Sanjay Raut Arrest Maharashtra News : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. राऊत यांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना अटक केल्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सोमवारी प्रसिद्धपत्रक जारी करत माफीनामाच सादर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या 'एकनाथ शिंदे उद्याना'चे उद्घाटन करणार आहेत. स्वत:च्या नावाचं उद्यान आणि स्वत:च उद्घाटक असल्याने पुण्यातील 'एकनाथ शिंदे उद्यान' वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि देशातील अशाच प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…