Maharashtra News Updates, 21 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच राज्यातील प्रमुख शहरात ९६ लाख बोगस मतदार निर्माण केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून १ नोव्हेंबर रोजी विरोधकांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पुण्यातील जैन मंदिराच्या जमीन व्यवहाराचा मुद्दा तापला आहे. यावरून शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीतच जुंपली असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत वितरणास सरकारने मंजुरी दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत तब्बल १२,४३१ पुरुषांची घुसखोरी झाली असून वर्षभर त्यांनी पैसे लाटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यासह दिवसभरातील राजकीय व इतर सर्व महत्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Breaking News Today : राजकीय व इतर सर्व महत्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

17:47 (IST) 21 Oct 2025

ऐन दिवाळीत मिरारोड मध्ये तणावाचे वातावरण, दोन गटांत वाद ; वाहनांची केली तोडफोड

मिरा रोड येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यात ५० हून अधिक वाहनांची तोडफोड ही करण्यात आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
17:38 (IST) 21 Oct 2025

विरार मध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग; आगीत दुकान जळून खाक

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास विरार पूर्वेच्या आर जे नगर येथे फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. ...सविस्तर वाचा
16:19 (IST) 21 Oct 2025

पुण्यातील ‘जायका’ प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने का व्यक्त केली नाराजी ?

औंध येथील जैवविविधता उद्यानातील (बोटॅनिकल गार्डन) जागा ताब्यात घेण्यास महापालिकेला अपयश आल्यामुळे मुळा-मुठा शुद्धीकरण प्रकल्पाला (जायका) अडथळा निर्माण झाला आहे. ...सविस्तर वाचा
16:18 (IST) 21 Oct 2025
'काही राजकीय फटाक्यांच्या वाती आता विझल्या...', अर्जून खोतकरांची दानवे अन् गोरंट्याल यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

"जवळ काही फटाके आहेत, पण काही राजकीय फटाक्यांच्या वाती आता विझलेल्या आहेत. काही फटाके असतात ना की त्यांची वात जळते पण तो फटाका वाजत नाही. असे काही फटाके आहेत. असे काही नेते आहेत", अशी खोचक टीका अर्जून खोतकर यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि गोरंट्याल यांच्यावर केली. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

15:17 (IST) 21 Oct 2025

वाशीच्या बाजारावर कारवाईचा ‘खेळ’ , महापालिका पथकाला फेरीवाल्यांचा गुंगारा

वाशीचा मुख्य रस्ता अडवून बसणारे फेरीवाले, फटाके विक्रेत्यांवर महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयाने उशीरा का होईना कारवाई करण्यास सुरुवात केली. महापालिका पथकाची पाठ फिरताच पुन्हा याठिकाणी फेरीवाले गर्दी करत असल्याचे चित्र होते. ...वाचा सविस्तर
15:11 (IST) 21 Oct 2025

Navi Mumbai : नवी मुंबईतील 'या' गावात साजरी होते अनोखी दिवाळी; समुद्रातून शोधली जाते देवाची मूर्ती अन् अंगावर फटाके फोडून साजरा होतो सण...

नवीमुंबई शहरातील एक गाव असे आहे की, त्या गावात दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. या गावातील देव १२ महिने समुद्रात असतात. दिवाळीच्या दिवसात या देवाला समुद्रातून बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. ...सविस्तर वाचा
14:48 (IST) 21 Oct 2025

दिवाळीतील हवेमुळे ज्येष्ठांसह लहान मुलांना गंभीर धोका? तज्ज्ञ काय सांगतात…

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अतिखराब नोंदविण्यात आली आहे.  या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे ...सविस्तर वाचा
14:38 (IST) 21 Oct 2025

बोरिवलीत होणार साडीथॉन... पारंपरिक साडी नेसून चालण्याची स्पर्धा

बोरिवलीमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात साडी नेसून चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवात साडीथॉन स्पर्धा होणार आहे. ...सविस्तर बातमी
14:37 (IST) 21 Oct 2025

धाराशिव: दोन कारची समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू; कुत्रा आडवा आल्याने अपघात

कारसमोर एक कुत्रा आडवा आल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून थेट बाजूच्या रस्त्यावर गेली. ...सविस्तर बातमी
14:37 (IST) 21 Oct 2025

नाशिकची धावपटू कविता राऊतनंतर भूमिका नेहतेची चर्चा….कारण काय ?

बहारिन येथे तिसरी युवा क्रीडा स्पर्धा २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या संघामध्ये नाशिकच्या भूमिका नेहते हिची निवड झाली आहे. ...वाचा सविस्तर
14:08 (IST) 21 Oct 2025
भाजपा अजित पवारांना धक्का देणार? ३ माजी आमदार जाण्याच्या चर्चेवर संजय राऊत म्हणाले, “ऐसा कोई सगा नही जिसको…”

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन माजी आमदार भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लागलीच पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आज (२१ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी भरणे संवाद साधून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान या घडामोडीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी खोचक भाष्य केले आहे.

सविस्तर वाचा

12:31 (IST) 21 Oct 2025

दिवाळीनिमित्त ठाणे पालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम..,गायमुख ते कल्याण फाटापर्यंत केली स्वच्छता

ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवारी गायमुख ते कल्याण फाटा या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...वाचा सविस्तर
12:30 (IST) 21 Oct 2025

मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहनाच्या धडकेत कल्याणच्या तरुणाचा मृत्यू

याप्रकरणी राहुल यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर अवजड वाहन मालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...अधिक वाचा
12:30 (IST) 21 Oct 2025

मुंबईकरांना दिवाळीची आणखी एक गोड भेट…. कोकणचा हापूस एपीएमसीत दाखल

कोकणातून इतक्या लवकर वाशी मार्केटला हापूस आंब्यांची पेटी रवाना करणारे प्रकाश शिर्सेकर हे पहिल्याच बागायतदार ठरले असून, उद्याच्या विक्रीदरम्यान या आंबापेटीला विक्रमी भाव मिळेल, अशी बाजारपेठेत चर्चा आहे. ...वाचा सविस्तर
12:14 (IST) 21 Oct 2025

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाइल हिसकावणारे गजाआड; १९ मोबाइल संच जप्त

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडील मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून १९ मोबाइल संच आणि दुचाकी असा तीन लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
12:00 (IST) 21 Oct 2025

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपात प्रवेश करणार? मंत्री भरणे म्हणाले, "कोणताही नेता..."

"राजकारणात प्रत्येकजण आपल्या फायद्याच्या काही गोष्टींसाठी प्रयत्न करत असतात. मात्र, मला असं वाटत नाही की हे तीन माजी आमदार पक्ष सोडतील. कारण अजित पवार आणि या नेत्यांचं खूप चांगले संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही", असं मंत्री भरणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

11:44 (IST) 21 Oct 2025

उरण मार्गावरील रेल्वे स्थानकांची सुरक्षा धोक्यात

बहुप्रतीक्षित उरण ते नेरुळ/ बेलापूर ही लोकल सुरू होऊन २२ महिने झाले आहेत. मात्र या स्थानकांवर आणि स्थानक परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. ...वाचा सविस्तर
11:44 (IST) 21 Oct 2025

उरण मार्गावरील रेल्वे स्थानकांची सुरक्षा धोक्यात

बहुप्रतीक्षित उरण ते नेरुळ/ बेलापूर ही लोकल सुरू होऊन २२ महिने झाले आहेत. मात्र या स्थानकांवर आणि स्थानक परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. ...वाचा सविस्तर
11:41 (IST) 21 Oct 2025

सोन्याचे दरच नव्हे, वजनही महत्त्वाचं; जगात सध्या किती सोनं आहे माहिती आहे? ५० टक्के सोन्याचे तर फक्त दागिनेच बनलेत!

जगभरात आजतागायत किती सोनं खणून काढलं आहे माहिती आहे? विशेष म्हणजे, जेवढं खणलं, त्यातल्या निम्म्या साठ्याचे फक्त दागिने तयार झाले आहेत! ...वाचा सविस्तर
11:04 (IST) 21 Oct 2025

नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती सूचनांचा पाऊस; दुबार मतदारांच्या घरी भेट देण्यासाठी पथके

पुणे जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रारूप मतदारयादीवर तब्बल ५८ हजार ६९७ हरकती-सूचना जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ४१८ हरकती-सूचना निकाली काढण्यात आल्या आहेत. ...वाचा सविस्तर
10:46 (IST) 21 Oct 2025

मैलामिश्रित पाणी थेट ‘पवने’त; नागरी आरोग्य धोक्यात

चिखली, जाधववाडीतील जाधव कमानीपासून गेलेल्या नैसर्गिक नाल्यामध्ये सांडपाणी सोडल्याने परिसरातील गृहनिर्माण सोसायटीधारकांसह बैठ्या घरांमध्ये राहणाऱ्यांना दुर्गंधीसह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...अधिक वाचा
10:45 (IST) 21 Oct 2025

पिंपरी : तिन्ही अतिरिक्त पदे भरलेली असताना चौथ्या अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती; प्रशासनात संभ्रम

महापालिकेत तिन्ही अतिरिक्त आयुक्त कार्यरत असताना ठाकुर यांचा आदेश आल्याने प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...अधिक वाचा
10:45 (IST) 21 Oct 2025

मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील दोन अधिकारी निलंबित !

महापालिकेत आयुक्तपदी रुजू झालेल्या नवल किशोर राम यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वचक निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. ...सविस्तर वाचा
10:44 (IST) 21 Oct 2025

पुण्यात महायुतीत ‘एकला चलो’चा संदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एकला चलो’चा संदेश कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली आहे. ...अधिक वाचा
10:44 (IST) 21 Oct 2025

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाणे महापालिकेकडे राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यासाठी निधी नाही! भाजपचे अनोखे आंदोलन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेकडे राजमाता जिजाऊ यांचा पुतळा उभारणीसाठी पैसेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
10:43 (IST) 21 Oct 2025

दिघी बंदरात एक हजार हेक्टरवर हायटेक ड्रग पार्क; रामकी कंपनीची निवीदा मंजुरीच्या टप्प्यात, जमिनीसाठी ७१३ कोटींचा खर्च

या प्रकल्पातील पहिला टप्पा खासगी विकसकाच्या माध्यमातून विकसीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अैाद्योगिक विकास महामंडळाने घेतला ...सविस्तर वाचा
10:38 (IST) 21 Oct 2025

"संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जातो", संजय राऊत यांचं वक्तव्य

"संकटाच्या काळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो. ज्या अर्थी शरद पवारांनी जे सांगितलं आहे ते पाहता गेल्या अनेक वर्षांत ज्या काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा साराशं त्यांनी सांगितलेला आहे. मला तर पूर्ण माहिती आहे की पंतप्रधान मोदींना आणि अमित शाह यांना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली त्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे आहेत", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

10:38 (IST) 21 Oct 2025

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण नव्हे, ही तर ‘लाडके भाऊ’ योजना! १२,४३१ पुरुषांची योजनेत घुसखोरी; वर्षभर लाटले पैसे

Ladki Bahin Yojana: Ladki Bahin Yojana Benificiaries Fraud Cases: गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांपासूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चर्चेत आहे. कधी योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी, कधी अपात्र लाभार्थ्यांकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष तर कधी योजनेतील गैरव्यवहाराचे आरोप. या सर्व गोष्टींमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी या योजनेसंदर्भात वेळोवेळी वेगवेगळे दावे करण्यात आले. मात्र, आता खुद्द सरकारकडूनच माहिती अधिकारामध्ये योजनेसंदर्भातली धक्कादायक माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षभरापासून तब्बल १२ हजार ४३१ पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे अद्याप त्यांच्याकडून दिलेल्या पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही!

सविस्तर वाचा

Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण नव्हे, ही तर ‘लाडके भाऊ’ योजना! १२,४३१ पुरुषांची योजनेत घुसखोरी; वर्षभर लाटले पैसे, (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)