Top Marathi News Live Updates : राज्यात पावसाचा जोर वाढला असून मुंबई, ठाणे, पुण्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे आतापर्यंत मुंबईत अनेक दुर्घटना घडल्या असून यात सामान्य नागरिकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, आजच्या पावसाळी अधिवेशनाकडेही अनेकांचं लक्ष आहे. पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनांकडे जातीने लक्ष देण्याबाबत आज सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील अनेक घडामोडी जाणून घेऊयात.
Mumbai Pune Thane Live News Updates, 3 July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
डोल्हारी बुद्रुक येथे ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी अभियान’ अंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत पश्चिम रेल्वेवरील स्थानकाची कामे वेगाने सुरू; मालाड स्थानकाचे ९० टक्के काम पूर्ण
Video : चंद्रपूर मनपात भाजप विरुद्ध भाजप! मुनगंटीवार आणि जोरगेवार समर्थकांमध्ये राडा; महापालिका कार्यालयातच धक्काबुक्की
पावसाळ्यात चिखलदऱा भटकायला जाताय? येण्यापूर्वी एकमार्गी वाहतुकीची माहिती घ्या!
विनाखर्च मूत्रपिंड प्रत्यारोपण कुठे होते? ‘या’ ठिकाणी झाली ७३ वी यशस्वी शस्त्रक्रिया! आईने मुलाला दिले जीवनदान
शाळांच्या परिसरात अपायकारक स्टिंग एनर्जी ड्रिंक व अन्नपदार्थ विक्रीस बंदी
अवघ्या दोन महिन्यांत मिसिंग लिंकवर खड्डे; एमएसआरडीसी म्हणते, किरकोळ स्वरूपाचे खड्डे बुजवले
भारतीय रेल्वेला पहिला मान; भायखळा रेल्वे रुग्णालयात 'क्यूआर कोड' वरून रुग्ण अभिप्राय प्रणाली
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव-मावळ कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विरार-अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा; वन जमिनीबाबत सरकारचा मोठा निर्णय
नाव 'पवित्र' पण नियम जाचक ! आंतरजिल्हा बदलीच्या अटीमुळे 'नोकरी की कुटुंब?' शिक्षकांसमोर यक्षप्रश्न!
मुंबईतील सर्व झोपु योजनांची एसआयटीकडून चौकशी करा, भाजप आमदाराची मागणी
न्यायालयाने फटकारल्यावर तुकाराम मुंढेच्या एफडीएची माघार, थेट कारवाई न करता नोटीस देण्याची तयारी…
वसई-विरारला सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा
"मुंबई महापालिकेचीच चुकी, सामान्य नागरिकांचीही काळजी घ्या",खड्ड्यात पडून मृत पावलेल्या अस्लम शेख यांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया
"मुंबई महापालिकेची चुकी आहे. सामान्य नागरिकांचीही काळजी घ्या. अशा खड्ड्यांवर काहीतरी लावा. तुमची गाडी तरी तिथे लावा. काहीतरी तिथे लावून ठेवा, जेणेकरून कोणी त्यात पडणार नाही. असे खड्डे खुले ठेवू नका. अजून कोणी असं जाऊ नये" ,खड्ड्यात पडून मृत्यू पावलेल्या अस्लम शेख यांच्या पत्नी .
पाचगणी पसरणी घाटात दरड कोसळली; महाबळेश्वर–वाई मार्गावरील वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता घाटरस्त्यांवरही दिसून येऊ लागला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर–वाई मार्गावर पाचगणीजवळील पसरणी घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरडीसह दगड-माती रस्त्यावर आल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. प्रशासनाकडून तातडीने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
परतूरच्या व्हायरल पाकिस्तानी गाणे प्रकरणाची किरीट सोमयांकडून पाहणी
जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका इंग्रजी शाळेत पाकिस्तानी गाणे वाजवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमया यांनी परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलची पाहणी केली.
अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात राजू शेट्टी आक्रमक; आंदोलन तात्पुरते स्थगित, लढा मात्र सुरूच
कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी हा लढा थांबलेला नाही, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलं का? - शंभूराज देसाईंची टीका
शिवसेना नेते शंभूराज देसाई म्हणाले, उद्ध ठाकरेंचे लोक आता महाआरती करणार आहेत. त्यांनी हे स्पष्ट केले पाहिजे की त्यांनी महाविकास आघाडीतील त्यांच्या मित्रपक्षांकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे की नाही. कारण जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि ते (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री होणार होते, तेव्हा त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा बाजूला ठेवली होती. ते आता दिखावा करत आहेत. त्यांचं हिंदूत्त्व कायमस्वरुपाचं नाही.
म्हाडा पुनर्विकासाला पुन्हा फटका बसणार! जुन्या प्रकल्पात नव्याने आरक्षणाची शिफारस
ब्लॉकचेन-एआयच्या मदतीने जात पडताळणी; काय आहे ही आधुनिक यंत्रणा आणि मुख्यमंत्री कां देतात ग्वाही ते बघा...
वसई विरार शहरातील नालेसफाईबाबत संशय! दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई?
तुकाराम मुंढे निवृत्तीनंतर राजकारणात जाणार? संघभूमीतील 'या' कार्यक्रमामुळे तर्कवितर्कांना उधाण
‘पीएम किसान’ हप्ता रखडण्याची चिन्हे; दोन लाख शेतकऱ्यांची ई- केवायसीकडे पाठ…
कळव्यात भररस्त्यात झाड कोसळले; मोठी वाहतूक कोंडी, सुदैवाने जीवितहानी टळली
ठाण्यातील कळवा परिसरातील मनीषा नगर येथे दिल्ली जायका हॉटेलसमोर भररस्त्यात झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाड रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्याने दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
कळवा येथील मनीषा नगर परिसरात दिल्ली जायका हॉटेलसमोर अचानक झाड रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने झाड कोसळताना कोणतेही वाहन किंवा नागरिक त्याच्या खाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
विक्रोळीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप
विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथे राहणाऱ्या चेतन ठाकूर (वय ३२) यांचा विक्रोळीतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूस डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेनंतर रुग्णाचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयात संताप व्यक्त करत संबंधित रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
ठाणे-बेलापूर मार्गावर रासायनिक द्रव्याचा कंटेनर बंद; दोन तासांपासून वाहतूक कोंडी
नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्गावर रासायनिक द्रव्याची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या दोन तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील मुख्य मार्गावर रासायनिक द्रव्याची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागपूर पुन्हा एकदा 'क्राइम कॅपिटल'च्या वाटेवर? एकाच दिवशी दोन खुनांनी उपराजधानी हादरली; सलग चार हत्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Mumbai Pune Thane Live News Updates, 3 July 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या

कोकणात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट (ai generated images)
