Maharashtra Political News Updates, 18 May 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणातील अनेक धागेदोर समोर येत आहेत. सीबीआयकडून कसून चौकशी सुरू असून पुणे, नांदेडपाठोपाठ आता लातूरमधील कोचिंग सेंटरचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर, मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. अमरावती येथील जनता दरबारात भाजपा प्रदेशाध्यक्षा मेघा भारती यांनी त्यांना हातात असलेल्या कागदपत्रांच्या सहय्याने हवा घातली. या कृत्यामुळे खुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी संबंधित महिलेला असं करण्यापासून रोखलं. तर, आज राज्यभरात कांदा दर प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने संभाजीनगरमध्ये चक्काजाम आंदोलन केले आहे, तर रोहित पवारांनी लासलगाव येथे जाऊन आंदोलन केले. यासह राज्यातील अनेक ताज्या घडामोडी आपण जाणून घेऊयात.

Live Updates

Today’s Latest Marathi News Live , 18 May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा

19:36 (IST) 18 May 2026

"आज प्रत्येक शहरात एक मोटेगावकर आहे"; राष्ट्रवादीचे नेते अमोर मिटकरी

"मोटेगावकर खाजगी शिकवणी क्लासेसचा संचालक जर इतका भामटेगिरी करून पालकांचं इतक्या वर्षांपासून आर्थिक शोषण करत होता तर विचार करा आज प्रत्येक शहरात एक मोटेगावकर आहे.यांच्या खाजगी शिकवणीवर जर सरकारने नियंत्रण समिती बसवली असती तर आज Neet च्या परीक्षा मेहनतीने देणाऱ्या विद्यार्थ्यावर जीव द्यायची वेळ आली नसती.दिपक केसरकर साहेब शिक्षण मंत्री असताना अनेकवेळा हा गंभीर विषय मी सभागृहात मांडला मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले.आज या प्रकरणावरून जबाबदारी झटकून चालणार नाही.ही लढाई धनदांडग्यांविरुद्ध आहे जी आपल्या सर्वांना लढावीच लागेल ,पुढच्या पिढीसाठी," असे अमोल मिटकरी म्हणाले. https://twitter.com/amolmitkari22/status/2056361129031692390?s=20

19:23 (IST) 18 May 2026

हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान नवीन एक्सप्रेस… जळगाव जिल्ह्यात कुठे थांबा?

या नवीन रेल्वे सेवेमुळे मराठवाडा, खान्देश आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि चाळीसगाव या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर या गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. ...वाचा सविस्तर
19:23 (IST) 18 May 2026

विमान निर्मितीच्या जागतिक नकाशावर पुणे! जीई एरोस्पेसकडून मोठ्या गुंतवणुकीची घोषणा

या विस्तारामुळे व्यावसायिक विमान इंजिनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीला वेग मिळणार असून, जागतिक विमान निर्मिती क्षेत्राच्या नकाशावर पुण्याचे स्थान अधिक बळकट होणार आहे. ...सविस्तर बातमी
19:00 (IST) 18 May 2026

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी व अनियमित पावसाचा अंदाज; खरीपाचे नियोजन कसे कराल?

खरीप हंगामात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका शेतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच शेती व्यवस्थापनात आवश्यक बदल करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले. ...वाचा सविस्तर
18:49 (IST) 18 May 2026

Video : नीट पेपरफुटी प्रकरणांत मनसेचे खळखट्याक; आरोपी मोटेगावकरच्या क्लासवर हल्लाबोल

नीट पेपरफुटी प्रकरणात मनसेने सोमवारी अकोल्यात आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणांत आरसीसी कोचिंग क्लासचे शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने ताब्यात घेतले. ...सविस्तर बातमी
18:49 (IST) 18 May 2026

"राजकारणात १ रुपयाचं काम करायचं अन् १० रुपये प्रसिद्धीवर खर्च…" नितीन गडकरींचा नेत्यांना घरचा आहेर!

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या २५ व्या वर्षानिमित्त रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते. ...सविस्तर बातमी
18:44 (IST) 18 May 2026

धोंड्याच्या महिन्यात जावयांची 'चांदी'! सोने-चांदीच्या दरवाढीने सासरे मंडळी मात्र चिंतेत

यंदा जळगावच्या बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठल्याने सासरे मंडळींचे आर्थिक गणित बिघडले असून जावयांची मात्र 'चांदी' झाली आहे. ...वाचा सविस्तर
18:30 (IST) 18 May 2026

Nana Patekar : ज्यांनी नटसम्राट नाटक केले, ते ‘हार्ट अटॅक’ने गेले…नाना पाटेकरांनाही वाटली होती भीती!

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या २५ व्या वर्षानिमित्त रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सोंमवारी आयोजित जलक्रांती परिषदेत ते बोलत होते. ...अधिक वाचा
18:22 (IST) 18 May 2026

विदर्भात मोसमी पावसाचे आगमन केव्हा होणार? हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला हा अंदाज…

Maharashtra monsoon arrival: विदर्भासह देशभरातील शेतकरी ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे, त्या मोसमी पावसाने अंदमान व निकोबार बेटासह अरबी समुद्राच्या काही भागांत अधिकृत प्रवेश केला आहे. ...अधिक वाचा
18:22 (IST) 18 May 2026

ठाणे पालिकेवर कचऱ्याच्या खर्चाचा भार वाढला; मुंब्य्रातील कंत्राटात २८.९३ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार, सर्व साधारण सभेने मात्र प्रस्ताव तहकूब केला

कचऱ्याचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने २८ कोटी ९३ लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चाचा आणि २७० दिवसांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी आणला होता. ...अधिक वाचा
18:18 (IST) 18 May 2026

शेलूच्या घरांच्या किंमती सहा लाख करा; घरांच्या बांधकामाचे कार्यादेश जारी; कामगारांनी पुन्हा उचलून धरली मागणी

पावणे दोन लाख गिरणी कामगारांना मुंबईत जागेअभावी घरे देणे शक्य नसल्याने राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात घरे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वांगणी आणि शेलू येथे जागा शोधून त्या ठिकाणी ८१ हजार घरे बांधण्याचे निश्चित करण्यात आले. ...सविस्तर बातमी
18:11 (IST) 18 May 2026

NEET paper leak Shivraj Motegaonkar arrested : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून ९ दिवस कोठडी

NEET paper leak Shivraj Motegaonkar arrested by CBI update. 'नीट' पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील प्रसिद्ध 'आरसीसी क्लासेस'चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी अटक केली. ...सविस्तर बातमी
18:05 (IST) 18 May 2026

वडील बेपत्ता झाल्याचा बनाव! प्रत्यक्षात हत्या करून जाळले; नराधम पुत्रास अटक

प्राप्त माहितीनुसार, हतेडी खुर्द येथील रहिवासी शेतकरी समाधान पुंजाजी घायवट (४४) हे मागील ८ मेपासून बेपत्ता असल्याची तक्रार बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. ...सविस्तर बातमी
18:05 (IST) 18 May 2026

खुल्या वर्गातील नियुक्ती नाकारणे अन्यायकारक; राज्याच्या निर्णयावर आठवलेंची नाराजी

अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी वर्गातील उमेदवारांना खुल्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेले किमान गुणाऐवढे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यास त्यांची खुल्या वर्गात नोंद होत होती. ...अधिक वाचा
17:48 (IST) 18 May 2026

जमिन पोटहिस्सा मोजणी फक्त २०० रुपयांत; शेतकरी आणि जागा मालकांना मोठा दिलासा

पहिल्या पोटहिस्सा मोजणीसाठी सुमारे आठ हजार रुपये, तर पुढील प्रत्येक हिस्स्यासाठी चार हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...सविस्तर वाचा
17:45 (IST) 18 May 2026

महाराष्ट्रात चारपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका; विशेष कायद्यांतर्गत दोषसिद्धीत राज्याची चिंताजनक कामगिरी

ॲट्रॉसिटी, पोक्सो, घरगुती हिंसाचार, एनडीपीएस कायदा, यांसारख्या विविध विशेष कायद्यांच्या अंतर्गत महाराष्ट्रात दोषसिद्धीचे अल्प प्रमाण असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग ‘एनसीआरबी’च्या अहवालातून पुढे आली. ...सविस्तर बातमी
17:32 (IST) 18 May 2026

वाघिणीचे कॉलर गळाले, चिंता वाढली! स्थलांतरित ‘हिरकणी’ने वाढवली वनविभागाची धडधड

विदर्भातील जंगलातून सह्याद्रीच्या दाट अरण्यात आणलेल्या चंदा, तारा आणि हिरकणी या तीन वाघिणींवर वन विभागाची बारकाईने नजर होती. ...सविस्तर वाचा
17:30 (IST) 18 May 2026

पावसाळ्यात सुरक्षा नियमांचे पालन करा अन्यथा कठोर कारवाई; एमएमआरडीएचा कंत्राटदारांना इशारा

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) अनेक ठिकाणी मेट्रो, भुयारी मार्गांसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहेत. ...सविस्तर वाचा
17:15 (IST) 18 May 2026

नीट पेपरफुटी प्रकरण! सीबीआयकडून शिवराज मोटेगावकरांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी

नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरसीसी क्लासेसचे मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्या चौकशीसाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी सीबीआयकडून करण्यात आली आहे.

17:13 (IST) 18 May 2026

नितीन गडकरींचा नागपूरसाठी मास्टरप्लॅन! उत्तर ते दक्षिण जोडणारे दोन नवे महामार्ग; प्रवासाचा वेळ होणार थेट अर्धा

नव्या महामार्गांमुळे केवळ उत्तर-दक्षिण कनेक्टिव्हिटी सुधारणार नाही, तर पुण्याचा मध्य भारताशी आणि पर्यायाने दक्षिण भारताशी असलेला संपर्क वेगवान होणार आहे. ...अधिक वाचा
16:55 (IST) 18 May 2026

आरपीएफ अधिकारी भासवून प्रवाशाचे अपहरण आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न

याप्रकरणी आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा आणि प्रवाशाचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
16:51 (IST) 18 May 2026

संयुक्त जमिनीच्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय; आता संमतीपत्रासह सौर पंपाची वीज जोडणी मिळणार… वीज बिल शुन्यावर येणार…

आतापर्यंत सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, शासनाने हा तांत्रिक पेच सोडवला असून आता सामायिक सातबारा असलेल्या खातेदारांनाही सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...अधिक वाचा
16:36 (IST) 18 May 2026

SRPF लेखी पेपरफुटी प्रकरणी SIT स्थापना करुन व आरोपींना अटक करा - रोहिणी खडसे

"नीट पेपरफुटीचा आणि महाराष्ट्रातील पोलीस भरती अंतर्गत येणाऱ्या SRPF लेखी पेपरफुटीचा पॅटर्न जवळपास सारखाच आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय चौकशी झाली आणि आरोपींना अटक करण्यात आले मग महाराष्ट्रातील या पेपरफुटी प्रकरणी अद्याप कुणालाही अटक का करण्यात आली नाही?", असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.

https://twitter.com/Rohini_khadse/status/2056291640831263038?s=20

16:31 (IST) 18 May 2026

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद… रुग्णांचे टेंशन वाढले… नागपूर ‘एफडीए’कडून हे उपाय…

ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने ऑनलाइन आणि इंटरनेट फार्मसीच्या विरोधात २० मे २०२६ रोजी देशभरातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना बंदचे आवाहन केले आहे. ...अधिक वाचा
16:26 (IST) 18 May 2026

जनगणना नाकारणाऱ्या पाच प्रगणकांविरुद्ध गुन्हा दाखल; कुळगाव बदलापूर नगर परिषद आक्रमक, इतर प्रगणकांना इशारा

जनगणना २०२७ च्या कामासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेकडून विविध शाळा आणि कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ...सविस्तर वाचा
16:18 (IST) 18 May 2026

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय, किरकोळ, महिला विशेष रजा लागू करा; फेडरेशनची मागणी

सध्या एसटीमधील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना या मूलभूत रजा उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...वाचा सविस्तर
15:53 (IST) 18 May 2026

मतदारांची 'रिसॉर्ट वारी' आता थेट गुन्हा! मतदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यास IPC अंतर्गत कारवाई; निवडणूक आयोगाचा मोठा दणका

देशातील विधानपरिषद निवडणुकांदरम्यान आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी भारत निर्वाचन आयोगाने (ECI) एक अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. ...सविस्तर बातमी
15:53 (IST) 18 May 2026

दादर स्टेशनबाहेर संतापजनक प्रकार! इडलीसाठी वापरले शौचालयातील पाणी; पाहा VIDEO

Dadar Station Idli Vendor Video exposes Mumbai Street Food : मुंबईच्या गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 18 May 2026

Video : धगधगत्या आगीत चारचाकी वाहने भस्मसात; वीज रोहित्राखाली वाहन उभे अन् घडला अनर्थ, सावधान! तुम्ही ही चूक….

धगधगत्या आगीमध्ये दोन चारचाकी वाहने भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना शहरातील वाशीम बायपास मार्गावर एका गॅरेजसमोर सोमवारी सकाळी घडली. ...सविस्तर बातमी
15:33 (IST) 18 May 2026

नांदेड जिल्हा बँक निवडणूक : आक्षेपांवरील सुनावणीनंतर आता सह निबंधकांच्या निर्णयाकडे लक्ष!

बँकेच्या प्रारूप मतदार यादीत किनवटचे आ.भीमराव केराम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख आदी दिग्गजांची नावे तांत्रिक कारणावरून वगळली गेली. ...वाचा सविस्तर

Devendra Fadnavis Live: पुण्यातून देवेंद्र फडणवीस Live

Today’s Latest Marathi News Live , 18 May 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा