Maharashtra Politics Shivsena UBT Operation Tiger , 18 June 2026 : शिवसेना (ठाकरे) गटातील ६ खासदारांच्या फुटी बाबत ऑपरेशन टायगर यशस्वी होईल की नाही? याची महाराष्ट्रात जोरदार चर्चा चालू आहे. याविषयी दिल्लीत मोठ्या घडोमोडी घडत आहेत. ६ पैकी 2 खासदारांसोबत ठाकरे सेनेच्या नेत्यांचा संवाद झाल्याची चर्चा आहे. त्याची अजूनही पत्रावर सही झाली नसल्याच कळतंय. तर राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सत्र चालूच आहे. यासह राज्यातील राजकीय क्षेत्रातील ठळक घडामोडी, गुन्हे, पर्यटन, कला – क्रीडा – संस्कृती- हवामान यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Today’s Live News Updates Maharashtra, 18 June 2026

19:31 (IST) 18 Jun 2026

शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची भाजपालाही धास्ती? ठाकरे गटाच्या बंडखोरांवर तात्काळ कारवाई? वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Top Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरमुळे राज्यातील भाजपाच्या गोटातही चलबिचल सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरेंच्या शिवसेनेने बंडखोर खासदारांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारला आहे, वाचा आजच्या ५ महत्वाच्या घडामोडी... ...सविस्तर वाचा
19:11 (IST) 18 Jun 2026

अंबरनाथमध्ये स्मार्ट मीटर विरोधात जनमोर्चा; सक्ती केल्यास रस्त्यावर उतरण्याचा मनसे-शिवसेनेचा इशारा

हावितरण कार्यालयावर काढण्यात आलेल्या या धडक मोर्चामध्ये शेकडो नागरिक, महिला आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ...अधिक वाचा
18:31 (IST) 18 Jun 2026

जो निवडून येतो तो पक्षद्रोह करतो… ही परभणीच्या खासदारांची परंपरा ! संजय जाधवही ठरले फुटीरांच्या परंपरेचे पाईक

शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर पक्षद्रोह करणाऱ्यांमध्ये अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर या माजी खासदारांमध्ये आता संजय जाधव यांचाही समावेश झाला आहे. ...वाचा सविस्तर
18:16 (IST) 18 Jun 2026

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत शंभर टक्के मतदान, तीन उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद; २२ जूनच्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष

महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानाने लोकशाहीचा उत्सव अक्षरशः परिपूर्णतेच्या शिखरावर पोहोचल्याचे चित्र दिसून आले. ...सविस्तर वाचा
17:59 (IST) 18 Jun 2026

झाडीपट्टीचा शब्दगंध आता बालभारतीत; ‘सरावन मईन्यात’ कविता महाराष्ट्रात गाजणार

ग्रामीण जीवनातील सहजता, निसर्गाशी असलेले घट्ट नाते, मातीतून उमटणाऱ्या भावना आणि झाडीबोलीची लयबद्ध अभिव्यक्ती यांचे सुंदर दर्शन घडविणारी ‘सरावन मईन्यात’ ही कविता विद्यार्थ्यांना भाषेची गोडी लावण्यासोबतच ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारी ठरणार आहे. ...वाचा सविस्तर
17:56 (IST) 18 Jun 2026

बिर्ला कॉलेज आणि पोलंडच्या व्हिस्तुला विद्यापीठात शैक्षणिक सहकार्य करार

कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालयाने उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या दृष्टीने पोलंडच्या नामांकित व्हिस्तुला विद्यापीठासोबत शैक्षणिक सहकार्याचा करार केला आहे. ...सविस्तर वाचा
17:44 (IST) 18 Jun 2026

इचलकरंजीला शाश्वत पाणीपुरवठ्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर - देवेंद्र फडणवीस

पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. ...सविस्तर वाचा
17:22 (IST) 18 Jun 2026

आटपाडीत कपाळावर चंद्रकोर असलेल्या 'सुलतान' नावाच्या गाढवाची चोरी; पोलिसांत तक्रार दाखल

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथून 'सुलतान' नावाच्या एका निरूपद्रवी गाढवाची चोरी झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे ...सविस्तर वाचा
17:11 (IST) 18 Jun 2026

Video : खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेचा एल्गार; यवतमाळमध्ये शिवसैनिक आक्रमक, पुतळ्याचे दहन…

यवतमाळ येथील दोन पंजा चौकात झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आले होते. ...सविस्तर बातमी
16:33 (IST) 18 Jun 2026

सावनेरमध्ये डिफेन्स-न्यूक्लिअर-एरोस्पेस हबचा मार्ग मोकळा; २,७२९ हेक्टर क्षेत्र औद्योगिक घोषित

महाराष्ट्र शासनाने सावनेर तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे २,७२९ हेक्टर क्षेत्र डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस (डीएनए) कॉरिडॉरसाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले असून, विदर्भातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...सविस्तर बातमी
16:22 (IST) 18 Jun 2026

१०० वा स्वदेशी ब्रह्मोस बुस्टर निर्मितीचा टप्पा गाठला, रशियन अवलंबित्वाला पूर्णविराम; नागपूरच्या सोलर समूहाची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप

सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने तयार केलेल्या १०० व्या स्वदेशी बूस्टरला गुरुवारी ध्वज दाखवून रवाना करण्यात आले. ...अधिक वाचा
16:16 (IST) 18 Jun 2026

उत्तरप्रदेशात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर मिरा-भाईंदर पोलिसांचा छापा; २३ कोटींचा मुद्देमाल जप्त, २० आरोपी गजाआड

मिरा रोड येथील गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी थेट उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यात छापा टाकून एमडी ड्रग्ज बनवणारा कारखाना उध्वस्त केला. ...सविस्तर वाचा
16:06 (IST) 18 Jun 2026

तात्पुरत्या यूडीआयडीधारक दिव्यांग बांधवांसाठी मोठी बातमी! विशेष सहाय्य योजनांचे लाभ कायम; वाचा काय आहे नवीन शासन निर्णय

दिव्यांग सक्षमीकरण विभागाने १७ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने दिलेले वैध तात्पुरते दिव्यांगत्व प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू राहणार आहे. ...सविस्तर बातमी
16:04 (IST) 18 Jun 2026

ठाणेकरांसाठी डबलडेकर बससेवा सुरू; वागळे इस्टेट-भाईंदरपाडा मार्गावर सेवा

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची (टीएमटी) बहुप्रतीक्षित विद्युत वातानुकूलित डबलडेकर बस अखेर प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. ही बस वागळे इस्टेट येथील आयटीआय सर्कल ते भाईंदरपाडा या मार्गावर धावणार असून, आगामी काळात आणखी नऊ बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. ...सविस्तर बातमी
16:00 (IST) 18 Jun 2026

'व्हीप' धुडकावणाऱ्या ६ खासदारांवर कधी, काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी स्पष्ट केली भूमिका

या बंडखोर खासदारांवर ठाकरे गट काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी मोठी अपडेट दिली आहे. ...वाचा सविस्तर
15:50 (IST) 18 Jun 2026

MPSC : कृषी सेवा परीक्षेत अहिल्यानगरचा शाहिद शेख राज्यात पहिला तर पुण्याची ऋतुजा डुंबरे मुलींमधून पहिली; २५८ उमेदवारांची शिफारस…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल १७ जून, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. ...सविस्तर बातमी
15:43 (IST) 18 Jun 2026

खासदार संजय जाधव यांची सोनपेठला प्रतिकात्मक अंत्ययात्रा; निषेधाच्या घोषणा देत शिवसैनिक रस्त्यावर

खासदार संजय जाधव यांनी उबाठा शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचे परभणीत तीव्र पडसाद उमटले आहेत. ...अधिक वाचा
15:40 (IST) 18 Jun 2026

तीन तासांचा थरारक पाठलाग; अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश…

गुरुवार १८ जून रोजी पहाटे (५:३०) साडेपाचच्या सुमारास काही ग्रामस्थांना गावातील शाळेच्या परिसरात बिबट दिसून आला. ...वाचा सविस्तर
15:35 (IST) 18 Jun 2026

ठाण्यातील मालमत्ता करावरील १० टक्के सवलत योजनेस मुदतवाढ; ठाणे पालिकेचा निर्णय

ठाणे महापालिकेने मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी लागू केलेल्या १० टक्के कर सवलत योजनेस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तीव्र उन्हाळा आणि तांत्रिक अडचणींमुळे कर भरू न शकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
15:31 (IST) 18 Jun 2026

धक्कादायक! वरवर चलनी नोटा, आत मात्र कोऱ्या कागदाचे तुकडे; नफा मिळवून देण्याचे नागरिकांना आमिष…

कमी वेळेत रक्कम दुप्पट-चौपट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने बुधवारी रात्री पुन्हा एकदा कारवाई केली. ...वाचा सविस्तर
15:27 (IST) 18 Jun 2026

महावितरणचे ग्राहकांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष; ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील भागाचा क्रमांक जाणून घ्या

ठाणे, नवी मुंबई, रायगडमधील भागातील वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड किंवा इतर तक्रारी ग्राहकांना करता याव्यात, यासाठी महावितरणने स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. ...अधिक वाचा
15:23 (IST) 18 Jun 2026

पवन राजेनिंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतरच शिंदेसेनेमध्ये जाण्याचा निर्णय, समाजमाध्यमातील लोकप्रिय प्रतिमा ‘कलंक’ पर्यंत घसरणीला

धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...वाचा सविस्तर
15:20 (IST) 18 Jun 2026

ठाकरे सेनेतील फुटलेल्या ६ खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? संजय राऊतांनी सांगितलं ठिकाण; म्हणाले, “राजस्थानातील…”

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात येत असून ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. हे ६ बंडखोर खासदार लवकरच स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे.

सविस्तर वाचा

15:13 (IST) 18 Jun 2026

"इथेनॉलमुळे देशाचा पैसा वाचणार", नितीन गडकरींवर टीका होत असताना बावनकुळे समर्थनार्थ सरसावले!

नितीन गडकरी यांनी हे फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. काही कंपन्यांकडून इथेनॉलवर चालणारी वाहने तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. ...सविस्तर वाचा
14:47 (IST) 18 Jun 2026

खेड्यापाड्यांतील महिलांना रोजगार देणारं ‘कार्य’ ॲप

स्थानिक बोलीभाषेत व्हॉईस रेकॉर्डिंग आणि डेटासेट्स तयार करून या ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांना, विशेषतः ६0 टक्के ग्रामीण महिलांना घरबसल्या हक्काचा डिजिटल रोजगार उपलब्ध झाला आहे. ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 18 Jun 2026

पस्तीस मतदारांचे साहाय्यकाच्या मदतीने मतदान! कायदेशीर तरतुदीचा भाजपाने उठवला लाभ ,२९ नगरसेवक निरक्षर

कायद्यातील तरतुदीचा आधार घेत भाजपाने याचे सूक्ष्म नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...सविस्तर वाचा
14:22 (IST) 18 Jun 2026

Video : रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; शेतकरी आंदोलनाचा भडका थेट मुंबईत! मेहकरात तलाठी कार्यालये जाळण्याचा प्रयत्न

संतप्त कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या निषेध आंदोलनाचा जोर मात्र वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्याकरिता करण्यात येणाऱ्या यां आंदोलनाकडे असलेले शासनाचे दुर्लक्ष कायम आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यातील आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे. ...वाचा सविस्तर
13:33 (IST) 18 Jun 2026

इराण संघर्षाचा मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील कामास फटका; डांबर तुटवड्या अभावी उड्डाणपुलाचे पुन्हा लांबणीवर

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून, २० जूनपर्यंत काम पूर्ण करून उड्डाणपूल खुला करण्याची अंतिम मुदत दिली आहे ...वाचा सविस्तर
13:25 (IST) 18 Jun 2026

Mumbai Pune Bullet Train : मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत! बुलेट ट्रेन, वाढवण बंदराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई-पुणे दरम्यान नियोजित बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार असून, ही शहरे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...वाचा सविस्तर
13:12 (IST) 18 Jun 2026

राजकारणात व्यभिचार सुरू आहे, शिवसेना खासदार फुटीवर किशोरी पेडणेकर यांची जळजळीत टीका

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या फुटीवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली आहे. ...वाचा सविस्तर

Maharashtra Politics News Live Updates | Operation Tiger Shivsena UBT Live Updates| Vidhan Parishad Election Voting 2026 Live

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स