Maharashtra News Updates : पुण्यातील भोर प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल आरोपीला हालहाल करून मारा असं सरकारला आवाहन केलं होतं. त्यांच्या या विधानावर वकील असीम सरोदे यांनी आक्षेप घेत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर आज अनेकविध प्रतिक्रिया येत आहेत. तर, दुसरीकडे पुण्यातील पार्वती पायथा येथेच नसरापूरसारखी घटना समोर आली आहे. या घटनेत सख्ख्या आजोबानेच नातीवर अत्याचार केला. सतर्क शेजाऱ्यांमुळे चिमुकली बचावली आहे. तसंच, राज्यात उष्णतेत वाढ झाली असून नांदेडमध्ये चक्क ट्रान्फर्मरला कुलर बसवण्याची वेळ आली आहे. तर, राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने विविध गावांत हंडाभर पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात भटकावं लागत आहे. यासह राज्यातील इतर अनेक राजकीय, सामाजिक आणि हवामानाशी संबंधित अपडेट्स जाणून घ्या.

Live Updates
18:53 (IST) 6 May 2026

टिटवाळा रेल्वे स्थानकात जिने तोडल्याने प्रवाशांची गैरसोय, उदवाहकातून प्रवाशांचा प्रवास

टिटवाळा स्थानकातील फलाट क्रमांक १ आणि २ वरील जिने विस्तारित कामासाठी पाडले; प्रवाशांची मोठी कोंडी. ...अधिक वाचा
18:52 (IST) 6 May 2026

नरसापुर प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी; ठाण्यात शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन

पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद ठाण्यात उमटले आहेत. शिवसेना महिला आघाडीने आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करत तीव्र आंदोलन केले ...वाचा सविस्तर
18:52 (IST) 6 May 2026

कोल्हापुरात राजर्षींना असेही अनोखे अभिवादन! 'शाहूस्पर्श भ्रमंती'तून इतिहास, निसर्ग, सामाजिक जाणिवेचे दर्शन

राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त 'बायसन नेचर क्लब'ने आयोजित केलेल्या 'शाहूस्पर्श भ्रमंती'तून राधानगरी परिसरातील ऐतिहासिक वास्तू, निसर्गसंपदा आणि लोकराजाच्या दूरदृष्टीचा जिवंत वारसा सहभागींना अनुभवता आला. ...अधिक वाचा
18:48 (IST) 6 May 2026

चार्जिंग गन पॉईंट चोरीला, शिवाजी नगर डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस

सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करून चोरी; बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघड केला धक्कादायक प्रकार ...सविस्तर बातमी
18:41 (IST) 6 May 2026

अकोल्यासह राज्यातील १० नर्सिंग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन; विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणा…

अकोला, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील नर्सिंग महाविद्यालयांच्या कायापालटासाठी राज्य सरकारने जपानच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून आर्थिक पाठबळ घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
18:38 (IST) 6 May 2026

इयत्ता आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा गायब; संतप्त राजघराण्यांच्या वंशजांची थेट हायकोर्टात धाव

ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा नकाशा आधी हिंदी, उर्दू आणि नंतर इंग्रजी आवृत्त्यांतून टप्प्याटप्प्याने काढून टाकण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
18:38 (IST) 6 May 2026

वाढत्या उष्णतेमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ; मुंबई अग्निशमन दलाचे मुंबईकरांना दक्षतेचे आवाहन

उन्हाळा प्रखरतेने जाणवत आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी संकुलांमध्ये पंखे, एअर कुलर, वातानुकुूलित यंत्र, फ्रिज व इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ...सविस्तर वाचा
18:37 (IST) 6 May 2026

कल्याणमध्ये २१ लाखाच्या गांजासह ठाणे, भिवंडीतील ३ तस्कर अटकेत

जप्त गांजाची किंमत २१ लाख ४० हजार रुपये; आरोपींकडून मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 6 May 2026

पाणी योजनेचा वीजपुरवठा महिनाभरात तब्बल ३१ खंडित; अहिल्यानगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत…

मुळानगर आणि विळद केंद्रावरील वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे पाणी उपसा विस्कळीत झाला असून उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना पाण्यासाठी वणवण सोसावी लागत असल्याने महापौरांनी प्रत्यक्ष उपसा केंद्रावर धाव घेतली आहे. ...वाचा सविस्तर
18:21 (IST) 6 May 2026

आणखी ६० हजार मेट्रिक टन हरभऱ्याची हमीभावाने खरेदी, जयुकमार रावल यांची माहिती

वाढीव खरेदीमुळे राज्यातील हरभऱ्याची खरेदीची मर्यादा यंदा ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन वर पोहोचेल. यापूर्वीच्या मर्यादेपेक्षा ही वाढ मोठी असून यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
18:17 (IST) 6 May 2026

अखेर मिरा भाईंदर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी आफरीन हुसेन यांची निवड

विरोधकांची संख्या कमी असतानाही मिरा भाईंदर विकास आघाडीच्या माध्यमातून आफरीन हुसेन यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. ...वाचा सविस्तर
18:12 (IST) 6 May 2026

‘‘कोष्टी ही स्वतंत्र जात नव्हे तर व्यवसाय’’, जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाचे निरीक्षण

कोष्टी’ ही जात नसून विणकामाशी संबंधित व्यवसाय असल्याचे नमूद करत न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला आणि याचिकाकर्त्यांचा ‘हलबा’ अनुसूचित जमातीचा दावा वैध ठरवला. ...वाचा सविस्तर
18:07 (IST) 6 May 2026

पालघरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचे पडसाद ; उपसभापती नीलम गोऱ्हे आणि आमदार रोहित पवार यांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

पालघर जिल्ह्यातील कासा येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. ...सविस्तर बातमी
18:06 (IST) 6 May 2026

"पीडितेवर याआधीही अत्याचार, मोबाईलही चोरला होता", पर्वती पीडितेच्या पालकांनी मांडली आरोपीची सर्व गुन्हेगारी कुंडली

Pune Parvati Case : पुणे पर्वती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर यापूर्वीही अत्याचार केल्याचे पीडितेच्या आईने सांगितलं. ...अधिक वाचा
17:56 (IST) 6 May 2026

अमेरिकेच्या ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ला स्थगिती; सेन्सेक्सची मोठी उसळी

दिवसाच्या अखेरीस गुंतवणूकदारांनी लावलेल्या खरेदीच्या सपाट्याने सेन्सेक्स ९४०.७३ अंशांनी ( १.२२ टक्के) वधारला आणि ७७,९५८.५२ या पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, सेन्सेक्समध्ये १,००४.९९ अंशांची कमाई करत ७८,०२२.७८ या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. ...सविस्तर बातमी
17:49 (IST) 6 May 2026

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, शिवसेना नेते उदय सामंत यांचा विश्वास

नाशिक तसेच दिंडोरी लोकसभा मतदार संघाचा आढावा मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे, संपर्क नेते आ. सुहास कांदे आदी उपस्थित होते. ...वाचा सविस्तर
17:49 (IST) 6 May 2026

‘या’ विशेष रेल्वेगाड्या आता नियमित धावणार; विदर्भातील चार स्थानकांवर थांबा; हजारो प्रवाशांची सोय

विदर्भातील चार रेल्वेस्थानकांवर या गाड्यांचा थांबा राहणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. ...सविस्तर वाचा
17:31 (IST) 6 May 2026

पुणे शहरात पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुकीचे प्रकार वाढले, कर्वेनगर भागात ज्येष्ठाचे दागिने लांबविले

पोलीस असल्याची बतावणी करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत जवळचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला (क्रमांक -११२) माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...वाचा सविस्तर
17:01 (IST) 6 May 2026

LIVE: "पर्वती प्रकरणातील पीडितेवर नराधमाने पूर्वीही केला होता अत्याचार", पीडितेच्या आईची धक्कादायक माहिती

मुलीने सांगितलं की अंगावरचे कपडे काढले होते, नखं मारली होती. माझ्या स्वतःच्या बापानेच हे कृत्य केलं आहे. मी कपड्यांच्या दुकानात कामाला आहे. मी कामावरून घरी जाण्यापूर्वीच हे घडलं आहे. तो भाड्याच्या घरात राहतो, तिथेच हे घडलं आहे. त्याने पूर्वीही असं केलं होतं, पण मला असं सांगितलं नव्हतं. पहिल्यांदा कळलं नव्हतं, पण आता दुसऱ्यांदा घडलं तेव्हा कळलं - पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

16:56 (IST) 6 May 2026

निवृत्तीवेतन योजना अखेर जाहीर; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय: सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती अशी…

Pension Scheme : राज्य शासनाने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 'सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना' लागू करण्याची सविस्तर कार्यपद्धती एका शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. ...वाचा सविस्तर
16:32 (IST) 6 May 2026

हरवलेली नाती पुन्हा जुळली…. १४ वर्षांनी दमयंती नागपुरातील मनोरुग्णालयातून परतली, आपल्या माणसांत

नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात २०१४ पासून उपचार घेत असलेली दमयंती अनेक वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर होती. तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. ...सविस्तर वाचा
16:02 (IST) 6 May 2026

प्रकाश आवाडे यांनी लोकसभेसाठी थोपटले दंड; धैर्यशील माने यांच्याशी संघर्ष

लोकसभा निवडणूक होण्यास अद्याप तीन वर्षाचा अवधी असताना कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात आतापासूनच प्राथमिक हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. ...सविस्तर बातमी
15:37 (IST) 6 May 2026

धक्कादायक: नाचताना धक्का लागला अन् गळा चिरला! नागपुरात १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

जोहरान मुस्तफा शेख (१७) असे मृत मुलाचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी होता. कळमना पोलिसांकडून मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, जोहरान हा मंगळवारी रात्री नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी वाजपेयी नगरात अशरफी मस्जिद परिसरात आला होता. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 6 May 2026

बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही, वडिलांनी व्यक्त केली नाराजी

बदलापूरमध्ये दोन वर्षांपूर्वी एका शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यानंतर या मुलीच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च शासनाकडून केला जाईल आणि मुलीच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य केलं जाईल, असं आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं होतं. मात्र दोन वर्षात शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून फी सुद्धा शासनाने भरली नसल्याचं पीडित चिमुकलीच्या वडिलांनी सांगितलंय. याबाबत त्यांनी शासनावर नाराजीही व्यक्त केलीय.

पीडित चिमुकली ही आता दुसऱ्या एका खासगी शाळेत शिकत असून यावर्षी ती पहिलीला जाणार आहे. तिची मागच्या वर्षीची फी मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी भरली होती. तर आता पहिलीची फी भरण्यासाठी शाळेकडून विचारणा झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्हाला अद्याप शासनाकडून याबाबत ऑर्डरच आलेली नसल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीये. त्यामुळे शासनाच्या लालफितीच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केलीये. आता तरी शासन याबाबत गांभीर्याने निर्णय घेतं का? हे पाहावं लागणार आहे.

15:26 (IST) 6 May 2026

Video : अमरावतीत बनावट साबण, डिटर्जंटचे दोन कारखाने; पोलिसांची कारवाई, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सर्वाधिक खप असलेल्या ब्रँडचे हुबेहुब पॅकिंग तयार करून त्यात बनावट डिटर्जंट पावडर मिसळण्याचे आणि साबण बनविण्याचे काम दोन कारखान्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. ...अधिक वाचा
15:16 (IST) 6 May 2026

६० वर्षीय वृद्धाची चिमुकलीवर वाईट नजर; आई-वडील मजुरीवर जाताच नराधमाने केले गैरकृत्य

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात एका ६० वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. ...वाचा सविस्तर
15:09 (IST) 6 May 2026

शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा सक्तीची; राज्यात पुन्हा मराठी हिंदी वादाला सुरुवात

Govt Hindi Exam Controversy: मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला असून, 'मराठीच्या राज्यात हिंदीची सक्ती का?' असा सवाल उपस्थित केला आहे. ...अधिक वाचा
15:06 (IST) 6 May 2026

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनावर ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश; न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण संचालकांचे विभागीय अधिकाऱ्यांना पत्र….

शासनाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेल्या निर्णयानुसार सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी संचमान्यता निश्चित केली होती. त्यानुसार विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक पदांची फेरमांडणी करण्यात आली. ...सविस्तर वाचा
14:51 (IST) 6 May 2026

नसरापूर प्रकरण! चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबला, छातीवर बुक्की मारली; वैद्यकीय अहवालातून काय समोर आलं?

नसरापूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पीडितेच्या मृत्यूबाबत ससून रुग्णालयाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. आरोपीने चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. आरोपीने चिमूरडीचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचेही वैद्यकीय अहवालात समोर आले आहे.

14:19 (IST) 6 May 2026

आनंदवार्ता ! नाशिक जिल्ह्यातील या रुग्णालयात आता ‘डायलिसीस’ सुविधा मोफत, किडनी विकारांनी त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा

किडनीच्या विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांचा विकार अधिक बळावला की, त्यांना डायलिसीसशिवाय पर्याय नसतो. कोणत्याही खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसीस सुविधा अधिक खर्चिक असते. ...सविस्तर वाचा