Maharashtra Heavy Rain Updates: राज्यात सर्वदूर मोठा पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुंबईत रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत चाळीचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे, घाटमाथ्यावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली असून, नागरिकांना अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसामुळं कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाट परिसरात, ठाकूरवाडी ते मंकी हिल दरम्यान रेल्वेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे मध्य रेल्वेने या मार्गावरील अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदलले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवरील बोगदा क्रमांक २ च्या बाहेर देखील पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुरक्षेची खबरदारी म्हणून आज पहाटे ४ वाजेपासूनच या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

एकीकडे नैसर्गिक आपत्तीने राज्याला घेरले असताना, दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांत झालेल्या दुर्घटना, मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांवरून विरोधक आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आज विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते.

राज्यातील पावसाचे आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…

Live Updates

Mumbai Pune Thane Live News Updates, 6 July 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स

19:22 (IST) 6 Jul 2026

जिल्हा बँक शिपाई भरतीत स्थानिकांना १००% प्राधान्य, आता परीक्षा होणार ऑफलाइन! गैरव्यवहार झाल्यास संचालकांवर कारवाई

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शिपाई पदांची भरती आता ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने होणार असून, स्थानिक उमेदवारांना १०० टक्के प्राधान्य दिले जाईल. ...सविस्तर वाचा
18:49 (IST) 6 Jul 2026

ताम्हिणी घाटात पावसाचा कहर; दरडी, झाडे कोसळल्याने पुणे–कोलाड महामार्ग धोकादायक

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका ताम्हिणी घाट परिसराला बसला आहे. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे–कोलाड महामार्गावरील निवे–डोंगरवाडी दरम्यान रस्त्यालगतची संरक्षक भिंत ढासळली असून अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. ताम्हिणी आणि सरोळे गावांदरम्यान हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली असून प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सततच्या पावसामुळे घाट परिसरातील स्थिती गंभीर बनली असून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वाहनचालकांनी अत्यावश्यक कामाशिवाय ताम्हिणी घाटातून प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

18:01 (IST) 6 Jul 2026

नाशिकमध्ये उद्या रेड अलर्ट; शाळा-कॉलेज आणि मंदिरांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना

नाशिकमध्ये उद्या रेड अलर्ट, शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. त्र्यंबकेश्वर मंदिरही राहणार बंद.

17:49 (IST) 6 Jul 2026

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी; ६ ते २९ जुलैदरम्यान सवलत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. ...वाचा सविस्तर
17:40 (IST) 6 Jul 2026

पाऊस समाधानकारक, पण धरणे तहानलेलीच! अनेक गावे टँकरवर अवलंबून; ‘या’ जिल्ह्यात परस्परविरोधी चित्र

धरण क्षेत्रात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे अपवाद वगळता ५१ लहान मोठ्या धरणातील जलपातळी अजूनही असमाधानकारक असल्याचे चित्र आहे. ...सविस्तर वाचा
17:34 (IST) 6 Jul 2026

"मिसिंग लिंकवर दरड कोसळणं देवाचा प्रकोप", प्रशासनाचा दावा चर्चेत, निसर्गाला धरलं जबाबदार!

Mumbai Pune Expressway Landslide latest updates : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेली मोठी दरड कोसळण्याची घटना हा 'अ‍ॅक्ट ऑफ गॉड' म्हणजेच नैसर्गिक आपत्ती असून, यात कोणताही बांधकाम दोष नाही, असा दावा MSRDC केला आहे. ...वाचा सविस्तर
17:17 (IST) 6 Jul 2026

जलयम परिस्थितीमुळे कल्याण, डोंबिवलीत १५ पाणी उपसा पंपांचे नियोजन

मागील दोन दिवसांपासून कल्याण आणि डोंबिवली शहरात होत असलेल्या मुसळधार पावासामुळे नागरी वस्तीत पाणी घुसू नये म्हणून केडीएमसीने १५ पाणी उपसा पंपांचे नियोजन केले आहे. पालिकेच्या आपत्कालीन विभागाचे ४० हून अधिक कर्मचारी या पाणी उपशाच्या कामासाठी रात्रंदिवस कार्यरत आहेत. ...सविस्तर वाचा
17:05 (IST) 6 Jul 2026

‘मिसिंग लिंक’च्या दुरवस्थेवरून यशोमती ठाकूर आक्रमक, म्हणाल्या, ४० टक्के टक्केवारीचे सरकार…

विकासाच्या नावाखाली आणल्या जाणाऱ्या प्रकल्पांमागे सरकारचे दुसरेच काहीतरी छुपे नियोजन असते, असा थेट आरोप काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला. ...सविस्तर वाचा
16:58 (IST) 6 Jul 2026

दोन नवीन एक्सप्रेसला दाखवली हिरवी झेंडी! नांदेड रेल्वेस्थानकावरील शुभारंभ कार्यक्रम

नांदेड-मुंबई-नांदेड एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस अकोला व मनमाड मार्गे धावेल. या गाडीत आरक्षित तसेच अनारक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध असेल. टनकपूर-नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस नांदेडहून रविवारी तर टनकपूरहून मंगळवारी धावेल. ...सविस्तर बातमी
16:57 (IST) 6 Jul 2026

Video : नवीन पनवेलमध्ये २४ तासांत सर्वाधिक ३५८ मिमी पाऊस; एकाचा मृत्यू, महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पनवेल महापालिका क्षेत्रात शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत विविध भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामध्ये नवीन पनवेल येथे सर्वाधिक ३५८ मिमी पावसाची नोंद झाली ...सविस्तर बातमी
16:51 (IST) 6 Jul 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ‘ ऑफ लाईन ’ घ्याव्यात; छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन, राेहीत पवार, अभिजीत दिपके यांची हजेरी

लाकुडतोड्याच्या गोष्टीतील ‘सोन्याची कुऱ्हाड आम्हाला नको, आम्हाला आमची लोखंडी कुऱ्हाडच द्या ’ या शब्दात ‘ ऑफलाईन ’ परीक्षेची मागणी करण्यात आली. ...अधिक वाचा
16:15 (IST) 6 Jul 2026

नव्या वैद्यकीय कायद्यामुळे 'इन्स्पेक्टर राज'ची भीती !'इमा'चा इशारा: विश्वासात घ्या, अन्यथा राज्यव्यापी संप

आपत्कालीन उपचारांची जबाबदारी उपलब्ध सुविधांशी सुसंगत असावी, अशी अपेक्षा प्रसिद्धी पत्रकात व्यक्त करण्यात आली असून विद्यमान नोंदणीकृत संस्थांचे हक्क संरक्षित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ...वाचा सविस्तर
16:06 (IST) 6 Jul 2026

पूराच्या संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडस; गर्भवती महिलेचे सुरक्षित स्थलांतर

अशा कठीण प्रसंगी भजेपार गावातून एका गर्भवती महिलेला आरोग्य विभागाच्या पथकाने पुरातून मार्ग काढत सुरक्षितपणे बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले. ...सविस्तर वाचा
16:00 (IST) 6 Jul 2026

ठाण्यात झाड कोसळून एक जण गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लुईसवाडी येथील आरटीओ कार्यालयाजवळ झाड कोसळून धर्मवीरनगरचे पांडुरंग भुवड गंभीर जखमी झाले. गेल्या २४ तासांत शहरात झाडे आणि फांद्या पडण्याच्या तब्बल १६८ तक्रारींची नोंद झाली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 6 Jul 2026

म्हाप्रळ-आंबेत पुलाला दोन वाळू बार्जची धडक; आंबेत मार्गे वाहतूक बंद

कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आधीच प्रभावित झाली आहे. त्यात म्हाप्रळ-आंबेत पूलही बंद झाल्याने कोकणात ये-जा करणारे प्रवासी, स्थानिक नागरिक आणि मालवाहतूक वाहनांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...वाचा सविस्तर
15:53 (IST) 6 Jul 2026

PCMC Flood Evacuation: पिंपरी-चिंचवडमधील पूरबाधित भागातील १८८० व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर! 'या' भागांवर विशेष लक्ष

पिंपरी-चिंचवड शहरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने १८८० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. ...वाचा सविस्तर
15:51 (IST) 6 Jul 2026

शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसाला डोंबिवलीतील फॉर्च्युनर कार चालकाची बेदम मारहाण

डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौक भागात मुख्य रस्त्यावर उभी असलेली फॉर्च्युनर कार बाजूला घेण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 6 Jul 2026

यवतमाळात गुटखा माफियाच्या घरावर छापा, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

शहर पोलिसांच्या डीबी पथकाने पळसवाडी सिंधी कॅम्प परिसरातील 'गुटखा किंग' कुमार रामचंद्र ओछाणी याच्या घरावर छापा टाकून तब्बल ४० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अवैध साठा आणि पॅकिंग मशिन्स जप्त केल्या आहेत. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 6 Jul 2026

झाडे पडण्याच्या घटनांवरून ठाणे महापालिकेविरोधात शिवसेना उबाठा पक्षाचे फांद्या अंगावर बांधून आंदोलन; निष्क्रिय कारभाराचा आरोप

ठाण्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गेल्या २४ तासांत तब्बल ११० झाडे कोसळली असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे महेश कदम यांनी अंगावर झाडांच्या फांद्या बांधून ठाणे महापालिकेविरोधात अनोखे आंदोलन केले. ...अधिक वाचा
15:25 (IST) 6 Jul 2026

​कोयना पाणलोटात 'धो-धो पर्जन्यवृष्टी '; धरण एक तृतीयांश भरण्याच्या मार्गावर!

कोयना पाणलोटात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात ३२४.६६ मिमी म्हणजेच तब्बल १२. ७८ इंच आणि वार्षिक सरासरीच्या साडेसहा टक्के पावसाची नोंद झाली आहे. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 6 Jul 2026

तुफान पावसामुळे मनोरी समुद्रकिनाऱ्याजवळ जहाज भरकटले

सध्या तटरक्षक दल आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून जहाजावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात येत आहे. ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 6 Jul 2026

झांझरोळी बंधार्‍याच्या संरक्षण भिंतीचा भाग निखळला; दहा गावांना सुरक्षिततेचा इशारा

पालघर तालुक्यातील केळवे रोड परिसरातील झांझरोळी बंधाऱ्याची संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे खचली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या १० गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पाटबंधारे विभागाकडून दुरुस्ती आणि पाण्याचा विसर्ग करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ...सविस्तर बातमी
14:36 (IST) 6 Jul 2026

डोंबिवलीतील कर्करोग रुग्णालयालगतच्या खचलेल्या इमारतींची भाजप प्रदेशाध्यक्षांकडून पाहणी

डोंबिवलीत कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे शेजारील दोन इमारतींच्या पायाचा भराव खचून मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. ...सविस्तर वाचा
14:25 (IST) 6 Jul 2026

धावत्या स्कूल बसचे चाक निखळले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

या घटनेमुळे स्कूल बसच्या फिटनेस आणि तांत्रिक तपासणीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...सविस्तर बातमी
14:21 (IST) 6 Jul 2026

VIDEO: जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर '५६ इंची भ्रष्टाचाराचा' आरोप! मानसिक दबावामुळं एकनाथ शिंदे आजारी पडल्याचा दावा

"विकासाच्या नावाखाली शहरांचा बलात्कार सुरू आहे. एका बाजूला मेट्रो, एका बाजूला मोनो आणि गरज नसताना कामे सुरू आहेत. लोकांची कुणालाही काळजी पडलेली नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
14:07 (IST) 6 Jul 2026

उल्हास नदीचे पाणी घुसल्याने मोहिली जलशुध्दीकरण केंद्र बंद, टिटवाळा, शहाड भागाचा पाणी पुरवठा बंद

मोहिली येथील उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रात एकूण १६ पंप २४ तास कार्यरत असतात. या पंपांच्या साहाय्याने कल्याण, डोंबिवली शहरांना दररोज पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होतो. ...वाचा सविस्तर
14:01 (IST) 6 Jul 2026

पावसाचा 'ब्रेक', विमानाचा 'वेट', मंत्री-आमदारांचा मुंबई दौरा रद्द

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचे कामकाज स्थगित झाल्याची माहिती मिळताच नेत्यांनी आपला मुंबई दौरा रद्द करून आपापल्या मतदारसंघातील स्थानिक कामांकडे मोर्चा वळवला. ...सविस्तर बातमी
13:30 (IST) 6 Jul 2026

PCMC Heavy Rain : पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकणमधील वाहतुकीची काय आहे परिस्थिती? वाहतूक पोलीस म्हणाले…

पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि आयटी हब, चाकण परिसरामध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते, अंडरपास आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. ...सविस्तर वाचा
13:25 (IST) 6 Jul 2026

मुंबई : हवाई वाहतूकीला मुसळधार पाऊस, वेगवान वाऱ्याचा तडाखा

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उड्डाणे सरासरी ५० ते ५५ मिनिटांच्या विलंबाने होत आहेत. तर येणाऱ्या विमानांपैकी २० टक्के विमाने उशिराने येत आहेत. ...अधिक वाचा
13:14 (IST) 6 Jul 2026

शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुटी जाहीर, खासगी कंपन्यांना घरातून काम करण्याचे निर्देश

रतीय हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ...वाचा सविस्तर

Maharashtra Heavy Rain updates in Mumbai and Pune | Mumbai Pune Traffic and School Holiday due to rain | महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि मुंबई पुणे वाहतूक कोंडी | मुंबई पुणे शाळांना सुट्टी आणि दरड कोसळल्याची दुर्घटना

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स