Today’s Top Marathi News Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत होता. मात्र, भारतीय हवामान विभागाने आता पुढील काही दिवस पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. सोनम वांगचुक यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे जंतरमंतरवर पोहोचल्या आहेत.
दरम्यान, राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात मध्यरात्री एक बैठक झाली होती. या बैठकीवेळी तिथे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “आम्ही जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान तिथे उपस्थित नव्हतो,” असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे.
तर दुसरीकडे ‘रामरक्षा’ आंदोलनात सहभागी व्हा यासाठी संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रण दिलं आहे.
या बातम्यांसह राज्यातील पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…
Maharashtra Mumbai Latest News Live, 16 July 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स
अमृतसर–सीएसएमटी एक्स्प्रेस खाली आढळला तुटलेला मानवी पाय, रेल्वे पोलिसांचा तपास सुरू
लाभाच्या योजनावरील निधी कपात, सदस्यांच्या आक्षेपानंतर फेरविचार
विविध ठिकाणांहून पाच अजगरांना वाचविण्यात यश, अजगर दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
जयंत पाटील महायुतीत जाणार नाही; सतेज पाटील यांना विश्वास
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास; अनधिकृत पाण्याची टाकी, मोटर पंप आढळल्यास रहिवाशांवर दंडाचा बडगा... म्हाडाच्या मुंबई मंडळाचा निर्णय
विनातिकीट प्रवाशांची धरपकडीला ग्रहण; विनातिकीट प्रवासी पकडण्यात ४ टक्क्यांची घट, मात्र दंड वसुलीत ६१ टक्क्यांनी वाढ
बदनामीनंतरही नीट फेरपरीक्षेत लातूर पॅटर्नचा पुन्हा डंका, १२०० हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पात्र
अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर, भाजपचे बंडखोर व ठाकरे गट एकत्र; चौघांवर कारवाईची शक्यता
खासदार सुप्रिया सुळेंनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांची आज भेट घेतली आहे. तसेच या भेटी दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
प्लास्टिक नोटा खरोखरच येणार; RBI कडून १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचपणी सुरू
'गण गण गणात बोते' गजराने सोलापूर दुमदुमले; ७०० वारकऱ्यांच्या सेवेसाठी उळे गाव सरसावले
रेल्वे प्रवासात हत्या, मारहाणीच्या घटना का घडत आहेत? प्रवाशांचा संयम का सुटतोय?
‘एमएमआरसी’च्या नावे पदभरतीच्या फसव्या जाहिराती, फसव्या जाहिरातींना भूलू नका; मेट्रो प्रशासनाचे आवाहन
समृद्धीस जोडणाऱ्या मार्गासाठी पोलीस बंदोबस्तात भूसंपादन, पाच गावांच्या हद्दीत बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी; प्रतिबंधात्मक आदेश लागू
बेटमोगरेकर यांचा भाजपा प्रवेश मुखेडच्या आमदारांनी थांबविला! दोन्ही बंधू विरोधक म्हणूनच ठीक- तुषार राठोड
पालकांच्या वेदनांची भरपाई पैशांत होऊ शकत नाही, एकुलत्या लेकीला गमावणाऱ्या याचिकाकर्त्याला दिलासा
नांदेडमध्ये जिल्हा परिषद शिक्षकाची दोन्ही मुलांसह गोदावरी नदीत आत्महत्या; शेवटच्या व्हॉट्सॲप मेसेजने खळबळ
आराम नगरमध्ये साडेतीन वर्षांत उभा राहणार म्हाडाचा वृद्धाश्रम ; सुमारे ५० कोटींच्या प्रकल्पाच्या निविदेत स्पेक्ट्रमची बाजी
आराम नगरमध्ये साडेतीन वर्षांत उभा राहणार म्हाडाचा वृद्धाश्रम ; सुमारे ५० कोटींच्या प्रकल्पाच्या निविदेत स्पेक्ट्रमची बाजी
'पक्षातीलच काहीजण पार्थ पवारांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करत आहेत'; पत्रातून राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद उघड
दसरा-दिवाळी दरम्यान सोलापूरातील ७०२ ग्रामपंचायतींच्या रंगणार निवडणूका; २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार
कुर्ल्यात तलावात बुडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना ‘एआय’ साक्षरतेचे धडे; कोणत्या कंपनीसोबत करार
Maharashtra Rain Alert : राज्यात शनिवारी वादळी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता; बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’
मोशी दुर्घटनेप्रकरणी सफाई कर्मचारी, अनुसूचित जाती आयोगांकडून महापालिकेला नोटीस, १५ दिवसात…
बेतवडे येथील शेतकऱ्यांचे जमीन फसवणूक प्रकरणी बेमुदत धरणे आंदोलन
जोगेश्वरीमधून ११ लाखांचा साबण जप्त ; सौंदर्यप्रसाधने विक्रेत्यावर एफडीएची कारवाई
मुंबईतील कांदळवने नष्ट होणे किती धोक्याचे ? ‘द लास्ट मॅन्ग्रोव्ह्ज ऑफ मुंबई’ माहितीपटातून कांदळवनांविषयी जनजागृती
आगीशी जुळवून घेणाऱ्या अनोख्या वनस्पतीचा पुण्यातील टेकडीवर शोध… प्रजातीचे ‘कॅन्स्कोरा अग्नी’ नामकरण!
मुंबईतील पारशी डेअरीचा परवाना निलंबित ; पालघर येथील उत्पादन करणाऱ्या डेअरीच्या आस्थापनेवरही कारवाई

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
