Mumbai Breaking News : महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात अनेक नेत्यांच्या सभा आणि दौरे सुरू आहेत. यातच मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजपा आणि शिंदे सेनेमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना भाजपाचे नेते गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एक महिला कर्मचारी संतप्त झाली. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Live Updates

Maharashtra Marathi News : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

18:28 (IST) 27 Jan 2026

गायिका अंजली भारतींचं अमृता फडणवीसांबाबत निंदनीय विधान; संजय राऊत म्हणतात, “अमृताजी…”

Anjali Bharti Statement on Amruta Fadnavis: गेल्या काही महिन्यांत राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घसरल्याची तक्रार सामान्य मतदार अनेकदा करताना दिसतात. वेळोवेळी सत्ताधारी व विरोधी पक्षातली काही नेतेमंडळी ही तक्रार योग्य असल्याचंच सिद्ध करणारी विधानं करताना दिसतात. पण दुसरीकडे इतर समाजघटकांकडूनदेखील आता टीका करताना पातळी सोडली जात असल्याचं वास्तव समोर येऊ लागलं आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे भीमगीते गाणाऱ्या गायिका अंजली भारती. अंजली भारतीचा यासंदर्भातला भंडाऱ्यातल्या भीम मेळाव्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.

सविस्तर वाचा

18:04 (IST) 27 Jan 2026

मिरा-भाईंदरमधील 'त्या' उड्डाणपुलाच्या निर्मितीत कोणतीही चूक नाही, एमएमआरडीएचे स्पष्टीकरण

उड्डाणपूल सुरू करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांचे मार्गदर्शन घेऊन आणखी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...सविस्तर बातमी
17:55 (IST) 27 Jan 2026

सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक; दोन सराईत आरोपीना अटक

बोईसर : सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करीत दागिने लांबवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत चोरांना बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.

बोईसर मधील हंसीदेवी कुंदनसिंह रोतेला ही महिला १३ जानेवारी रोजी भाजी बाजारातून भाजी खरेदी करून परतत असताना आयसीआयसीआय बँकेजवळ दोन अनोळखी इसमांनी तिच्याशी ओळख निर्माण केली. आपण सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी करीत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून साडे तीन लाख रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच महिलेने याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धीरज उर्फ पापा राजाराम राठोड आणि दिनेश सोलंकी या दोन सराईत चोरांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या विरोधात मुंबई परिसरात चोरीचे आणखी चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

17:49 (IST) 27 Jan 2026

Pimpri Chinchwad: ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मानावरून दोन गटात राडा, उपसरपंच महिलेच्या पतीसह १५ जणांविरोधात गुन्हा

मपंचायत सदस्य असलेल्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
17:37 (IST) 27 Jan 2026

सिन्नर मधील शाळांमध्ये आता सीसीटीव्ही आणि तक्रारपेटी अनिवार्य, मुख्यध्यापकांना कडक सुचना

सिन्नर येथे तालुक्यातील मुख्याध्यापकांची विशेष सहविचार सभा पार पडली. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. ...सविस्तर वाचा
16:51 (IST) 27 Jan 2026

जेएनपीए सेझमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; आयात- निर्यातीमध्येही भरघोस वाढ

जेएनपीए सेझ प्रकल्पात २०२५ मध्ये एकूण २० हजार ६९३ टीईयू कंटेनर आयात निर्यात कंटेनरची हाताळणी झाली आहे. २०२४ मध्ये १६ हजार ३१२ टीईयूची हाताळणी झाली आहे. यामध्ये सुमारे २६.८६ वाढ झाली आहे. ...अधिक वाचा
16:39 (IST) 27 Jan 2026

'महिलांविरोधातील वक्तव्यांना...', अंजली भारती यांच्या वक्तव्यावरून नवनीत राणांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत गायिका अंजली भारती यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गायिका अंजली भारती यांच्या वक्तव्याचा नवनीत राणा यांनी निषेध व्यक्त केला. 'महिलांविरोधातील अशा वक्तव्यांना थारा देता कामा नये', असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

16:26 (IST) 27 Jan 2026

मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय वाचा!

मुंबईला नवी मुंबईशी जोडण्याकरता मेट्रो ८ ला मान्यता देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच, समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामास गती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

16:26 (IST) 27 Jan 2026

घोडागाडीच्या अपघातात तरुणी गंभीररित्या जखमी, केळवे समुद्रकिनाऱ्यावरील प्रकार, मुंबईत खाजगी उपचार सुरू

केळवा सागरी पोलिसांनी समुद्रकिनारी असणारे घोडागाडी, उंट सफर, बीच बाईक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
15:46 (IST) 27 Jan 2026

Nashik Art Competition: गोदाकाठी चित्रकलेचा कुंभमेळा ! नाशिक कलानिकेतनचा पुढाकार, इतक्या विद्यार्थ्यांचा सहभाग

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, वसई, डहाणू, पालघर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथील २१४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. ...अधिक वाचा
15:38 (IST) 27 Jan 2026

फलाटावर सापडलेली ‘शिवानी’; आई-वडिलांचा शोध सुरू

२४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास प्रवाशांच्या नजरेस ही बालिका पडली. एकटी, गोंधळलेली आणि रडवेली अशा अवस्थेत तिला स्थानकातील पुरुष गार्डच्या ताब्यात देण्यात आले. ...सविस्तर बातमी
15:26 (IST) 27 Jan 2026

Mira-Bhayandar News :मिरा रोड येथे नव्या सिमेंट रस्त्याची तोडफोड, निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी प्रशासनाची कारवाई

प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते उभारत असले तरी कामाची गुणवत्ता अपेक्षेप्रमाणे नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ...सविस्तर वाचा
15:04 (IST) 27 Jan 2026

बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप, बँकिंग सेवा विस्कळीत

"सरकारी धोरणांचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांसाठी आज देशातील लाखो बँक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा आठवडा पाच दिवसाचा करण्यात यावा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण थांबवावे, रिक्त पदे तातडीने भरावीत आणि वेतन करारात सुधारणा करावी, या मुख्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे आज चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणे आणि नवीन खाते उघडणे यांसारख्या सेवांवर मोठा परिणाम झाला आहे", अशी माहिती एका बँक कर्मचाऱ्याने दिली आहे.

14:35 (IST) 27 Jan 2026

Girish Mahajan : '…तर राजीनाम्याची मागणी का?', नाशिकच्या घटनेवरून गिरीश महाजनांचं पुन्हा स्पष्टीकरण

गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. एखादा शब्द राहून गेल्यावर राजीनाम्याची मागणी कशासाठी? असं म्हटलं आहे. ...सविस्तर वाचा
14:26 (IST) 27 Jan 2026

ॲड.आंबेडकर, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी, भाजपच्या ‘शहर सुधार’कडे बहुमत

अकोला महापालिकेत भाजपच्या पुढाकारातून ४४ नगरसेवकांची ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन झाली. शरद पवार गटाच्या निर्णायक भूमिकेमुळे काँग्रेस व ॲड. आंबेडकरांच्या सत्तास्थापनाच्या स्वप्नांवर पाणी फिरले. ...सविस्तर वाचा
14:15 (IST) 27 Jan 2026

कल्याणमधील ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांचा नाशिक, इगतपुरी, सिन्नर परिसरात शोध

ठाकरे गटाचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी पळवून नेलेले नगरसेवक आपले नगरसेवक पद रद्द होईल या भीतीने परत आपल्या ठाकरे गटात परतीसाठी खूप इच्छुक असल्याची माहिती ठाण्यातील एका विश्वसनीय सुत्राने कल्याणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. ...सविस्तर बातमी
14:00 (IST) 27 Jan 2026

भंडाऱ्यात सैराट ! आंतरजातीय विवाहातून तरुणाची हत्या; सासू आणि साळ्यासह तीन जणांना अटक

भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून सासू व साळ्याने कट रचत तरुणाची निर्घृण हत्या केली. सैराट चित्रपटाची आठवण करून देणाऱ्या या घटनेत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
14:00 (IST) 27 Jan 2026

Maharashtra Weather Update : येत्या २४ तासांत मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबई परिसरात हवामानात लक्षणीय बदल

मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबई परिसरात पुढील २४ तासांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरणासह काही भागांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...वाचा सविस्तर
13:58 (IST) 27 Jan 2026

मिरा-भाईंदरमध्ये विरोधकांची 'शहर विकास आघाडी' २०२९ च्या विधानसभेची तयारी

मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केली असून, भाजपला आव्हान देत २०२९ विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. ...सविस्तर वाचा
13:55 (IST) 27 Jan 2026

Buldhana crime update : वाडी येथे दरोडा, प्रतिकार करणारे बाप लेक, गंभीर जखमी

खामगावजवळील वाडी परिसरात चार सशस्त्र दरोडेखोरांनी घरफोडीचा प्रयत्न करत प्रतिकार करणाऱ्या बाप-लेकावर चाकूने १२ ते १४ वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ...सविस्तर वाचा
13:50 (IST) 27 Jan 2026

Gold Silver Price: सोने, चांदीच्या दरात आणखी मोठा उलटफेर… जळगावमध्ये ग्राहक चक्रावले!

चांदीच्या किमतींमध्ये झालेली ही घसरण बाजाराच्या दृष्टीने आरोग्यदायी मानली जात असून, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी ठरू शकते. ...वाचा सविस्तर
13:31 (IST) 27 Jan 2026

Nandurbar: २१ कोटींची शासकीय माॅडेल डिग्री काॅलेजची इमारत धूळ खात… नंदुरबारमध्ये तीन वर्षांपासून वापराविना पडून !

मुळातच देशासह राज्यातील बड्या नेत्याच्या हस्तेच उदघाटनाच्या हट्टामुळेच उच्च व शिक्षण विभागाने ही इमारत अद्यापही हस्तातरीत केली नसल्याची चर्चा आहे. ...अधिक वाचा
13:09 (IST) 27 Jan 2026

Girish Mahajan: गिरीश महाजन यांच्या विरोधात ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा….ॲड. प्रकाश आंबेडकर मैदानात !

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हा विषय उचलून धरला आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यापुढील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
12:44 (IST) 27 Jan 2026

‘महारेरा’मध्ये कधीही तक्रार दाखल करण्याची मुभा!‘महारेरात तक्रार दाखल करण्यासाठी कालमर्यादा नाही!’, अपिलीय न्यायाधिकरणाची स्पष्टोक्ती

भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तक्रार दाखल करता येत नाही, हा महारेरा प्राधिकरणाचा दावाही उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत न्यायाधिकरणाने दूर केला आहे. ...सविस्तर वाचा
12:25 (IST) 27 Jan 2026

"अंजली भारती यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं...", रोहित पवारांनी काय म्हटलं?

"गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भात केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व हीन दर्जाचं आहे. राज्यात महिला सुरक्षा-महिला सबलीकरण महत्त्वाचे आहेच, शक्ती कायद्याची गरज आहेच यात शंका नाही, पण महिला सुरक्षेवर बोलताना थेट दुसऱ्या एका महिलेसंदर्भात बलात्काराची भाषा वापरणं नक्कीच माणूस म्हणून देखील शोभणारं नाही. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RRPSpeaks/status/2016034525449789466

12:18 (IST) 27 Jan 2026

"मुंब्र्याला हिरवं करून टाकू " सहर शेख च्या वक्तव्याला गणेश नाईकांचा पाठिंबा…? काय म्हणाले नाईक..

वनमंत्री गणेश नाईक यांनी सहर शेखच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी सहर शेखची एकप्रकारे बाजू मांडली आहे असेच दिसते. ...सविस्तर वाचा
12:07 (IST) 27 Jan 2026

Nashik Ringroad : नाशिक सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनात कोणावर अन्याय होत असेल तर….खासदार राजाभाऊ वाजे स्थानिकांसाठी आक्रमक

एकलहरा रोडवरील अरिंगळे मळा परिसरातूनही हा रिंगरोड जाणार आहे. या रिंगरोडसाठी काही नागरिकांच्या निवासी आणि व्यावसायिक जागा संपादित करण्यात येणार असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे ...वाचा सविस्तर
11:51 (IST) 27 Jan 2026

Rain In Mumbai: मुंबई आणि उपनगरात पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ कुठे ?

Mumbai Rain Update: मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...अधिक वाचा
11:41 (IST) 27 Jan 2026

‘पनवेलच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात?’

जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सुरू असल्याने भाजपने महापौरपदाची घोषणा जाणीवपूर्वक लांबवली असून, निकालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. ...सविस्तर वाचा
11:30 (IST) 27 Jan 2026

सहर शेख प्रकरणानंतर आज मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड यांची रॅली, आव्हाड सभेत काय उत्तर देणार?

मुंब्रा शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप दर्गाह गल्ली येथे होईल. त्यानंतर दर्गाह गल्ली येथे आयोजित सभेत जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करणार आहेत. ...सविस्तर वाचा

Girish Mahajan Statement

“एखादं नाव घ्यायचं राहिलं तर गोंधळ का घालायचा?”, बाबासाहेबांचं नाव विसरल्याप्रकरणी गिरीश महाजनांची प्रतिक्रिया; दिलगीरीही केली व्यक्त, (फोटो-संग्रहित छायाचित्र)