Maharashtra Politics : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसंच वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि नवी मुंबईत येत आहेत. त्याआधी धनंजय मुंडे हे परळीला का गेले? याचीही चर्चा होते आहे. दरम्यान संजय राऊत यांनी वाल्मिक कराड प्रकरणावरुन सरकारवर टीका केली आहे. परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन झालं, त्यावर सरकार शांत का बसलं आहे? लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर आहे म्हणजेच धनंजय मुंडेंवर आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Maharashtra Live News Update Today | धनंजय मुंडेंचा राजीनामा हे सरकार घेणार का? संजय राऊत यांचा सवाल, यासह महत्त्वाच्या बातम्या
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
मुंबई : नंदुरबारच्या ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या आवडाबाईला प्रसुतीदरम्यान वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती. तेथील डॉक्टरांनी टेलिमेडिसीनच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर नेमक्या उपचाराची दिशा स्पष्ट झाली आणि बाळाचा सुखरूप जन्म झाला तसेच आईचेही प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.
कर्नाक पूल जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता; दुसरी तुळई लवकरच स्थापित करणार, मध्य रेल्वेकडून ब्लॉकची प्रतीक्षा
मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या आणि पी. डि'मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्ष जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला आहे. या पुलाच्या दुसऱ्या तुळईची जोडणी पूर्ण झाली असून हा पूल आता लवकरच रेल्वे रुळांवर स्थापित केला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मध्य रेल्वेकडे ब्लॉक घेण्याची विनंती केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
Vaijapur Leopard Attack News : शेतकरी मच्छिंद्र काशिनाथ चव्हाण यांच्या गट न. १३३ मधील शेतात कापूस वेचणीचे काम सुरू होते.
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
राज्यात महिला अत्याचार व हत्याकांडाच्या घटना वाढत आहे. विशेष म्हणजे, नागपुरात सलग हत्याकांडाची मालिका सुरु झाली आहे.
एसटीच्या चालक, वाहकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाई, विशेष तपासणी मोहीम सुरू
मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील चालक, वाहकाने मद्यपान केलेले नाही याची खातरजमा करूनच त्यांना कर्तव्यावर पाठवणे गरजेचे आहे. मात्र, या नियमाची विभाग पातळीवर प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एसटीच्या चालक, वाहकाने मद्यप्राशन केलेले नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या कामगाराच्या (डिलिव्हरी बाॅय) वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली.
घोडबंदर भागासाठी मिळणार आणखी शंभर वाहतूकसेवक, ठाणे महापालिका आयुक्तांचे बैठकीत संकेत
ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीकरीता आणखी प्रशिक्षित शंभर वाहतूक सेवक दिले जाणार आहे. यासंबंधीचे संकेत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दिले.
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामधील आरोपप्रत्यारोप महाराष्ट्राने अनुभवला आहे.
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला. वेगवेगळ्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांकडील तीन लाखांचे दागिने चोरुन नेले. धनकवडी, बिबवेवाडी, वानवडी परिसरात या घटना घडल्या.
नागरी समस्या, तक्रारी ऐकून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना
कल्याण : नागरिक विविध प्रकारच्या नागरी समस्यांविषयक तक्रारी घेऊन पालिकेत येतात. अशा नागरिकांच्या नागरी समस्या, अडचणी विषयक म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी खास वेळ राखून ठेवावा. यासाठी भेटीची कार्यालयीन वेळ निश्चित करावी, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी पालिकेतील विभाग प्रमुखांच्या एका बैठकीत दिले.
मध्य रेल्वेच्या १२ रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी मुंबई विभागातील तीन, भुसावळ विभागातील चार, पुणे आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन आणि नागपूर विभागातील एक कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.मागील महिन्यात कर्तव्य निभावताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कतेमुळे रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू राहिली.
मुंबई: विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगून एका भामट्याने विक्रोळी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तब्बल साडेचार लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी महिलेने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.तक्रारदार महिला या विक्रोळीत कुटुंबियासोबत राहतात. आठ दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन आला. त्याने आपण विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. पतीचे अनेक हप्ते रखडले असून हप्ते न भरल्यास विमा रद्द होण्याची भीती आरोपीने महिलेला घातली. पहिल्यांदा आरोपीने महिलेला तत्काळ आठ लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र महिलेने नकार देताच आरोपीने साडेचार लाख रुपये भरण्याची सूचना केली.
महिलेने खात्री न करताच आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे जमा केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा त्यांना विमा कंपनीतून फोन आला. विम्याची रक्कम भरण्याची सूचना त्यांना करण्यात आली. यावेळी विमा कंपनीतील अधिकाऱ्याने विम्याची रक्कम जमा झाली नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार महिलेने पूर्वीच्या अनोळखी नंबरवर पुन्हा फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अखेर महिलेने याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
डोंबिवली : मुंबईतील मालाडा मनोरी भागात आपण ९० बंगल्याचा रो हाऊस प्रकल्प बांधत आहोत. या प्रकल्पात गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत चांगला फायदा होईल या विकासक आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन डोंबिवलीतील कोपर गाव भागातील एक कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी ४४ लाख रूपयांची गुंतवणूक या रो बंगला प्रकल्पात केली.
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
कोहका-भानपूर जंगलात वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आले होते.
शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी
संगमनेर : शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत.
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
जळगाव : शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांचे निलंबन करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत ठाकरे गटाकडून नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती झालेली नाही. नावाच्या निश्चितीसाठी फक्त खलबते सुरू आहेत. दुसरीकडे, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन महिन्यांपूर्वी पक्षात ठाकरे गटातून दाखल झालेले जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांना जिल्हाप्रमुखपदाची संधी देत ठाकरे गटाला चांगलीच चपराक दिली आहे.
‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकांच्या कामाला मुदतवाढ; मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार
मुंबई : ‘दहिसर - मिरा - भाईंदर मेट्रो ९’ आणि ‘अंधेरी पूर्व - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ मार्गिकांची कामे सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून सुरु आहेत. या दोन्ही मार्गिकांच्या कामासाठी कंत्राटदारांना मुदवाढ देण्यात आली आहे. मेट्रो ९ मार्गिकेला जून २०२५ पर्यंत तर मेट्रो ७ अ साठी जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
डोंंबिवली : भारत देशात विविध पातळ्यांवर परिवर्तन सुरू आहे. यापूर्वीच्या पतनाकडून उत्थानाकडे होणारा हा परिवर्तनाचा प्रवास समाज, राष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारा आहे. देश, जगासमोर सन्मान वाढविण्याची संधी भारत देशाला मिळणार आहे. आपल्या मूळ हिंदू धर्म संस्कृतीचा विचार केला तर भारत सुपरपाॅवर नव्हे तर सुपरराष्ट्र होणे आवश्यक आहे.
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
पुणे : कात्रज, आंबेगाव भागात दहशत माजविणाऱ्या येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीतून अटक केली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) येनपूरे टोळीविरुद्ध कारवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर तो गेले दोन वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता.
बुलढाणा : वारी हनुमान संस्थानवर दरोडा, पुजाऱ्याला बांधून लाखोंचा ऐवज लंपास…
बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या आणि मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सुप्रसिद्ध वारी हनुमान संस्थान येथे आज धाडसी दरोडा पडला.
डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील कोळेगावात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी शिताफीने अटक केली आहे.
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्यातील ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर वारली चित्रकला, विपश्यना ध्यान साधना, शेती व्यवसायाची माहिती देणारी चित्रे रेखाटण्यात आली आहेत.
चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…
नागपुर येथील नंदकिशोर गवारकर यांच्या अभिजित इंटेलिजन्स, सिक्युरिटी ॲन्ड लेबर सप्लायर या कंपनीकडे नागभीडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.
वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; कोट्यवधींचा फ्लॅट असल्याचं उघड, महानगरपालिकेने बजावली नोटीस
सुमारे एक लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी वाल्मिक कराडच्या पिंपरी चिंचवडमधील फ्लॅटच्या दरवाज्यावर महापालिका कर संकलन विभागाकडून नोटीस लावण्यात आली आहे.
देवनारमध्ये वीजनिर्मिती वाढीस केंद्राचा विरोध; प्रकल्प मंजुरीनंतर वीजनिर्मिती क्षमता वाढवणे नियमबाह्य असल्याचा अभिप्राय
मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे. मूळ कंत्राटात कचऱ्यापासून प्रतिदिन ४ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार होती. मात्र त्याच कंत्राटांतर्गत प्रतिदिन ७ मेगावॅट वीज निर्मिती करता येईल, अशी तयारी महापालिका प्रशासनाने व कंत्राटदाराने केली होती.
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
मुंबई : म्हाडाने भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीपाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) येथे २६ मजली व्यावसायिक संकुल उभारले जाईल. या संकुलातील ५० टक्के जागा भाडेतत्वावरील कार्यालयांसाठी राखीव असणार आहेत.
‘आनंदवन’ला तीन कोटींचा निधी, उपमुख्यमंत्र्यांकडून तातडीची मदत; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
आनंदवन महारोगी सेवा समिती ही कुष्ठरुग्णांची तसेच अंध, अपंग, मुकबधीरांची सेवा करणारी संस्था बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी उभी केली.
डोंबिवलीत चोरी करत असताना चोरट्याला नागरिकांनी पकडले
पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीतील माहिती अशी की, तक्रारदार सुनीलकुमार आणि निखील सिंग हे दोघे सहकारनगर मधील एका घरात वास्तव्य करतात.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर काय म्हणाले अजित पवार? (फोटो-लोकसत्ता ऑनलाईन)
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड आणि खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. तसंच वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई आणि नवी मुंबईत येत आहेत. त्याआधी धनंजय मुंडे हे परळीला का गेले? याचीही चर्चा होते आहे.