Maharashtra News Live Updates, 13 October 2025 : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला असून सर्वच नेते आपआपल्या पक्ष संघटनेचा कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहेत. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच राज ठाकरे यांनी सहकुटुंब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंची तीन महिन्यांतली ही सहावी भेट होती, त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी महायुतीतीलच भाजपावर गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीत भाजपाकडून पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आत्राम यांनी केल्यामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तसेच पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून शस्त्रपरवाना मंजूर करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai News Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

19:26 (IST) 13 Oct 2025

Maharashtra SSC HSC Exam Schedule 2026 : मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर… कधी सुरू होणार परीक्षा?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. …सविस्तर बातमी
19:00 (IST) 13 Oct 2025

First Monkeypox Case In Maharashtra : धुळ्यात मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण

Monkeypox : या आजाराचा हा राज्यातील पहिला रुग्ण असून संबंधिताचे दोन्ही अहवाल सकारात्मक आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. …सविस्तर बातमी
18:23 (IST) 13 Oct 2025

New Marathi Movie Tath Kana : ‘ताठ कणा’ २८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात, उमेश कामत प्रमुख भूमिकेत

Umesh Kamat New Movie : डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा ‘ताठ कणा’ हा मराठी चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. …वाचा सविस्तर
17:35 (IST) 13 Oct 2025
ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या मोर्चाला सुरूवात! भास्कर जाधव, राजन विचारे सहभागी

ठाणे येथे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र येत मोर्चा काढण्यात येत आहे. विविध नागरी समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलना भास्कर जाधव, राजन विचारे, जितेेंद्र आव्हाज असे नेते सहभागी झाले आहेत. याबरोबरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि सामान्य ठाणेकरांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

16:51 (IST) 13 Oct 2025
ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा

ठाणे येथे शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी एकत्र येत मोर्चा काढण्यात येत आहे. विविध नागरी समस्या सोडवल्या जाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

16:37 (IST) 13 Oct 2025

“नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मी फार तर मोदींपर्यंत जाईन”, भुजबळांचा मंत्री महाजन आणि दादा भुसेंना टोला

“मंत्री महाजन आणि दादा भुसे हे नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत जे बोलले ते मी ऐकलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जणार वैगेरे, आता एवढ्या लांब तर मी जाऊ शकत नाही. मी फार-फार तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि फार-फार तर पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मी कुठे जाणार? ती मंडळी (मंत्री महाजन आणि दादा भुसे) जाऊ शकतात”, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

16:04 (IST) 13 Oct 2025

संसर्गजन्य आजारांपेक्षा भारतात असंसर्गजन्य ‘लाइफस्टाइल’ आजारांचा प्रभाव जास्त! भारताचा आरोग्य नकाशा बदलतोय…

बर्लिनमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०२३ अहवालानुसार, जगभरातील दोन-तृतीयांश मृत्यू आता असंसर्गजन्य आजारांमुळे (एनसीडी)मुळे होत आहेत. …सविस्तर बातमी
15:23 (IST) 13 Oct 2025

“ज्यांना दिघे साहेबांनी भ्रष्ट ठरवलं, तेच आज भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढतात ”, खासदार नरेश म्हस्के यांची राजन विचारेंवर टीका

ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
15:16 (IST) 13 Oct 2025

Honey-Trap Scam: आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणारा अटकेत, होता पुरुष पण भासवायचा महिला

मोहन पवार (२६) असे आरोपीचे नाव असून तो महिला असल्याचे भासवून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे. त्याने यापूर्वी कितीजणांना फसविले आहे याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच यामध्ये काही राजकीय कट कारस्थान आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. …अधिक वाचा
14:53 (IST) 13 Oct 2025

“सरकार अजून किती गुंडांना पाठीशी घालणार, याचं उत्तर…”, रोहित पवारांची सरकारवर टीका

“ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावरच कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. सत्ताधारी नेते गुंडांना बळ देत असल्यानेच पुण्यात पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गुंडांची मजल गेलीय. मंत्रीच आजुबाजूला गुंड घेऊन फिरत असतील तर पोलिसांवर हल्ले करण्याची हिंमत गुंड करणार नाही तर काय? यापुढं जाऊन एखादा नेता गुंड आणि गुंडगिरीविरोधात बोलला की त्याला गप्प करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्रीच देत असतील तर या सरकारचं प्राधान्य हे सामान्य माणसाची सुरक्षितता नाही, हेच स्पष्ट होतं. पुण्यात सामान्य नागरिक सोडून द्या पण पोलीसही सुरक्षित नसल्याचं वारंवार दिसून येतं. तरीही हे सरकार अजून किती गुंडांना पाठीशी घालणार आणि अशांत झालेल्या पुण्याची शांत पुणे ही ओळख पूर्ववत कधी करणार याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं”, असं ट्विट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
14:06 (IST) 13 Oct 2025

Video: कल्याणमध्ये आगरी समाजातील मुलाला उद्देशून परप्रांतीय महिला म्हणते, ‘मराठी माणूस कचरा’

कांचन खरे यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने ती परप्रांतीय महिला बिथरली. तेवढ्यात दुकानात मनसेचे पदाधिकारी दाखल झाले. पोलिसांना बोलविण्यात आले. …वाचा सविस्तर
14:06 (IST) 13 Oct 2025

डोंबिवलीतील ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर इनामदार यांचे निधन

नाट्य कलेचा प्रचार आणि प्रसाराठी सुधाकर इनामदार यांनी नाट्य दुदुंभी नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांंनी ६० वर्ष नाट्यविषयक विविध उपक्रम राबविले. …सविस्तर वाचा
13:13 (IST) 13 Oct 2025

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली आहे. संजय राऊत हे भांडुपमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून पुढील उपचार घेत आहेत.

13:06 (IST) 13 Oct 2025

पुण्यात नक्की चालंलय काय? वसंत मोरेंचा सवाल, पुण्यात पोलीस शिपायाला मारहाण झाल्याचा केला आरोप

“पुण्यात नक्की चालंलय काय? मुख्यमंत्री तथा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लक्ष देतील का? कोंढवा परिसरात रात्री 9.30 वा. कात्रज चौकातील आपली ड्युटी संपल्यानंतर घरी जात असताना अंधारातील एकामोकळ्या जागेवर लघु शंका करण्यासाठी थांबलेले पोलीस शिपाई प्रवीण डिंबळे यांना काही तरुणांकडून कानातून रक्त येईपर्यंत तसेच तोंड फुटेपर्यंत मारहाण केली, इतके सारे होऊन अजून पर्यंत आरोपी फरार…गुन्हा दाखल होण्यासाठी दिरंगाई का होत आहे?”, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

12:45 (IST) 13 Oct 2025

राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा म्हणाल्या, ” भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा..”

अफगाण तालिबानी मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार पक्षाने आंदोलन केले. “भारताचा तालिबान करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप महिला अध्यक्षा सुजाता घाग यांनी केला. …अधिक वाचा
12:28 (IST) 13 Oct 2025

Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे ‘मविआ’त जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेसला बरोबर घेण्याची…”

शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. …वाचा सविस्तर
12:04 (IST) 13 Oct 2025

कल्याणमध्ये भाजपला आडवे करण्याचा शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा इशारा

जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या विधानाची भाजप, शिंदे शिवसेनेकडून किती दखल घेतली जाते. त्यांना समज दिली जाते की बळ दिले जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. …अधिक वाचा
11:46 (IST) 13 Oct 2025

रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास शिर्के समुहाकडे;आज भूमिपूजन, पुनर्वसित इमारतींच्या कामाला होणार सुरुवात

पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार घाटकोपर ते ठाणे असा केला जाणार आहे. या कामासाठी रमाबाई आंबेडकर नगर,कामराज नगर येथील काही झोपड्या विस्थापित कराव्या लागणार होत्या. अशावेळी एमएमआरडीएने या झोपड्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. …वाचा सविस्तर
11:45 (IST) 13 Oct 2025

राज ठाकरे मविआत जाण्याच्या चर्चांवर महायुतीच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते विचार करतील…”

“काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे, तेथे अशा कोही गोष्टी होत आहेत. पण महाराष्ट्रातील जनतेने कर्नाटक सरकारचा हा देखील विचार केला पाहिजे की सीमा भागातील मराठी बांधवांना छळण्याचं काम कर्नाटकमधील काँग्रेस सरकार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार बाजूला करण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे. त्यामुळे काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही, काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही. एवढं काँग्रेस स्वयभू झालेलं आहे. मग असं असताना त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत, त्याचा विचार ते करतील”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

11:16 (IST) 13 Oct 2025

डोंबिवली पश्चिमेत रस्ते, बँका, एटीएमटी प्रवेशद्वारे बंद करून फटाक्यांचे बेकायदा स्टाॅल; अधिकाऱ्यांना दादागिरी करून मुख्य वर्दळीचे रस्ते स्टाॅलसाठी बंद

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील घनश्याम गुप्ते या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर १५ बाय १० आकाराचा फटाके, फराळ विक्रीचा भव्य मंडप पालिका, पोलीस, वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना न जुमानता उभारण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
11:04 (IST) 13 Oct 2025

रस्ते का माल सस्ते में, काॅपी जिन्स विकणाऱ्यांवर कारवाई

भिवंडी येथील भुसावळ कंपाऊंड भागातील एका गोदामामध्ये एका नामांकित ब्रँडचे काॅपी वस्त्र विकली जात असल्याची माहिती एका कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. …अधिक वाचा
10:55 (IST) 13 Oct 2025

लहान आकाराच्या माशांच्या विक्रीला बंदी; ५० हजार ते ५ लाखांच्या दंडाची तरतूद

मत्स्यविभागाने लहान आकारांच्या मासे पकडणे आणि त्याची विक्री करणे यावर बंदी घातली आहे. त्यासाठी माशांची वर्गवारी करून त्यांचा किमान आकार (एमएलएस) निश्चित करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
10:47 (IST) 13 Oct 2025

कुर्ल्यात रात्री भीषण आग, २० गाळे जळून खाक

कुर्ला (पश्चिम), सीएसटी रोड कपाडिया नगर येथील गुरुद्वारा परिसरात वाहनांचे सुटे भाग, टायर, विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे, भंगार सामान आणि इतर साहित्य इत्यादींचा साठा असलेले अंदाजे ३००० चौरस फूट क्षेत्रफळाचे बैठे, एकमजली गाळे आहेत. …वाचा सविस्तर
10:34 (IST) 13 Oct 2025

दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या

ठिकाठिकाणच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदी करणाऱ्यांची गर्दी दिसतेच पण दादर, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, मालाड मार्केट, बोरिवली या ठिकाणच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये संध्याकाळी गर्दीचा उच्चांक गाठला जातो आहे. …सविस्तर वाचा
10:25 (IST) 13 Oct 2025

Video: प्रकाश लोंढेच्या घरातील भुयारात शस्त्रे; पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे फरार आहे. पोलिसांनी त्याचे वडील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी प्रकाश लोंढे, भूषणचा भाऊ दीपक लोंढे यांना सहआरोपी करत ताब्यात घेतले. …अधिक वाचा
10:25 (IST) 13 Oct 2025

Tejas Mk1A maiden flight – तेजसच्या उड्डाणाला अखेर मुहूर्त… इतका विलंब का झाला ?

एचएएलच्या नाशिक प्रकल्पातील सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या हलक्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी सकाळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. …अधिक वाचा
10:25 (IST) 13 Oct 2025

Video: “ठाणेकरांनो, तुम्हालाही अस्वस्थ वाटत आहे का? मग…’’ राजन विचारे असे का म्हणाले?

ठाणे शहर आणि जिल्ह्यात वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्यावतीने आज, सोमवार, दुपारी ३ वाजता गडकरी रंगायतन येथून ठाणे महापालिकेपर्यंत भव्य धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी
10:23 (IST) 13 Oct 2025

मुंबई महापालिकेच्या शाळेतील ३७० शिक्षकांची जातपडताळणी प्रमाणपत्रे देण्यास प्रशासनाची टाळाटाळ; माहिती आयोगाने पुन्हा फटकारले

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ मिळवून नोकरी व पदोन्नती प्राप्त केली असल्याची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विकास घुगे यांनी केली आहे. …अधिक वाचा
10:22 (IST) 13 Oct 2025

अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका, भाजप मात्र सलामत; माजी महापौर किशोरी पेडणेकर…

मुंबई महापालिका निवडणूकांचे पडघम वाजू लागले असून प्रभागांच्या सीमा अंतिम झाल्यानंतर आता आरक्षणाकडे सगळ्या उमेदवारांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाची सोडत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. …सविस्तर बातमी
10:22 (IST) 13 Oct 2025

मुंबई महापालिकेची ४२६ घरांची सोडत; अत्यल्प उत्पन्न गटातील घर एक कोटी सात लाखाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा…

महापालिकेला १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १८६ घरे, तर विकास नियंत्रण नियमावली २०३४ च्या ३३ (२०) (ब) अंतर्गत २४० घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. …अधिक वाचा

अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाचा शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका, भाजप मात्र सलामत; किशोरी पेडणेकर…, (फोटो-संग्रहित छायाचित्र)