Latest Marathi News Updates, 12 June 2026: जळगाव विधान परिषद निवडणूकीतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल झाल्या आहेत.’देशातील राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (TMC) या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेस हे एक बुडते जहाज असून, हुशार नेते कधीही त्यात पाय ठेवणार नाहीत. मात्र, तरीही असे विलीनीकरण झालेच, तर त्याचा फायदा भाजपलाच होईल,” असा दावा फडणवीस यांनी केला आहे. तर दुसरीकडे सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी शर्तींमुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफिपासून वंचित राहणार आहेत असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या जाचक अटी आणि शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी यासाठी रोहित पवार आज पंढरपूरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडने दिल्लीत बोलावलं आहे. या बातम्यांसहच दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Mumbai Maharashtra Latest News Updates, 12 June 2026

16:01 (IST) 13 Jun 2026

कल्याण मध्ये तुकाराम मुंडेंचा दणका…. प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्या तीन टपरी चालकांविरुद्ध गुन्हे

ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
15:55 (IST) 13 Jun 2026

नायगाव बीडीडी पुनर्वसन इमारतीतील पाणीटंचाई २२ सदनिकांमधील अतिरिक्त टाक्यांची जोडणी म्हाडाने तोडली;भविष्यात कारवाई सुरुच राहणार

म्हाडाच्या मुंबई मंडळाने २८ सदनिकाधारकांना नोटीस बजावली होती, ज्यातील मुदत संपल्यानंतर शुक्रवारी इमारत टी ६ मधील २२ घरांच्या टाक्यांची जोडणी तोडण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
15:41 (IST) 13 Jun 2026

‘कृषी विभागात ‘कृषीमित्र’ होण्याची संधी’, कृषी मंत्र्यांचा फोटो वापरून बनावट जाहिरात व्हायरल, वाचा सविस्तर…

पुण्यात सायबर गुन्हेगारांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. ...वाचा सविस्तर
15:30 (IST) 13 Jun 2026

पिंपरीच्या पोलीस आयुक्तांचा दणका! पिस्तूलाचा दुरुपयोग; माजी नगरसेवकासह १५ जणांचे परवाने रद्द, ६८ जणांना…

पिंपरी-चिंचवडमध्ये पिस्तुलचा दुरुपयोग, गुन्हेगारी पार्श्वभूमी, मुदतीत शस्त्र खरेदी न करणे आणि वृद्धत्वामुळे १५ जणांचे शस्त्र परवाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रद्द केले आहेत. ...सविस्तर वाचा
15:10 (IST) 13 Jun 2026

कोल्हापूर प्रवेशासाठी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मानगुटीवर टोल आकारणीचे ओझे; जिल्ह्यात असूनही इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळकरांवर कर जाच

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या बाहेरच्या वाहनांवर 'प्रवेश कर' (एन्ट्री टॅक्स) आकारण्याचा प्रस्ताव १७ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी येत आहे. ...अधिक वाचा
15:10 (IST) 13 Jun 2026

कोल्हापूर प्रवेशासाठी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मानगुटीवर टोल आकारणीचे ओझे; जिल्ह्यात असूनही इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळकरांवर कर जाच

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या बाहेरच्या वाहनांवर 'प्रवेश कर' (एन्ट्री टॅक्स) आकारण्याचा प्रस्ताव १७ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी येत आहे. ...अधिक वाचा
15:07 (IST) 13 Jun 2026

राज्यात उष्माघाताचे २९७ रुग्ण;८ जणांचा मृत्यू, तर १७ संशयित मृत्यू

तर १८ संशयित मृत्यूंची नोंद आहे. विदर्भ आणि मराठवाडा या उष्णतेमुळे सर्वाधिक प्रभावित झाले असून औरंगाबादमध्ये सर्वाधिक ४८ रुग्ण आढळले आहेत. ...सविस्तर बातमी
13:48 (IST) 13 Jun 2026

सराईत भूमाफिया सलमान डोलारेला अटकेपासून रोखणाऱ्या धमकी देणाऱ्या १० नातेवाईकांवर गुन्हा

कोर्टाचे वॉरंट असतानाही त्याला लपवून ठेवत पोलिसांना धमकावणाऱ्या आणि सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या त्याच्या १० नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
13:42 (IST) 13 Jun 2026

दुधात भेसळ करणाऱ्यांची गय करणार नाही, तुकाराम मुंढे यांचा डेअरी चालकांना सज्जड दम

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी डेअरी चालकांना कडक इशारा दिला आहे. ...वाचा सविस्तर
13:38 (IST) 13 Jun 2026

अंबरनाथ-काटई मार्गावरील कोंडी कायम राहणार; काकोळेगाव पुलाचे काम लांबले, ३० ऑगस्टपर्यंत वाहतूक बदलांची मुदतवाढ

ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, यामुळे या पट्ट्यात वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे. ...अधिक वाचा
13:34 (IST) 13 Jun 2026

पार्किंगचा वाद, महिलेने दुचाकीसह पाच वाहने पेटवली; अंबरनाथमधील प्रकार, महिलेविरूद्ध गुन्हा दाखल

या आगीत शेजारी उभी असलेली दोन महागडी चारचाकी वाहने आणि इतर दोन दुचाकी अशी एकूण पाच वाहने जळून खाक झाली आहेत. ...सविस्तर बातमी
13:16 (IST) 13 Jun 2026

घाटकोपर पाठोपाठ आता शिवसेना - मनसेच्या बालेकिल्ल्यात पांढऱ्या पट्टीवरून वाद, दुपारी ३ पर्यंत मनसेचा अल्टिमेटम; मराठी - जैन वाद पुन्हा भडकला⁩

मनसेच्या या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने पावले उचलत मुदतीपूर्वीच सकाळी या पांढऱ्या पट्ट्या पुसण्याची कारवाई सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
13:14 (IST) 13 Jun 2026

अधिक मासाचे ‘लाखमोला’चे कौतुक! लेकींसोबत सुनेला पायात घालण्यासाठी चक्क चांदीच्या चपला

अधिक मासानिमित्त बारणे कुटुंबीयांनी आपल्या दोन मुलींसह सुनेलाही मुलीसमान मानून चांदीच्या चपला वाण म्हणून भेट दिल्या आहेत. ...वाचा सविस्तर
12:34 (IST) 13 Jun 2026

पुणे स्टेशनवरील एक्सप्रेस, लोकल गाड्या रद्द; वाचा नेमके कारण काय ?

पुणे रेल्वे स्थानक परिसरात रविवार, १४ जून रोजी पायाभूत सुविधांच्या आणि तांत्रिक कामांसाठी ९ तासांचा ‘विशेष ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
12:26 (IST) 13 Jun 2026

ठाण्याला ‘तुकाराम मुंडे’ हवेत?; महापालिका वर्तुळात चर्चा, भाजपचा एक गटही आग्रही

पालिकेचा नियोजनशून्य कारभार आणि २,१०० कोटी रुपयांचे वाढते आर्थिक दायित्व या पार्श्वभूमीवर, कारभाराला शिस्त लावण्यासाठी धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नेमणूक करावी ...सविस्तर वाचा
12:24 (IST) 13 Jun 2026

अहिल्यानगरमधील रस्त्यावर बेकायदा विल्हेवाट लावलेल्या वैद्यकीय जैविक कचऱ्याचा खच, आरोग्य विभागाकडून पंचनामा

रुग्णालये व दवाखान्यांमधून निर्माण होणारा हा जैविक कचरा अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने स्पष्ट नियमावली तयार केलेली आहे. ...सविस्तर वाचा
12:08 (IST) 13 Jun 2026

आणखी एका आयटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; ‘टीसीएस’ने सांगितलं की…

या घटनेमुळे आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकरणावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) आपली अधिकृत भूमिका जाहीर करत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ...सविस्तर वाचा
12:02 (IST) 13 Jun 2026

गरजू महिलांच्या मदतीसाठी महानगरपालिकेतही स्वतंत्र ''लाडकी बहिण''योजना - राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० ते २००० रुपये आर्थिक मदत देण्याचा विचार असून, मंजुरीसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ...अधिक वाचा
12:01 (IST) 13 Jun 2026

आर्थिक मदतीचा बेस्ट प्रशासन कसा वापर करणार? दीर्घ चर्चेअंती ९०६ कोटींचा स्थायी समितीने प्रस्ताव राखून ठेवला

आतापर्यंत दिलेल्या १२ हजार कोटींहून अधिक निधीचा वापर कसा झाला याचा हिशोब स्पष्ट नसल्याने आणि मुंबईतील कंत्राटी बसचे अपघात, वीज संकट यावर नगरसेवकांनी आक्षेप घेतले आहेत. ...अधिक वाचा
11:40 (IST) 13 Jun 2026

ठाण्यात बोगस डॉक्टरांचे बिंग फुटले; १७६७ खासगी दवाखान्यांची तपासणी, तिघांविरोधात गुन्हे

ठाणे शहरातील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ३५ जणांच्या विशेष पथकाद्वारे १७६७ खासगी दवाखान्यांची अचानक भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी केली आहे. ...सविस्तर वाचा
11:25 (IST) 13 Jun 2026

चर्चेविना प्रस्ताव मंजुरीचा सपाटा- विरोधकांचा सभात्याग ; अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर विरोधक संतप्त

सत्ताधारी पाशवी बहुमताच्या आधारे अधिकारांचा गैरवापर करत असून लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
11:25 (IST) 13 Jun 2026

मॅगीमध्ये अळ्या? 'FSSAI' कडून नेस्ले, केएफसी आणि फ्लिपकार्टला नोटीस!

मॅगीमध्ये अळ्या आणि केएफसी आउटलेटमध्ये अस्वच्छता आढळल्याच्या सोशल मीडियावरील तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली ...सविस्तर वाचा
11:09 (IST) 13 Jun 2026

प्रभावित भागांना टँकरद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा करावा; अभिजीत बांगर यांचे आदेश

या पार्श्वभूमीवर, टोकावरील वस्त्या आणि उंचावरील भागात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी टँकरद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा करावा ...सविस्तर बातमी
11:01 (IST) 13 Jun 2026

३० वर्षांनंतर दहा सोसायट्यांना‘म्हाडा’कडून भूखंडांचा ताबा मिळणार!

१९९४ च्या जागतिक बँक प्रकल्पांतर्गत वितरित केलेल्या या भूखंडांबाबत सर्वोच्च न्यायालयाने संस्थांच्या बाजूने निकाल दिला असून, म्हाडाने आता ताबा हस्तांतरणाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. ...वाचा सविस्तर
11:01 (IST) 13 Jun 2026

भली मोठी फांदी तुटल्याने निसर्ग उन्नत मार्गाचे नुकसान; पर्यटकांना तात्पुरती प्रवेशबंदी

सुदैवाने यावेळी पर्यटक उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. महानगरपालिका प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग पर्यटकांसाठी तात्पुरता बंद केला ...सविस्तर बातमी
21:55 (IST) 12 Jun 2026

मध्य रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक

मुंबईतील लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर या वीकेंडला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...सविस्तर वाचा
21:00 (IST) 12 Jun 2026

राज्यात 'शाळा प्रवेशोत्सव २०२६' उत्साहात साजरा होणार, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत

राज्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ ने होणार असून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात १५ जून तर विदर्भात ३० जूनपासून शाळा सुरू होत आहेत. ...अधिक वाचा
20:48 (IST) 12 Jun 2026

सेजल पवारच्या वक्तव्याची चौकशी होणार, केईएम रुग्णालय स्थापन करणार तथ्यशोधन समिती

मुंबईच्या केईएम रुग्णालयातील एमबीबीएस विद्यार्थिनी सेजल पवार हिने एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये अवयवदान आणि मृतदेहासंबंधी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. ...वाचा सविस्तर
20:33 (IST) 12 Jun 2026

‘रालोआ’सरकारमुळे जनता समाधानी- भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. ...सविस्तर वाचा
20:26 (IST) 12 Jun 2026

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक

एसटी महामंडळाच्या प्रवासात पारदर्शकता आणण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना १ ऑगस्ट २०२६ पासून 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा

Maharashtra News Live Updates in Marathi | Maharashtra Water Crisis Monsoon Delay

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)