Maharashtra News Updates, 11 August 2026 : सातारा-पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथे मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचे अपडेट्स आता समोर येत आहेत. तर, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत पार पडला. या वेळी देशभरातील अनेक मंडळी या सोहळ्याला आली होती. मात्र, राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि रेवतीच्या मामी सुनेत्रा पवार मात्र या सोहळ्यात दिसल्या नाहीत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसंच, याच सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनी एकत्र बसून बराचवेळ चर्चा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा नवं राजकीय समिकरण पाहायला मिळणार आहे का? अशीही चर्चा रंगली आहे. तर, आज सकाळपासून मुंबईत अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Today’s Breaking News Live Updates, 11 August 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
गलवानच्या शौर्यगाथेने वीरपत्नींचे डोळे पाणावले; लेहमध्ये ‘त्रिशूल युद्ध संग्रहालय’ खुले
सर्पदंश प्रकरणी जपतलाई आश्रमशाळेची मान्यता रद्द ; संस्थाचालकावर फौजदारी कारवाई व अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे मुख्यमंत्र्यांकडून निर्देश…
पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट पुन्हा वाहतुकीसाठी बंद…
वाशीत आईच्या हत्येने खळबळ, मुलाला अटक; कौटुंबिक वादातून गळा आवळून फरशीवर डोके आपटले
"मातृसंस्थेच्या मुख्यालयावर ५२ वर्षे तिरंगा न फडकवणारे आज 'तिरंगा यात्रा' काढत आहेत", रोहित पवारांची टीका
पालघर: तलासरी हद्दीत १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; ३ संशयितांना अटक
"पक्ष घटना संवैधानिक की असंवैधानिक हे ECI ठरवू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयात सिब्बलांचा युक्तीवाद
"१९९९ च्या संविधानांतर्गत कोणतेही 'मुख्य नेता' पद नाही. कोणत्या संविधानानुसार त्यांनी (शिंदे) स्वतःला ही पदवी बहाल केली? हे सर्व पक्षांतराच्या नंतर घडले. निवडणूक आयोगाची (ECI) मार्गदर्शक तत्त्वे २०१० मध्ये लागू झाली... परिच्छेद १५ असे गृहीत धरतो की तुमची निवड किंवा नामांकन एका विशिष्ट पक्ष संविधानांतर्गत झाले आहे आणि राजकीय पक्षात फूट पडली आहे. संविधानाच्या वैधतेचा परिच्छेद १५ शी काय संबंध? निवडणूक आयोग ही केवळ एक न्यायाधीकरण आहे. घटना संवैधानिक आहे की असंवैधानिक हे ते ठरवू शकत नाही. मी गृहीत धरतो की माझ्या पक्षाची घटना असंवैधानिक होते. मग त्याचे परिणाम काय? तर ते म्हणजे पक्षाची नोंदणी रद्द करणे. याशिवाय दुसरा कोणताही अधिकार नाही. दुसरा गट (शिंदे गट) देखील याच संविधानाची निर्मिती आहे. मग निवडणूक चिन्ह त्यांना कसे मिळू शकते? - कपिल सिब्बल
https://twitter.com/LiveLawIndia/status/2087118197317394914?s=20
श्रावणात सिद्धेश्वरांचा गजर अन् पूर्व भागात रथोत्सव; सोलापुरात १३ ऑगस्टपासून भक्तीचा महाकुंभ
'वारणा'ची म्हैस दूध खरेदीत प्रतिलिटर दीड रुपया; गाय दुधास १ रुपया दरवाढ
नवी मुंबईत ‘एसआयआर’ला अल्प प्रतिसाद; हजारो मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता
नवी मुंबई: शहरात ‘हरित प्रभाग’ स्पर्धा; पर्यावरण संवर्धनासाठी नागरिक, संस्था आणि मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन
महिलेने जीन्स घातल्याने पुरुषांचे मन भ्रष्ट होते?
वाढीव दर, ओला- उबेरला बंदी; नालासोपाऱ्यात रिक्षाचालकांची मनमानी
विरारच्या ९० फूट रस्त्यावर विचित्र अपघात, दुचाकी आणि रिक्षाची धडक; दोन जण जखमी
सेवानिवृत्तांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, राज्यातील किती कर्मचाऱ्यांना लाभ होणार
सलग सुट्ट्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या दहिहंडीच्या सुट्टीत बदल
मुंबई : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांमधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या दहिहंडीच्या सुट्टीत बदल करण्याचा सुधारित आधेश सोमवारी जारी करण्यात आला. या बदलामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस सलग सुट्टी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनाबाबत सरकारचा मोठा निर्णय
नसलेली आंब्याची झाडे दाखवून भरपाई घेतली, रक्कम व्याजासह परत करण्याचे न्यायालयाचे आदेश
वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा कोलमडली! विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; प्रवाशांचे हाल
रेवती सुळेच्या रिसेप्शनमध्ये रत्नागिरीच्या मिथिलेश देसाईने वेधलं लक्ष; थेट मोदींशी मारल्या गप्पा, कोण आहे हा 'फणस किंग'?
‘एसआयआर’च्या मुदतवाढीची मागणी जनहित याचिकेत रूपांतरित, औरंगाबाद खंडपीठाची परवानगी
पुणे जिल्ह्यात २५ लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता! ‘SIR’अंतर्गत अर्ज संकलित होत नसल्याचा परिणाम
इथेनॉलमुळे वाहन खराब होण्याला वैज्ञानिक आधार नाही, नितीन गडकरींवर होणाऱ्या आरोपानंतर संशोधक काय म्हणतात?
अंबरनाथमधील सत्ताधाऱ्यांतील विरोध मावळणार? वाळेकर-करंजुले वादावर ज्येष्ठ भाजप आमदाराची मध्यस्थी
LIVE : "लोकलमधील १२ पैकी ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा", भाजपा नगरसेविकेची Gen Z आणि Alpha साठी मागणी
"लोकलमधील १२ पैकी ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा", भाजपा नगरसेविकेची Gen Z आणि Alpha साठी मागणी. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिलं पत्र
नवी मुंबई: नैना प्रकल्पाला गावनिहाय गती… प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे नियोजन
"हा प्रशासकीय खून", सर्पदंशप्रकरणी रोहित पवारांची सरकारवर टीका
पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम मंडळाची स्थापना, अधीक्षक अभियंता सह इतर पदांना मान्यता
ठाणे: लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
पश्चिम रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरीय प्रवाशांना दिलासा

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह सुनावणीच्या लाईव्ह घडामोडी वाचा. (संग्रहित छायाचित्र)
Today’s Breaking News Live Updates, 11 August 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या.
