Top Marathi News Updates, 27 August 2026: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्लीत ज्याप्रकारे आंदोलन झाले. त्याप्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते की काय? असे चित्र सध्या दिसत आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी झालेल्या परीक्षेचा पेपरफुटीचे प्रकरण आता उजेडात आले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तर पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विभागाच्या वसतीगृहाचे विद्यार्थी गेले १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. १४ ऑगस्ट रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांनी केली असली तरी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. विद्यार्थी म्हणाले की, आमच्या १४ मागण्या आहेत. या मागण्या एकमेकांशी संबंधित आहेत. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे आम्ही सरकारला कळवले आहे.

काँग्रेस नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र अससल्याचा आरोप केला. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत वडेट्टीवार यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले. तसेच, आरोप सिद्ध करावा अन्यथा जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. यानंतर आता वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाल्याचे सांगत खेद व्यक्त केला आहे.

दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारवर टीका केली असून मुंबईतील आंदोलनावर निर्बंध लादल्याबद्दल त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत यावेळी आम्ही जाणारच आणि तिथे रात्र-दिवस बसणार. मुंबईकरांनी आम्हाला १०-१५ दिवस सांभाळून घ्यावे, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Live Updates

Latest Marathi News Live Updates, 27 August 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स

19:40 (IST) 27 Aug 2026

बँकांना ९९.९७ टक्क्यांचा गंडा! २२ हजार कोटींच्या थकबाकीवर सुभाष चंद्रा चुकवणार अवघे ६.२५ कोटी

एस्सेल समूहाचे संस्थापक आणि माध्यम उद्योजक सुभाष चंद्रा यांच्या वैयक्तिक कर्ज थकबाकी प्रकरणात ‘राष्ट्रीय कंपनी कायदे न्यायाधिकरणा’ने (एनसीएलटी) बँकिंग जगताला थक्क करणारा निर्णय दिला. ...सविस्तर बातमी
19:18 (IST) 27 Aug 2026

सण-उत्सवकाळात मध्य रेल्वेचा १५ दिवस रात्रकालीन ब्लॉक; टिटवाळा, कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास रखडणार

रक्षाबंधन, गोपाळकाला व गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेने १५ दिवसांचा रात्रकालीन ब्लाॅकचे नियोजन केले आहे. ...वाचा सविस्तर
19:05 (IST) 27 Aug 2026

बीएलओसाठी नियुक्त शिक्षकांना ‘अर्जित रजा’ मिळणार, सेवा पुस्तिकेत अर्जित रजेची नोंद करण्याबाबत प्रधान सचिवांकडे प्रस्ताव

जनगणना व बीएलओच्या कामासाठी राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित शाळांमधील शिक्षकांची मे महिन्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ...अधिक वाचा
18:58 (IST) 27 Aug 2026

प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य; "अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी वर्षभराने आणखी मुदत मागू नये, मराठी शिकणं अनिवार्य"

मुंबईसह महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदत दिली आहे. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी बोलता आलं पाहिजे यासाठी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मराठी भाषा शिकण्यासाठीचं अभियान सुरु केलं आहे. जे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक मुंबईत येतात त्यांना जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणून आम्ही हे अभियान सुरु ठेवलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यानंतर जर तुम्ही परत निर्णय मागाल तर ते योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला बंधनकारक असतो. पण आमच्या अभिनयातून त्यांना मराठी शिकावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय दिला आहे तर तो आम्हाला बंधनकारक आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

18:54 (IST) 27 Aug 2026

गणेशोत्सवासाठी मुंबई-मडगावदरम्यान चार विशेष रेल्वेगाड्या

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - मडगावदरम्यान चार गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...अधिक वाचा
18:52 (IST) 27 Aug 2026

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबईसह राज्यभरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या सगळ्यांना जुजबी मराठी शिकण्याठी सरकारने एक वर्षाची मुदत दिली आहे. या वर्षभरात कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मराठी शिकण्यासाठी आम्हाला वेळ वाढवून द्या अशी मागणी करत रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यांच्या भेटीनंतर जी चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.

18:46 (IST) 27 Aug 2026

जळगाव : म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मिळणार गती; ४५.८२ कोटींच्या सुधारित खर्चाला मान्यता

तालुक्यातील म्हसावद आणि परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी तसेच वाहनधारकांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...सविस्तर बातमी
18:41 (IST) 27 Aug 2026

OBC प्रमाणपत्रावरुन आधी सुप्रिया सुळेंवर केले आरोप, नंतर विजय वडेट्टीवारांचा माफीनामा; म्हणाले, "खेद..."

Vijay Wadettiwar Apologizes Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. ...सविस्तर वाचा
18:36 (IST) 27 Aug 2026

मुंबई-सुभेदारगंज विशेष रेल्वेगाडीचे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर, आठवड्याला १,८०० हून अधिक प्रवाशांना फायदा

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-सुभेदारगंज विशेष रेल्वेगाडीचे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ही गाडी आता नियमित साप्ताहिक सेवेत दाखल करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
18:10 (IST) 27 Aug 2026

सांगली: वृद्धांना दर्शनाचे आमिष दाखवून दागिने लुटणारा अटकेत; आठ गुन्हे उघड

मिरज तालुक्यातील बेळंकी येथे १६ ऑगस्ट रोजी एक वृद्ध महिला रस्त्यावर थांबली असताना आरोपीने दुचाकीवरून येऊन आपण पुजारी असल्याचे सांगितले. ...सविस्तर बातमी
18:02 (IST) 27 Aug 2026

डोंबिवलीत ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे दोन कामगार गंभीर जखमी

डोंबिवलीत बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेची पुरेशी साधने न पुरवल्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक पर्यवेक्षक आणि एक मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ...अधिक वाचा
18:00 (IST) 27 Aug 2026

सिंहस्थ कुंभमेळा ठरणार महिलांसाठी रोजगाराची पर्वणी; १० हजारांहून अधिक महिलांना संधी

सिंहस्थ कुंभमेळ्यात तीनपेक्षा अधिक पर्वणी आहेत. या पर्वण्यांमध्ये स्नानासाठी देश, विदेशातून भाविक, पर्यटक येणार आहेत. ...अधिक वाचा
17:24 (IST) 27 Aug 2026

कोल्हापुरात १०० कोटींचे रस्ते तरीही खड्डेच खड्डे; ठाकरेसेनेकडून खड्ड्यात वृक्षारोपण

कोल्हापूर शहरात गेल्या वर्षभरात शेकडो कोटी निधी रस्त्यांसाठी आला. त्या संदर्भात स्थानिक नेत्यांनी बॅनरबाजी ही जोरदार केली. ...सविस्तर वाचा
17:15 (IST) 27 Aug 2026

सेवानिवृत्तांच्या पेन्शनची पुनर्रचना करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

खंडपीठाने नमूद केले की, याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट खंडपीठ आणि मुख्य खंडपीठ (मुंबई) यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशांशी पूर्णपणे साधर्म्य राखणारा आहे. ...सविस्तर बातमी
17:07 (IST) 27 Aug 2026

एक लाख परदेशातील विद्यार्थी राज्यात शिक्षण घेण्याचे उद्दिष्ट

राज्यातील विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण रोखून परदेशी विद्यार्थी महाराष्ट्रात अधिकाधिक येतील, या दृष्टीने एक पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
16:52 (IST) 27 Aug 2026

नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ८० हून अधिक पर्यटक अडकले; चौघांशी संपर्क, जळगावच्या कुटुंबाशीही संपर्क

नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या शोधासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली. ...वाचा सविस्तर
16:45 (IST) 27 Aug 2026

गोवेलीच्या जीवनदीप महाविद्यालयाला युवक महोत्सवात सर्वंकष चॅम्पियनशिप

मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवक महोत्सवात कल्याणजवळील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयाने झोन-६ चे सर्वंकष अजिंक्यपद पटकावले आहे. ...सविस्तर वाचा
16:32 (IST) 27 Aug 2026

सोलापुरात उच्चदाब टॉवरवर चढलेल्या मनोरुग्णाला सुखरूप उतरवले; पाच तास वीजपुरवठा खंडित

सकाळी सुमारे १० ते ११ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती या टॉवरवर चढल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ...अधिक वाचा
16:28 (IST) 27 Aug 2026

‘केडीएमटी’च्या बस बिघाडामुळे डोंबिवली एमआयडीसीतील प्रवाशांची दैना

डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौक ते एमआयडीसी दरम्यान धावणाऱ्या 'केडीएमटी'च्या बसेसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने नोकरदार व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. ...अधिक वाचा
16:24 (IST) 27 Aug 2026

सतेज पाटील - आमदार शिवाजी पाटील यांच्यातील भेटीने गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीला वेगळे वळण

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. ...सविस्तर बातमी
16:24 (IST) 27 Aug 2026

तोच ऑगस्ट महिना, तेच ठिकाण... निगडीत BSNLच्या 'डक्ट'मध्ये पुन्हा दोघांचा मृत्यू; वर्षभरात घेतले ५ बळी

पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे बीएसएनएलच्या फायबर ऑप्टिक 'डक्ट'मध्ये उतरलेल्या दोन तरुणांचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ...सविस्तर बातमी
16:13 (IST) 27 Aug 2026

डोंबिवली देसलेपाड्यातील उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत वेश्याव्यवसाय; दोन महिला, पुरुष मध्यस्थांविरुद्ध गुन्हा

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील 'एंजल प्राईड' या उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ...सविस्तर वाचा
16:08 (IST) 27 Aug 2026

अखेर श्वानांना खाद्य देण्याच्या निर्णयावर सत्ताधाऱ्यांचा घूमजाव; रस्ते, पदपथ वगळता इतर ठिकाणी खाद्य देण्यास मुभा देण्याचे संकेत

२९ फीडिंग केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्राणीप्रेमींनी नवीन जागा सुचवाव्यात; आमदार नरेंद्र मेहता यांचे आवाहन. ...वाचा सविस्तर
15:58 (IST) 27 Aug 2026

गणपतीच्या गावांना खड्ड्याचे विघ्न; मार्गातील खड्ड्यामुळे मूर्तीची ने-आण धोक्यात

गणेशोत्सव तोंडावर आल्याने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून मूर्ती नेणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडी अन् अपघाताची भीती. ...अधिक वाचा
15:55 (IST) 27 Aug 2026

MPSC : पेपरफुटी प्रकरणानंतर आता एमपीएससीच्या कार्यालयात १ सप्टेंबरला आंदोलन… कोणी दिला इशारा, नेमक्या मागण्या काय?

एमपीएससीने घेतलेल्या औषध निरीक्षक पदभरतीचा पेपर फुटल्याचे सिद्ध झाल्यानंतर आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ...सविस्तर वाचा
15:48 (IST) 27 Aug 2026

नागपूर महापालिकेत सत्ताधारीविरुद्ध सत्ताधारी शीतयुद्ध, भाजप नेत्यांच्या मौनावर आश्चर्य!

नागपूर महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आणि शीतयुद्ध टोकाला पोहोचले आहे. ...वाचा सविस्तर
15:37 (IST) 27 Aug 2026

गोंदिया: बेलगाव तलावात कीटकनाशकांमुळे हजारो मासे मृत; पाणी विषारी झाल्याचा संशय, चिचगड पोलिसांत तक्रार

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बेलगाव येथील जिल्हा परिषद तलावात हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...सविस्तर वाचा
15:24 (IST) 27 Aug 2026

Maharashtra News Live Updates: ‘सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख’, विजय वडेट्टीवार यांनी मागितली माफी

"ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो", अशा शब्दात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंची दिलगिरी व्यक्त केली.

15:19 (IST) 27 Aug 2026

पोलिसांचा वेढा भेदून तुपकरांची 'एंट्री'! मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना पोलिसांनी पकडले; कार्यकर्तेही ताब्यात, पोलिसांची दमछाक

पोलिसांचा महाकाय बंदोबस्त चकवत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी मुंबईत गनिमी काव्याने मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दिशेने कूच करत अचानक आंदोलन केले. ...अधिक वाचा
15:17 (IST) 27 Aug 2026

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे ठाणे स्थानक जमिनीपासून १२ मीटर उंच का उभारले जात आहे?

हा प्रकल्प महाराष्ट्रात १३५.४५ किमी लांबीचा असून शिळफाटा ते झारोली गावापर्यंत पसरलेला आहे. ...सविस्तर वाचा

MPSC Paper Leak Case Mumbai Crime Branch Arrests | Drug Inspector Exam Breakup Angle Details

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ब्रेकअपचा धक्कादायक अँगल उघड. (Photo - Ai Generated / Gemini)