Maharashtra Breaking News : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाद्यपूजनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर आता संजय राऊतांनी जयकुमार गोरेंना दूर राहण्याचा सल्ला देत जवळ फिरकल्यास अडचणीत याल, असा इशारा दिला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारींकडून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या विरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Pune Breaking News Live Updates, 04 August 2026: महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स.

18:41 (IST) 4 Aug 2026

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा 'डीपफेक' व्हिडिओ अन् मस्क यांच्या SpaceX शेअर्सचं आमिष; पुण्यातील व्यावसायिकाला १.०७ कोटींचा गंडा कसा घातला?

पुण्यातील एका बड्या व्यावसायिकाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा AI 'डीपफेक' व्हिडिओ आणि एलॉन मस्क यांच्या 'SpaceX' चे शेअर्स देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...सविस्तर वाचा
17:52 (IST) 4 Aug 2026

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पूल परिसरात भीषण वाहतूक कोंडी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वसई-विरार आणि मिरा-भाईंदरदरम्यान मंगळवारी १५ किलोमीटरपेक्षा जास्त लांब वाहतूक कोंडी झाली. महामार्गावरील खड्डे, पाऊस आणि काही वाहनांच्या रॉंग साईड प्रवेशामुळे ससूनवघर ते मालजीपाडा परिसरात दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ...सविस्तर वाचा
16:56 (IST) 4 Aug 2026

देशभरात रेल्वेतील बेडरोल चोरीत वाढ; रेल्वेला लाखोंचा फटका

या चोरीमुळे लिनन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना आणि रेल्वेला १०४.५१ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसला असून, यात सर्वाधिक चोरी फेस टॉवेल्स आणि बेडशीट्सची झाली आहे. ...वाचा सविस्तर
16:55 (IST) 4 Aug 2026

एक वर्षांपूर्वी 'कमळ' हाती घेऊनही सुरेश वरपूडकर यांच्या पदरी घोर निराशा ; परभणी जिल्हा बँक हातातून निसटली !

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाल्याने वरपूडकरांचा भाजप प्रवेशाचा मनसुबा अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. ...अधिक वाचा
16:19 (IST) 4 Aug 2026

अनधिकृत बांधकामे अन् फेरीवाल्यांवर कारवाईसाठी वसईत मनसेचे आमरण उपोषण

प्रभाग समिती एचच्या अंतर्गत वसई पश्चिमेतील माणिकपूर - नवघर परिसर येतो. या परिसरात सार्वजनिक रस्ते, गटारे आणि फूटपाथवर २०२१ पासून अनधिकृत अतिक्रमणे व फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार मनसेकडून करण्यात आली होती. ...वाचा सविस्तर
15:59 (IST) 4 Aug 2026

VIDEO: मोहन भागवत यांच्या ‘जेन-झी’शी संवादावर CJPच्या अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, "उशीराने का होईना…"

"ज्येष्ठांनी तरुणांशी संवाद साधणे चांगलेच आहे; पण हा संवाद तरुणांनीच आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून त्यांना करायला भाग पाडला आहे," असे छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजित दिपके म्हणाले आहेत. ...सविस्तर वाचा
15:41 (IST) 4 Aug 2026

डॉ. डी. वाय पाटील का म्हणाले होते? हा तर गुरुकडून शिष्याचा सन्मान!

विद्यापीठाने जानेवारी २०१५ मधील दीक्षान्त समारंभात त्यांना 'डी.लिट' या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले होते. ...सविस्तर वाचा
15:13 (IST) 4 Aug 2026

मुंबई सेंट्रलच्या ‘जन आहार’वर आयआरसीटीसीची कारवाई; अस्वच्छतेमुळे सेवा तात्पुरती बंद; एक लाखांचा दंड

मुंबई सेंट्रल स्थानकावरील ‘जन आहार’ उपहारगृहात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे उल्लंघन आढळल्याने आयआरसीटीसीने सेवा तात्पुरती बंद करत कंत्राटदाराला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...वाचा सविस्तर
14:57 (IST) 4 Aug 2026

काँग्रेसच्या कार्यालयात घुसले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, माफीची मागणी

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' म्हणत टीका केल्याने वाद उफाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याप्रकरणी निषेध केला जात आहे. माफी मागण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात घुसले आहेत.

14:28 (IST) 4 Aug 2026

डॉ. डी. वाय. पाटील काँग्रेसच्या मुशीतील कार्यकर्ता ते राज्यपाल; भाजपच्या सत्ताकाळातही सन्मान

आयुष्यभर काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांचा हाच राजकीय आणि वैचारिक वारसा त्यांच्या पुढच्या पिढीनेही समर्थपणे पुढे चालवला आहे. ...सविस्तर वाचा
14:10 (IST) 4 Aug 2026

शिक्षणविश्वातील द्रष्टे व्यक्तिमत्त्व हरपले; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने नवी मुंबईत हळहळ

कोणतीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसताना शिक्षणाच्या बळावर संस्थांचे विशाल विश्व उभे करणाऱ्या डॉ. पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले ...वाचा सविस्तर
13:21 (IST) 4 Aug 2026

"MHT-CET ऑनलाईन परीक्षेत घोळ", ऑफलाईन परीक्षा घेण्याची रोहित पवारांची मागणी

"राज्यात इंजिनिअरींग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या MHT-CET ऑनलाईन परीक्षेतच घोळ होत असून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन (OMR) परीक्षा घेणं आवश्यक आहे", अशी मागणी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेतून केली.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2084540400321106338?s=20

13:14 (IST) 4 Aug 2026

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; चालू वर्षात ६ महिन्यात तब्बल १५२ कर्जबळी!

यवतमाळ जिल्ह्यात चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत (जानेवारी ते जून २०२६) तब्बल १५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...वाचा सविस्तर
12:39 (IST) 4 Aug 2026

"इंदिरा गांधींनाही असेच म्हटले होते, इतिहास विसरू नका"; सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेला मिटकरींचे प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून 'गुंगी गुडिया' अशी टीका करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. "इंदिरा गांधी यांनाही सुरुवातीला अशाच शब्दांत हिणवले गेले होते," असा टोला लगावत अमोल मिटकरींनी काँग्रेसवर वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन केल्याची टीका केली.

https://twitter.com/amolmitkari22/status/2084487933512572952?s=20

12:19 (IST) 4 Aug 2026

"द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला"; एकनाथ शिंदेंकडून डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली

https://twitter.com/mieknathshinde/status/2084528095835353251?s=20

12:08 (IST) 4 Aug 2026

"हा कौल भाजपच्या विरोधात"; खासदार संजय राऊत

तीन विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालांवर बोलताना, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले की, "हा कौल भाजपच्या विरोधात आहे. याचा अर्थ, राम मंदिरातील लूटमार आणि जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारहाण झाली, ते लोकांना आवडले नाही. लोकांनी 'मंगल मिलन' नाकारले आहे."

https://twitter.com/ANI/status/2084500225037914141?s=20

11:46 (IST) 4 Aug 2026
D Y Patil Death: शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचं निधन

शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2084525511582355499?s=20

11:42 (IST) 4 Aug 2026

डॉक्टरांपाठोपाठ नर्सेसही संपात; शासकीय रुग्णालयांत रुग्णांची सकाळीच गैरसोय; दोन तासांचे कामबंद आंदोलन

पुणे जिल्ह्यात ससून सर्वोपचार केंद्र, औंध जिल्हा रुग्णालय, शिरूर  रुग्णालय यासह जिल्हास्तरावर असणाऱ्या आणि छोट्या शासकीय रुग्णालयांमध्ये जवळपास अडीच हजार नर्सेस कार्यरत आहेत. ...अधिक वाचा
11:40 (IST) 4 Aug 2026

Rohit Pawar Press Live: रोहित पवार यांची पत्रकार परिषद लाईव्ह

रोहित पवार यांची पत्रकार परिषद लाईव्ह

https://twitter.com/RRPSpeaks/status/2084512012282044739?s=20

11:34 (IST) 4 Aug 2026

ठाणे अंतर्गत मेट्रो सर्वांना विश्वासात घेऊनच पुढे नेणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीत आश्वासन

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीनुसार समता नगर, लोकमान्य नगर मार्गाचा ३ आठवड्यात अभ्यास करून सादरीकरण करण्याचे निर्देश ...सविस्तर बातमी
11:34 (IST) 4 Aug 2026

नागपूर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत अघटीत घडलं, आढळल्या 'या' संतापजनक वस्तू, सुरक्षेला सुरुंग!

नागपूर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...वाचा सविस्तर
11:22 (IST) 4 Aug 2026

चंद्रपुरात ऑनलाईन फसवणुकीचे जाळे उघड! ३०० बँक खाती, ४०० व्यवहार अन् कोट्यवधींचा घोटाळा; तपासाला वेग

चंद्रपुरात देशातील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. ...सविस्तर वाचा
11:12 (IST) 4 Aug 2026

वसई पूर्वेतील गोलानी नाका रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य; कामगार आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात

वसई पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत. तसेच या परिसरातून महामार्गाला जोडणारे मार्गही गेले आहेत ...अधिक वाचा
11:11 (IST) 4 Aug 2026

आनंदाची बातमी : दहिसर-मिरा भाईंदर मेट्रोच्या अखेरच्या टप्प्याच्या चाचणीला सुरुवात

मिरा-भाईंदर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने मेट्रो मार्गिका ९ उभारली आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा एप्रिल महिन्यात दहिसर ते काशिगावदरम्यान प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. ...सविस्तर वाचा
10:59 (IST) 4 Aug 2026

साखरेचा भाव ५० पार! सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना मोठा झटका; दरवाढीचे मुख्य कारण काय?

सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दराने पन्नाशी पार केली असून किरकोळ बाजारात साखर ५२ ते ५३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. ...वाचा सविस्तर
10:53 (IST) 4 Aug 2026

महसूल विभागातील कामवाटपाचा निर्णय महिनाभरातच बदलण्याची शासनावर वेळ, खनिकर्म विभागाच्या दबावाची चर्चा

महसूल विभागातील जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व महसूल उपजिल्हाधिकारी यांच्यातील कामवाटपाचा ऐतिहासिक निर्णय अवघ्या महिन्याभरातच बदलण्याची नामुष्की राज्य शासनावर आली आहे. ...अधिक वाचा
10:21 (IST) 4 Aug 2026

“अभिजीत दिपकेंना तात्काळ अटक करा”, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारींकडून दिल्ली पोलिसांत तक्रार

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारींकडून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या विरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. “आज मी सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्लीच्या डीसीपींकडे लेखी तक्रार दाखल केली आहे, कारण त्यांच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केल्याचा माझ्याकडे पुरावा आहे. माझ्यावर पुणे आणि औरंगाबादमध्ये हल्ला झाला. याप्रकरणी आधीच २ गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी दीपकेला तात्काळ अटक करावी, अशी माझी मागणी आहे. शिवाय, सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्याबद्दल मी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पोलिसांना सलाम करतो, ज्यामुळे दिल्लीतील वातावरण बिघडण्यापासून वाचले… दिपके हे सर्व काही स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत,” असे फैजान म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/2084453125092737077?s=20