Mumbai News Updates, 19 September 2024 : राज्यात आजपासून ‘स्वच्छताही सेवा’ अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेतही सहभागी झाले. याशिवाय राज्यातील राजकीय घडामोडींवरही आपले लक्ष राहणार आहे. काल केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या विधानावरूनही राजकारण तापलं आहे.
Maharashtra News Live Today, 19 September 2024 : अजित पवार पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर?
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यास त्यांना शिक्षेत सवलत दिली जाते.
नंदुरबार: ईदनिमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक झाल्यानंतर शहराच्या विविध भागात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली
भंडारा : भंडारा येथील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलकडून बोलावण्यात आलेली एसटी ट्रान्सपोर्ट बँकेची सभा आज वादळी ठरली
नागपूर : भाजप आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी आहेत.. त्यांच्या वक्तव्याचा कधी कधी वेगळा अर्थ निघतो, नारायण राणे आणि मी त्यांच्याशी चर्चा केली केली असून त्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला दिला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने गुरूवारी सकाळी राष्ट्रवादी भवन परिसरात सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ शेकडो महिलांनी मानवी साखळी केली.
बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणाच्या तपासात मुलींना धमकावून त्यांना दारु पाजण्यात आली, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सविस्तर वाचा…
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंधाऱ्यात एकाचा तर, विहिरींमध्ये दोन जणांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणाच्या तपासात मुलींना धमकावून त्यांना दारु पाजण्यात आली, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सविस्तर वाचा…
महायुतीमधील नेते रावसाहेब दानवे आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला जाऊ लागला आहे. ‘सिल्लोड मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानचा भाग वाटावा या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या विरोधात गुरुवारी सिल्लोडमध्ये पालकमंत्री सत्तार यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला आणि सिल्लोडमधील दुकानेही बंद ठेवली.
एक देश एक निवडणुकीच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकावर टीका केली आहे. एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून देशातील लोकशाही संपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे ते म्हणाले.
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यानिमित्त अभूतपूर्व सुरक्षा तयारी करण्यात आली आहे. २० सप्टेंबर, शुक्रवारी पंतप्रधान मोदी हे विश्वकर्मा मेळाव्यास संबोधित करणार आहेत. येथील स्वावलंबी मैदानावर त्यांचा कार्यक्रम होत असून याठिकाणी जाणारे मार्ग २०० मिटर अंतरावर बंद करण्यात आले आहे.
बुलढाणा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज बुलढाणा येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासह आलेल्या मान्यवरांचे जिल्हा प्रशासन व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वागत केले. आगमनानंतर एका विशेष वाहनात बसून ते बुलढाणा शहरात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जयस्तंभ चौक परिसरातील पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला.
नागपूर: राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
नागपूर : पीडिता सीताबर्डी परिसरात एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. ती रोज ऑटोने कामावर येणे-जाणे करीत होती. संकेत याच मार्गावर ऑटो चालवतो. या दरम्यान दोघांची ओळख झाली. संकेतने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.
नागपूर : राज्यातील काही भागात पावसाने उसंत दिल्यामुळे विजेची मागणी पुन्हा वाढत आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर) दुपारी २.३० वाजता राज्यात विजेची मागणी २३ हजार ६१८ मेगावाॅट नोंदवली गेली.
Balasaheb Thorat : राज्यात विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या सभा, मेळावे आणि आढावा बैठका सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरै सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्टची राज्यसेवा पूर्व परीक्षा चौथ्यांदा रद्द केली. राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या २ लाख २५ हजार उमेदवारांमध्ये जवळपास ५ हजारांवर उमेदवार हे ‘आयबीपीएस’ची परीक्षा देणारे असतात तर कृषी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्याचे दोन दिवसांआधीच आयोगाने जाहीर केले होते.
लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पोटात दुखू लागलं आहे. त्यामुळे ते ही योजना बंद होणार असल्याची अफवा पसरवत आहे. मात्र, माझं त्यांना सांगणं आहे, की लाडक्या बहीणींच्या ओवाळणीत खोडा घालू नका, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुढे बोलताना लाडक्या बहिणींनी सरकारला आणखी बळ दिलं, तर दीड हजाराचे दोन हजार होतील, असेही ते म्हणाले.
महिलांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहिल. त्यानुसार दर महिन्याला महिलांना मिळत राहिली. भाऊबीजेदेखील पैसे मिळतील, असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
बुलढाणा: बुलढाणा जिल्हा व मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पुन्हा एकदा अवैध शस्त्र तस्करीची घटना उघडकीस आली आहे.
माझी लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी मुंबईत आंदोलन केलं.
ज्यांना राज्यपाल, मंत्रीपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं, ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं, त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना महामंडळं देऊन गप्प केलं, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली आहे.
काँग्रेसचे नेते माझ्या विधानाविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, राहुल गांधी विदेशात जाऊन काय बोलले, हे आधी काँग्रेसने सांगितलं पाहिजे. राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा केली. ते विदेशात जाऊन भारताबद्दल गरळ ओकतात. त्यामुळे आधी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी केली.
मुंबई : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
मुंबई : गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
शहरातील प्रमोद नगरात वास्तव्यास असलेल्या एकाच कुटूंबातील चौघे जण गुरुवारी मृतावस्थेत आढळून आले. कुटूंबातील प्रमुख व्यक्ती प्रवीण गिरासे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर, पत्नी आणि दोन मुलांनी विषारी द्रव घेतलेले दिसले. सविस्तर वाचा…
अकोला : पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे अभिनेते आमिर खान शिवार फेरीत सहभागी होऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत
कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा भागातील ६० फुटी रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांचे हाल होत आहेत. या रस्त्यावर दोन शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षकांना दररोज या खड्ड्यांना सामोरे जात शाळेची वाट धरावी लागते. सविस्तर वाचा…
राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत असली, तरी काही नेत्यांकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्नही सुरु आहेत. त्यासंदर्भात आज पुण्यात बैठकही पार पडत आहे. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू तसंच इतर पक्षांचे नेते हजर आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बच्चू कडू यांना महाविकास आघाडीत येण्याचे आवाहन केलं आहे.
अजित पवार हे पुन्हा महाराष्ट्राच्या दौरा करणार असल्याची माहिती आहे. येत्या २१ सप्टेंबरपासून या दोऱ्याला सुरुवात होणार असल्याचे सांगितलं जात आहे. ते सुरुवातीला ७० मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याची शक्यता आहे.