Top Marathi News Updates : राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे सेनेचे सहा खासदार फुटले. या सहा खासदारांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर हे देखील शिंदे सेनेच्या गळाला लागले. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ अद्यापही सुरूच असल्याचं बोललं जात आहे. तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचंही पाहायला मिळत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. मुंबईला पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मुंबई, ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा चाकरमाण्यांना फटका बसत आहे. पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेवर देखील परिणाम होत असून लोकलसेवा उशीराने सुरू आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Politics Live Updates in Marathi, 2 July 2026 : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊ.
जन्म-मृत्यू नोंदणीसाठी शासनाची प्रमाणित कार्यपद्धती लागू; सीआरएस पोर्टलद्वारेच प्रमाणपत्रे मिळणार
Uddhav Thackeray Press Conference: उद्धव ठाकरे शुक्रवारी घेणार महत्वाची पत्रकार परिषद; काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष
उद्धव ठाकरे शुक्रवारी (०३ जुलै) महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहिती राज्यसभा खासदार संजय राऊत यंनी दिली आहे. उद्धव ठाकरे बंडखोर खासदार, आमदारांवर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/2072663971640008802?s=20
टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तिघे जेरबंद; अटक आरोपींची संख्या ७ वर
मुंबईत मागील दशकभरात प्रदूषणसंबंधी तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ; प्रजा फाऊंडेशनच्या ‘नागरी अहवाल २०२६’मध्ये उघड
भिवंडीत एफडीए कारवाईची भीती दाखवत ५० हजारांची खंडणी; हॉटेल चालकाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीकेसी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन : एमएमआरसीकडून दर शुक्रवारी बीकेसीत मोफत फीडर बस सेवा
मराठवाड्यातील औषधी करटोलीची भाजी खाल्ली आहे का ? आता पुण्यातही मिळते, काय आहे भाव ?
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू; शिवसेना आक्रमक, उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी!
माजी सरसंघचालकांच्या नाटकांसाठी राज्य सरकाचा ४५ लाखांचा निधी; सहा प्रयोगांसाठी प्रत्येकी ७.५ लाखांचा निधी
माहिती अधिकार कायद्याबाबत मोठा निर्णय; अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या इशारऱ्याने सरकारची माघार
शिक्षकांचे अखेर ठरले! TET ला विरोध कायम, BLO च्या कामाचा ताण नको; ९ जुलैला ‘शाळाबंद’ आंदोलन!
Video : बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर साजिद खान यांचे मोठे विधान, “मुख्यमंत्र्यांचा रात्री १२ वाजता फोन, सुरक्षा नको, पण मंदिर…’
लग्नात ३२ लाख खर्च करूनही मांडव चांगला नसल्याचे टोमणे मारत डोंबिवलीच्या सुनेचा सासरच्यांकडून छळ
तुकाराम मुंढेंच्या विभागाच्या थेट कारवाईवर न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह; म्हणाले, ‘‘आम्हीही नोटीस न देता थेट कारवाई करायची का?’’
पाऊस आल्याने हिरव्या देवाची यात्रा भरणार; ५ जुलै रोजी मासले बेलपाड्यात आयोजन, रानभाजी स्पर्धा अनुभवता येणार
स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्काराची घोषणा
Video : नागपुरात अनोखा धबधबा, पहिल्याच जोरदार पावसात असे वाढले शहराचे सौंदर्य!
नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २३ जागांसाठी १६९ अर्ज वैध! आ.चिखलीकर-नागेलीकरांचे अर्ज बाद
भिवंडीत ‘डॉक्टर्स डे ’ला बोगस डॉक्टरांना दणका; ३३ पदव्यांची चौकशी, एकावर गुन्हा दाखल
चक्क १.५३ कोटींची इलेक्ट्रिक बसच चोरली! बस चोराची 'ही' कार्यपद्धती पाहून पोलीसही चक्रावले
प्रदेशाध्यक्षांची पराभवानंतर महायुतीसाठी आर्जव, ठाणे जिल्हा बँकेत पराभवाने बदलले रविंद्र चव्हाणांचे सूर
पहिल्याच पावसात विवळवेढे उड्डाणपुलावर डांबरीकरण उखडले ; पाण्याचा निचरा करण्यासाठी पोलिसांचा पुढाकार
एअर इंडियातील नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक; उत्तराखंडमधून ११ जणांना अटक
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीची रक्कम जमा होईपर्यंत थकीत पीककर्जावर व्याज नाही; शासनाचे बँकांना आदेश
प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरूणाचा मृत्यू; सर्व आरोपींच्या अटकेची मागणी, भाजप नगरसेविकेच्या कार्यालयाची तोडफोड
VIDEO: आई-वडिलांची रोजची भांडण...त्यातच बेरोजगार; मुंबईत १८ वर्षांच्या तरुणाचा इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
कल्याण तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषद शाळांमध्ये पावसाचे पाणी, विद्यार्थी, पालक त्रस्त
राजुराच्या कन्येची जागतिक झेप; रशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. त्रिवेणी गव्हाळे यांनी फडकवला भारताचा तिरंगा
नुकसानीमुळे बस तपासणी अशक्य; उत्पादक कंपनीने चौकशी करावी, ताडदेव आरटीओची शिफारस, दादर बस अपघाताचा अहवाल प्रतीक्षेत

राज्यात मुसळधार पावसाची हजेरी; मुंबई, ठाणे, रायगडसह पालघरला रेड अलर्ट, मुंबईच्या समुद्रात लाटा उसळण्याची शक्यता, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
