Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार? की ते कोणाला मिळणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

  • आमदार अपात्रता याचिका: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेला नकार, या याचिकेद्वारे आव्हानात आणला गेला आहे.
  • विशेष न्यायपीठ: या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या न्यायपीठासमोर होत आहे.
  • पक्ष आणि चिन्हाचा वाद: यासोबतच, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत ‘शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि पक्षचिन्ह वाटप करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी याचिकादेखील सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

Live Updates

Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing Live Updates  | शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू...

17:51 (IST) 5 Aug 2026

VIDEO: CJP संस्थापक अभिजित दिपके यांची महत्त्वाची घोषणा! NEET आंदोलनानंतर मोर्चा आता E20 कडे...

सीजेपीनं आता आपल्या लढ्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉलमिश्रित इंधन (E20) धोरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवर आता व्यापक जनजागृती केली जाईल, असे दिपके म्हणालेत. ...वाचा सविस्तर
16:53 (IST) 5 Aug 2026

नाशिकमध्ये सुनेत्रा पवार प्रकरणावर राजकीय संघर्ष; काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा, तणाव

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...अधिक वाचा
16:44 (IST) 5 Aug 2026

राहुल नार्वेकरांचा निर्णय अवैध; संपूर्ण सरकारची निर्मितीच बेकायदेशीर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला मुख्य पक्ष मानून दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर वेळेत निर्णय न घेतल्याने १० व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच नष्ट झाला असून, या बेकायदेशीर सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केल्याचा आरोप सिब्बल यांनी केला.

16:43 (IST) 5 Aug 2026

निवडणूक चिन्ह हे मूळ राजकीय पक्षाचेच; विधिमंडळ पक्षाचे नाही; न्यायालयाच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे स्पष्टीकरण

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश व न्यायमूर्तींनी "निवडणूक चिन्ह कुणाचे?" असा प्रश्न विचारला. त्यावर सिब्बल यांनी स्पष्ट केले की, चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते, विधिमंडळ पक्षाचे नाही. राजकीय पक्षाच्या मान्यतेशिवाय कुणालाही उमेदवारी किंवा चिन्ह मिळत नाही.

16:43 (IST) 5 Aug 2026

शिंदेंचे कृत्य पक्षविरोधी; १० व्या अनुसूचीनुसार आमदार अपात्र

कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, सूरत आणि गुवाहाटीला गेलेले आमदार भाजपच्या संपर्कात होते आणि शिंदे यांनी 'महाशक्ती' पाठीशी असल्याचे जाहीर केले होते. हे कृत्य उघडपणे पक्षविरोधी असून, पक्षांतरबंदी कायद्यानुसार (१० वी अनुसूची) हे सर्व आमदार आपोआप अपात्र ठरतात.

16:40 (IST) 5 Aug 2026

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयांवर तीव्र आक्षेप

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवत सिब्बल यांनी अध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण केले:
  • अवैध मान्यता: अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता आणि भरत गोगावले यांना 'व्हिप' म्हणून दिलेली मान्यता पूर्णपणे बेकायदेशीर होती.
  • विलंब आणि निष्क्रीयता: अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला गेला.
  • बेकायदेशीर सरकार: "महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारची संपूर्ण निर्मितीच बेकायदेशीर पायावर झाली आहे. न्यायालयाने मध्यस्थी करेपर्यंत या बेकायदेशीर सरकारने आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला," असे सिब्बल म्हणाले.
  • शिवसेनेच्या या महत्त्वाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता काय भूमिका घेते आणि पक्षांतरबंदी कायद्याचा नवा अर्थ कसा लावते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

    16:35 (IST) 5 Aug 2026

    "विधिमंडळातील पक्षापेक्षा राजकीय पक्ष श्रेष्ठच!", सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वाची टिप्पणी

    शिवसेनेच्या नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. "राजकीय पक्षाचे नियंत्रण हे नेहमी विधिमंडळ पक्षावरच असते," असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

    न्यायालयाने नमूद केले की, राजकीय पक्षाने घेतलेला कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षा नेहमीच वरचढ ठरेल. म्हणजेच, केवळ लोकप्रतिनिधी किंवा आमदारांचे बहुमत आहे म्हणून राजकीय पक्षाची मूळ भूमिका किंवा निर्णय बाजूला सारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

    16:17 (IST) 5 Aug 2026

    '१० व्या अनुसूचीचा उद्देशच संपला'

    कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालाचा संदर्भ देत अध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

    "आम्ही मोठ्या संघर्षांनंतर न्यायालयाकडून अध्यक्ष हे एक 'लवाद' असल्याचा आदेश मिळवला होता. तरीही घटनापीठाच्या निकालानंतर २०२३ मध्ये नोटिसांना उत्तरे दाखल केली गेली."

    कायद्याच्या औचित्यावरच प्रश्न: "जेव्हा लवाद किंवा अध्यक्ष निर्णयच न घेण्याची भूमिका घेतात, तेव्हा संविधानातील १० व्या अनुसूचीचा (पक्षांतर बंदी कायदा) नेमका अर्थ आणि उद्देश काय उरतो?"

    16:14 (IST) 5 Aug 2026
    लोकशाहीच्या, महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता

    महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सिब्बल म्हणाले की, या सर्व प्रकरणात लोकशाहीची तत्त्वे पायदळी तुडवली गेली आहेत. बेकायदेशीर पायावर उभे राहिलेले सरकार कोणताही कायदेशीर अडथळा न येता आपला पूर्ण कार्यकाळ चालवते, ही बाब संविधानाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणातील कायदेशीर पेच आणि सर्वोच्च न्यायालयाची आगामी भूमिका याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

    16:08 (IST) 5 Aug 2026

    'सरकारचा पायाच बेकायदेशीर, तरीही कार्यकाळ पूर्ण केला!'

    महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा तीव्र युक्तिवाद पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आणि तत्कालीन सरकारच्या वैधतेवर अत्यंत आक्रमक शब्दांत बोट ठेवले. "ज्या सरकारचा पायाच पूर्णपणे बेकायदेशीर होता, त्या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला," असा घणाघाती आरोप सिब्बल यांनी न्यायालयात केला.

    16:08 (IST) 5 Aug 2026

    कपिल सिब्बल यांचा राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल; राहुल नार्वेकरांच्या निर्णयांवर थेट प्रश्न

    न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी तर भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून तात्काळ मान्यता दिली.

    "कोणत्याही लवादाला किंवा प्राधिकरणाला ठराविक प्रक्रिया आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करावे लागते. मात्र, या प्रकरणात मूलभूत नियमांकडेच दुर्लक्ष करण्यात आले." - कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील

    16:01 (IST) 5 Aug 2026

    पक्षातील 'बहुमत' कसं ठरवायचं? सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

    राजकीय पक्ष, निवडणूक चिन्ह आणि पक्षांतर्गत बहुमत या कायदेशीर मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाचा आणि युक्तिवाद सुरु आहे. सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती बागची यांच्यात झालेला युक्तिवाद राजकीय पक्षाचे अस्तित्व आणि निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकारांवर थेट प्रकाश टाकणारा ठरला.

    15:55 (IST) 5 Aug 2026

    'पक्षाचे पत्र नाही तर उमेदवारी नाही' – कपिल सिब्बल

    पक्षाच्या अधिकाराचे समर्थन करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली.

    चिन्हाची मान्यता: निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो. मी माझ्या पसंतीचे चिन्ह निवडू शकतो, पण जोपर्यंत मूळ पक्ष अधिकृत पत्र (B-Form) देत नाही, तोपर्यंत कोणालाही उमेदवारी अर्ज भरता येत नाही.

    घटनात्मक अस्तित्व: जर इथे पक्षाची घटनाच अस्तित्वात नाही असा युक्तिवाद केला जात असेल, तर २०१३ च्या निवडणुकांवरही प्रश्न उपस्थित होतील आणि पक्षाचे अस्तित्वच उरणार नाही.

    15:54 (IST) 5 Aug 2026

    विधिमंडळ पक्ष की मूळ राजकीय पक्ष? निवडणूक आयोगाचा प्रश्न चुकीचा: न्यायमूर्ती बागची

    सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मोठे निरीक्षण नोंदवले. "निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षात बहुमत आहे की नाही, हा प्रश्न विचारून गफलत केली. वास्तविक पाहता हा संपूर्ण विषय मूळ 'राजकीय पक्षाशी' संबंधित असायला हवा," असे न्यायमूर्ती बागची यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही पक्षाची व्याख्या कशी करायची आणि बहुमताचा अर्थ कसा लावायचा, हे पक्षाची स्वतःची घटनाच ठरवते, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

    15:49 (IST) 5 Aug 2026

    'आमदारांचे कृत्य पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखेच', सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. "२२ जूनच्या बैठकीला गैरहजर राहून आमदारांनी प्रतोद सुनील प्रभूंचे अधिकार नाकारले. तसेंच आमदार महेश शिंदे यांच्या स्वाक्षरीतही मोठी तफावत होती," असे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर "आमदार पक्षाच्या मूळ नेतृत्वाला पदावरून हटवू शकत नाहीत," अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.या टिप्पणीचा धागा पकडत सिब्बल म्हणाले, "आमदारांचे हे वर्तन म्हणजे स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखेच आहे. याच पूर्वनियोजित कटातून राज्यात सत्तांतर घडवून आणले गेले, ज्याचे देशाच्या लोकशाहीवर गंभीर परिणाम होत आहेत."

    15:46 (IST) 5 Aug 2026

    मुख्य प्रतोद बदल प्रकरण: कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद सुरु...

  • विधानमंडळ पक्षातील फूट आणि निर्णय: ३१ आमदारांच्या ठरावाचा दाखला देत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. विधानमंडळ पक्षाने सभागृहात आपणच प्रमुख असल्याचा दावा करत सुनील प्रभू यांच्या जागी नव्या मुख्य प्रतोदांची (चीफ व्हिप) नियुक्ती केली होती. त्यामुळे पक्षाच्या विधानमंडळ गटात अंतर्गत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
  • घटनापीठाचा निकाल आणि अध्यक्षीय आदेश: 'सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र शासन' या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. विधानमंडळातील एका गटाला अशा प्रकारे पक्षाचा गटनेता किंवा मुख्य प्रतोद बदलण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी या बदलांना दिलेली मान्यता पूर्णपणे बेकायदेशीर ठरवण्यात आली होती.
  • 15:22 (IST) 5 Aug 2026

    विशेष न्यायपीठ

    या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या न्यायपीठासमोर होत आहे.

    15:21 (IST) 5 Aug 2026

    आमदार अपात्रता याचिका

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेला नकार, या याचिकेद्वारे आव्हानात आणला गेला आहे.

    15:17 (IST) 5 Aug 2026

    शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु

    शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार? की ते कोणाला मिळणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

    14:31 (IST) 5 Aug 2026

    नांदेडे यांच्या पदव्यांची ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स’मध्ये नोंद!

    पाच दशकांत ३१ पदव्यांसह एकूण ३८ पदव्या-पदविका मिळवून त्यांनी डॉ. श्रीकांत जिचकार यांचा विक्रम मोडीत काढला आहे. ...सविस्तर वाचा
    14:06 (IST) 5 Aug 2026

    द्रोणागिरीत अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी; बेकायदा वाहनतळांमुळे अपघाताचा धोका

    सेवारस्त्यांवर रिकाम्या कंटेनर वाहनांनी ताबा मिळवल्याने अपघातांचा धोका वाढला असून, यावर तोडगा काढण्यासाठी १० ऑगस्टला जेएनपीएकडून नवीन वाहनतळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...सविस्तर वाचा
    13:58 (IST) 5 Aug 2026

    पाणथळींच्या सीमांकनानंतरच विकास; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नवी मुंबईतील निर्णयप्रक्रियेला नवी दिशा

    नवी मुंबईतील फ्लेमिंगो अधिवास आणि पाणथळ जागांच्या दर्जावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ...अधिक वाचा
    13:22 (IST) 5 Aug 2026

    ‘पिंक ई-रिक्षा’साठी अडथळ्यांचीच वाट; महिलांकडून प्रतिसाद का नाही?

    राज्य सरकारने महिलांसाठीच्या ‘पिंक ई-ऑटो’ योजनेतील अनुदान ४० टक्क्यांपर्यंत वाढवूनही पुण्यात महिलांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ...वाचा सविस्तर
    13:17 (IST) 5 Aug 2026

    संसदेत विधेयक सादर; व्यापाऱ्यांवर ‘एमडीआर’चा भार आणणारे संसदेत विधेयक; यूपीआय व्यवहारांवर आता पैसे मोजावे लागणार?

    यूपीआयच्या माध्यमातून जुलैमध्ये २३.६ अब्ज व्यवहार झाले असून, ते एकूण २९.९ लाख कोटी रुपयांचे आहेत. वॉलमार्टचे पाठबळ लाभलेल्या ‘फोनपे’ आणि अल्फाबेटच्या ‘गुगल पे’ हे दोन मंच या व्यवहारांत आघाडीवर आहेत. ...वाचा सविस्तर
    12:54 (IST) 5 Aug 2026

    पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातूनच चोरीला; अहिल्यानगरमधील घटना

    जप्त केलेला टेम्पो त्यातील साहित्यसह पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आला होता. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातून जप्त टेम्पो पळवण्यात आल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...सविस्तर बातमी
    12:44 (IST) 5 Aug 2026

    E20 पेट्रोल वाद: नितीन गडकरींविरोधात 'डीपफेक' व्हिडिओ बनवणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! सर्व सामग्री तातडीने हटवण्याचे निर्देश

    न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकल खंडपीठाने हे स्पष्ट केले की, गडकरी यांनी त्यांच्या याचिकेत दाखवलेली सर्व सामग्री सकृतदर्शनी बदनामीकारक आहे. ...वाचा सविस्तर
    12:41 (IST) 5 Aug 2026

    सोने, चांदीच्या दरात घसरणीनंतर पुन्हा तेजी..! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आता काय स्थिती?

    आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कॉमेक्स एक्सचेंजवरही सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत सोन्याचा भाव ०.८५ टक्क्यांनी वाढून प्रति औंस ४,१८८.१० डॉलर इतका नोंदवला गेला. ...अधिक वाचा
    12:13 (IST) 5 Aug 2026

    आनंदवार्ता ! नाशिक जिल्ह्यात नोकरीची सुवर्णसंधी, १२०० पेक्षा अधिक जागा उपलब्ध

    नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सतत बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असते. वारंवार रोजगार मेळावे घेऊन युवकांना रोजगाराची संधी या केंद्राच्या वतीने करण्यात येत असते. ...सविस्तर बातमी
    11:58 (IST) 5 Aug 2026

    अहिल्यानगरमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी पथक;  सात महिन्यात १.७८ कोटींचे अमली पदार्थ जप्त

    गेल्या सात महिन्यात १ कोटी ७८ लाख ५७ हजार ८१० रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. ...अधिक वाचा
    11:50 (IST) 5 Aug 2026

    International Mathematical Compitition : भारतीय विद्यार्थ्यांनी सोडवले आंतरराष्ट्रीय गणित… आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत दमदार कामगिरी!

    बल्गेरियात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण यश मिळवत चमकदार कामगिरी केली आहे. ...वाचा सविस्तर

    Maharashtra News Live Updates in Marathi| Maharashtra Weather Update Today

    महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स