Mumbai Maharashtra News Updates, 09 April 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे न होता काँग्रेसने आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असून काँग्रेसने उमेदवार माघारी घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे अशोक खरात आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडेच्या लैंगिक शोषणाच्या घटना ताज्या असतानाच नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत तसाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या घटना घडल्या आहेत. यासह ताज्या घडामोडी आपण जाणून घेऊया…

Live Updates

Maharashtra Live News Updates, 09 April 2026 : येथे वाचा महाराष्ट्रातील सर्वा ताज्या घडामोडी...

20:01 (IST) 9 Apr 2026

स्वच्छतेसाठी वॉर रुम; पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे निर्देश

मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी घनकचरा विभागाची आढावा बैठक घेऊन मध्यवर्ती वॉर रुम स्थापन करण्याचे महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
19:54 (IST) 9 Apr 2026

मुंबईत पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट वातावरण; उकाडाही वाढणार

वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना घामाच्या धारांचा त्रास सहन करावा लागणार असून हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. ...वाचा सविस्तर
19:24 (IST) 9 Apr 2026

FYJC Admission 2026: अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू… राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी

राज्यातील अकरावी प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू होत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने अर्जाचा भाग १ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, दहावीच्या निकालानंतर भाग २ भरता येणार आहे. ...वाचा सविस्तर
19:23 (IST) 9 Apr 2026

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला १० एप्रिलपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ भरता येणार आहे तर दहावीच्या निकालानंतर भाग २ उपलब्ध होईल. ...वाचा सविस्तर
19:14 (IST) 9 Apr 2026

महाराष्ट्र मोटार वाहन करात दुरूस्ती; जुन्या वाहनांसाठी नव्या दरांची घोषणा

राज्यातील वायूप्रदूषण रोखण्यासाठी सरकारने मोटार वाहन करात मोठी दुरुस्ती केली असून १५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांवरील पर्यावरण कर आता थेट दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
19:10 (IST) 9 Apr 2026

सांगली : मयतविधी म्हणून पोळ्या वाटल्या, आणि बारा दिवसांनी खूनाला वाचा फुटली; पत्नी व दोन मुलांसह प्रियकराला अटक

सांगलीच्या करोली टी येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, मुलांच्या मदतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकून १२ व्या दिवशी 'पोळ्या'ही वाटण्यात आल्या, मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला ...सविस्तर वाचा
19:03 (IST) 9 Apr 2026

वाहने कशी चालवावीत आणि रस्ता कसा ओलांडावा? विकसित नागरिकांकडून बोध घ्या! उच्च न्यायालयाने नागरिकांना "हा" सल्ला देण्याचे कारण काय?

परदेशात नियम पाळणारे भारतीय मायदेशात वाहतुकीचे नियम का धाब्यावर बसवतात? असा परखड सवाल करत उच्च न्यायालयाने नागरिकांना विकसित देशांकडून बोध घेण्याचा सल्ला दिला आहे. ...अधिक वाचा
19:02 (IST) 9 Apr 2026

छत्रपती संभाजीनगर: पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारून खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

छत्रपती संभाजीनगरमधील राहुलनगर भागात पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारून हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ५ जून २०२२ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत न्यायालयाने १० साक्षीदारांच्या आधारे मच्छिंद्र पिटेकरला दोषी धरले. ...सविस्तर वाचा
18:55 (IST) 9 Apr 2026

Summer Special Trains 2026 : कोकणात जाणाऱ्यांना दिलासा… धावणार चार वातानुकूलित विशेष रेल्वे… कधी आणि नेमक्या कुठून सुटणार वाचा…

या विशेष एसी ट्रेनमुळे रत्नागिरी, चिपळूण आणि कणकवलीच्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि थंडगार होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली. ...वाचा सविस्तर
18:44 (IST) 9 Apr 2026

विद्यार्थ्यांसाठी खूषखबर… मेट्रो ३ मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘ही’ सवलत...

एमएमआरसीने विद्यार्थ्यांसह अपंग प्रवाशांना तिकीट दरात दिलासा दिला असून मेट्रो कनेक्ट ३ ॲपच्या माध्यमातून आता २८० रुपयांत दिवसभर अमर्याद मेट्रो प्रवास करता येणार आहे. ...अधिक वाचा
18:39 (IST) 9 Apr 2026

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा : नांदेड परिक्षेत्राचा श्वान 'टायसन' ची सुवर्ण कामगिरी

नागपूर येथे पार पडलेल्या ६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात नांदेड परिक्षेत्राच्या 'टायसन' या श्वानाने 'आज्ञाधारकता' प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. परभणी पोलीस दलात कार्यरत असलेल्या टायसनने देशपातळीवर चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. ...अधिक वाचा
18:33 (IST) 9 Apr 2026

आंबा घाटात चालकाला अडवून दरोडा; पाच जण जेरबंद, तिघांचा शोध सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट परिसरात बोलेरो चालकाला अडवून २५ हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा देवरूख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून फरार तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत ...अधिक वाचा
18:29 (IST) 9 Apr 2026

ठाण्यात पहिल्यांदाच भरणार ‘सेंद्रीय प्रदर्शन’; सेंद्रीय अन्न-धान्य, देशी खाद्यपदार्थांचे प्रकार, आरोग्यदायी उत्पादनांचा समावेश…

ठाणे शहरात पहिल्यांदाच आयोजित ‘ठाणे सेंद्रीय प्रदर्शन’ मध्ये विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेले सकस अन्नधान्य, आरोग्यदायी उत्पादने आणि अस्सल देशी खाद्यपदार्थांचा खजिना नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. ...सविस्तर वाचा
17:35 (IST) 9 Apr 2026
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; अदिती तटकरेंनी पोस्ट करत मानले आभार

"बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून आपल्या पक्षाचा उमेदवार मागे घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या पश्चात बारामतीकरांच्या मनात असलेला भावनांचा कल्लोळ समजून घेत काँग्रेस पक्षाने ही समंजस भूमिका घेतल्याबद्दल पक्षाच्या राज्य नेतृत्वाचे, केंद्रीय नेतृत्वाचे मनापासून आभार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रीमती सुनेत्राकाकी पवार व बारामतीकरांचे असलेले मायेचे नाते यापुढील काळात अधिक दृढ होईल हा मला विश्वास आहे." अशी पोस्ट मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.

17:13 (IST) 9 Apr 2026

जिल्हा रुग्णालयाच्या समस्या आरोग्यमंत्र्यांच्या दारात; सिटीस्कॅन ठप्प, औषधांचाही तुटवडा असल्याची मनसेची तक्रार

कॅम्प ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असूनही, येथे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. काही दिवसांपूर्वी येथील सिटीस्कॅन यंत्रणा ठप्प असल्याची बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली होती. ...वाचा सविस्तर
17:09 (IST) 9 Apr 2026
करुणा मुंडे बारामती पोटनिवडणूक लढण्यावर ठाम; माघार न घेण्याबाबत म्हणाल्या...

महाराष्ट्रात लोकशाही उरलेली नाही. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाने या निवडणुकीत माघार घेणे ही लज्जास्पद गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे आपल्या मनाप्रमाणे महाराष्ट्र चालवणार असतील, तर ते मी होऊ देणार नाही. मी देखील माघार घेण्याचा विचार करत होते; मात्र एक पोस्ट पाहिली. त्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांचा फोटो होता. त्यात धनंजय मुंडे यांनी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून माघार घ्यायला लावल्याचे म्हटले होते. ही माहिती ऐकून आणि पोस्ट पाहून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला. माझी दुसरी मागणी म्हणजे दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत एफआयआर दाखल व्हावी. ती झाली असती, तर मी नक्कीच माघार घेतली असती. बारामतीत दिवंगत अजित पवार यांना न्याय मिळत नसेल, तर महाराष्ट्रात राहण्याचा अधिकारच नाही, असे मला वाटते.

16:18 (IST) 9 Apr 2026

बेस्टच्या वातानुकूलित बसमध्ये प्रवाशांची घुसमट…; प्रवाशांच्या त्रासात भर, चालक-वाहकासोबत वाद

बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाली असून त्यातच कडक उन्हाचे चटके सोसत बसची वाट पहात ताटकळणाऱ्या मुंबईकरांना वातानुकूलित बसमध्ये चढल्यानंतरही गारेगाव प्रवास दुरापास्त होत आहे. ...सविस्तर वाचा
16:12 (IST) 9 Apr 2026

नदीची श्वास कोंडला! टिटवाळ्यात भूमाफियांची सीआरझेड क्षेत्रात बेकायदा चाळींची बांधकामे

टिटवाळा मांडा परिसरात ९० फुटी रस्त्यालगतच्या नदी किनारच्या सागरी किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे टिटवाळा, मांडा भागातून पावसाळ्यात नदीत वाहून जाणारे पाणी अडून राहण्याची शक्यता आहे. ...अधिक वाचा
15:55 (IST) 9 Apr 2026

कोकणातील कातळशिल्पांवर तयार होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट

रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. ...अधिक वाचा
15:47 (IST) 9 Apr 2026

कल्याण डोंबिवली पालिकेचा टँकर लाॅबीवर वर्षाला ११ कोटी खर्च; टँकर लाॅबीवर नियंत्रणाची नगरसेवकांची मागणी

पाण्याच्या टँकरवर पालिका दरवर्षी ११ कोटीहून अधिक खर्च करते. मग, हे पाणी जाते कोठे, असे प्रश्न करून सर्व पक्षीय नगरसेवकांनी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे लेखा परिक्षण करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली. ...वाचा सविस्तर
15:41 (IST) 9 Apr 2026

ठाणे जिल्ह्यात १५ ठिकाणी आधुनिक ‘प्रवासी निवारे’; एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा

ठाणे, मानपाडा, भिवंडी, शहापूर, मुरबाड यांसारख्या महत्वाच्या एसटीच्या मार्गावर हे अत्याधुनिक प्रवासी निवारे उभारण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
14:33 (IST) 9 Apr 2026

कळमनुरीत दोन मालमोटरीमध्ये भीषण धडक; बिहारच्या दोघांचा जागीच मृत्यू

या अपघातात बिहार राज्यातील दरभंगा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...सविस्तर बातमी
14:23 (IST) 9 Apr 2026

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार! हर्षवर्धन सपकाळांनी दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेस पक्षाने माघार घेतली आहे. येते राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी केली होती. यानंतर सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष माघार घेत असल्याचे जाहीर केले.

14:18 (IST) 9 Apr 2026

नवली उड्डाणपुलावर भीषण अपघात, शतपावली करणाऱ्या महिलेचा मृत्यू

उड्डाणपुलावर पथदिवे नसल्याने असलेल्या अंधाराचा हा बळी असल्याची भावना व्यक्त करत, संतप्त स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली आहे. ...अधिक वाचा
13:56 (IST) 9 Apr 2026

पार्थ पवारांनी घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ! सुनेत्रा पवारांनी पोस्ट करत दिल्या शुभेच्छा

"राष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली. जनतेच्या विश्वासाचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या माध्यमातून तरुण नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त करते. लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, अशी खात्री आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!" अशी पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे.


13:53 (IST) 9 Apr 2026

शिक्षकांना पूर्णवेळ निवडणुकीच्या कामाची सक्ती, परीक्षेमुळे शिक्षकांकडून काम करण्यास नकार

मतदारयादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मुंबई महानगरपाालिका प्रशासनाने २ हजार २७५ शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती केली आहे. ...सविस्तर बातमी
13:52 (IST) 9 Apr 2026

टोईंग बंद, कोंडी प्रचंड! कल्याण-डोंबिवलीत रस्तोरस्ती बेशिस्त पार्किंगचा धुमाकूळ; निविदेच्या चक्रात अडकली वाहतूक व्यवस्था

डोंबिवली, कल्याणमधील टोईंग व्हॅन मागील तीन महिन्यापासून बंद आहेत. याची जाणीव असल्याने अनेक दुचाकी स्वार, मोटार वाहन मालक शहरातील मुख्य बाजारपेठा, चौकांमध्ये आपली वाहने उभी करून ठेवत आहेत. ...सविस्तर वाचा
13:47 (IST) 9 Apr 2026

अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेला 'तो' चिमुकला सुखरूप घरी परतला

तब्बल १० दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, मुख्यमंत्री सहायता निधी आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीमुळे या चिमुकल्याला नवे आयुष्य मिळाले आहे. ...सविस्तर बातमी
13:32 (IST) 9 Apr 2026

तरुणाईत वाढते वंध्यत्व; प्रत्येक ६ पैकी १ जोडपे अपत्यासाठी झगडते

भारतात तरुणांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, ही समस्या आता केवळ वैयक्तिक न राहता सार्वजनिक आरोग्याच्या मोठ्या संकटात परिवर्तित होत असल्याचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अहवालांतून स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर वाचा
13:31 (IST) 9 Apr 2026

व्हर्टिगोचे रुग्ण वाढत आहेत मात्र निदान प्रक्रियेत मोठी दरी! कशी घ्याल काळजी…

देशभरात, विशेषतः कर्नाटक राज्यात व्हर्टिगो अर्थात भोवळ किंवा गरगरण्याच्या समस्येने ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे समोर आले आहे. ...वाचा सविस्तर