Marathi Breaking News Live Updates : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार शरद पवार यांचं एका मुलाखतीत बोलताना कौतुक केलं आहे. शरद पवार जय-पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरु असून यावर राजकीय वर्तुळातून देखील संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या प्रकरणात वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे. दरम्यान, या बरोबरच यंदा मान्सून लवकरच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व बातम्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Latest Maharashtra News Highlights : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

22:31 (IST) 29 May 2025

लातूरमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू, ३४ प्रवासी जखमी

औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी पहाटे कृष्णा ट्रॅव्हल्स आणि अभिनव ट्रॅव्हल्सच्या दोन प्रवासी वाहनांमध्ये झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर ३४ प्रवासी जखमी झाले. ...अधिक वाचा
19:51 (IST) 29 May 2025

‘लाडकी बहीण’साठी आदिवासींचा निधी वळवला? आदिवासी विकास मंत्री म्हणतात…

आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले आहे. सन २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला शासनामार्फत एकूण १७,००० कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. ...वाचा सविस्तर
19:26 (IST) 29 May 2025

बाळासाहेब थोरात यांचे भाचे फडणवीसांच्या प्रेमात; राहुल गांधींवर टीका

आता त्यांनी चक्क काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींवर टीका करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचाल काय असेल याचे संकेत दिले आहेत. ...वाचा सविस्तर
18:35 (IST) 29 May 2025

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाण्यात एकाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाणे येथील एका व्यक्तीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

18:31 (IST) 29 May 2025

राहुल गांधी यांना धमकाविणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा ; काँग्रेसची तक्रार

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांच्याविरुद्ध काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली. ...सविस्तर बातमी
17:35 (IST) 29 May 2025

शेअर्समधील गुंतवणुकीच्या आमिषाने बाणेरमधील व्यक्तीला २६ लाखांना गंडा

सायबर चोरट्यांनी तरुणाची २५ लाख ८९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना १ ते २८ एप्रिल कालावधीत बाणेरमध्ये घडली. याप्रकरणी एका ४० वर्षीय गुंतवणूकदाराने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...सविस्तर बातमी
17:20 (IST) 29 May 2025

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; दोन महिलांची सुटका, मालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा

याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांची सुटका केली आणि स्पाच्या दोन मालकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...सविस्तर वाचा
17:02 (IST) 29 May 2025

नितीन गडकरींच्या शेतात एक किलोचा एक कांदा…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी नागपूरमधील धापेवाडा येथील भक्ती फार्ममध्ये ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाच्या कांद्याचे उत्पादन घेतले आहे. ...वाचा सविस्तर
16:37 (IST) 29 May 2025

‘एमपीएससी’च्या ऐतिहासिक २७९५ जागांच्या जाहिरातीसमोर नवीन अडचण

पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 29 May 2025

"अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत", बाबासाहेब पाटील यांचं विधान

"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काम करण्याची धमक आहे. त्यांची प्रशासनावर पकड आहे. मग अशा माणसाच्या हातात जर नेतृत्व गेलं तर महाराष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. एक ना एक दिवस अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत", असं विधान सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं आआहे.

16:15 (IST) 29 May 2025

रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग चिखलाने भरला; संगमेश्वर,रत्नागिरी व लांजा येथे महामार्गाची दुर्दशा

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा मुंबई गोवा महामार्गाचे गेले १८वर्ष काम सुरु आहे. तरी हा महामार्ग पुर्ण होवू शकला नाही. संपुर्ण देशात हा महामार्ग आता चर्चेचा विषय बनला आहे. पावसाला सुरु झाल्याने आता या महामार्गाचे काम मंदावले आहे. ...वाचा सविस्तर
16:12 (IST) 29 May 2025

“वैष्णवीला पाच ते सहा दिवस मारहाण झाली, ती हयात नाही; आता किमान…”, वडील अनिल कस्पटे काय म्हणाले?

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्यभरात होते आहे. या प्रकरणावर बुधवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. आता वैष्णवीच्या वडिलांनी त्याबाबत उत्तर दिलं आहे.

वाचा सविस्तर

15:09 (IST) 29 May 2025

लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी पळवला? विरोधकांच्या आरोपांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा तब्बल ३३५ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा आरोप झाला होता. मंत्री संजय शिरसाट यांनी यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनुसूचित जातींसाठीचा निधी देखील वळवल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवल्याचा आरोप केला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे. हा अतिशय चुकीचा दावा आहे. अर्थसंकल्पाची पद्धत ज्यांना समजत नाही ती मंडळी असा आरोप करू शकतात”.

वाचा सविस्तर

14:31 (IST) 29 May 2025

कल्याण डोंबिवलीत वर्षभरात चौदा हजार नागरिकांना श्वान दंश

मागील दोन वर्षाच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली परिसरातील सुमारे ३६ हजाराहून अधिक नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला आहे. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. ...वाचा सविस्तर
14:17 (IST) 29 May 2025

"लपवण्यासारखं काही नाही...", संजय राऊतांनी राज ठाकरेंना पाठवलं 'नरकातला स्वर्ग' पुस्तक

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांचं 'नरकातला स्वर्ग' हे पुस्तक पाठवलं आहे. या संदर्भातील माहिती खासदार संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली आहे. या फेसबुकवर पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं की, "लपवण्यासारखे काही नाही.'नरकातला स्वर्ग'ची प्रत श्री.राज ठाकरे यांना पाठवली, हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे."

https://platform.twitter.com/widgets.js

13:46 (IST) 29 May 2025

अंबरनाथच्या वेशीवर आढळला शीर नसलेला मृतदेह ; नाळिंबीजवळची घटना, कल्याण ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू

अंबरनाथच्या तीन झाडीच्या पुढे कल्याण तालुक्याच्या हद्दीत नाळिंबीजवळ रस्त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या पहाटेच्या वेळी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ...सविस्तर वाचा
12:42 (IST) 29 May 2025

"ओबीसीचे झोपडे उद्ध्वस्त कराल तर...", लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंसह मुख्यमंत्र्यांना इशारा

"आम्ही ऑगस्ट महिन्यात नांदेडमधून मुंबईपर्यंत लॉन्ग मार्च काढणार आहोत. ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि खऱ्या ओबीसींच्या बाजूने उभे राहण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीत ओबीसींनी ओबीसींना मतदान करण्यासाठी व खोट्या ओबीसींच्या प्रमाणपत्रावर जे निवडणुकीला उभे राहतील त्यांना बाजूला करायचं ही आमची भूमिका आहे. या राजकीय नेत्यांना मला सांगायचं आहे की तुमच्या आमदाराकीचा, खासदारकीचा आणि मुख्यमंत्री पदाचा मार्ग आमच्या गावगाड्यातील ओबीसींच्या वाड्यातून जातो. पण तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत असाल तर आमचा हा लॉन्ग मार्च काढणार आहोत. मनोज जरांगे ज्या दिवशी उपोषणाला बसतील त्याच दिवशी आमची ओबीसींची संघर्ष यात्रा मुंबईपर्यंत जाईल. आमचा इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि ओबीसीचे झोपडे उध्वस्त करायला निघालेल्या मनोज जरांगेंना आहे", असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

11:59 (IST) 29 May 2025

डोंबिवलीत मामाच्या मुलाबरोबर लग्नास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आपण ठरविलेल्या मुलाबरोबर आपले लग्न होणार नसल्याचा विचार करून या अल्पवयीन मुलीने मंगळवारी दुपारी खंबाळपाडा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...अधिक वाचा
11:58 (IST) 29 May 2025

Sanjay Raut : "भाजपाने अजित पवारांना न विचारता भुजबळांना मंत्री केलं"; 'या' नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वीच मंत्रिपद देत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. ...सविस्तर बातमी
11:45 (IST) 29 May 2025

आता खुल्या गटास पण मोफत प्रशिक्षण; या जातींना मिळणार लाभ..

प्रशिक्षण संस्था पण सूरू करण्यात आल्या आहेत. पण अन्य घटक पण आर्थिक दुर्बल असतात म्हणून त्यांनाही मोफत शैक्षणिक प्रशिक्षण मिळावे, असा हेतू ठेवून आता उपक्रम आला आहे. खुल्या गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे. ...वाचा सविस्तर
11:26 (IST) 29 May 2025

"सुप्रिया सुळेंना सत्तेची तहान लागली असेल", संजय राऊत असं का म्हणाले? मविआत नेमकं चाललंय काय?

Sanjay Raut Remark on Supriya Sule : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, "तुम्ही प्रसारमाध्यमं सुप्रिया सुळे यांचं व अन्य काही नेत्यांची नावं घेत आहात. त्यांना नक्कीच सत्तेची तहान लागली असेल". ...सविस्तर बातमी
10:35 (IST) 29 May 2025

"सत्यजित तांबे काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांनी याचं भान ठेवावं", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

सत्यजित तांबे यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, "राहुल गांधी यांनी किमान १०० वेळा त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असेल. त्यांच्या निवासस्थानी ते मुक्कामी देखील होते. पण आता सत्यजित तांबे यांची जी राजकीय अस्वस्थता आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते विधान केलं असेल. तसेच आणखी काय कारणे आहेत हे मला सांगता येणार नाही. राहुल गांधी हे कधीही उपलब्ध असतात, कामांच्या बाबतीत ते सर्वांना भेटत असतात. सत्यजित तांबे यांचं हे विधान मनाला न पटणारं आहे. तसेच सत्यजित तांबे हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते निवडून आलेले आहेत याचं त्यांनी भान ठेवावं", असं हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

10:35 (IST) 29 May 2025

हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय; वकील म्हणतात, “तिच्या फोनमध्ये…”

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा चालू आहे. या प्रकरणावर गुरुवारी पुणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करीश्मा व सासू लता या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी त्यांच्या आशिलांची बाजू मांडत असताना वैष्णवीबाबत अनेक मोठे दावे केले आहेत.

सविस्तर वाचा

Vaishnavi Hagawane Case

हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी त्यांच्या आशिलांची बाजू मांडत वैष्णवीबाबत अनेक मोठे दावे केले आहेत. (PC : Brides Affair Pune/Insta)