Maharashtra Breaking News Updates : राज्यातील सातारा, सांगली आणि अहमदनगर या तीन ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर पुण्यातील हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रोच मार्गिकेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हिरवा कंदील दाखवून मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण केलं. उद्या सकाळपासून ही मार्गिका सेवेत रुजू होणार आहे. तर, दिवाळीच्या निमित्ताने दिया मिर्झाने केलेल्या व्हिडिओवरून सध्या वाद सुरू आहे. यावरून हायकोर्टानेही आज भाजपा नेत्यांना नाव न घेता फटकारले असून हा व्हिडिओ पुन्हा प्रसारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावरून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
ॲपलला भारतातून विक्रमी महसूल; आयफोन, मॅक, सेवा व्यवसायाची दमदार कामगिरी
ॲपलला भारतातून विक्रमी महसूल; आयफोन, मॅक, सेवा व्यवसायाची दमदार कामगिरी
किणी टोल नाक्यावर स्वाभिमानीचा हुंकार; उस दरासाठी कोल्हापुरात राष्ट्रीय महामार्ग आठ तास ठप्प, ऐन दिवाळीत वाहतूक कोंडी
"पुरावे देताना शपथपत्राची सक्ती रद्द करा"; MPSC पेपरफुटीप्रकरणी रोहित पवारांची तुकाराम मुंढेंकडे मागणी
"एमपीएससीच्या पेपरफुटीचे पुरावे देताना सोबत शपथपत्र बंधनकारक केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाहक भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं पुरावे देताना विद्यार्थ्यांसाठी शपथपत्राच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याची मागणी न्यायिक चौकशी आयोगाचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडं केली आणि याबाबतचं पत्रंही त्यांना दिलं. तसंच पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने पुणे शहरात सुनावणी घेण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीही त्यांना केली", असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' ट्विटवरून राज ठाकरेंची नाराजी; "आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी…"
इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे, रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांना यंदाचा 'ब्रँड कोल्हापूरचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
बंदीचा आदेश निघणार हो, बोअर घ्या, बोअर.. दुकानदारांचे व्यापारी तंत्र; खर्च लाखाच्या घरात
“मोर्चे कसले काढता? सत्ता अंगात असावी लागते”; राज ठाकरेंची भाजपावर टीका
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम व निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात देशभरात विरोधक आंदोलने करत आहेत. इंडिया आघाडीच्यावतीने १ नोव्हेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर महामोर्चा काढण्यात आला, तर दुसरीकडे भाजपाच्यावतीने २ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ महारॅली काढण्यात आली. महाराष्ट्रात देखील भाजपाच्यावतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अशी रॅली काढण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा कट; मीनाक्षी शिंदे यांचा आरोप
ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत किणी टोलनाक्यावरून हटणार नाही! राजू शेट्टींचा निर्धार; उसाची एकही गाडी जाऊ देणार नसल्याचा इशारा
ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाका शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत महामार्गावरून हटणार नसल्याचा ठाम निर्धार माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
डोंबिवली उमेश नगरमध्ये टेम्पोखाली श्वानाचे पिल्लू चिरडले; चालक दीपेश भोईरविरुद्ध गुन्हा
टिटवाळा निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौकात फटाके विक्रीला नागरिकांचा विरोध
काटई-अंबरनाथ मार्गावर बेशिस्त वाहनचालक आणि पोलिसांच्या अनुपस्थितीने कोंडीत भर
क्लस्टर, एसआरएच्या नावाखाली बोगस करपावत्यांचा धंदा; भाजप आमदार संजय केळकरांचा गंभीर आरोप
LIVE : "MPSC परीक्षेत गैरप्रकार करणारी टोळी सक्रीय", उमेदवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट
ठाणे ग्रामीणमधील महिला बचत गटांच्या उत्पादनांची ठाण्यात विक्री; जिल्हा परिषदेचा वज्रेश्वरी महोत्सव
एसटी कामगारांच्या आंदोलनात तीन तारखा; एकजुटीचा अभाव सरकारच्या पथ्यावर?
Video : "शरम वाटली पाहिजे, फुकटचे पैसे पाहिजेत का?" नितीन गडकरी कंत्राटदारावर चांगलेच भडकले!
LIVE : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; फेऱ्यांमध्ये वाढ, प्रतीक्षा कालावधीही घटणार
मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो मार्गिका ३ वरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून कामकाजाच्या दिवशी ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून ३३७ झाली आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मेट्रोसाठी कमी प्रतीक्षा करावी लागणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करणेही अधिक सोपे होणार आहे.
डोंबिवली पश्चिमेत खोली तोडण्याच्या वादातून भावांमध्ये तुफान हाणामारी; साथीदाराकडून चाकू हल्ला
डोंबिवलीतील सुभाष रस्त्यावर अतिक्रमण; बेकायदा गाळ्यांची उभारणी
दिया मिर्झा दिवाळी वादावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य; छोटा विषय असल्याचं सांगत म्हणाले, 'मुंबई मनपाची मर्जी'
पंतप्रधान मोदींची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मराठीतून साद, म्हणाले, "अजिबात काळजी करू नका"
"मुंबई महापालिकेत सर्कस सुरू आहे", दिया मिर्झा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची महापौरांवर टीका
दिया मिर्झा वगैरे यांना बीएमसीने पत्र लिहिलं. पण तिथे सर्कस सुरू आहे. महापालिकेच्या ऑफिसमधून पत्र गेलं आणि महापौर म्हणतात की पत्र कोणी दिलं माहीत नाही. मग तुम्ही शहर काय चालवत आहात? धर्माचं आणि जातीचे राजकारण सुरू आहे. शुद्ध हवा, शुद्ध पाणी यावर महापौरांनी लक्ष केंद्रित करायला पाहिजे, पण हे पहिले महापौर असतील जे राजकारणावर लक्ष देत आहेत.- आदित्य ठाकरे</p>
भारतीय मेट्रो नेटवर्कला जगातील टॉप ३ मध्ये गणलं जातं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपल्या देशात पहिली मेट्रो १९८४ मध्ये चालवली गेली होती. त्यानंतर ३० वर्षात २४८ किमी मेट्रो ट्रेन चालल्या. २०१४ पर्यंत पाच शहरांत मेट्रो होती. तेच जुनं सरकार आणि जुनी कार्यसंस्कृती राहिली असती तर पुण्यात मेट्रो पोहोचायला अनेक दशकं लागली असती. पण पुण्यातील लोकांनी २०१४ मध्ये एनडीए सरकार निवडलं तेव्हा आम्ही एक संकल्प निवडला की शहरात राहणाऱ्या मिडल क्लास लोकांसाठी इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ ट्रान्स्पोटर्टेशन. परिणाम आपण पाहतोय. मेट्रो मार्गिकेचा कायाकल्प झाला आहे. २०१४ मध्ये २४८ किमी मेट्रो मार्गिका होते, आता १२०० किमी झाला आहे. आज २६ शहरांत मेट्रो चालते. १ कोटीहून अधिक लोक प्रवास करत आहेत. भारतीय मेट्रो नेटवर्कला जगातील टॉप ३ मेट्रो नेटवर्कमध्ये गणलं जातं - नरेंद्र मोदी</p>
Pune Metro Live Updates : पुणे शहराने देशाला कायम देशाला आणि समाजाला नवी दिशा दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुण्यातील मोठ्या आयटी हबला कनेक्टिव्हिटी मिळेल. आणखी दोन मार्गिका खुल्या झाल्यानंतर पुण्यातील जुन्या आणि नव्या शहरांतील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. मी पुणे आणि महाराष्ट्रातील सर्वांना खूप शुभेच्छा देतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>
पुणे कायम अशा विचारांचं केंद्र राहिलं आहे ज्यामुळे देशाला, समाजाला नवी दिशा मिळाली आहे. आज पुणे विकसित भारताच्या नव्या उर्जेलाही दिशा देत आहे. आयटी, ऑटोमोबाईल, स्टार्टअप्स, इनोव्हेशनला घेऊन मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत स्वप्नांचं स्थान आहे. त्यामुळे येथील मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे पुण्यातील शहराच्या विकासाला गती देत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुण्यातील मेट्रोचा विस्तार हे दाखवत आहे की विकसित भारतासाठी आपण कशाप्रमाणे शहरं तयार करतोय. आज शहरांच्या ओळखीप्रमाणेच दोन आव्हान जोडले गेले आहे. एखादं शहर किती स्पर्धात्मक आहे आणि तेथील इज ऑफ लिव्हिंगचा काय स्तर आहे. या दोन्ही आव्हानांमध्ये मेट्रो मार्गिका शहरांना सोपं बनवतं. यामुळे वेळही वाचणार आहे आणि पुणेकरांना अधिक सुविधाही मिळणार आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
शहरातील वेळ वाचला की शहरातील प्रोडक्टिव्हिटी वाढते. तेव्हा देशातील अर्थव्यवस्थेला गती मिळते. याचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीयांना होतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचं तिकीट कसं काढायचं? आता दोन QR कोड स्कॅन करावे लागणार….
Maharashtra Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मेट्रोमुळे इकोसिस्टिम तयार होते - देवेंद्र फडणवीस
देशातील सर्वांत जास्त मेट्रो मार्गिका महाराष्ट्रात बनल्या आहेत. १२ महानगरपालिका क्षेत्रात मेट्रो चालत आहेत किंवा चालणार आहे. मेट्रो मोबिलिटीसाठी महत्त्वाचं नाहीय, आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. यामुळे गुंतवणूक होते, रोजगार निर्माण होतो. इकोसिस्टिम तयार होते - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आयटी क्षेत्रातील लोक या मार्गिकेसाठी डोळे लावून होते- देवेंद्र फडणवीस
हिंजवडीला देशात आयटीची राजधानी म्ङणून ओळख आहे. हजारो लाखो लोक रोज येथे येतात. येथे पोहोचपर्यंत एक दोन तास लागतात. वाहतूक कोंडीत अडकावं लागलं. आयटीत काम करणारे भाऊ बहिण डोळे लावून होते मेट्रो मार्गिकेसाठी. आज ती वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्धाटन करत आहेत. ही पिंक पॉवर्ड लाईन आहे, महिला शक्ती ही मार्गिका संचलित करणार आहे. महिलांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Maharashtra Live News Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
