Maharashtra Politics Live News Updates Today: ठाणे शहरात एका इमारतीत पाचव्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. तर, ८० जणांना वाचविण्यात यश आले आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. दुसरीकडे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन झाले आहे. नफिसा यांच्यावर आज (१७ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नफिसा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नफिसा बेगम या सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या. यासह महाराष्ट्राच्या राजकारणासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Today’s Live News Updates, 17 February 2026: महाराष्ट्रातील राजकारण, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, मनोरंजन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.
शेपटी सुस्थितीत, मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा? विमान अपघातावर अमोल मिटकरींचा सवाल
माझी वसुंधरा-५ अभियानात अहिल्यानगर महापालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार
हद्दवाढीविरोधात मूकमोर्चा! बुलढाण्यात हजारो ग्रामस्थ एकवटले; वाहतूक विस्कळीत
सांगली : कला मानवी शरीराचा अदृष्य भाग - मंत्री पाटील; राज्य कला प्रदर्शन सुरू
National Highway Authority of India : राष्ट्रीय महामार्गांवर ‘मधमाशी कॉरिडॉर’, नॅशनल हायवे लावणार ४० लाख वृक्ष…
गर्दीच्या काळात रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; विदर्भातून मुंबई, पुण्यासाठी…
असुविधेमुळे अपघातग्रस्त तरुणाची हेळसांड; आरोग्य मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती 'जैसे थे'..
टीपू सुलतानवर रान उठवणाऱ्या भाजपच्या आमदाराच्या स्टेट्सवर चंगीझ खान
हर्षवर्धन सपकाळ यांची पोस्ट - "शिवप्रेमी बंधू-भगिनींनो, सप्रेम नमस्कार सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे.
मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही,मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता, इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.
प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.
शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपाच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू!
कठीण वज्रास भेदूं ऐसे भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी । मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥ "
भाजप नेत्या नवनीत राणा म्हणतात, 'औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवू'
Ajit Pawar Accident : अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळला? अपघात की घातपात, संशयाचे ढग गडद
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026: शिवजयंतीनिमित्त ठाण्यात ‘शिवशंभू गाथा’, शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे
Shivratri accident : शिवरात्र ठरली तीन कुटुंबासाठी काळरात्र
Rickshaw Fare Hike: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक ते लालचौकी रिक्षा चालकांच्या मनमानी भाडेवाढीने प्रवासी संतप्त
बुलढाणा: विद्यार्थी वाहक वाहन आणि बुलेट ची धडक, एक ठार, चार जखमी
“तुकाराम मुंढे हे त्यांच्याच तोऱ्यात”, बच्चू कडू यांनी व्यक्त केली नाराजी
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात लवकरच परिषद व भव्य मोर्चा; माजी खासदार हुसेन दलवाई यांची पत्रकार परिषदेत माहिती
‘सह्याद्री’त मानव-वन्यजीव सहअस्तित्व बळकटीसाठी प्रयत्न होणार; ‘सह्याद्री व्याघ्र क्षेत्र’ व ‘लास्ट वाइल्डरनेस’मध्ये सामंजस्य करार
नागपूरमध्ये आरटीई प्रवेश सुरू; उत्पन्नाची अट रद्द, पण १ किमी नियम कडक
बुलढाणा: जिल्हा रुग्णालयात दारूच्या बाटल्यांचा खच! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातील चित्र
मोठी बातमी… इंदोरातील मुलींच्या वस्तीगृहातून २९ अल्पवयीन मुलींची सुटका, सर्व १५ सदस्यांवर गुन्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल; लोकभवन येथे घेतली फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी स्वागत केल्यानंतर, मोदींनी लोकभवन येथे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली.
शिवजयंती निमित्त आयटीनगरी हिंजवडी मधील वाहतुकीत बदल, कसा आहे बदल?
बी.एड. परीक्षेत प्रतिमा कस्तुरे राज्यात अव्वल; सुवर्णपदकाचा मान
Pimpri Chinchwad Crime : 'तुझे या भागात अति चालले आहे', दोन गटात राडा, १३ जणांवर गुन्हे
स्मार्ट मीटरबाबत मोठी बातमी… भाजप सत्तेवर असलेली तीन राज्ये मीटर बसवण्यात आघाडीवर… महाराष्ट्रात…
MMRDA Budget 2026: एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात ठाणेपल्याडही ‘कल्याण’, तीन मेट्रो मार्ग - उन्नत मार्गांना भरीव निधी
सीबीआयने दाखल केलेला खटला जलदगतीने चालवण्याचे आदेश द्या; अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात मागणी
भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या रुंदीकरणासाठी ३५३.२३ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-बी च्या भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या रुंदीकरणासाठी ३५३.२३ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण ४७.६६३ किमी लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार असून प्रकल्पामध्ये वागदरी येथे बायपास व सांगवी येथे पुलाच्या बांधकामास देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.
कोल्हापूरमध्ये सत्ता संपादनासाठी नवीन समीकरणे?

आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन (फोटो - लोकसत्ता ऑनलाईन)
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन

