Maharashtra News Updates, 21 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच राज्यातील प्रमुख शहरात ९६ लाख बोगस मतदार निर्माण केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून १ नोव्हेंबर रोजी विरोधकांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पुण्यातील जैन मंदिराच्या जमीन व्यवहाराचा मुद्दा तापला आहे. यावरून शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून महायुतीतच जुंपली असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत वितरणास सरकारने मंजुरी दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत तब्बल १२,४३१ पुरुषांची घुसखोरी झाली असून वर्षभर त्यांनी पैसे लाटल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यासह दिवसभरातील राजकीय व इतर सर्व महत्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Breaking News Today : राजकीय व इतर सर्व महत्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
ऐन दिवाळीत मिरारोड मध्ये तणावाचे वातावरण, दोन गटांत वाद ; वाहनांची केली तोडफोड
विरार मध्ये फर्निचर दुकानाला भीषण आग; आगीत दुकान जळून खाक
पुण्यातील ‘जायका’ प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने का व्यक्त केली नाराजी ?
“जवळ काही फटाके आहेत, पण काही राजकीय फटाक्यांच्या वाती आता विझलेल्या आहेत. काही फटाके असतात ना की त्यांची वात जळते पण तो फटाका वाजत नाही. असे काही फटाके आहेत. असे काही नेते आहेत”, अशी खोचक टीका अर्जून खोतकर यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि गोरंट्याल यांच्यावर केली. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
वाशीच्या बाजारावर कारवाईचा ‘खेळ’ , महापालिका पथकाला फेरीवाल्यांचा गुंगारा
Navi Mumbai : नवी मुंबईतील ‘या’ गावात साजरी होते अनोखी दिवाळी; समुद्रातून शोधली जाते देवाची मूर्ती अन् अंगावर फटाके फोडून साजरा होतो सण…
दिवाळीतील हवेमुळे ज्येष्ठांसह लहान मुलांना गंभीर धोका? तज्ज्ञ काय सांगतात…
बोरिवलीत होणार साडीथॉन… पारंपरिक साडी नेसून चालण्याची स्पर्धा
धाराशिव: दोन कारची समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू; कुत्रा आडवा आल्याने अपघात
नाशिकची धावपटू कविता राऊतनंतर भूमिका नेहतेची चर्चा….कारण काय ?
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन माजी आमदार भाजपाचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लागलीच पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आज (२१ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी भरणे संवाद साधून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान या घडामोडीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी खोचक भाष्य केले आहे.
दिवाळीनिमित्त ठाणे पालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम..,गायमुख ते कल्याण फाटापर्यंत केली स्वच्छता
मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहनाच्या धडकेत कल्याणच्या तरुणाचा मृत्यू
मुंबईकरांना दिवाळीची आणखी एक गोड भेट…. कोकणचा हापूस एपीएमसीत दाखल
पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाइल हिसकावणारे गजाआड; १९ मोबाइल संच जप्त
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपात प्रवेश करणार? मंत्री भरणे म्हणाले, “कोणताही नेता…”
“राजकारणात प्रत्येकजण आपल्या फायद्याच्या काही गोष्टींसाठी प्रयत्न करत असतात. मात्र, मला असं वाटत नाही की हे तीन माजी आमदार पक्ष सोडतील. कारण अजित पवार आणि या नेत्यांचं खूप चांगले संबंध आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही”, असं मंत्री भरणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
उरण मार्गावरील रेल्वे स्थानकांची सुरक्षा धोक्यात
उरण मार्गावरील रेल्वे स्थानकांची सुरक्षा धोक्यात
सोन्याचे दरच नव्हे, वजनही महत्त्वाचं; जगात सध्या किती सोनं आहे माहिती आहे? ५० टक्के सोन्याचे तर फक्त दागिनेच बनलेत!
नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती सूचनांचा पाऊस; दुबार मतदारांच्या घरी भेट देण्यासाठी पथके
मैलामिश्रित पाणी थेट ‘पवने’त; नागरी आरोग्य धोक्यात
पिंपरी : तिन्ही अतिरिक्त पदे भरलेली असताना चौथ्या अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती; प्रशासनात संभ्रम
मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील दोन अधिकारी निलंबित !
पुण्यात महायुतीत ‘एकला चलो’चा संदेश
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाणे महापालिकेकडे राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यासाठी निधी नाही! भाजपचे अनोखे आंदोलन
दिघी बंदरात एक हजार हेक्टरवर हायटेक ड्रग पार्क; रामकी कंपनीची निवीदा मंजुरीच्या टप्प्यात, जमिनीसाठी ७१३ कोटींचा खर्च
“संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जातो”, संजय राऊत यांचं वक्तव्य
“संकटाच्या काळात सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला जात असतो. ज्या अर्थी शरद पवारांनी जे सांगितलं आहे ते पाहता गेल्या अनेक वर्षांत ज्या काही घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा साराशं त्यांनी सांगितलेला आहे. मला तर पूर्ण माहिती आहे की पंतप्रधान मोदींना आणि अमित शाह यांना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली त्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण नव्हे, ही तर ‘लाडके भाऊ’ योजना! १२,४३१ पुरुषांची योजनेत घुसखोरी; वर्षभर लाटले पैसे
Ladki Bahin Yojana: Ladki Bahin Yojana Benificiaries Fraud Cases: गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांपासूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चर्चेत आहे. कधी योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी, कधी अपात्र लाभार्थ्यांकडे करण्यात आलेलं दुर्लक्ष तर कधी योजनेतील गैरव्यवहाराचे आरोप. या सर्व गोष्टींमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी या योजनेसंदर्भात वेळोवेळी वेगवेगळे दावे करण्यात आले. मात्र, आता खुद्द सरकारकडूनच माहिती अधिकारामध्ये योजनेसंदर्भातली धक्कादायक माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, गेल्या वर्षभरापासून तब्बल १२ हजार ४३१ पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे अद्याप त्यांच्याकडून दिलेल्या पैशांच्या वसुलीसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही!
लाडकी बहीण नव्हे, ही तर ‘लाडके भाऊ’ योजना! १२,४३१ पुरुषांची योजनेत घुसखोरी; वर्षभर लाटले पैसे, (फोटो-प्रतिकात्मक छायाचित्र)
