Latest Maharashtra News Live: शिवसेना पक्षनाव व धनुष्य बाण निवडणूक चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हे चिन्ह यावर सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या शिवाय जिल्हा परिषद निवडणुका, महापौर व जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण आदी मुद्द्यावर न्यायालयाकडून आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना फुटीनंतर राज्यात झालेला सत्तासंघर्ष, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मूळ पक्ष म्हणून दिलेली मान्यता आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा घेतलेला निर्णय आदी बाबींना ठाकरे उद्धव गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भातील याचिका न्यायालयात ३-४ वर्षांपासून प्रलंबित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी मूळ पक्ष म्हणून मान्यता देऊ घड्याळ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. या संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होऊ शकते.

या सुनावणीशी संबंधित सर्व अपडेट्स खालील ब्लॉगमधून जाणून घ्या.

Live Updates

Marathi News Updates | महाराष्ट्र बातम्या लाईव्ह अपडेट्स

20:16 (IST) 21 Jan 2026

लोकमान्य टिळक मंडईच्या नूतनीकरणासाठी विक्रेत्यांवर दबाव; अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा आरोप

लोकमान्य टिळक मंडईच्या नूतनीकरणासाठी विक्रेत्यांवर दबाव टाकला जात असून कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केला आहे. व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. ...सविस्तर वाचा
20:09 (IST) 21 Jan 2026

आमदार साजिद खान पठाणांमुळे पराभव; काँग्रेसमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर, ‘काँग्रेस पक्षात हिंदुंना डावलण्यात…’  

पक्षाच्या माजी नगरसेविका चांदणी शिंदे व महानगर महासचिव रवी शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदार साजिद खान पठाण यांना पराभवासाठी जबाबदार धरले. ...सविस्तर बातमी
20:09 (IST) 21 Jan 2026

किसान सभेचे आता मुंबई लक्ष्य; जिल्ह्यातून हजारो आदिवासी बांधवांचे नाशिककडे कूच

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी प्रलंबित वनजमीन हक्क आणि पाणी प्रश्नासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली आता थेट मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त करत मोठे आंदोलन छेडले आहे. ...सविस्तर बातमी
19:55 (IST) 21 Jan 2026

बीडीडीवासियांना दिलासा; दरमहा ३० हजार रुपये घरभाडे, म्हाडाच्या मुंबई मंडळाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत तात्पुरत्या स्थलांतरासाठी मिळणारे घरभाडे वाढवण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. राज्य सरकारकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास रहिवाशांना दरमहा ३० हजार रुपये घरभाडे मिळणार आहे. ...वाचा सविस्तर
19:21 (IST) 21 Jan 2026

खासदार झाले म्हणजे पक्षाचे मालक होत नाहीत”; धानोरकरांवर वडेट्टीवारांची थेट तोफ

पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “खासदार आणि नेते यांचे काम वेगवेगळे असते. खासदार झाल्याने कुणी पक्षाचा मालक होत नाही. पक्ष कार्यकर्त्यांचा असतो ...वाचा सविस्तर
19:09 (IST) 21 Jan 2026

Indian Army Topchi 2026 : ​नेपाळ लष्कर, सातारा अन् पुण्याच्या विद्यार्थ्यांसमोर, नाशिकमध्ये रंगला तोफांचा अग्निवर्षाव!

School of Artillery Nashik : नाशिकच्या देवळाली येथील तोफखाना स्कूलतर्फे आयोजित 'तोपची' सोहळ्यात के-९ वज्र, धनुष आणि बोफोर्स सारख्या महाभयंकर तोफांच्या अग्निवर्षावाने संपूर्ण फायरिंग रेंज उजळून निघाली. ...सविस्तर बातमी
19:04 (IST) 21 Jan 2026

नागपूर : पोलीस क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तात, शहरात दोन खून

मानकापूर पोलीस हद्दीतल्या राजलक्ष्मी सोसायटीतील प्रसाद विहारमध्ये प्राची हेमराज खापेकर (२३) या तरुणाचा संशयास्परित्या मृतदेह आढळला. ...अधिक वाचा
18:51 (IST) 21 Jan 2026

गडचिरोली पालिकेत 'राष्ट्रवादी'ला सत्तेत वाटा, भाजपमध्ये मात्र नाराजीनाट्य…

राष्ट्रवादीचे गटनेते लीलाधर भरडकर यांची पाणीपुरवठा सभापतिपदी वर्णी लागली असली, तरी या प्रक्रियेत भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली. ...सविस्तर बातमी
18:27 (IST) 21 Jan 2026

Nanded Special Trains : चंडीगड, दिल्लीहून जळगाव–भुसावळमार्गे नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार…

Shri Guru Teg Bahadur Shahidi Samagam Nanded : श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिल्ली, चंडीगड आणि मुंबईहून नांदेडसाठी विशेष सुपरफास्ट गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर
18:18 (IST) 21 Jan 2026

PWP Crisis: रायगडमध्ये शेकापसाठी अस्तित्वाची लढाई

जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड राखणारा हा पक्ष, आज कुठेतरी गटांगळ्या खाताना दिसतो आहे. पक्षाची वाताहत सुरु आहे. ...सविस्तर बातमी
18:15 (IST) 21 Jan 2026

PCMC Election 2026 : महापालिका सभागृहात असणार चाैथी, पाचवी पास अन् डॉक्टर, वकील, अभियंते

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात चौथी-पाचवी पास नगरसेवकांपासून ते डॉक्टर, वकील आणि अभियंते असा विविध शैक्षणिक स्तरांचा समावेश आहे. १२८ नवनिर्वाचित नगरसेवकांचे हे चित्र प्रशासन आणि धोरणात्मक चर्चांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. ...वाचा सविस्तर
17:40 (IST) 21 Jan 2026

‘दैव आले द्यायला, अन् पदर नाही घ्यायला’, 'बॅकवॉटर'मुळे कारधावासींचे जगणे अधांतरी….

गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरचा गावाला कायमच त्रास, भिंती ओल्या, जमीन ओली, भिंतीला पाण्यामुळे जाणारे तडे ...सविस्तर वाचा
17:40 (IST) 21 Jan 2026

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’निमित्त मध्यभागातील वाहतुकीत उद्या बदल- शहरातील सर्व शाळा दुपारी बारापर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेच्या समारोपामुळे शुक्रवारी शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बदल राहणार आहेत. तसेच सर्व शाळा दुपारी बारापर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...सविस्तर बातमी
17:36 (IST) 21 Jan 2026

Bhandara Crime : राज्य कर निरीक्षकाला ३५ हजारांची लाच स्वीकारतांना अटक; बंद पडलेला जीएसटी क्रमांक सुरू करण्यासाठी…

बंद पडलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू व कर विभागाच्या (जीएसटी) राज्य कर निरीक्षकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...सविस्तर बातमी
17:29 (IST) 21 Jan 2026

PCMC Election 2026 : भाजपला ४५.२०, अजितदादांच्या 'राष्ट्रवादी'ला ३६.३७ टक्के मते; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 'नोटा'पेक्षा…

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला ४५.२० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ३६.३७ टक्के मते मिळाली. शिवसेना (शिंदे) पक्षाला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर वाचा
17:24 (IST) 21 Jan 2026

कल्याण डोंबिवली पालिकेत भाजप युतीधर्म पाळणार; भाजप जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय हालचाली सुरू असल्या तरी भाजप युतीधर्माचे पालन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांनी स्पष्ट केले आहे. ...सविस्तर वाचा
17:20 (IST) 21 Jan 2026

शिंदेसेनेची भाजप मुक्त कल्याण डोंबिवलीची खेळी; कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा सत्तेचा नवा पॅटर्न…

कल्याण डोंबिवलीत भाजपचे महत्त्व कमी करण्यासाठी शिंदे सेनेने मनसे आणि इतर पक्षांशी हातमिळवणी करत सत्तेचा नवा आणि धक्कादायक पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली आहे. ...अधिक वाचा
17:05 (IST) 21 Jan 2026

निवडणुकीत पराभव झाला तरी काँग्रेस उमेदवाराची घरोघरी भेट, लोकसेवेचे नाते कायम ठेवणार

मतदारांचे आभार मानत, लोकसेवेचे नाते कायम ठेवण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ...वाचा सविस्तर
16:59 (IST) 21 Jan 2026

अमली पदार्थ तस्करी प्रकरणी सलमान खानला अटक

मुंबईतील कुर्ला परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सलमान खानला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा एमडी जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. ...वाचा सविस्तर
16:52 (IST) 21 Jan 2026

व्हिडिओ : सहा.धर्मदाय आयुक्त कार्यालयातील हुंडीवाले हत्याकांड : दहा जणांना जन्मठेप, ॲड. निकम म्हणाले, ‘भीषण आणि क्रूरता…’

या हत्याकांडामुळे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एकूण १५ आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. ...अधिक वाचा
16:47 (IST) 21 Jan 2026

केवळ एक ॲम्बुलन्स नावावर असलेल्या उमेदवाराची कमाल! आमदार, खासदारांच्या मुलांनाही मागे टाकत महाराष्ट्रात फटकाविला पहिला क्रमांक

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर यांनी तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विक्रमी विजय मिळवला. केवळ एक ॲम्बुलन्स नावावर असतानाही त्यांनी महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला. ...वाचा सविस्तर
16:46 (IST) 21 Jan 2026

विश्लेषण: शेअर बाजारातील अस्थिरताही मोजता येते? काय आहे व्हीआयएक्स इंडेक्स? सध्याच्या बाजाराबद्दल चिंताजनक संकेत?

इंडिया व्हीआयएक्स निर्देशांकात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. तो गुणांक सध्या १३ ते १५ या श्रेणीत आहे. ...सविस्तर बातमी
16:46 (IST) 21 Jan 2026

Ranvir Singh Khalsa : धुळे वैध शस्त्र परवान्यामुळे रणवीरसिंग खालसा यांना जामीन; गुरुद्वारातील अग्निशस्त्र प्रकरणात न्यायालयाचा दिलासा...

धुळे येथील गुरुद्वारामध्ये सापडलेल्या अग्निशस्त्र प्रकरणात रणवीरसिंग खालसा यांच्याकडे वैध शस्त्र परवाना असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
16:32 (IST) 21 Jan 2026

Central Railway : ठाणे रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचण्याच्या समस्येतून सुटका; स्थानकातील महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण

ठाणे रेल्वे स्थानकात पावसाळ्यात रुळांवर पाणी साचून होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मध्य रेल्वेने फलाट क्रमांक एकजवळ हाती घेतलेले भूमिगत वाहिन्यांचे महत्त्वाचे काम आता पूर्ण झाले आहे. ...सविस्तर बातमी
16:29 (IST) 21 Jan 2026

तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड - टोळक्याच्या दहशतीमुळे रहिवासी भयभीत

पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने कोयते आणि बांबू उगारत १५ वाहनांची तोडफोड केली. किरकोळ वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील रहिवासी दहशतीखाली गेले असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...अधिक वाचा
16:29 (IST) 21 Jan 2026

कल्याण डोंबिवली पालिकेतील सत्तेसाठी; मनसेने धरला अखेर ‘बबल्या’चा हात

कल्याण ग्रामीणमधील प्रलंबित विकासकामांवरून ज्यांना 'बबल्या' म्हणून हिणवले, त्याच शिवसेनेसोबत मनसेचे राजू पाटील सत्तेसाठी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली आहे. ...अधिक वाचा
16:28 (IST) 21 Jan 2026

PCMC TAX : निवडणुकीनंतर आता थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर; दिला 'हा' इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने निवडणुकीनंतर थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा दिला आहे. मालमत्ता कर न भरल्यास निवासी मालमत्तांचे नळजोड खंडित तर बिगरनिवासी मालमत्तांवर लाखबंदी केली जाणार आहे. ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 21 Jan 2026

'स्थिरता, विकासासाठी मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, इच्छुकांचेही महायुतीत स्वागत असेल'; खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची माहिती…

कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी आणि राजकीय स्थिरतेसाठी मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असून महायुती अधिक बळकट करण्यासाठी इतर पक्षांतील इच्छुकांचेही स्वागत असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. ...अधिक वाचा
16:19 (IST) 21 Jan 2026

मालेगावकरांना मोठा दिलासा! थकीत घरपट्टी-पाणीपट्टीच्या व्याजात 'एवढी' सूट…

मालेगाव महानगरपालिकेने थकबाकीदार नागरिकांसाठी अभय योजना लागू केली असून घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या दंडात्मक व्याजात सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ...अधिक वाचा
16:16 (IST) 21 Jan 2026

Pimpri Chinchwad Crime : ड्रेनेजचे काम बंद पाडत कंत्राटदारावर चाकूने वार; वाचा कुठे घडली ही घटना?

ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचे नुतनीकरण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या कामामुळे नाट्यगृह सुमारे तीन महिने बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ...वाचा सविस्तर

Reservation Shiv Sena promises Supreme Court hearing today mumbai print news

आरक्षण, शिवसेना वादावर आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष (लोकसत्ता टिम)