Mumbai Maharashtra News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जनतेचा विश्वास उरला नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसंच आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावाही एकनाथ शिंदेंनी केला. तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली. षंढ नसाल तर बाळासाहेबांचा फोटो न वापरता, धनुष्य-बाण न घेता नव्या चिन्हावर माझ्या समोर निवडणुकीला उभे राहा असं आव्हान त्यांनी दिलं आहे. याबाबत आता प्रतिक्रिया येत आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासून पाऊस पडू लागला आहे. या बातम्यांसह महत्त्वाच्या घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचणार आहोत.

Live Updates

Mumbai Maharashtra News Live | मोदींवर जनतेचा विश्वास उरला नाही, शरद पवारांचं वक्तव्य; यासह महत्त्वाच्या बातम्या

20:32 (IST) 20 Jun 2024
“निर्लज्जम सदा सुखी… गद्दार तर गद्दारच राहतो”, अरविंद सावंत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले…

गद्दार कायम गद्दार असतो आणि पळपुट्यांची पळपुटे अशीच नोंद होते, याचे भान त्यांनी ठेवणे आवश्यक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी येथे केली.

सविस्तर वाचा...

20:19 (IST) 20 Jun 2024
यवतमाळसाठी स्वत:च्या उमेदवारीचा ठासून दावा…..महाविकास आघाडीत चर्चेआधीच….

मदन येरावार ज्या लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक होते, त्या प्रत्येक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, असा आरोप बाजोरिया यांनी केला.

सविस्तर वाचा...

20:10 (IST) 20 Jun 2024
रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध, सोलापुरात रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण

तुती लागवड किंवा रेशीम उत्पादन हा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आला असून त्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.

सविस्तर वाचा...

19:53 (IST) 20 Jun 2024
मुंबई : दहिसरमध्ये पिंपळाचे झाड उन्मळून पडले, पाच ते सहा वाहनांचे मोठे नुकसान

मुंबई : दहिसर येथील आनंद नगर परिसरातील आर. एम. एस सोसायटीच्या आवारात गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास पिंपळाचा डेरेदार वृक्ष उन्मळून पडला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, झाडाखाली उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकींचे मोठे नुकसान झाले.

आर. एम. एस सोसायटीच्या आवारातील पिंपळाचे झाड ४० वर्ष जुने होते. गुरुवारी सकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे क्षणार्धातच झाड उन्मळून इमारतीच्या संरक्षण भिंतीवर पडले. या दुर्घटनेत संरक्षण भिंतही कोसळली. झाड पडल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. झाडाच्या फांद्या कापून छोटे छोटे भाग करून झाड बाजूला करण्यात आले. या दुर्घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या तीन दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

19:53 (IST) 20 Jun 2024
विषय संपला; राज्यात शक्तिपीठसाठी भूसंपादन करणार नाही – चंद्रकांत पाटील

संघाचे करोडो स्वयंसेवक आहेत, त्यातील एकाने मत मांडलं म्हणजे ते संघाचे मत नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी केले.

सविस्तर वाचा...

19:24 (IST) 20 Jun 2024
डॉ. अरुणा ढेरे यांना जीवन सन्मान पुरस्कार जाहीर

साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कवयित्री व साहित्याच्या अभ्यासिका डॉ. अरूणा ढेरे यांना लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

19:20 (IST) 20 Jun 2024
कोल्हापुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ७ दाम्पत्य व अंध व्यक्तींच्या हस्ते दुग्धाभिषेक व ११ नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.

सविस्तर वाचा...

19:15 (IST) 20 Jun 2024
कोल्हापूर: तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद

तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला.

सविस्तर वाचा...

19:06 (IST) 20 Jun 2024
विश्रांतीनंतर कोल्हापुरात पावसाचे आगमन; दमदार पावसाची प्रतीक्षा

पंधरवड्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे.

सविस्तर वाचा...

18:59 (IST) 20 Jun 2024
सुनील केदारांच्या विधानसभा उमेदवारीवर विघ्न? निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी स्वतः महाधिवक्ता…

विधानसभा निवडणूक लढविता यावी म्हणून केदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा...

18:51 (IST) 20 Jun 2024
“काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार”, भागवत कराड यांचा आरोप; म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था…”

भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलण्याविषय गैरसमज पसरवण्यात आले, असा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज येथे केला.

सविस्तर वाचा...

18:37 (IST) 20 Jun 2024
केंद्रीय मंत्री मोहोळांच्या समोरच भाजपाच्या दोन गटात हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील बिबवेवाडी भागातील शंकर महाराज मठ येथे केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे आज सकाळी दर्शनासाठी आले होते.

सविस्तर वाचा...

18:16 (IST) 20 Jun 2024
‘हिट अँड रन’ मध्ये जखमी ‘त्या’ चिमुकलीचाही मृत्यू

या विचित्र अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

सविस्तर वाचा...

17:45 (IST) 20 Jun 2024
Video : जळगाव जिल्ह्यातील इंग्रजी शाळेचा आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशास नकार, यावल एकात्मिक कार्यालयावर पालकांची धडक

जळगाव : यावल तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीपासून प्रवेश घेतलेल्या मुलांना दहावीत प्रवेश देण्यास संस्थाचालकांनी नकार दिला. त्यामुळे दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी यावल येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात धडक देत कैफियत मांडली.

सविस्तर वाचा...

17:41 (IST) 20 Jun 2024
नाशिक : पत्नी, सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या

नाशिक : पत्नीसह सासरच्या जाचास कंटाळून एकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघड झाल्यावर मृताच्या वडिलांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी मृताच्या पत्नीसह सासरच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा...

17:29 (IST) 20 Jun 2024
सांगली: एनडीआरएफचे आपत्ती निवारणासाठी प्रात्यक्षिक

आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करायचा , यासाठी कोणकोणती घरगुती साधने वापरायची याची माहिती देण्यात आली.

सविस्तर वाचा...

17:15 (IST) 20 Jun 2024
पनवेलमध्ये सकाळपासून जोरधारा

गुरुवारच्या पावसाची सकाळपासून सूरुवात झाल्यावर अचानक वीज पुरवठा बंद पडला.

सविस्तर वाचा...

17:12 (IST) 20 Jun 2024
आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला अशी राऊतांची अवस्था लवकरच होईल-चित्रा वाघ

ब्रँड आणि ब्रँडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी

@rautsanjay61

तुम्ही पेपरवाले नाहीत तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय… त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा… पण त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा विजयाची इतकी हवा डोक्यात जाऊ देऊ नका… नाही तर ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था होईल लवकरच…

17:10 (IST) 20 Jun 2024
नवी मुंबई: एपीएमसीतील धोकादायक इमारतीतील नळ जोडणी खंडीत

सोमवारी कांदा बटाटा बाजारातील प्रशासकीय इमारतीतील खुद्द एपीएमसी सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला होता.

सविस्तर वाचा...

16:47 (IST) 20 Jun 2024
नवी मुंबई: एपीएमसीतील नालेसफाईची पोलखोल, पहिल्याच पावसात बाजारात साचले पाणी

मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे.

सविस्तर वाचा...

16:17 (IST) 20 Jun 2024
रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध आता कारवाई, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून गोंधळ घातला जातो. रुग्णालयाचे बिल माफ करण्यासाठी डाॅक्टरांना धमकावले जाते.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 20 Jun 2024
मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली

कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी कल्याण-तळोजा मेट्रो मार्गिकेची कामे गेल्या महिन्यांपासून सुरू झाली आहेत.

सविस्तर वाचा...

16:13 (IST) 20 Jun 2024
विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना दिल्या या सूचना

नागपूर: सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानितच्या पहिली ते आठवीपर्यंत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शाळांची घंटा १ जुलैपासून वाजणार आहे.

वाचा सविस्तर...

16:12 (IST) 20 Jun 2024
कोट्यवधी रुपयांची फसवणूक; पण खातेदार म्हणतात, “पोलीस केस नको”, अखेर आमदारांचा हस्तक्षेप

वर्धा: वर्ध्यात शेतकरी मदत निधी म्हणून बँक आहे. या बँकेचे प्रकरण सध्या चांगलेच गाजू लागले आहे. बँकेच्या वर्धेसह सेलू, आर्वी, कारंजा, मोर्शी, वरुड व तिवसा येथे शाखा आहेत. बँकेचे अध्यक्ष शरद अरुण कांबळे हे असून संचालक म्हणून प्रियंका कांबळे, प्रशांत फुलझेले व अन्य आहेत. त्यांच्या विरोधात शेकडो खातेदारांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

वाचा सविस्तर...

16:11 (IST) 20 Jun 2024
लातूरमध्ये सीबीएससी शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्येतून आईची मुलीसह आत्महत्या

लातूर – आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सीबीएससी शाळेत आपल्या मुलीला प्रवेश घेता येणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माळेगाव कल्याणी या गावात घडली आहे.

सविस्तर वाचा...

15:47 (IST) 20 Jun 2024
पुणे : धक्कादायक..! पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा आढळला मृतदेह

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील फुरसुंगी येथे पाण्याच्या टँकरमध्ये २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कौशल्या मुकेश चव्हाण वय २५ असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा....

15:11 (IST) 20 Jun 2024
भाजप नेत्याचा ओबीसी आरक्षणाला जाहीर पाठिंबा…राज्य सरकारला इशारा देत म्हणाले….

चंद्रपूर : मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात व विदर्भात देखील होईल, संपूर्ण ओबीसी समाज हा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या पाठिशी उभा आहे, याची दखल सरकारने घ्यावीच, असे मत विदर्भवादी ओबीसी नेते व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी आज (दि.२०) ला येथे मांडले.

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 20 Jun 2024
ठाणे,पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : ठाणे, तसेच पालघर जिल्ह्यांत पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

सविस्तर वाचा...

14:42 (IST) 20 Jun 2024
मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार-चंद्रशेखर बावनकुळे

मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. आता तेच मराठा आरक्षणाबाबत बोलत आहेत ही आश्चर्याची बाब आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना दूर नेण्याचं काम चाललं आहे. सरकारला क्रेडिट द्यायचं नाही पण विकासाची कामं डायव्हर्ट करत आहेत असाही आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.

14:37 (IST) 20 Jun 2024
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थांनी केले रामायणावर विडंबनात्मक नाटक, प्रशासनाने विद्यार्थ्यांना ठोठावला १.२ लाख रुपये दंड

मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) या संस्थेत मार्चमध्ये झालेल्या कला महोत्सवात काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘राहोवन’ नाटकात श्रीराम आणि सीता या हिंदू देवतांवर विडंबन करण्यात आले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी या नाटकाचा निषेध केला होता. याची दखल घेत आयआयटी, मुंबई प्रशासनाने हिंदू देवदेवतांचे विडंबन केल्याप्रकरणी नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये दंड ठोठावला.

सविस्तर वाचा..

What Sharad Pawar Said?

शरद पवार यांनी बारामतीतल्या निंबूत गावात केलेलं वक्तव्य चर्चेत (फोटो-शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस)

जनतेचा मोदींवर आणि भाजपावर विश्वास उरला नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला आहे. दोन मेळावे पार पडले ज्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, भाजपावर टीका केली. तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आणि काँग्रेसवर टीका केली. याबाबत आता प्रतिक्रियाही येत आहेत.