Maharashtra Political Updates, 09 September 2026: एमपीएससी पेपरफुटी आणि गैरप्रकाराविरोधात राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटविण्याची मागणी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या १२ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाशी निगडीत मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला १२ तारखेपर्यंत मुदत दिली असून, त्यानंतर मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. यासह राज्यातील राजकारण, समाजकारण, गुन्हे, कला-क्रीडा-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Today Marathi News Live Updates: महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स

18:41 (IST) 9 Sep 2026

‘अभ्यासात कमी पडत नाही, तरी अपयश का?’; पेपरफुटीविरोधात नाशिकमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन

राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर शहरांपाठोपाठ बुधवारी नाशिकमधील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ...अधिक वाचा
17:47 (IST) 9 Sep 2026

गणेशोत्सवानिमित्त मुंबई - मडगाव वंदे भारत २० डब्यांची करा; रेल्वे मंडळाकडे मागणी

गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ...वाचा सविस्तर
17:24 (IST) 9 Sep 2026

राडारोडा वाहतुकीवर मुंबई महापालिकेची नजर; वाहनांना व्हीटीएमएस बंधनकारक, नियमभंग केल्यास २५ हजार रुपये दंड

बांधकाम आणि पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने आता ‘मुंबई राडारोडा नियंत्रण व मागोवा प्रणाली’ अनिवार्य केली आहे. ...अधिक वाचा
17:16 (IST) 9 Sep 2026

पालघर रुग्णालय धुडगूस प्रकरण, नरमाई धोरण पोलिसांना भोवले

५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर जखमी गोविंदांना पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे व अन्य नऊ पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन धुडगूस घातली होती. ...सविस्तर बातमी
16:59 (IST) 9 Sep 2026

जे.जे. रुग्णालयात दीड वर्षांत ३०० रुग्णांवर रोबोटिक शस्त्रक्रिया; मेडट्रॉनिकतर्फे उत्कृष्टता केंद्र म्हणून गौरव

वैद्यकीय शिक्षण विभागाने ३२ कोटींचा खर्च करून जे.जे. रुग्णालयासाठी ही तंत्रज्ञान प्रणाली खरेदी केली. ...सविस्तर वाचा
16:50 (IST) 9 Sep 2026

पहिल्या मजल्यावरील झोपडवासीयांनाही घर! सर्वोच्च न्यायालयात आता २९ सप्टेंबरला सुनावणी!

धारावी पुनर्विकास प्रकल्पात बहुमजली झोपड्यांना सशुल्क वा भाड्याची घरे दिली जाणार आहेत. मात्र मूळ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत तो लाभ देण्याची शासनाची तयारी नाही. ...वाचा सविस्तर
16:33 (IST) 9 Sep 2026

मोठी बातमी: आंदोलनासमोर ‘एमपीएससी’ची माघार! राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या गुणांची फेरपडताळणी होणार, मात्र विद्यार्थी म्हणतात…

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालातील गुणांकन प्रक्रियेवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आणि सुरू असलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नमते घेतले आहे. ...सविस्तर बातमी
16:30 (IST) 9 Sep 2026

मनुस्मृतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संघ कार्यालयावर सन्मान मोर्चा

मनुस्मृतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने संघ कार्यालयावर सन्मान मोर्चा. राहुल गांधींवर शुद्धीकरण प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाले आहेत.

16:29 (IST) 9 Sep 2026

शाळेत माकडाचा धुमाकूळ; घाबरलेले विद्यार्थी-शिक्षक शाळेबाहेर

गेल्या आठवड्यापासून माकडाने खर्डी हायस्कूलमध्ये धुमाकूळ घातला आहे. माकडाच्या दहशतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज माकड शाळेत आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळा सोडून बाहेर पडावे लागले. त्यामुळे शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.

16:22 (IST) 9 Sep 2026

अल्पवयीन मुलांच्या २६ पालकांवर गुन्हे, तब्बल ३० हजारांचा दंड! परवाना नसताना मुलांना वाहने चालवायला दिली

नागपुरात अल्पवयीन मुलांकडे वाहने सोपवणाऱ्या २६ पालकांवर नागपूर ट्रॅफिक पोलिसांनी कठोर कारवाई केली असून, न्यायालयाने त्यांना ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...वाचा सविस्तर
16:01 (IST) 9 Sep 2026

आरएसएस कार्यालयावर युवक काँग्रेसचा मोर्चा! मनुस्मृतीची प्रत जाळून निषेध

नागपुरात आरएसएस कार्यालयावर युवक काँग्रेसने धडक मोर्चा काढत मनुस्मृतीची प्रत जाळून तीव्र निषेध नोंदवला. ...सविस्तर बातमी
15:33 (IST) 9 Sep 2026

बायोमेट्रिक हजेरीत अनियमितता; जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयातील ३५ डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपासून डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरीची नियमित आणि योग्य नोंद करणे अनिवार्य आहे. ...अधिक वाचा
15:14 (IST) 9 Sep 2026

न्या. महेश चंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी, ५० वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ

न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी १९९० मध्ये लखनऊ विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि ११ जानेवारी १९९२ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. ...सविस्तर वाचा
14:56 (IST) 9 Sep 2026

महामुंबईतील आदिवासी राजभवनावर धडकणार; जंगल वाचविण्यासाठी ११ ते १३ सप्टेंबरला लाँग मार्च

११ सप्टेंबरला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून आदिवासींचा लाँग मार्च निघणार असून ३५ किमीचा प्रवास करून १३ सप्टेंबरला ते राजभवनावर धडकणार आहेत. ...सविस्तर वाचा
14:45 (IST) 9 Sep 2026

टिटवाळा ब्लॉक: आज रात्री २३ लोकल रद्द, कसारा-टिटवाळादरम्यान सेवा बंद

या कालावधीत टिटवाळा येथे संपणाऱ्या सर्व लोकल आता आसनगावपर्यंत धावतील, तर टिटवाळाहून सुटणाऱ्या लोकल आसनगावहून सुरू होतील. ...अधिक वाचा
14:35 (IST) 9 Sep 2026

सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनंदिन एक्स्प्रेस १० सप्टेंबरपासून नियमित धावणार

गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी – सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज सीएसएमटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटेल. पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी २० ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ...सविस्तर बातमी
14:30 (IST) 9 Sep 2026

सहकारी संस्था कायद्यातील नव्या तरतुदीला आव्हान, आमदार बच्चू कडूंची न्यायालयात याचिका…

महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम ७३एएए(३) मधील नव्या दुरुस्तीला आमदार बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ...अधिक वाचा
14:26 (IST) 9 Sep 2026

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड; प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’, प्रवाशांचे हाल

कोकणात जाणाऱ्या बहुतांश सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण १० सप्टेंबरपासून पुढील सर्व दिवसांसाठी पूर्ण झाले असून, प्रतीक्षा यादी देखील फुल्ल झाल्याने आता थेट ‘रिग्रेट’ (प्रतीक्षा यादीही बंद) असा संदेश आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर दिसू लागला आहे. ...सविस्तर वाचा
14:14 (IST) 9 Sep 2026

अबब! गोंदियाच्या बाजारात चक्क पन्नास हजारांचा काष्ठ नंदी विक्रीला; तान्हा पोळ्याची चाहूल

गोंदियाच्या बाजारात तान्हा पोळ्यानिमित्त तब्बल ५० हजार रुपये किमतीचा काष्ठ नंदी विक्रीसाठी आला असून तो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ...वाचा सविस्तर
14:11 (IST) 9 Sep 2026

साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती; ऑक्टोबरपासूनच उसाचा हंगाम सुरू करण्याचा सरकारचा विचार

सणासुदीच्या दिवसात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण झाल्याने राज्य सरकार ऑक्टोबरपासूनच उसाचा हंगाम सुरू करण्याचा विचार करत आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याला काही कारखानदारांनी विरोध दर्शवला असल्याची माहिती आहे. दरवर्षी उसाचा गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होतो.

13:57 (IST) 9 Sep 2026

शिक्षणसेवक पद रद्द होणार? किमान कालावधी कमी करण्याचे संकेत, TET बाबत शासन म्हणते…

महाराष्ट्रात शिक्षणसेवक पद रद्द करणे किंवा त्याचा कालावधी कमी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक चर्चा करत आहे. ...वाचा सविस्तर
13:50 (IST) 9 Sep 2026

"मशि‍दीसमोर हनुमान चालीसाचे कार्यक्रम घेता,पण...", यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर अप्रत्यक्ष टीका

"पालकमंत्री येतात, माझा असा समज होता की चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभ्यास भरपूर आहे, ते संवेदनशील आहेत. पण, आता ज्या गोष्टी कानावर येत आहेत त्या धक्कादायक आहेत. बोलतात सगळं पण करत काही नाहीत, स्थानिक आमदारांना देखील काही घेणं देणं नाही. दुष्काळ पडलाय तिथं मशिदीच्या समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे कार्यक्रम घेतात पण, शेतकऱ्यांकडे बघायला यांना वेळ नाही. हा सगळा विद्रुपपणाच आहे", अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. पाऊस, शेतकरी आत्महत्या याच्याशी निगडीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

13:40 (IST) 9 Sep 2026

शहरांमधील जीवनमानाचा दर्जा घसरल्यास व्यापक आर्थिक परिणाम… माजी सनदी अधिकाऱ्याचा गंभीर इशारा!

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या काळे सभागृहात डॉ. पी. आर. दुभाषी व्याख्यानावेळी डॉ. झा बोलत होते. ...सविस्तर वाचा
13:36 (IST) 9 Sep 2026

धक्कादायक! शववाहिका आली, पण डिझेल संपले; रस्त्यातच मृतदेह उतरवण्याची वेळ

भंडाऱ्यातील मोहाडी नगरपंचायतीचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. ...सविस्तर वाचा
13:21 (IST) 9 Sep 2026

Video : बिबट्याच्या हल्ल्यात राजू पाटील यांच्या श्वानाचा थरारक प्रतिकार; रॉकीने बिबट्यालाच पळवून लावले

मनसेचे नेते राजू पाटील यांचे मुरबाड येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सोमवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारून आलेल्या बिबट्याने रॉकीवर हल्ला केला ...वाचा सविस्तर
13:13 (IST) 9 Sep 2026

MPSC पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्टवर, भरती परीक्षामध्ये लवकरच मोठ्या सुधारणा

कोकण विभागासाठीची सल्लामसलत २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत चेतना कॉलेज, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळ, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे होणार आहे. ...वाचा सविस्तर
13:10 (IST) 9 Sep 2026

Private Coaching Class : खासगी शिकवणी वर्ग नियमनासाठीच्या प्रस्तावित कायद्यातील काही तरतुदींना विरोध… नेमके कारण काय?

खासगी शिकवणी वर्ग नियमनासाठीच्या प्रस्तावित कायद्यातील काही जाचक तरतुदींना 'प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र'ने (PTAM) तीव्र विरोध दर्शवला आहे. ...वाचा सविस्तर
12:55 (IST) 9 Sep 2026

बैलांची संख्या चिंताजनक पण पोळ्याचा उत्साह धुमधडाक्यात; सध्या 'सर्जा-राजा'च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह!

वर्धा जिल्ह्यात बैलांची संख्या चिंताजनक रीतीने घटत चालली असून केवळ २६,१०० बैलजोड्या शिल्लक राहिल्या आहेत. ...सविस्तर बातमी
12:47 (IST) 9 Sep 2026

नवीन घराचे स्वप्न लांबणीवर! यंदा बिल्डरकडून ताबा चार महिने उशिराने मिळणार

पुण्यातील मधल्या काळातील रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पचालकांचा संप, काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे कामगारांची निर्माण झालेली टंचाई याचा परिणाम गृहनिर्माण प्रकल्पांवर झाला. ...सविस्तर वाचा

श्री क्षेत्र हनुमान मंदिर, चांदपूर (ता. तुमसर, जि. भंडारा

श्री क्षेत्र हनुमान मंदिर, चांदपूर ता. तुमसर, जि. भंडारा (फोटो - X/ Rohit Pawar)