Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलेले नाहीत कारण त्या बंगल्यावर काळी जादू झाली आहे. कामाख्या मंदिरात जे रेडे कापण्यात आले त्यांची मंतरेली शिंगं वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये म्हणून हे करण्यात आलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीही आलबेल नाही अशीही चर्चा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. दरम्यान आज महापालिकेचं बजेट सादर होणार आहे. या आणि अशा घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
Mumbai News | वर्षा बंगल्याबाबत संजय राऊत यांचा दावा, एकनाथ शिंदेंकडे अंगुलीनिर्देश, यासह महत्त्वाच्या बातम्या
BMC Budget 2025: शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प ३९५५ कोटींचा, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५७ कोटी रुपयांनी वाढ
Mumbai Municipal Budget 2025 Updates महानगरपालिका प्रशासनाने शिक्षण विभागासाठी २०२५ - २६ या आर्थिक वर्षाचा ३९५५.६४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला.
कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी उद्यानांची देखभाल करणाऱ्या कंत्राटदाराची, महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती
मुंबईतील उद्यानांत यापुढे कोणतीही अनुचित घडना घडल्यास त्यासाठी उद्यानांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांना जबाबदार धरले जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अखंड मराठा समाजाच भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला आहे.आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता,तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या विश्वस्त पदावर राहुल सोलापूरकर आहेत.त्या पार्श्वभूमीवर अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेमध्ये आंदोलन करण्यात आले.तर राहुल सोलापूरकर यांना भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटविण्यात यावे,या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करीत राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला.
एसटी भाडेवाढीविरुद्ध ठाण्यात महाविकास आघाडीचे आंदोलन
ठाणे : भाजप पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरील चुकीच्या धोरणामुळे आज सर्वसामान्यांना महागाईच्या प्रचंड झळा सोसाव्या लागत आहेत. त्यातच, महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी परवडणाऱ्या एसटीच्या भाडेदरातही पंधरा टक्क्यांनी वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याला वाचा फोडण्यासाठी ठाण्यातील खोपट डेपो समोर महाविकास आघाडीतर्फे सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
नाशिक : शहर परिसरात वाहतूक विभागाच्या वतीने बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वेगवेगळ्या मोहिमा, वाहतूक नियम अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत २२ दिवसांत १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल
अलिबाग : अलिबागचा बहुप्रतिक्षीत पांढरा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा पांढरा कांदा नेहमी पेक्षा उशीराने दाखल झाला आहे. हंगामाची सुरवात असल्याने पुढील काही दिवस कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांद्याची माळ २५० ते ३०० रुपायांना विकला जाण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
नागपूर : महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजीत पवार) आमदारांना अडचणीत आणून भाजप राजकीय दबाव निर्माण करीत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप हा भाजपच्या षड्यंत्राचा एक भाग आहे, असा आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
पुणे : लोणी काळभोर भागातील एका बंगल्यात शयनगृहात छुप्या पद्धतीने तयार केलेल्या तिजोरीतून चोरट्यांनी १५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अकोल्यात अपार्टमेंटच्या तळ मजल्याला आग; ११ दुचाकी जळून खाक
अकोला : शहरातील गंगाधर प्लॉट येथील आरती अपार्टमेंटच्या तळ मजल्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत ११ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर या अपार्टमेंटमध्ये १५ जण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात यश आले असून आग आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले.
विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची 'हरित रेल्वे' म्हणून ओळख; विद्युतीकरणाने दरवर्षी १९० कोटी रुपयांचा नफा
रत्नागिरी: विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वे हरित रेल्वे म्हणून ओळखली जात आहे. विद्युतीकरणाने डिझेलच्या खर्चात दर वर्षी १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
नागपूर : उपराजधानीत थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. शहरात दिवसा ऊन तर रात्री वातावरण थंड होऊन तापमानात वारंवार बदल बघायला मिळत आहे. त्यामुळे शहरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे (व्हायरल) रुग्ण वाढले आहे. त्यामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्या वाढली आहे.
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण, लाडका भाऊ, मोफत तीर्थ यात्रा अशा एकापेक्षा एक सरकारी खर्चाने सुरू केलेल्या योजनांमुळे घसघशीत यश मिळवणाऱ्या भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी आणखी एका सरकारी नियमांचा पक्षासाठी फायदा करून घेण्याची तयारी सुरू केली आहे.
नागपुरात रोज होतात दोन घटस्फोट! काय आहे कारण…
नागपूर : अतिव्यस्त आणि तणावपूर्ण जीवनामुळे या आधुनिक आणि तांत्रिक युगात घटस्फोटाचा आलेख वाढत असल्याचे चित्र आहे. घटस्फोटाचे प्रकरण दिवसागणिक चिघळत चालले आहे. नागपूर शहरात २०१८ ते २०२४ या सात वर्षांत पाच हजार ९९५ जोडप्यांनी परस्पर संमतीने कौटुंबिक न्यायालयातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
पोलीस निरीक्षकाला बीट मार्शलकडून मारहाण, दोघांवरही गुन्हा दाखल; शासकीय कामात…
नागपूर : वाडी पोलीस ठाण्यातील एका बीट मार्शलने एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणून चांगला चोप दिला. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला तर जखमी पोलीस निरीक्षकाने मेयो रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन वैद्यकीय चाचणी करण्यास नकार देत शासकीय कामात अडथळा आणला.
Pune Crime News: लष्कर भागात चाकूच्या धाकाने महाविद्यालयीन युवकाची लूट
पुणे : महाविद्यालयीन युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना लष्कर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत एका युवकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक लष्कर भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
मिहान प्रकल्पग्रस्तांना व्यापारी संकुलातील गाळे, महसूल मंत्र्यांचा तोडगा
नागपूर : मिहान पुनर्वसन अंतर्गत कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही सुरुवातीपासूनच घेतली आहे. खापरी रेल्वे पुनर्वसन प्रकल्पात उभारण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील शंभरटक्के दुकाने व गाळे स्थानिकांना आवंटित करण्यासाठी पायाभूत रक्कमेवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येईल, असे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मुंबई : दुभाजक ओलांडून कारची बसला धडक; पश्चिम द्रुतगतीमार्गावर अपघात, कार चालकाचा मृत्यू
अग्निशमन दलाच्या मदतीने चालकाला बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोेषित केले.
BMC Budget 2025 : मालमत्ता कराची थकबाकी २२,५६५ कोटींवर
नवीन करप्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रवीष्ट प्रकरणे, कर देयके देण्यास झालेला विलंब अशा अनेक कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे.
BMC Budget 2025: मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क, कायदेशीर सल्ला घेणार
Mumbai Municipal Budget 2025 Updates देशातील बहुतांशी शहरांमध्ये नागरिकांकडून कचरा शुल्क वसूल केले जाते. मात्र मुंबई महापालिका असे कोणतेही शुल्क मुंबईकरांकडून घेत नाही. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानामध्ये मुंबईला क्रमांक मिळत नाही.
प्रतिकूल वास्तवात राहूनही ‘त्यां’चे भविष्य ‘त्यां’नी असे बघितले…! झोपडपट्टीतील मुलांसाठी आयोजित कला महोत्सवात कल्पनेच्या भरारीचे अनोखे दर्शन
पुणे : चॉकलेट आणि कँडीने ओसंडून वाहणारी नदी... माणसापेक्षाही मोठा झालेला पिझ्झा-बर्गर आणि पॉपकॉर्न... मोबाइल-टीव्ही-घड्याळे इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू झाडावर टांगून कामावर गेलेली माणसे... कुणीही उपाशी राहू नये म्हणून सगळीकडे फळे आणि भाज्याच भाज्या... उलटी माणसे-उलट्या इमारती, सगळे काही उलटेच उलटे... वास्तवापासून फारकत घेणाऱ्या स्वप्नातील जादुई दुनियेची ही चित्रे साकारली होती दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या झोपडपट्टीतील लहान मुलांनी.
कल्याण डोंबिवली पालिकेतील लाचखोर कर्मचाऱ्याच्या घरात सापडली १६ लाखाची रोकड
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेतील बाजार व परवाना शुल्क विभागातील लिपिक प्रशांत धिवर यांना एका तक्रारदाराकडून दीड लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. ते पोलीस कोठडीत असल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी लिपिक धिवर यांना पालिका सेवेतून निलंबित केले आहे.
लाखो विद्यार्थ्यांनी घातले सुर्यनमस्कार; रथसप्तमीनिमित्त उपक्रम, शेकडो शाळा महाविद्यालयांचा सहभाग
बदलापूर : रथसप्तमीनिमित्त मुरबाड विधानसभा मतदारसंघात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मंगळवारी सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी सुर्यनमस्कार घातले. आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकारातून आयोजीत या उपक्रमात बदलापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…
वर्धा : ब्रिटिशांनी गुन्हेगार जमात म्हणून शिक्का मारलेल्या पारधी समाजाचे प्राक्तन अद्याप गावाकुसाबाहेर असल्याचे चित्र नवे नाही. गावालागत असणारे पारधी बेडे त्याची साक्ष ठरावे. त्यातच मुख्य प्रवाहात आले नसल्याने ते दारू गाळण्याचाच व्यवसाय करतात. मुलांचे पाय शाळेच्या नव्हे तर दारू गुत्त्यावरच विसावतात. त्यांना चांगले जीवन देण्याचा शासन प्रयत्न करते पण अडचणीच फार.
मिसिंग लिंकसाठी निधी द्या, ' दादांची ' राज्य सरकारकडे मागणी !
पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ जोडावी लागणार असून, ८०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी ५० टक्के निधी राज्य सरकारने द्यावा, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महापालिकेचे १०० सफाई कर्मचारी जाणार इंदूरला हे आहे कारण !
पुणे : महापालिकेचे शंभर स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मदत व्हावी, यासाठी ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा अभ्यास दौरा होणार आहे.
पुणे: गुलटेकडी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे : मार्केटयार्ड-गुलटेकडी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.नेल्सन पाॅल डिसोझा (वय ५०, रा. ज्ञानेश्वर काॅलनी, कासारवाडी, मुंबई-पुणे रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
नागपूर : तीन महिन्यांची गर्भवती असतानाच माहेरी आलेल्या महिलेला तिच्या प्रियकराने सांभाळले. तिच्या बाळालाही स्वतःचे नाव दिले. मात्र, मुलगी मोठी झाल्यानंतर तिने आईच्या प्रियकराविरुद्ध बंड पुकारले.
खचलेल्या संरक्षण कठडा दुरुस्ती करिता तिलारी घाट सर्व वाहनासाठी बंद
सावंतवाडी : गोवा – दोडामार्ग – बेळगाव – कोल्हापूरला जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटातील धोकादायक जयकर पॉईंट उतारावर एका ठिकाणी संरक्षण कठडा रस्ता खचला आहे. हे कारण पुढे करून चाळीस वर्षे सुरू असलेली एस टी बस सेवा सात महिने बंद आहे.
शिळफाटा वाहतूक नियोजनासाठी १५० कर्मचाऱ्यांचा ताफा; ५ ते १० फेब्रुवारी शिळफाटा पलावा चौक वाहतुकीसाठी बंद
निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक ५ ते १० फेब्रुवारी या काळात बंद असणार आहे. या परिसरात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी १५० हून अधिक वाहतूक पोलीस २४ तास तैनात असणार आहेत.
Pune Crime News : बिबवेवाडीत गुंडावर गोळीबार करणारे अटकेत, सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा
आरोपी सनी,सलमान, हर्षल आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ साथीदारांनी दुचाकीस्वार पवनला अडविण्याचा प्रयत्न केला.
वर्षा बंगल्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल (फोटो - एएनआय संग्रहीत)
देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलेले नाहीत कारण त्या बंगल्यावर काळी जादू झाली आहे. कामाख्या मंदिरात जे रेडे कापण्यात आले त्यांची मंतरेली शिंगं वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये म्हणून हे करण्यात आलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.