Maharashtra News Updates : रशिया-युक्रेन किंवा आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला तेल, पेट्रोल आणि डिझेल ‘काटकसरीचा डोस’ जनतेच्या पचनी पडताना दिसत नाहीये. हे आवाहन म्हणजे आगामी काळात होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या संभाव्य दरवाढीची पूर्वसूचना तर नाही ना? असा प्रश्न विचारत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र शब्दांत टीका केली. पंतप्रधानांनी देशाला आर्थिक शिस्त लावण्याचे आवाहन केले असले तरी, विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनशैलीवर आणि पक्षाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने या विषयावर नवीन राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी काल तब्बल 6 तास एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हभप संग्रामबापू भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी शाई फेक केली. जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रातील ठळक घडामोडी, गुन्हे, पर्यटन, कला – क्रीडा – संस्कृती- हवामान यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Today’s Live News Updates, 11 May 2026 :  महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत...

20:13 (IST) 11 May 2026

देशभरात जुलैपासून ‘ जी राम जी ’ ची सुरूवात, मनरेगा कायदा रद्द होणार

विकसित भारत - जी राम जी ची कायद्याची अंमलबजावणी देशभरात एक जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने आज, ११ मे रोजी अधिसूचना जारी केली आहे. ...सविस्तर बातमी
19:56 (IST) 11 May 2026

अवघ्या चार दिवसातच म्हसळा नगराध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे आणि शिवसेना पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे हा निर्णय घेतल्याचे समोर येत असून, यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...सविस्तर बातमी
19:56 (IST) 11 May 2026

‘धर्मांतर केलेल्यांना आदिवासी आरक्षणाचा लाभ नको’; हालेवारा ग्रामसभेची शासनाकडे थेट मागणी…

ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या आदिवासींची जनगणनेत स्वतंत्र नोंद करावी आणि त्यांना मिळणारे अनुसूचित जमातींचे (ST) आरक्षण व शासकीय लाभ तात्काळ बंद करावेत, अशी मागणी ग्रामसभेने राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...वाचा सविस्तर
19:52 (IST) 11 May 2026

अजित पवार यांच्या अपघाताबाबत काहीतरी दडविल्याचा संशय, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांचा गंभीर आरोप

सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रकरणात विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. योग्य वेळी जनता या सर्वाचा जाब विचारेल असेही शशिकांत शिंदे म्हणाले. ...अधिक वाचा
19:45 (IST) 11 May 2026

शिक्षकांच्या बीएलओ ड्युटीवरून विरोधक संतापले- शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका करण्याची ठाकरेंच्या नगरसेवकाची मागणी

या अतिरिक्त कामाच्या बोजामुळे शिक्षकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांवर कारवाईचा दबाव टाकला जात आहे. ...अधिक वाचा
19:33 (IST) 11 May 2026

खाद्यतेलाच्या दराचा भडका उडणार ? सविस्तर वाचा, दरवाढ का होणार...

युद्धानंतर आजपर्यंत किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर सरासरी दहा ते पंधरा रुपये प्रती किलोने वाढले आहेत. केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप न केल्यास आणखी प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
19:22 (IST) 11 May 2026

‘आयपीएल’मध्ये युवकांचे वर्चस्व, मुंबई इंडियन्सकडून ‘पूर्वपुण्याई’लाच महत्त्व! निराशाजनक हंगामाची कारणे कोणती?

सहापैकी चार हंगामांत मुंबईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. असे असले तरी मुंबईचे व्यवस्थापन संघात मोठे बदल करण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र आहे. ...अधिक वाचा
19:21 (IST) 11 May 2026

आरटी-पीसीआर, मॉलिक्युलर बायोलॉजीचे मुंबई विद्यापीठात भरणार वर्ग

१८ ते ३० मे दरम्यान कलिना संकुलात हे प्रशिक्षण दिले जाणार असून, याद्वारे विद्यार्थ्यांची उद्योगसिद्धता आणि रोजगारक्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. ...वाचा सविस्तर
19:17 (IST) 11 May 2026

विदर्भ भाजतोय! अकोला ४५ अंशांवर; आता तापमान ४६ अंश सेल्सिअस पार जाणार?

हवामान विभागाने पुढील चार दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, काही जिल्ह्यांत तापमान ४६ अंशांचा टप्पा ओलांडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
19:09 (IST) 11 May 2026

डोंबिवलीतील तरुणाचा इरशाळगडावर ट्रेकिंग दरम्यान मृत्यू…….

ट्रेक सुरू असताना अचानक अस्वस्थ वाटून तो बेशुद्ध पडला होता. उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ...सविस्तर बातमी
18:35 (IST) 11 May 2026

आता झोपु प्राधिकरण तुमच्या दारी पात्रता, थकीत घरभाडे वा इतर कोणत्याही तक्रारीचे निवारण होणार मुंबईत भरणार समस्या निराकरण शिबिर 

प्राधिकरणाने आता 'झोपु आपल्या दारी' ही संकल्पना राबवत संपूर्ण मुंबईत समस्या निवारण शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
18:23 (IST) 11 May 2026

शेगावला येताय? मग ‘हा’ नियम पाळाच! मंदिराच्या प्रवेशद्वारावरच…

भाविकांसाठी गजानन महाराज संस्थानमार्फत सर्व त्या सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यांचबरोबर भाविकांनी संस्थांनाच्या शिस्तीचे, नियमांचे पालन करणे अपेक्षित असते. ...अधिक वाचा
18:17 (IST) 11 May 2026

बंदी नसलेल्या गाण्याच्या तालावर नाचणे गुन्हा नव्हे, कृष्णार येथील घटनेवरून ग्रामसभेची संतप्त प्रतिक्रिया; गुन्हे मागे घेण्याची मागणी…

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कृष्णार येथे एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात डीजेवर हमारे हक की जंग है हिडमा हे गीत वाजवण्यात आले आणि त्यावर काही तरुणांनी नृत्य केले. ...सविस्तर वाचा
18:14 (IST) 11 May 2026

अहिल्यानगरमध्ये 'ट्रॅव्हल जिहाद' विरोधात सकल हिंदू समाजाचे रास्तारोको

हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या वाहकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार जगताप यांनी घेतली. ...वाचा सविस्तर
18:05 (IST) 11 May 2026

टिटवाळा बल्याणी भागातील बेकायदा चाळींची; जमीन चकमकफेम पोलीस अधिकाऱ्याची?

वादाच्या भीतीने या अधिकाऱ्याने जमीन पडिक ठेवली होती, मात्र याचाच फायदा घेत भूमाफियांनी तिथे घरे बांधून सामान्यांची फसवणूक सुरू केली आहे. ...वाचा सविस्तर
18:00 (IST) 11 May 2026

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एअर इंडियाच्या केबिनचे कौतुक; विमानातील अनुभव 'नवीन गाडी घेतल्यासारखा'

क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरने एअर इंडियाच्या नूतनीकरण केलेल्या विमानांचे "नवीन गाडी चालवल्यासारखा अनुभव" दिल्याबद्दल कौतुक केले आहे. ...सविस्तर वाचा
17:47 (IST) 11 May 2026

नवी मुंबई, नोएडा विमानतळांवर वापर शुल्क अधिक; इंडिगो, एअर इंडियाचे 'एरा'ला निवेदन

विमानतळांचे दर निश्चित करणारी नियामक संस्था भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (एरा) या दोन नवीन विमानतळांनी त्यांच्या पहिल्या पाच वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या दरांचा आढावा घेत आहे. ...सविस्तर बातमी
17:40 (IST) 11 May 2026

शहापूरच्या जि. प. शाळेतील जीत पाटीलची ठाणे जिल्ह्यातून बंगळुरच्या राष्ट्रीय मिलिटरी शाळेत निवड

जीत पाटील हा ठाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. ...वाचा सविस्तर
17:37 (IST) 11 May 2026

Heat Wave Conditions : राज्यात पुन्हा उष्णतेच्या लाटसदृशय स्थिती; 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रभाव

राज्यात एप्रिल महिन्यात विदर्भात अनेक दिवस उष्णतेची लाटसदृश्य स्थिती कायम होती. या दरम्यान तापमानाचा पारा ४५ ते ४६ अंशांवर पोहोचला होता. ...सविस्तर वाचा
17:34 (IST) 11 May 2026

शहरात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; ज्येष्ठाकडील अडीच लाखांचे दागिने चोरुन चोरटे पसार

पुण्यात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाला आहे. वारजे येथील डुक्करखिंड परिसरात एका ६३ वर्षीय ज्येष्ठाचे अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी हातचलाखीने लांबवले. ...वाचा सविस्तर
17:34 (IST) 11 May 2026

गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून जनता प्रवास करेल, आव्हाड यांची पंतप्रधानांवर खरमरीत टीका

ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ...सविस्तर बातमी
17:34 (IST) 11 May 2026

Matrimonial Fraud Pune : पुण्यात लग्नाचे आमिष दाखवून महिलेची २१ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच पिशवीत भरून दिल्या 'खेळण्यातील नोटा'!

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख करून लग्नाचे आमिष दाखवत एका भामट्याने महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक केली. ...सविस्तर बातमी
17:31 (IST) 11 May 2026

हा कसला 'त्याग' आहे ? जनतेने फक्त महागाई सोसायची आणि तुम्ही मात्र सरकारी पैशावर इव्हेंटबाजी करायची ? सपकाळ यांची टीका

महाराष्ट्र कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनावर भाष्य करत जोरदार टीका केली आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे… आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फक्त इव्हेंटबाजी, फोटोशूट आणि प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत! निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची अक्षरशः राख केली आणि आता जनतेलाच उपदेश देत आहेत, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी (X) वर पोस्ट करत दिली.

काल भाषणात जनतेला "डिझेल-पेट्रोल वाचवा, त्याग करा" म्हणून शहाणपण शिकवलं आणि आज स्वतःच्या रॅलीसाठी हजारो लिटर इंधन फुंकून आणि कोट्यवधींची उधळपट्टी करून मिरवताहेत ? हा कसला 'त्याग' आहे ? जनतेने फक्त महागाई सोसायची आणि तुम्ही मात्र सरकारी पैशावर इव्हेंटबाजी करायची ? अशा शब्दात सपकाळ यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

17:22 (IST) 11 May 2026

धोकादायक पूल, जुन्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करा !मान्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व धोकादायक इमारती, जुने पूल आणि साकवांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. ...वाचा सविस्तर
17:22 (IST) 11 May 2026

सर, आईला भेटून येऊ का पटकन? विमानतळावर तरुणाची सीआयएसएफ अधिकाऱ्याला विनवणी, खाकी वर्दीतली माणूसकी

एका सीआयएसएफ (CISF) अधिकाऱ्याने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे माय-लेकाची शेवटची भेट झाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे डोळे ओले करत आहे. ...वाचा सविस्तर
17:18 (IST) 11 May 2026

शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित अधिसूचनेची परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होळी; आराखड्यात बदल करण्याऐवजी...

शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने महामार्गाच्या आराखड्यात मोठे फेरबदल करत गेल्या आठवड्यात शासनाने शक्तीपीठ महामार्गाची सुधारित अधिसूचना काढली. ...सविस्तर बातमी
17:01 (IST) 11 May 2026

लोक अदालतीतून २८ हजार वीज ग्राहकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, ९ कोटीचा भरणा

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित आणि वीजचोरीची सुमारे २८ हजार ४८८ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली असून, ग्राहकांनी ९ कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. ...सविस्तर वाचा
16:48 (IST) 11 May 2026

पापड, लोणचे, कुरडया मिळणार महापालिकेच्या विभाग कार्यालयात

मुंबई महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांत ११ आणि १२ मे रोजी महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
16:47 (IST) 11 May 2026

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरण- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

सह्याद्री अतिथीगृह येथे ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. ...अधिक वाचा
16:46 (IST) 11 May 2026

घरतांना डच्चू, निकमांकडे धुरा; ठाकरे शिवसेनेचे पनवेलचे नवे शिलेदार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षांतर्गत समन्वय साधण्यासाठी 'मातोश्री'ने हे पाऊल उचलले असून, यामुळे पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. ...सविस्तर वाचा

 

Maharashtra Breaking Live News Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स (संग्रहित छायाचित्र)