Mumbai Pune News Updates, 03 April 2026 : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे काही खासदार शिवसेनेच्या (शिंदे) स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच दुसरीकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घडामोडी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांत नेमकं काय चाललंय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Updates, 03 April 2026 : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरण: 'एसआयटी'ने अजूनही 'त्या' बड्या नेत्यांना हात का लावला नाही?
नक्षलवादी चळवळीचा ‘थिंक टँक’ प्रशांत बोसचा मृत्यू; तुरुंगात प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचारादरम्यान…
पांढऱ्या सोन्याला झळाळी, कापसाची हमीभावावरही कुरघोडी ! युद्धजन्य परिस्थितीत पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाल्याचा परिणाम
राज्यात हजारांवर गोशाळा; बायोगॅस प्रकल्प जेमतेम, गौऱ्यांची मागणी वाढली
पाणी गळती शोधण्यासाठी पथके तैनात करणार दूषित पाण्याच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी चोवीस तास कार्यरत राहण्याचे आदेश
रिक्षा- टॅक्सी कल्याण मंडळात सदस्य नोंदणीचे प्रमाण अत्यल्प; राज्यभरात ९ लाखांहून अधिक चालक, नोंदणी केवळ ९ हजार सदस्यांची
लाडक्या बहिणींसाठी खुषखबर, ई-केवायसीमधील त्रुटीची करता येणार सुधारणा, दिली महिन्याभराची मुदतवाढ
संक्रमण शिबिरातील घुसखोरांविरोधात म्हाडाची कारवाई; धारावीतील घुसखोरांना बाहेर काढण्यास सुरुवात, आतापर्यंत ३२ जणांना काढले बाहेर
अशोक खरातला कोणी किती कॉल केले? चाकणकरांचे १७७, शिंदेंचे १७ तर तटकरेंचे ८; अंजली दमानिया आणि सुषमा अंधारेंनी वाचली यादी!
Anjali Damania On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं असून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचेही फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
पावसामुळे घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली- नुकसानीच्या भीतीने आवक कमी
तब्बल १२ वर्षानंतर अभयारण्यांचा ताबा वन्यजीव विभागाकडे
नागपूरचा सन्मान ! डॉ. संजीव चौधरी यांना रशियन विद्यापीठाचा सर्वोच्च बहुमान..
बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंच्या सुरात सूर, बघा काय म्हणाले?
झोपु योजनेतील रहिवाशांना दिलासा; योजनेतील देखभाल शुल्कात वाढ, प्रति सदनिका ४० हजार रुपयांवरून शुल्क आता १ ते ३ लाखांपर्यंत राज्य सरकारकडून शासन निर्णय प्रसिद्ध
जी. श्रीकांत यांची बदली रोखण्याच्या वक्तव्याला विरोध; जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी. सी रुजू
राज्यातील सर्वात मोठ्या नाट्यगृहाची घोषणा, ‘निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी’ यांच्या नावाने ओळखले जाणार
नोटबंदीच्या काळात जप्त नोटा परत घेण्यास ‘आरबीआय’कडून नकार, न्यायालय म्हणाले, ‘नागरिकांचा दोष नसताना…’
भंडारदरा धरण शताब्दी महोत्सव उधळून लावण्याचा इशारा
बदलापूर: पाण्यासाठी पायपीट कधी थांबणार? श्रमिक मुक्ती संघटनेची रविवारी नाणेघाटाच्या पायथ्याशी ‘पाणी हक्क परिषद’
नागपुरात पोलीस शिपायाचीच हत्या… पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलानेच छातीत सळई खुपसली…
मेळघाटातील चिलाटीतून थेट ग्रेट ब्रिटन! ५५ लाखांची शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या किशोर बेठेकरचा थक्क करणारा प्रवास…
Video : पहिले मुत्रपिंड विकले, आता इच्छा मरण मागतोय, हतबल शेतक-याची …
लग्न टिकवण्याचे आव्हान! वाढते घटस्फोटाचे प्रमाण रोखण्यासाठी 'मराठा पाटील' सरसावले; ‘जोडला मोडू घातलेला संसार’; विवाह पश्चात समस्या निवारणासाठी…
दहिसर मिरा भाईंदर मधील मेट्रोमध्ये नवा वाद
Video: डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक सांडपाण्याची वाहिनी फुटली, दुर्गंधीने नागरिक हैराण
Hapus : उत्पादन घटले, बनावट ‘हापूस’चा फटका; कर्जबाजारी बागायतदारांना व्याजमाफीचा दिलासा
नवी मुंबईतील उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून वाद? कोनशिलेवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव नसल्याने सेना आक्रमक
नवी मुंबईतील पामबीच मार्गावरून सायन-पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून वाद निर्माण झाला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव कोनशिलेवर नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने पामबीच मार्ग ते सायन-पनवेल महामार्ग जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत खळबळ: विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच लिपिक भूषण पाटील निलंबित
नांदेड भाजपा कार्यालय पूर्णत्वाची जबाबदारी आता खा.चव्हाणांकडे!

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आश्विनी भिडेच का? मुख्यमंत्री फडणवीसांच्या या निर्णयामागची कारणे कोणती? (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
