Mumbai-Maharashtra Breaking News Updates, 28 May 2026: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे आणि भाजपाचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू सहकारी असलेले प्रसाद लाड यांच्यात २२ मे रोजी अंतरवाली सराटीमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती पण या भेटीला सहा दिवस झाले तरी अद्याप सरकारकडून कुठलंही उत्तर त्यांना आलेलं नाही. त्यामुळं आंतरवली सराटीत मनोज जरांगेंकडून ३० मे पासून रखरखत्या उन्हात बाज टाकून बेमूदत उपोषण करण्याची घोषणा! दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठीच्या जागावाटपावरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून विदर्भाला उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. या बातम्यांसहच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…

Live Updates

Today's Marathi News Live Updates, 28 May 2026

19:16 (IST) 28 May 2026

विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर राजीव पाटील चर्चेत; भाजप नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि आमदारांनी बविआचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिल्याने पालघरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...सविस्तर बातमी
19:05 (IST) 28 May 2026

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत! राज्यात इंधन तुटवडा नाही; इंडियन ऑईलची माहिती

पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाची मागणी वाढली असली, तरी महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असल्याची माहिती इंडियन ऑईलने दिली आहे. ...अधिक वाचा
18:59 (IST) 28 May 2026

Duvvuri Subbarao : "रुपया पडू द्या, पण व्याजदर वाढवू नका!", 'आरबीआय'ला माजी गव्हर्नरांचा सल्ला!

जागतिक तणावामुळे रुपया घसरत असताना आरबीआयने व्याजदर न वाढवता चलनाला नैसर्गिकरीत्या समायोजित होऊ द्यावे, असा सल्ला माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी दिला आहे. ...सविस्तर वाचा
18:52 (IST) 28 May 2026

मुख्यमंत्र्यांवर टीका करून जरांगे पाटील स्वतःचा जनाधार कमी करत आहेत - राधाकृष्ण विखे

मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक असून उद्या जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांचे गैरसमज दूर करणार असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी दिली. ...वाचा सविस्तर
18:43 (IST) 28 May 2026

VIDEO : मोठा अनर्थ टळला! कसारा स्थानकात महानगरी एक्सप्रेसच्या जनरेटर व्हॅनमधून धूर; प्रवाशांमध्ये घबराट...

इगतपुरीहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसचे ब्रेक लायनर जाम होऊन धूर निघाल्याने कसारा स्थानकावर गुरुवारी सकाळी प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...सविस्तर वाचा
18:39 (IST) 28 May 2026

ठाण्यातील २८०० कोटींच्या टीडीआरचा मार्ग मोकळा! पालिका आणि डी. दाह्याभाईमधील समझोता, सर्वोच्च न्यायालयाने याचिका काढली निकाली

सर्वोच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आणि दाह्याभाई कंपनीमधील समझोत्याची नोंद घेत विशेष अनुमती याचिका निकाली काढत जमिनीवरील उद्यान आरक्षण अबाधित ठेवले आहे. ...सविस्तर बातमी
18:26 (IST) 28 May 2026

प्रेमसंबंधातून सावत्र आई-मुलाची आत्महत्या; बीड जिल्ह्यातील घटना

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सावत्र आई आणि २१ वर्षांच्या मुलाने अनैतिक प्रेमसंबंधांतून झालेल्या बदनामीच्या भीतीने लागोपाठ आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...अधिक वाचा
18:08 (IST) 28 May 2026

नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त, गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई; शस्त्रसाठ्यासह स्फोटके जप्त

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती दुर्गम जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी उभारलेला शस्त्रनिर्मिती कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, स्फोटके आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...अधिक वाचा
18:07 (IST) 28 May 2026

१ जून पासून सौर पॅनेलसाठी नियम बदलणार; अनुदानावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या...

सौर उर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षांत केंद्र व राज्य सरकारने विविध अनुदान योजना लागू केल्या आहेत, परंतु आता या योजना व नियम सुधारित होणार आहेत. ...सविस्तर बातमी
18:01 (IST) 28 May 2026

विधान परिषद निवडणूक: महायुतीत नांदेडची जागा भाजपाला सुटल्यातच जमा, विरोधी पक्षांचे मोट बांधण्याचे प्रयत्नही सुरू

विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची जागा महायुतीत भाजपाला सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ...वाचा सविस्तर
17:50 (IST) 28 May 2026

नागपुरात जमीयतची शांतता बैठक, गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी चर्चेत

आगामी ईद-उल-अजहा (बकरी ईद) सणाच्या पार्श्वभूमीवर मोमीनपुरा येथील जमीयत उलेमा कार्यालयात शांतता व सौहार्द राखण्यासाठी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मुफ्ती मोहम्मद साबिर बोलत होते. ...अधिक वाचा
17:37 (IST) 28 May 2026

पाण्याच्या बाटल्यांपासून बनवले जॅकेट; एक मोदींना, एक मला भेट दिले; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा…

समारंभातील पुरस्कार मिळवलेल्या तरुणांना शुभेच्छा देताना गडकरी यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’, जैवइंधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश बदलू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. ...सविस्तर बातमी
17:17 (IST) 28 May 2026

रुग्णवाहिकेस डिझेल न मिळाल्याने हिंगोली जिल्ह्यात नवजात बालकाचा मृत्यू

वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला असून, डिझेल तुटवडा आणि चालकाच्या अनुपस्थितीवरून आरोग्य प्रशासनावर गंभीर आरोप होत आहेत. ...वाचा सविस्तर
16:37 (IST) 28 May 2026

आले मंत्र्यांच्या मना… नांदेडजवळील नदीजोडचे कार्यालय ३०० किमी लांब अहिल्यानगरमध्ये

जलसंपदा विभागात मोठी प्रशासकीय उलथापालथ! गोदावरी खोरे महामंडळाचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला, तर काही कार्यालये अहिल्यानगरमधील लोणी येथे हलवली. ...अधिक वाचा
16:33 (IST) 28 May 2026

सोयाबीनच्या पेंडपासून शेव-चटणी बनवा, नितीन गडकरींचा हल्दिरामच्या मालकांना सल्ला; केवळ १०० रुपये दर…

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नवनवीन कल्पना मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. देशातील नामांकित हल्दिराम समूहाच्या मालकांनाच गडकरी यांनी नवीन खाद्यपदार्थ विकसित करण्याचा सल्ला दिला. ...सविस्तर बातमी
16:33 (IST) 28 May 2026

चुकीच्या ई-चलानविरोधात ऑनलाइन हरकत; पोलिसांना ४५ दिवसांत द्यावे लागणार उत्तर

राज्य शासनाने आता ई-चलानवर हरकत नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोलीस विभागाला ४५ दिवसांच्या आत या हरकतीचे निराकरण करावे लागणार आहे. ...अधिक वाचा
16:28 (IST) 28 May 2026

कल्याणच्या गांधारे पुलावर भरधाव वाहने चालविणाऱ्या ३० मद्यपी वाहन चालकांवर आरटीओकडून कारवाई

या कारवाईत भरधाव वेगात वाहने चालवणाऱ्या, मद्यप्राशन केलेल्या आणि नियम मोडणाऱ्या ३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यामुळे हुल्लडबाजांची चांगलीच तारांबळ उडाली. ...सविस्तर बातमी
16:23 (IST) 28 May 2026

स्वस्त प्रवासासाठी मुंबईऐवजी नवी मुंबई विमानतळाला प्रवाशांची पसंती; तिकीट दरात बचत, कमी गर्दीमुळे प्रवासही सोयीचा

नवी मुंबई येथे नव्याने झालेल्या विमान तळावर तुलनेने कमी गर्दी असल्याने अनेक विमान कंपन्यांकडून आकर्षक दरात तिकिटे उपलब्ध करून दिली जात आहेत. ...सविस्तर वाचा
16:12 (IST) 28 May 2026

वालधुनी नदी किनारी कचरा जैसे थे ;दहा महिन्यांपासून नदीकिनारी कचरा, पूरस्थिती आणि आरोग्याचा धोका

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून, आगामी पावसाळ्यात हा कचरा पुन्हा नदीत वाहून जाऊन शहरात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...अधिक वाचा
15:57 (IST) 28 May 2026

Bashir Badr: महान शायर बशीर बद्र काळाच्या पडद्याआड, 'किसी मोड पर मुलाकात होगी..' म्हणणारा उर्दू साहित्यातील ध्रुव तारा निखळला!

Bashir Badr Death News: आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात बशीर बद्र हे 'डिमेंशिया' (स्मृतिभ्रंश) या आजाराने ग्रस्त होते. ज्या शायरने जगाला प्रेमाची भाषा शिकवली, ते स्वतःच्याच अनेक लोकप्रिय गझला विसरून गेले होते. परंतु, त्यांनी लिहिलेले शब्द रसिकांच्या मनात युगानुयुगे अमर राहतील. ...अधिक वाचा
15:50 (IST) 28 May 2026

एनसीएमसी कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची फरफट; वसई आगारात हेलपाटे, तातडीने उपाययोजनेची मागणी

वसईत एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची रखरखत्या उन्हात फरफट होत आहे. ...सविस्तर वाचा
15:49 (IST) 28 May 2026

१३ जूनला मुंबई गाठायची आहे? 'या' दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच संपणार; वाचा रेल्वेची नवी अपडेट

रेल्वे मार्गांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल तसेच इतर तांत्रिक कामे सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी काही गाड्यांच्या मार्गात आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. ...सविस्तर वाचा
15:44 (IST) 28 May 2026

ठाणे, पालघर जिल्ह्यात दोन महिने मासेमारीला बंदी; माशांच्या प्रजोत्पादन काळात मासेमारी केल्यास कठोर कारवाई, या कालावधीत अपघात झाल्यास आर्थिक मदत नाही

समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि पावसाळ्यातील वादळी हवामानापासून मच्छीमारांचे रक्षण करण्यासाठी सर्व यंत्रचलित व यांत्रिक नौकांना या काळात मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
15:29 (IST) 28 May 2026

कार्यालयात कोणी नाही, तरी दिवे-एसी सुरू? ठाणे पालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व प्रभाग समित्या आणि मुख्यालयासाठी कडक परिपत्रक जारी केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट संबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...अधिक वाचा
15:15 (IST) 28 May 2026

अधिक मासातील पंच पर्वणींचा योग, दान आणि फळाचे महत्व

या पवित्र काळात कोणत्या दिवशी कोणती दाने करावीत, कोणती उपासना करावी आणि शरीर प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत, याबद्दल कल्याणमधील ज्येष्ठ शास्त्रीय पंडितांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. ...वाचा सविस्तर
15:12 (IST) 28 May 2026

Video: हिंदुत्ववादी भाजप सरकारच्या काळात दुर्गाडी मंदिर बंद राहते, यांचे हिंदुत्वच बेगडी, ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांचा आरोप

एकीकडे नमाज सुरू आणि दुसरीकडे मंदिर बंद. त्यामुळे पुढील वर्षी उच्च न्यायालयात याप्रकरणी आम्ही दावा करून नक्कीच यश मिळवू,- बंड्या साळवी ...अधिक वाचा
15:06 (IST) 28 May 2026

व्हॉट्सॲप हॅक करून आमदारांच्या नावे मागितले पैसे; मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक

याप्रकरणी आमदार कथोरे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...वाचा सविस्तर
15:06 (IST) 28 May 2026

शाडूच्या गणरायासाठी महापालिकेची पुढाकार; मूर्तिकारांना मोफत जागा, शाडू मातीचाही पुरवठा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक मूर्तिकारांना १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करावे लागणार असून, 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर जागांचे वाटप केले जाईल. ...सविस्तर बातमी
15:00 (IST) 28 May 2026

कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का; बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...वाचा सविस्तर
14:55 (IST) 28 May 2026

Vidhan Parishad Election : महायुतीचे अखेर ठरले… जळगावमधील विधान परिषदेची जागा शिवसेनेला, तर नाशिक भाजपला?

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याची चिन्हे आहेत. ...अधिक वाचा

Maharashtra News Live Updates| CNG Price Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)