Mumbai Pune Expressway News Live Today: पुणे – मुंबई दृतगती महामार्गावरील वाहतूक ३२ तासानंतर सुरळीत झाली आहे. शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट झाली असून, त्यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यासह राज्यातील विविध ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Live Updates
Live News Today in Marathi
नाशिक मध्ये अवतरला 'बोलणारा हत्ती'! डोळे मिचकावतो, कान हलवतो… ३७५ किलो एलीची किमया...
नाशिकच्या इस्पॅलिअर स्कूलमध्ये 'एली' या आशियातील पहिल्या रोबोटिक हत्तीने डोळे मिचकावत आणि कान हलवत विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्राण्यांप्रति संवेदनशीलतेचा संदेश दिला. ...सविस्तर वाचा
दिल्लीत बैठकीनंतर वडेट्टीवार व धानोरकर यांचे एक पाऊल मागे! महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल... वडेट्टीवार गटाकडे...
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित केला असून वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी तर वसंत देशमुख यांची उपमहापौर पदासाठी निवड करण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
आता शासकीय, कार्यालयात अभिप्राय पेटी! उपयुक्त सूचनांची तत्काळ अंमलबजावणी, शासन घेणार दखल…
प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेत नागरिकांच्या चांगल्या सूचनांची कार्यालयीन स्तरावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...सविस्तर बातमी
कल्याण डोंबिवली पालिकेत मालमत्ता कर वसुलीसाठी ४१ कर्मचाऱ्यांची विशेष फौज, मालमत्ता कर्मचाऱ्यांचा १० महिने आराम, दोन महिने फक्त काम
मालमत्ता कर विभागातील कर्मचारी मागील आठ महिने फक्त आराम, मौजमजा करतात आणि फेब्रुवारी महिना आला की आम्हाला मालमत्ता कर वसुलीचे मोठे आव्हान आहे, असा गमजा मारून पालिकेचे आर्थिक नुकसान करत असल्याची पालिकेतील चर्चा आहे. ...सविस्तर बातमी
बेकायदा बाइक टॅक्सीविरोधात ७ फेब्रुवारीला कॅब व रिक्षाचालकांचा देशव्यापी बंद
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्षा आणि कॅब चालक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...सविस्तर बातमी
मुजोर रिक्षा चालकांच्या निष्काळजीपणाने रिक्षेच्या धडकेत तीन जखमी, एका महिलेचा मृत्यू, कल्याण डोंबिवलीतील घटना
झटपट प्रवासी मिळवून वाढीव फेऱ्या मारता येतील यासाठी सुसाट वेगाने रिक्षा चालवून इतर वाहन चालक, पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. ...अधिक वाचा
लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे
लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. ...सविस्तर वाचा
Job / Employment / Recruitment : नोकरी शोधताय? तुमच्यासाठी मोठी संधी, विविध पदांवर भरती…
Akola Job Fair : दहावी, बारावी, आयटीआय आणि पदवीधर उमेदवारांना खासगी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील केंद्रावर सकाळी ११ वाजता मुलाखती पार पडतील. ...सविस्तर वाचा
इचलकरंजीत महापौर निवडीत भाजपच्या दुहीचा फायदा विरोधकांना? सोमवारी महापौर आमचाच!भाजपचा दावा
विरोधकांच्या शिवशाहू विकास आघाडीकडून गुरुवारी आघाडीकडुन महापौरपदासाठी सयाजी चव्हाण तर उपमहापौर पदासाठी संगिता आलासे यांचे अर्ज दाखल करण्यात आले. ...अधिक वाचा
Abu Salem : अबू सालेमला पॅरोल नाहीच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली…
मुंबई उच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत अबू सालेमची याचिका फेटाळली असून साखळी बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. ...अधिक वाचा
जालना: रेल्वेमार्ग देखभालीच्या कामामुळे २७ मेपर्यन्त प्रवाश्यांचे हाल
४ फेब्रुवारी ते २७ मे मध्ये करमाड ते जालना दरम्यान यंत्राद्वारे खडी स्वच्छ करण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
Goa Government : गोव्यातील वाघांची न्यायालयात धाव! सीईसी आणि राज्य सरकारच्या कचाट्यात…
Supreme Court : गोव्यात वाघ निवासी नसल्याचा दावा करत राज्य सरकारने म्हादई भागात व्याघ्रप्रकल्प अधिसूचित करण्याच्या केंद्रीय अधिकार समितीच्या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयात जोरदार विरोध दर्शवला आहे. ...सविस्तर बातमी
कारवाई पुढील आठवड्यावर, पण अतिक्रमणे हटवण्यास सुरूवात, बदलापुरात पालिकेची नरमाईची भूमिका, दुकानदार मात्र तयारीत
शिवसेनेच्या वतीनेही या कारवाईला विरोध करण्यात आला आहे. कारवाई तुर्तास थांबली असली तरी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी स्वतःहून दुकाने रिकामी करण्यास सुरूवात केली आहे. ...वाचा सविस्तर
राज्यभरातील परिचारिका संतप्त… क्रेडिट पाॅईंटच्या नावाने लूट… संघटना म्हणते…
महाराष्ट्रातील परिचारिका पाच वर्षांत १५० क्रेडिट पॉईंट पूर्ण करण्यासाठी बाध्य असून ऑनलाईन व ऑफलाईन सीएमईमध्ये अडचणी व आर्थिक लूटामुळे संतप्त झाल्या आहेत. ...अधिक वाचा
Nanded Waghala Mayor Election: महापौर-उपमहापौर पदासाठी भाजपा नेत्यांत चर्चा सुरू
भाजपाने महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी ८ अर्ज घेतले असून दोन्ही पदांचे अर्ज शुक्रवारी दाखल केले जाणार आहेत. ...सविस्तर बातमी
Maharashtra Weather Update : थंडीने राज्याची वेस ओलांडली, उन्हाळी पर्वास सुरुवात! हवामान बदलाचे सत्र ८ फेब्रुवारीपर्यंत कायम
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात थंडीने वेस ओलांडले असून दिवसा उन्हाळ्याची चाहूल देणारे तापमान वाढले असून पुढील आठ फेब्रुवारीपर्यंत हवामान बदलाचे सत्र सुरू राहणार आहे. ...सविस्तर बातमी
रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासातून ‘कुली’ दुर्लक्षित...
नागपूर रेल्वे स्थानकाच्या ५०० कोटींच्या पुनर्विकास आराखड्यात प्रवाशांचे ओझे वाहणाऱ्या १४५ कुलींसाठी साधी बसण्याची व्यवस्थाही नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या प्रवासी-केंद्रित दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ...अधिक वाचा
Thane Milk Shortage Today: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात... ठाण्यात ५० टक्केच दुधाचा पुरवठा
Thane City Milk Supply Disrupted: मुंबई पुणे मार्गावरील अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत अनेक दुध पुरवठा करणारी वाहने अडकून पडली. अनेक वाहने शहरात येण्याऐवजी पुन्हा माघारी परतली. परिणामी, या भीषण कोंडीचा फटका नागरिकांसह दुग्धव्यवसायालाही बसला. ...वाचा सविस्तर
Nashik Kumbhmela : त्र्यंबकेश्वरमध्ये साधूंचा राग गेला… विकासाचा नारळ फुटला! पण महाजनांनी नेमके केले काय?
साधू-महंतांच्या आग्रहाखातर प्रत्येक आखाड्यात सुविधा पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला असून जागतिक स्तरावर कुंभमेळ्याचा लौकिक वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ...सविस्तर वाचा
चंद्रपूरमधील सत्तास्थापनेचा वाद उच्च न्यायालयात, मात्र लगेच मोठा ट्विस्ट..
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या दोन गटांतील वाद विकोपाला गेल्यानंतर वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका तडकाफडकी मागे घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...सविस्तर बातमी
उल्हासनगरात भाजप - कलानी गटाचे मनोमीलन नाहीच, कलानींच्या फलकावर भाजप गायब, तर आम्ही पहारेकरीही आहोत भाजपची भूमिका
उल्हासनगरात महापौर अश्विनी निकम यांचे अभिनंदन करणारे फलक शहरात कलानी गरटाकडून लावण्यात आले असले तरी त्यावर फक्त दोस्ती का गठबंधन असाच उल्लेख करून भाजपला टाळण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
UPSC 2026 : ‘यूपीएससी’च्या नियमावलीमध्ये मोठा बदल, आधीच आयएएस, आयपीएसमध्ये असाल तर...
Significant Policy Shift in UPSC 2026 Notification for Serving Officers : नागरी सेवा परीक्षेत वारंवार तेच पद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना लगाम लावण्यासाठी यूपीएससीने प्रशिक्षणातून सूट आणि राजीनाम्याबाबत कडक तरतुदी लागू केल्या आहेत. ...सविस्तर बातमी
Land Registration : आता जमिनीच्या मोजणीनंतरच दस्त नोंदणी; कायद्यात अनेक सुधारणा…
आयुष्यभराची पुंजी लावून जमीन घेणाऱ्या सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी शासनाने जमिनीशी संबंधित कायद्यात अत्यंत महत्त्वाच्या आणि क्रांतिकारी सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत. ...वाचा सविस्तर
डोंबिवली पश्चिमेतील अपात्रतेच्या वाटेवरील तीन नगरसेवकांचा निधी रोखा, महापालिका आयुक्तांकडे मागणी
नगरसेविकांचे पती, नगरसेवकाच्या मुलाने केलेल्या बेकायदा बांधकाम उद्योगांमुळे हे नगरसेवक अडचणीत आले आहेत.
...सविस्तर वाचा
Nashik Police : दिले दागिने, निघाले दगड! नाशिकमध्ये ‘असली-नकली’ चा खेळ जोरात...
गंगापूर रोड परिसरात सुरक्षिततेचा बनाव रचून तोतया पोलिसांनी ७५ वर्षीय महिलेचे पावणे दोन लाखांचे दागिने लांबवल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...सविस्तर बातमी
Buldhana Job Fair : २०० उमेदवारांना जागीच नोकरी; ५५० जणांची प्राथमिक निवड...
शेगाव येथील माऊली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ३३ कंपन्यांनी १७०० उमेदवारांच्या मुलाखती घेऊन २०० जणांना जागीच नियुक्तीपत्रे प्रदान केली. ...सविस्तर वाचा
MPSC : ‘एमपीएससी’ने ‘ऑप्टिंग आऊट’, पसंतीक्रमाचा पर्याय नाकारला, विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ, अनेकांची संधी हुकणार...
One Candidate, Two Posts - How MPSC's Policy is Wasting Govt Vacancies : एमपीएससीच्या तांत्रिक चुकीमुळे पात्र उमेदवारांची संधी हुकणार असून सरळसेवा भरती प्रक्रियेत तातडीने सुधारणा करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ...सविस्तर बातमी
पूर्वी नाकारलेला नांदेड भूषण पुरस्कार अशोक चव्हाण यांनी आता स्वीकारला !
रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप असलेला हा पुरस्कार चव्हाण यांना येत्या २२ फेब्रुवारी रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नरेन्द्र-देवेन्द्र’ महोत्सवात प्रदान केला जाणार आहे. ...सविस्तर बातमी
महापौरपदासाठी निवडणूक, एमआयएम, मुस्लिम लिग कॉंग्रेस की भाजपसोबत?
सत्ताधारी भाजपासोबत जवळीक साधून विकासकामे पदरात पाडून घेण्यासाठी मुस्लिम लीग आणि एमआयएम निवडणुकीच्या प्रक्रियेत काय भूमिका घेतात यावर उत्सुकता ताणली गेली आहे. ...सविस्तर बातमी
कल्याण डोंबिवली पालिका महापौर दालनाबाहेर गटार, पायवाटांच्या ‘उपजीवी’ ठेकेदारांचा विळखा; वर्षानुवर्षाचे अडगळीतील ठेकेदार पुन्हा सरसावले
नवनिर्वाचित महापौर, उपमहापौरांना आमच्या ताकदीने आम्ही महापौर, उपमहापौर पदावर बसविले आहे, अशा अविर्भावात हे ठेकेदार महापौर दालनाच्या बाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे. ...वाचा सविस्तर

जय पवार अजित पवारांच्या आठवणीत भावूक (फोटो -X/jaypawar)
जय पवार वडील अजित पवार यांच्या आठवणीत भावूक झाले आहेत.

