

15:52 (IST) 27 Sep 2023
धुळे जिल्ह्यात बनावट दारु कारखाना उध्वस्त; १० लाखांचा मुद्देमाल नष्ट

कारवाईत सुमारे १० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा…

15:51 (IST) 27 Sep 2023
महाराष्ट्रात रेल्वेच्या सांडपाण्याची अशी होणार विल्हेवाट, वाचा…

मध्य रेल्वेने महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांत ३२ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहे.

सविस्तर वाचा…

15:50 (IST) 27 Sep 2023
पुणे महापालिकेचा फतवा : रस्त्यांवरील बेवारस वाहने ताबडतोब काढा अन्यथा जप्ती

अतिक्रमण विभागाकडून या वाहनांवर नोटीस चिकटविण्यात आली असून वाहने तातडीने न हटविल्यास ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

15:49 (IST) 27 Sep 2023
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार; पवना धरण १०० टक्के भरले

मागील चोवीस तासांत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५५ मिली मीटर पाऊस चिंचवडमध्ये झाला आहे.

सविस्तर वाचा…

15:48 (IST) 27 Sep 2023
जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवास पूर्ववत होणार; जेएनपीटी लाँच १ ऑक्टोबर पासून भाऊचा धक्का ऐवजी गेट वे ऑफ इंडिया पर्यंत जाणार

या जल मार्गाने उरण मधील बंदर व इतर उद्योगातील अधिकारी कर्मचारी आणि नागरीकही प्रवास करीत आहेत.

सविस्तर वाचा…

15:27 (IST) 27 Sep 2023
आरक्षणात वाटेकरी नको… ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’च्या उपोषणाला नागपुरात सुरुवात

नागपूर : राज्य सरकारच्या आश्वासनानंतर धनगर समाजाचे उपोषण आंदोलन मागे घेतले आहे, तर आता आदिवासी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषणाला बसले आहेत. ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’ या एका बॅनरखाली हे आंदोलन आजपासून सुरू झाले.

सविस्तर वाचा…

15:25 (IST) 27 Sep 2023
Marathi Live News Today: मराठी पाट्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मनसेचं ट्वीट…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'मराठी नामफलका'च्या आंदोलनाला उत्तरेतल्या आणि बेपारी मानसिकतेच्या लोकांनी हिणवलं पण दुर्दैव हेच वाटायचं कि आपल्याच मराठीत खर्डेघाशी करणाऱ्या बोरूबहाद्दरांनीही त्यांचाच कित्ता गिरवला. अंतिमतः शुद्ध हेतूचा, सत्याचा विजय होतो… तो झाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 'मराठी नामफलका'च्या निकालाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन किती यथायोग्य होतं ते सिद्ध झालं.

https://twitter.com/mnsadhikrut/status/1706959973929164801

15:22 (IST) 27 Sep 2023
Marathi Live News Today: सुप्रिया सुळेंच्या कवितेला भाजपाचं कवितेतून उत्तर…

सुप्रिया सुळेंच्या कवितेला भाजपाचं कवितेतून उत्तर…

दहा कोटींची वांगी उगवते माझ्या शेतात कोणती ही मशागत? चर्चा जनमाणसात बारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला 'ते'रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा 'शरद' बहरला आम्हा, बाप – लेकीला, आस एक लावसाची जमीन लाटून कष्टकऱ्यांची माडी उभारू 'शरदचंद्रा'ची राजकीय कारकिर्द 53 वर्षाची हौस भारी बिरुदे मिरवण्याची काय सांगू माझ्या पप्पांची महती, जिथे तिथे फक्त खंजीरच खुपसती..

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1706958444413239401

15:21 (IST) 27 Sep 2023
वर्धा : आश्रमशाळा विनयभंग प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल

वर्धा : देवळी तालुक्यातील नवजीवन आश्रमशाळेतील चिमुरड्या मुलींवरील ओढवलेल्या अश्लील प्रकारची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज चौकशीस प्रारंभ केला. महिला नायब तहसीलदार तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी यांची चमू नेमली. हे अधिकारी आश्रमशाळेत भेट देत विचारपूस करणार. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. त्यानंतर कारवाईस सुरवात होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

15:17 (IST) 27 Sep 2023
सिनेस्टाईल थरार: दरोड्याच्या तयारीत असलेले १० दरोडेखोर जेरबंद; १३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम: घातक शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या १० दरोडेखोरांना दरोड्याच्या साहित्यानिशी सिनेस्टाईल जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

सविस्तर वाचा…

14:16 (IST) 27 Sep 2023
गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज; विसर्जन घाटांवर विविध सुविधा

पिंपरी: गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज असून शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर गणेश मंडळांसाठी तसेच नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:52 (IST) 27 Sep 2023
नवी मुंबई : शहरात आता जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी, अंशतः बदल  

गणेश उत्सव आता शेवटच्या टप्प्यात आला असून उत्साह सुद्धा शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होणार असून त्याची तयारी सुरूच आहे.  अनंत चतुर्दशीला सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतींची विसर्जन होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. सविस्तर वाचा

13:50 (IST) 27 Sep 2023
मुंबई:क्षयरोगाची औषधे डिसेंबरपर्यंत मिळणे अवघड; क्षयराग समन्वयक, संस्थाचा आरोप

क्षयरोगासंदर्भातील औषधांचा आवश्यक पुरवठा असून प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात केंद्र सरकारकडून आता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत क्षयरोगाची औषधे मिळणे अवघड असल्याचे स्थानिक समन्वयकांचे म्हणणे आहे. सविस्तर वाचा

13:42 (IST) 27 Sep 2023
रेल्वे मार्गात उभे राहून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न; दिवा रेल्वे स्थानकातील प्रकार

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात कर्जत, कसारा, कल्याण, टिटवाळा, बदलापूरकडून येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खच्चून भरुन येतात.

सविस्तर वाचा…

12:53 (IST) 27 Sep 2023
Marathi Live News Today: याचिकाकर्त्यांवर अन्याय करणार नाही – राहुल नार्वेकर

याचिकाकर्त्यांवर अन्याय करणार नाही. १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर यादरम्यान युक्तिवाद चालेल. दोन आठवड्यांत यासंदर्भातल्या अंतिम सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे – राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

12:49 (IST) 27 Sep 2023
कल्याणचा तिढा सुटला, ठाण्याचा संभ्रम कायम

ठाणे : डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकविणाऱ्या भाजप नेत्यांनी अखेर कल्याण शिंदेचेच राहील अशी भूमीका घेत दिलजमाईची भूमीका घेतली आहे.

सविस्तर वाचा…

12:43 (IST) 27 Sep 2023
कल्याणमध्ये अखंड वाचनयज्ञ; दहा हजारहून अधिक वाचक आणि रसिकांचा सहभाग

ठाणे: वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी कल्याणमध्ये १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते १५ ऑक्टोबरला रात्री ९ यावेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 27 Sep 2023
काय सांगता? चक्क वाघ आणि कासवात रंगलीय स्पर्धा! नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

नागपूर : महाराष्ट्रातल्या ‘वॉकर’ या वाघाने अवघ्या वर्षभरात तब्बल तीन हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला. त्या वाघाला लावलेल्या ‘रेडिओ कॉलर’मुळेच त्याची ही भ्रमंती जगासमोर आली. या वाघाने भ्रमंतीदरम्यान दोन राज्येही पालथी घातली. आता महाराष्ट्रातल्या कासवाबाबतही हाच इतिहास रचला जात आहे.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 27 Sep 2023
मोदकोत्सव स्पर्धेत वैविध्यपुर्ण मोदकांची मेजवानी

ठाणे: सुभेदारवाडा कट्टा, कल्याण विकास फाऊंडेशन आणि इनरव्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या वतीने मोदकोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 27 Sep 2023
उरणमध्ये धुके की प्रदूषणाचे धुरके ?

उरण शहर व परिसरात झालेल्या पावसानंतर धुक्याचेच वातावरण दिसत होते. त्यामुळे हे खरंच धुकं आहे की, हवेतील वाढते प्रदूषण अशी शंका उरण मधील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 27 Sep 2023
नाशिकमध्ये भ्रमणध्वनी स्फोट, तीन जण जखमी

सिडकोतील उत्तमनगर परिसरात बुधवारी सहाच्या सुमारास भ्रमणध्वनीचा (मोबाईल) स्फोट होऊन तीन जण जखमी झाले.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 27 Sep 2023
नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ३३ टक्के कमी पाऊस; पावसाळा संपत असतानाही टँकरच्या फेऱ्या कायम

सद्यस्थितीत ९८ गावे आणि १४१ वाड्या अशा २३९ ठिकाणी एकूण ८६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 27 Sep 2023
मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचे अर्जही नाशिक मनपाकडून बेदखल, हक्कभंगाच्या कारवाईचे सावट

सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे फारशा गांभीर्याने न पाहणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाकडून मंत्री, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधींच्या तक्रारी, निवेदनेही बेदखल केली जात असल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:13 (IST) 27 Sep 2023
Marathi Live News Today: मंत्रालय नव्हे, आत्महत्या पॉइंट – संजय निरुपम

मंत्रालय नव्हे, हा राज्यातला कुख्यात आत्महत्या पॉइंट – संजय निरुपम

https://twitter.com/sanjaynirupam/status/1706914298617094297

12:13 (IST) 27 Sep 2023
नाशिकमधील कोंडीवर मुबलक वाहनतळ, रुंद रस्त्यांचा तोडगा शक्य; शिवसेनेचे सर्वेक्षण मनपाकडे सादर

मध्यवर्ती दाटीवाटीच्या बाजारपेठेसह अनेक भागात वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नाहीत. त्यामुळे वाहनधारकांकडून रस्त्यावर वाहने उभी केली जातात.

सविस्तर वाचा…

12:12 (IST) 27 Sep 2023
“निवृत्ती म्हणजे राजकारण नव्हे”, खासदार सुभाष भामरे यांच्याकडून प्रतापराव दिघावकर लक्ष्य

पक्ष आपणास तिसऱ्यांदाही उमेदवारी देईल आणि आपणच पुन्हा निवडून येऊ, असा विश्वास भाजपचे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 27 Sep 2023
तलाठी परीक्षेच्या उमेदवारांसाठी उद्यापासून उत्तरतालिका पाहण्याची सुविधा

पुणे: राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे. त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 27 Sep 2023
वर्धा : आता गावागावात भाजपा नेत्यांसाठी पत्रकारांतर्फे चहापान व एकदा जेवण

वर्धा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा पाजण्याची व ढाब्यावर जेवू घालण्याची सूचना नगरमध्ये पक्षसभेत बोलताना केली. त्याचे संतप्त पडसाद आता पत्रकार वर्तुळात उमटत आहे.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 27 Sep 2023
गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणामुळे भटक्या प्राण्यांचे स्थलांतरण; शहरातील २० ते २५ प्राण्यांनी सोडली स्वत:ची जागा; श्वानांची संख्या सर्वाधिक

ठाणे: गणेशोत्सवाच्या काळात मिरवणूकीदरम्यान करण्यात येणारी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या आवाजाचा त्रास माणसांप्रमाणे भटक्या प्राण्यांनाही होत असतो. या आवाजामुळे यंदा शहरातील २० ते २५ प्राण्यांनी दुसऱ्या जागी स्थलांतरण केले असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 27 Sep 2023
पाऊसमान : पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा, पुढील ७२ तासांत…

नागपूर : राज्यात पूर्व विदर्भापासून तर दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भ वगळता राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील ७२ तासांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 27 Sep 2023
पात्र कातकरींना घर तर भूमीहिनांना घरासाठी जागा; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची घोषणा

बदलापूरः प्रत्येक पात्र बेघर कातकरी कुटुंबाला शासनाकडून घर दिले जाणार असून भूमीहिन कातकरी बांधवांना घर बांधणीसाठी जागाही दिली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

सविस्तर वाचा…

11:39 (IST) 27 Sep 2023
….तर अ.जा. प्रवर्गातील शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित, महाविद्यालयांवर जबाबदारी; वाचा कारण काय?

अकोला : विविध शिष्यवृत्ती योजनांचे अनुसूचित जाती प्रवर्गातील शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रलंबित अर्जांची तत्काळ पूर्तता करण्याचे निर्देश समाजकल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा…

Marathi Live News Today: ठाकरे गट व शिंदे गटामध्ये राजकीय कलगीतुरा!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra news live mumbai maharashtra ganesh visarjan 2023 marathi batmya rain updates weather report pmw

First published on: 27-09-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×