scorecardresearch

Premium

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Today : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा आणि महत्त्वाच्या घडामोडी

Marathi Batmya Live Today
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Maharashtra Breaking News Today, 04 December 2024: राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांचे निकाल लागले आहेत. चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर या निकालांवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्या जिंकलेल्यांचं अभिनंदन करतो असं उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा म्हटलं आहे. तसंच आता महाराष्ट्रात याच असंही म्हटलं आहे. तर असा निकाल लागणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. आज संजय राऊत यांनी निकालांविषयी बोलताना भाजपाचं अभिनंदन केलं.. आणि मोदी है तो भाजपा है.. मोदींना वगळलं तर भाजपा काय आहे? असा खोचक प्रश्न विचारला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिंधुदुर्गात आगमन होणार आहे. यासह राज्यातल्या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Eknath Shinde and J P Nadda
महायुतीच्या जागावाटपाचा पेच सुटला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यात एक तास चर्चा
dcm devendra fadnavis on maratha reservation solution
‘मागची दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी’, मोदींच्या तिसऱ्या टर्मबद्दल फडणवीस म्हणाले…
Accusation between Uddhav Thackeray and Devendra Fadnavis in Abhishek Ghosalkar murder case
गोळय़ा मॉरिसने झाडल्या की अन्य कुणी? उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
solapur ajit pawar marathi news, ajit pawar latest marathi news, ajit pawar supriya sule latest marathi news,
“सुप्रिया सुळेंच्या मागणीवर उत्तरासाठी आपण बांधील नाही”, अजित पवारांचे भाष्य
Live Updates

Latest Latest Maharashtra News Updates| “मोदी है तो भाजपा है..”, निकालांवरुन संजय राऊत यांचा टोला; यासह महत्त्वाच्या बातम्या

19:31 (IST) 4 Dec 2023
विजयी जल्लोषानंतरचा ‘राडा’ भोवला, २३ कार्यकर्त्यांविरुद्ध दंगलीचा गुन्हा…

भाजपाच्या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा होत असताना मेहकर येथे भाजपाच्या दोन गटात राडा झाला.

सविस्तर वाचा…

19:18 (IST) 4 Dec 2023
भंडारा : पक्ष विरोधी हालचाली भोवल्या! भाजपच्या दोन नेत्यांचे निलंबन

भंडारा : निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या दोन नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्ष विरोधी हालचाली तसेच नियोजित बैठकांना नित्यची अनुपस्थिती व पक्ष श्रेष्ठींच्या आदेशांचे उल्लंघन करण्याचा ठपका ठेवून भाजपच्या या दोन प्रमुख नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे यांनी पत्र परिषदेतून याबाबत माहिती दिली. पंचायत समिती सभापती नंदु रहांगडाले तथा पंचायत समिती सदस्या पल्लवी कटरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अधिकृत पत्र प्रसार माध्यमांना देण्यात आले.

19:13 (IST) 4 Dec 2023
पुणे : दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसे नेत्याकडे व्यापारी महासंघाने मागितली काही दिवसांची मुदत

दुकानावर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेकडे पुणे व्यापारी महासंघाने काही दिवसांची मुदत मागितली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील व्यापारी महासंघाचे पदाधिकारी लवकरच भेट घेणार आहेत. मनसेचे नेते अनिल शिदोरे, मनसेचे नेते बाबू वागसकर, मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि व्यापारी महासंघ अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील,अरविंद कोठारी यांच्यात जवळपास तासभर बैठक चालली होती.

19:12 (IST) 4 Dec 2023
शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटाचा पोलिस ठाण्यातच तुफान राडा; कार्यकर्त्यांची एकमेकांना मारहाण, पोलिसांनाही धक्काबुक्की

शिवसेनेच्या (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) गटात काल रविवारी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तुफान राडा झाला.

सविस्तर वाचा…

18:54 (IST) 4 Dec 2023
पिंपरी-चिंचवड: चार पिस्तुले आणि १० जीवंत काडतुसे जप्त; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई, मध्यप्रदेश येथून आणली होती पिस्तुले

पिंपरी-चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने चार पिस्तूले आणि दहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. हे पिस्तूले सहा ते सात महिन्यापूर्वी मध्यप्रदेश या ठिकाणाहून आणले होते. याप्रकरणी हरीश काका भिंगारे, गणेश बाळासाहेब कोतवाल, शुभम जगन्नाथ पोखरकर आणि अरविंद अशोक कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हरीश भिंगारे हा मूळचा उरवाडे या ठिकाणचा असून त्या ठिकाणी स्थानिक व्यक्तीशी शेत जमिनीच्या हक्कावरून वाद झाला होता, म्हणून तो पिस्तूल बाळगत असल्याचं समोर आलं आहे.

18:49 (IST) 4 Dec 2023
नालासोपार्‍यात एकाच वेळी १० घरांमध्ये चोरीचा प्रयत्न, नागरिक भयभीत

नालासोपारा पूर्वेच्या तुळींज गावातील सेवालाल नगर येथे सोमवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा…

18:26 (IST) 4 Dec 2023
ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टर गजाआड

पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरगळे याना गुन्हे शाखेने अटक केली. ललित पाटील प्रकरणांत यापूर्वी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह कारागृहातील रक्षकासह समुपदेशकाला गुन्हे शाखेने अटक केली होती.

सविस्तर वाचा…

18:21 (IST) 4 Dec 2023
मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधिंचा विरोध; अन्य मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधिंचा विरोध; अन्य धर्मीय येतील या भीतीने प्रकल्पाला विरोध येतील या भीतीने प्रकल्पाला विरोध

मुंबई: मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधताना कोणताही आर्थिक घोटाळा झालेला नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी मुलुंडमधील भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाला पुन्हा एकदा विरोध केला आहे.

सविस्तर वाचा…

18:12 (IST) 4 Dec 2023
कोल्हापुरात मनसेने इंग्रजी फलकांना काळे फासले

दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात या मागणीसाठी सोमवारी कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली.

सविस्तर वाचा…

17:57 (IST) 4 Dec 2023
पालघर पंचायत समिती पोट निवडणूक बिनविरोध

पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ अवघ्या वर्षभराचा राहणार असल्याने बहुजन विकास आघाडी तसेच शिवसेना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ही पोटनिवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न केले होते.

सविस्तर वाचा…

17:57 (IST) 4 Dec 2023
“राजीनामा देण्याची भाषा करणारे कुणीही राजीनामा देत नसतात”, चंद्रकांत पाटील यांचे भाष्य

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्षात राजीनामा कोणी देत नसतो, अशा शब्दांत आमदार देशमुख यांना घरचा आहेर दिला.

सविस्तर वाचा…

17:55 (IST) 4 Dec 2023
कैद्याने उच्च न्यायालयात केली ‘हृदया’च्या आजाराची तक्रार, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला…

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका कैद्याने हृदयाचा आजार असल्याची तक्रार कारागृह प्रशासनाकडे केली.

सविस्तर वाचा…

17:53 (IST) 4 Dec 2023
हे काय! झिम्बाब्वेतील झाडे चक्क बोलायला लागली, महाराष्ट्रातील प्राध्यापकाची किमया

झिम्बाब्वेमधील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नालॉजी’ (एनयुएसटी – नस्ट) परिसरातील झाडेसुद्धा आता बोलायला लागली आहेत.

सविस्तर वाचा…

17:51 (IST) 4 Dec 2023
नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘स्वच्छ शौचालय अभियान’

नवी मुंबई: स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई महानगरपालिका केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच अभियानांमध्ये पुढाकार घेऊन काम करताना दिसते. अशाच प्रकारे केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ शौचालय अभियान’ कार्यक्रमातही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका उत्साहाने सहभागी झालेली आहे.

१९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिवसापासून अभियानाला प्रारंभ झाला असून २५ डिसेंबर या सुशासन दिनापर्यंत अभियान कालावधी असणार आहे. या पाच आठवड्यांच्या कालावधीत सर्व शौचालयांमध्ये स्वच्छता व देखभाल विशेष मोहीम राबवली जाणार असून शौचालयांमध्ये ‘कार्यान्वित, प्रवेशयोग्य, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित’ अशा बाबींनुसार शौचालय तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिला बचत गटांद्वारे शौचालयांची तपासणी करण्यात येणार असून त्याची वर्गवारी केली जाणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरणही केले जाणार आहे. यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात येत असून त्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला बचत गटांचे हे तपासणी समूह शौचालयांना भेटी देऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत दिलेल्या निकषानुसार त्यांचे मूल्यांकन करून शौचालयांना श्रेणी देतील. याप्रमाणेच ‘स्वच्छ शौचालय चॅलेंज’ जाहीर करण्यात आले असून ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर हा या अभियानाचा कालावधी आहे. या अंतर्गत स्वच्छ शौचालयांना ‘स्वच्छ भारत सार्वजनिक शौचालय’ असा गुणवत्तेचा दर्जात्मक शिक्का प्राप्त होणार आहे.

अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी विविध शौचालयांना भेटी देत तेथील देखभाल करणाऱ्यांना अधिक गुणात्मक काम करण्याच्या सूचना दिल्या व शौचालयातील स्वच्छतेची आणि सुविधांची पाहणी केली.

स्वच्छता विषयक नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी नवी मुंबई महानगरपालिका या स्वच्छ शौचालय अभियानाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय, माहिती शिक्षण व प्रसारासाठी वॉल स्ट्रक्चर उभारणी, स्वच्छतागृहातील वर्तनाविषयी जागरूकता, प्रभागातील शौचालयांच्या स्थितीविषयी चर्चा तसेच शौचालयांची देखभाल करणाऱ्या केअरटेकरला बेस्ट केअर टेकर पुरस्कार देऊन गौरविणे असे नानाविध उपक्रम राबविणार आहे.

नवी मुंबई शहरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व नवी मुंबईला विविध कारणांमुळे भेटी देणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाची शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून महानगरपालिकेची सर्व शौचालय गुगल मॅप वर सहजपणे उपलब्ध आहेत व नागरिकांच्या वापरासाठी त्यांचा गुणात्मक दर्जा कायम राहील याच्याकडेही लक्ष दिले जात आहे.

17:40 (IST) 4 Dec 2023
नाशिक : सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस, दोन जण ताब्यात

शहरातून सोनसाखळी चोरी करणाऱ्या नोंदीवरील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या वतीने शहर परिसरातील सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी काम सुरू आहे.

पोलीसांनी सापळा रचत महेश जाधव (२४, रा.चेहडी पंपिंग स्टेशन), भारत उर्फ सोनु चावरे (३१, रा. लाखलगाव) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बंदूक, पाच जिवंत काडतुस, चाकू, दुचाकी असा ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी मु्देमाल आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिला असून संशयित महेशने सोनसाखळी चोरीची कबुली दिली.

शहर परिसरातील उपनगरमध्ये सहा, नाशिकरोड परिसरात दोन, म्हसरूळ परिसरात दोन, पंचवटी परिसरात एक, मुंबई नाका येथे एक याप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली. सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

17:38 (IST) 4 Dec 2023
डोंबिवलीत बेकायदा इमारत नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे, अधिकृत होण्यापूर्वीच माफियांकडून घरांची विक्री

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागातील राहुल नगर मध्ये भूमाफियांनी तीन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या इमारतींना ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी दोन महिन्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा पाठविल्या होत्या.

सविस्तर वाचा…

17:38 (IST) 4 Dec 2023
नवी मुंबई : १४ डिसेंबरला माथाडी कामगारांचा एक दिवसाचा राज्यव्यापी संप

नवी मुंबई: माथाडी कामगार कायद्याची पायमल्ली होत असल्याने १४ डिसेंबरला राज्यव्यापी एकदिवासिय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपात प्रथमच भाजी पाला , फळ मार्केट तसेच खाजगी कंपनीतील कामगारही संपावर जाणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

वाचा सविस्तर…

17:29 (IST) 4 Dec 2023
VIDEO: बेस्टच्या वांद्रे आगारात उपहारगृहाअभावी वाहक आणि चालकांचे हाल; बसगाडीतच बसून जेवण करीत असल्याची चित्रफीत प्रसारित

मुंबई: बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या बस आगारांमधील उपहारगृहांची दुर्दशा झाली असून बस वाहक आणि चालकांना बसगाडीतच बसून जेवणाचा डबा खावा लागत आहे. सविस्तर वाचा…

17:21 (IST) 4 Dec 2023
नौदलाला नौदल दिनाच्या माझ्याकडून शुभेच्छा-पंतप्रधान नरेंद्र मोदी

मालवण आणि तार्कर्लीचा हा सुंदर समुद्र किनारा, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि इथलं वातावरण हे भारतात नवा जोश निर्माण करतं आहे. झुकू नका, थांबू नका पुढे चाला हा मंत्र नौदलाने दिला आहे. आज मी नौदलाच्या अधिकाऱ्यांना नेव्ही दिवसाच्या शुभेच्छा देतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.

17:17 (IST) 4 Dec 2023
कल्याणमधील मायलेकांच्या हत्येमागचे नवे कारण समोर; प्रेमसंबंध आणि कर्जामुळे हत्या केल्याचा मृत महिलेच्या भावाचा आरोप

कल्याण: कल्याण येथील रामबाग परिसरात राहणाऱ्या अश्विनी गायकवाड आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा आदिराज या दोघांच्या हत्येचे नवे कारण आता समोर आले आहे.

सविस्तर वाचा…

17:10 (IST) 4 Dec 2023
गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवस्पर्शाने पावन झालेल्या भूमित मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करतो. नौदलाचे सगळे अधिकारी आणि बंधू भगिनी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणा मोदी मॅजिक सगळ्यांनीच पाहिलं. त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आहे. जो विजय भाजपाला मिळालं आहे त्यामुळे देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी आहे हे लोकांनी दाखवून दिलं आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

17:04 (IST) 4 Dec 2023
नागपूर : मेट्रो प्रशासनाला विद्रुपीकरणाचा धाक, दिला कारवाईचा इशारा

मेट्रो खांबांवर नेत्यांचे स्वागत फलक, पोस्टर लावण्याचे प्रयत्न अधिवेशन काळात केले जातात.

सविस्तर वाचा…

17:04 (IST) 4 Dec 2023
नारायण राणेंनी सांगितला हिरोजी इंदुलकरांचा किस्सा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा परिसर पाहिला आणि हिरोजी इंदुलकरांना हा किल्ला बांधायला सांगितला. रायगडही हिरोजी इंदुलकरांनी बांधला आहे. किल्ल्यांचं काम पाहिल्यानंतर छत्रपती शिवराय हिरोजींनी म्हणाले तुम्हाला काय देऊ? त्यावर हिरोजी म्हणाले मला काही नको. परत छत्रपती शिवराय म्हणाले काय हवं ते मागा. त्यावर हिरोजी म्हणाले जरेश्वर मंदिराच्या शेवटच्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची संमती द्या. मला तुमच्या पायाशी असू द्या असे त्यावेळचे मावळे होते असं नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.

16:53 (IST) 4 Dec 2023
केवळ एका अटीमुळे गिरणी कामगारांवर अपात्रतेची टांगती तलवर; म्हाडाकडून घर मिळणार की नाही…

मुंबई: म्हाडातर्फे गिरणी कामगारांना घरे देण्यात येणार असून त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत. घराच्या पात्रतेसाठी १९८२ मध्ये कामावर हजर असल्याचा पुरावा सादर करण्याची अट गिरणी कामगारांना घालण्यात आली असून ही अट जाचक ठरू लागली आहे.

सविस्तर वाचा…

16:43 (IST) 4 Dec 2023
देवेंद्र फडणवीसांचा जन्म अन् गडकरी या रुग्णालयात बचावले! राष्ट्रपतींपुढे सांगितला किस्सा…

मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून नागपुरातील मेडिकलची ख्याती आहे.

सविस्तर वाचा…

16:41 (IST) 4 Dec 2023
मुख्यमंत्रीपदी कोण हे जास्त आमदार असलेला पक्ष ठरवेल; आमदार संजय गायकवाड म्हणाले, ‘बावनकुळेंची…’

विधानसभेतील २८८ आमदार मराठा आरक्षणाची मागणी करतील असा आशावाद गायकवाड यांनी बोलून दाखविला.

सविस्तर वाचा…

16:33 (IST) 4 Dec 2023
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची X पोस्ट चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने नारायण राणेंनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो आहे. याचा विशेष आनंद आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा होतो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

16:29 (IST) 4 Dec 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांचीही उपस्थिती होती. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

16:15 (IST) 4 Dec 2023
राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याचा राजीनामा; जाणून घ्या कारण

पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. आयोगाचे योगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे महिनाभरात आयोगातील तीनजणांनी राजीनामा दिला आहे.

सविस्तर वाचा…

15:47 (IST) 4 Dec 2023
डोंबिवलीतील कचरा वाहनावरील चालकाच्या हल्लेखोरांना अटक; बेकायदा बांधकामातील व्यवहारातून हल्ला झाल्याची चर्चा

डोंंबिवली: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कचरा वाहनावरील एका वाहन चालकावर गेल्या आठवड्यात पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर हल्ला झाला होता. धारदार शस्त्राने केलेल्या या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी झाला होता.

सविस्तर वाचा…

15:41 (IST) 4 Dec 2023
महाराष्ट्रात काँग्रेसची लाट – नाना पटोले

महाराष्ट्रात काँग्रेसची लाट असल्याचे दिसून येते, पुढील निवडणुकीत त्यांचा परिणाम दिसेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

सविस्तर वाचा…

15:34 (IST) 4 Dec 2023
‘या’ चार जिल्ह्यांत आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचा थरार, उल्का वर्षाची पर्वणी; जाणून घ्या कुठे, केव्हा…

अमेरिका, रशियासह पंधरा देशांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्याधुनिक अंतराळ संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले.

सविस्तर वाचा…

15:14 (IST) 4 Dec 2023
नाशिक : शेतकऱ्यांसाठी ठाकरे गटही मैदानात; बैलगाड्या, ट्रॅक्टरद्वारे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नाशिक :अवकाळी पाऊस आणि गारपिटीत शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी सोमवारी शिवसेना ठाकरे गटाने अनेक बैलगाड्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

वाचा सविस्तर…

15:13 (IST) 4 Dec 2023
‘एमपीएससी’ : ‘महाज्योती’चे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण; कर सहायक, पीएसआय, एएसओ पदावर होणार रुजू

विद्यार्थांना उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळेच ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.

सविस्तर वाचा…

15:06 (IST) 4 Dec 2023
मेट्रोचे काम करताना बाणेर परिसरात हातबॉम्ब सापडले

पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरात खोदकामात जुने हातबॉम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. बॉम्ब जागेवरच निकामी करण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

14:59 (IST) 4 Dec 2023
पालघर : बिबट्याचा वावर अभ्यासण्यासाठी १० ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर, नागरिकांमध्ये जनजागृती

बिबट्याने एका लहान मुला व्यतिरिक्त इतर कोणावरही हल्ला केल्याची घटना घडली नसल्याने संबंधित भागात जनजागृती करण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

14:38 (IST) 4 Dec 2023
जिल्हा न्यायालयांत ४६२९ पदांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील ४६२९ पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती २०२३ जाहीर झाली आहे.

सविस्तर वाचा…

14:31 (IST) 4 Dec 2023
धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून दोन विद्यार्थ्यांनी संपविले जीवन

दोन विद्यार्थ्यांनी अगदी क्षुल्लक कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली.

सविस्तर वाचा…

14:17 (IST) 4 Dec 2023
बोईसर : तारापूरच्या प्रदूषणाविरोधात खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

काही दिवसांपूर्वी पालघर तालुक्यातील नवापूर आणि मुरबे खाडी किनारी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार समोर आला होता.

सविस्तर वाचा…

14:10 (IST) 4 Dec 2023
नवी मुंबई: बहिण भावाला भेटण्यास गेली आणि तेवढ्यात साडेचार लाखांची घरफोडी झाली

नवी मुंबई: गावाहून आलेल्या आपल्या भावास घरी घेऊन येण्यासाठी बहीण गेली. मात्र घरी येऊन पाहताच दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोराने घरात प्रवेश करीत  ४ लाख ५५ हजार ६४१ रुपयांचा ऐवज चोरी केला होता.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 4 Dec 2023
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील भूमिपुत्रांचा लढा; महायुतीच्या आमदारांचा पाठिंबा

पिंपरी: तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या आहेत त्या भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी हिवाळी अधिवेशनात आम्ही तिन्ही आमदार एकत्रितपणे पाठपुरावा करणार आहोत.

सविस्तर वाचा…

12:56 (IST) 4 Dec 2023
एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! शिवाजीनगर स्थानकाला अखेर मुहूर्त

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) शिवाजीनगर स्थानक वाकडेवाडीला हलवल्यानंतर चार वर्षांनी अखेर ते मूळ जागी उभारण्याचा निर्णय झाला आहे.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 4 Dec 2023
मंदिर विश्वस्तांच्या निवडीवरून आळंदीकर नाराज; स्थानिकांना डावलल्याचा आरोप करत आळंदी बंदची हाक

ऐन कार्तिकी यात्रा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान बंदची हाक दिल्याने लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ शकते.

सविस्तर वाचा…

12:54 (IST) 4 Dec 2023
गोंदिया : ११२६ हेक्टर सरकारी जमिनीवर अतिक्रमण; २० हजार घरे बांधली

गोंदिया जिल्ह्यात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

सविस्तर वाचा…

12:36 (IST) 4 Dec 2023
आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाकडून सराफावर कोयत्याने वार

पुणे: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले आहे. लष्कर भागात शनिवारी रात्री सराफ व्यावसायिकावर दोघांनी कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली.

सविस्तर वाचा….

12:34 (IST) 4 Dec 2023
एनएमएमएसएस शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ; ३१ डिसेंबरपर्यंत संधी

पुणे: शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या एनएमएमएसएस शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 4 Dec 2023
चारित्र्याच्या संशयातून पतीकडून महिलेवर चाकूने वार

अशोक लक्ष्मण आढाव (वय ३१, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 4 Dec 2023
‘एमपीएससी’, ‘पीडब्‍ल्‍यूडी’ची परीक्षा एकाच दिवशी! उमेदवारांमध्‍ये संभ्रम

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) महाराष्‍ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्‍त मुख्‍य परीक्षा येत्‍या १७ डिसेंबरला नियोजित आहे.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 4 Dec 2023
सावधान! विदर्भावर पुन्हा अवकाळीचे संकट, येत्या २४ तासांत पावसाची शक्यता

येत्या २४ तासांत विदर्भाला पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 4 Dec 2023
“काँग्रेसने लहान घटकांना विश्वासात घेतलं नाही, आघाडी पुढे घेऊन जायची असेल तर…”, संजय राऊतांचं विधान चर्चेत

देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यापैकी तीन राज्यांत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर, काँग्रेसला केवळ एका राज्यावर समाधान मानावं लागलं आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला यश मिळवण्याची पूर्ण संधी होती. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने चांगल्या मताधिक्क्याने भाजपावर विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसचा हाच करिष्मा पुन्हा मध्य प्रदेशात होण्याची शक्यता होती. परंतु, काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. ते आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

सविस्तर वृत्त वाचा

narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोकण दौरा (संग्रहित छायाचित्र)

राऊत यांनी निकालांविषयी बोलताना भाजपाचं अभिनंदन केलं.. आणि मोदी है तो भाजपा है.. मोदींना वगळलं तर भाजपा काय आहे? असा खोचक प्रश्न विचारला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सिंधुदुर्गात आगमन होणार आहे. यासह राज्यातल्या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra news live political news narendra modi sindhudurg visit today navy day 04 december 2023 scj

First published on: 04-12-2023 at 11:38 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×