Today’s Breaking News Updates, 13 August 2026: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सलग तिसऱ्या दिवशी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत. आजही सिब्बल ठाकरे गटाची भूमिका मांडतील. महाराष्ट्रासह देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपा नेते विनोद तावडे एकत्र दिसले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत देखील विविध घडामोडी घडत आहेत. यासह राज्यातील राजकीय, सामाजिक, गुन्हे, कला – क्रीडा- संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

Live Updates

Marathi News Live Updates, 13 August 2026: महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट्स.

20:01 (IST) 13 Aug 2026

निहंग शीख म्हणजे नेमके कोण? नांदेडच्या घटनेनंतर उत्सुकता

निळा बाणा, उंच पगडी आणि शस्त्रधारणेसाठी ओळखली जाणारी ही पारंपरिक योद्धा परंपरा नेमकी काय आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...सविस्तर बातमी
19:51 (IST) 13 Aug 2026

मेळघाटातील डोमा आश्रमशाळेत ‘भूत’ नसून केवळ अफवा; मास हिस्टेरियाची शक्यता, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून…

मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेमुळे शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी भीतीपोटी शाळा सोडून घर गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ...अधिक वाचा
19:46 (IST) 13 Aug 2026

राज्यात भाकड गोवंशांसाठी हजार गोशाळा; १.७५ लाख गोवंशाचे संगोपन

यंदा गोशाळांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ११ कोटी रुपये किंमतीच्या गोमयापासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या विक्रीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे. ...अधिक वाचा
19:36 (IST) 13 Aug 2026

ठाणे : जिल्हा परिषद शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेत ठसा

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथीच्या परीक्षेत ४६० विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १७४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. इयत्ता सातवीच्या परीक्षेत १७६ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १०० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली. ...वाचा सविस्तर
19:32 (IST) 13 Aug 2026

गोंदिया : रानडुकरांचा धुमाकूळ; तीन शेतकरी गंभीर जखमी, उमरी-धादरी परिसरात दहशतीचे सावट…

तिरोडा तालुक्यातील खरीप हंगामातील शेतीची कामे जोमात सुरू असतानाच तिरोडा तालुक्यातील उमरी आणि धादरी परिसरात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...वाचा सविस्तर
19:26 (IST) 13 Aug 2026

ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू, मूल शहरातील नागपूर मार्गावर भीषण अपघात

राहुल पाल हे बाजार आटोपून मुलगी ईशाला सोबत घेऊन दुचाकीने बोंडाळा (भूज) गावाकडे परतत होते. ...सविस्तर वाचा
19:19 (IST) 13 Aug 2026

न्यायालयातील ‘केस’च चोरीला; चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयातील धक्कादायक प्रकार, परत करण्यासाठी ५० हजारांची…

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सतीश उगले यांच्या ताब्यात असलेली फौजदारी अपील क्रमांक ३/२५ (रामराज विरुद्ध सरकार) ही केस गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. ...सविस्तर वाचा
19:13 (IST) 13 Aug 2026

"मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकले असते..", गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...सविस्तर बातमी
19:10 (IST) 13 Aug 2026

कोल्हापुरात भाजपाची तिरंगा पदयात्रा उत्साहात

पदयात्रेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरजकर तिकटी येथून हातात तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ...वाचा सविस्तर
19:05 (IST) 13 Aug 2026

‘लव स्टोरी’वरून नवा पेच ! विवाहिता चिमुकल्याला घेऊन प्रियकराकडे तर प्रियकर म्हणतो, पतीकडेच जा…

नेहमी गुन्हेगारीवरून चर्चेत असलेले पोलीस ठाणे आता प्रेम प्रकरणावरून प्रकाशझोतात आले आहे. ...सविस्तर बातमी
19:00 (IST) 13 Aug 2026

मिरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रताप : अवघ्या १० वर्षांत क्रीडा संकुलाची इमारत पाडून नवीन बांधण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर.

भाईंदर पूर्वेतील अवघ्या १० वर्षांपूर्वी २५ कोटी रुपये खर्चून उभारलेले गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडून त्या ठिकाणी नवी इमारत उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेत मांडण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
18:59 (IST) 13 Aug 2026

विसर्जनाच्या दिवसाप्रमाणेच गणेशमूर्तींच्या आगमनाचेही नियोजन करा; गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी

यंदा १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. ...वाचा सविस्तर
18:58 (IST) 13 Aug 2026

डोंबिवलीत स्वातंत्र्यदिनी ३५ हजार चौरस फुटांचा विश्वविक्रमी तिरंगा फडकणार, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

‘तिरंगा हाती घेऊया, विश्वविक्रम घडवूया’ अशी साद देत आयोजित करण्यात आलेल्या या फेरीत हजारो डोंबिवलीकर एकत्र येत ३५ ते ३६ हजार चौरस फुटांचा भव्य तिरंगा घेऊन मार्गक्रमण करतील. ...सविस्तर बातमी
18:58 (IST) 13 Aug 2026

मालेगावात ओबीसी संघटना आक्रमक! 'जातनिहाय जनगणना करा,५०% आरक्षण मर्यादा हटवा'

देशात ओबीसी समाजाची लोकसंख्या किती आहे, त्याची आकडेवारी विकासाच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून वेळोवेळी अधोरेखित केले गेले आहे. ...सविस्तर बातमी
18:50 (IST) 13 Aug 2026

गडचिरोलीसाठी स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळ; जिल्हाधिकारी असतील अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून…

मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या स्वतंत्र प्रादेशिक नियोजनाला चालना मिळाली आहे. ...सविस्तर वाचा
18:49 (IST) 13 Aug 2026

कल्याण, बदलापूर, टिटवाळ्यात शुक्रवारी पाच तास वीजपुरवठा बंद

बडोदे ते मुंबई या कामासाठी महापारेषणची १०० केव्ही पडघा मोहने उच्च दाब वीज वाहिनीचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. ...सविस्तर बातमी
18:43 (IST) 13 Aug 2026

बदलापूरकर तासनतास कोंडीत; लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष, दत्त चौकापासून ते आदर्श शाळेपर्यंत वाहनांच्या रांगा

शहरातील वाहतुकीचा एवढा बोजवारा उडालेला असताना, बदलापूरचे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र २०२९ मध्ये पूर्ण होणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यात आणि केवळ चमकोगिरी करण्यात मग्न असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. ...सविस्तर बातमी
18:25 (IST) 13 Aug 2026

अकबरुद्दीन ओवैसींची याचिका फेटाळली

सुनावणीत न्यायालयाने गुन्हा आणि त्याअनुषंगाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यास नकार दिला. त्यामुळे अर्धापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील खटल्याची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. ...सविस्तर वाचा
18:21 (IST) 13 Aug 2026

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसच्या वैमानिकांना अमली पदार्थविषयक चाचणी अनिवार्य

दररोज १,००० उड्डाणे एअर इंडिया कंपनी दररोज अंदाजे १,००० ते १,१०० उड्डाणे करते. एअर इंडिया एक्स्प्रेस ही कमी खर्चाची (लो-कॉस्ट) विमान कंपनी दररोज ५००हून अधिक (वा मागणीनुसार सरासरी ४२० ते ५०० दरम्यान) उड्डाणे चालवते. ...सविस्तर वाचा
18:16 (IST) 13 Aug 2026

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

मंदिर परिसर, मणिकर्णिका कुंड, नगारखाना इमारत आणि गरुड मंडप बांधकाम इत्यादी ठिकाणी राज्य पुरातत्त्व विभाग पुणे यांच्यामार्फत जतन व संवर्धनाची कामे सुरू आहे. मंदिर संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या आतील ओवऱ्या सहीत विविध कामांचा समावेश आहे. ...वाचा सविस्तर
17:59 (IST) 13 Aug 2026

Video: समुद्रावर कार घेऊन स्टंटबाजी करणे पर्यटकांना पडले महागात, समुद्रात अडकली कार; स्थानिकांच्या मदतीने सुटका

कळंब समुद्रकिनारी पर्यटकांची वाहने वाळूत किंवा पाण्यात अडकण्याच्या अशा घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही समुद्रावर कार घेऊन जाण्याचे प्रकार आता धोकादायक ठरताना दिसत आहेत. ...अधिक वाचा
17:50 (IST) 13 Aug 2026

कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक कार्यक्रमांत तृतीयपंथीयांच्या बिदागीची दहशत

सार्वजनिक कार्यक्रमात यामुळे गोंधळ उडत असल्याचे अनुभव अनेकांना आले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी आयोजित कार्यक्रमांना कल्याण, डोंबिवलीतील अनेक आयोजकांनी मुरड घातली आहे. ...सविस्तर वाचा
17:14 (IST) 13 Aug 2026

ठाण्यात पाणी देयक थकबाकीदारांना पुन्हा दंडमाफी, महापालिकेचा शंभर टक्के सवलतीचा प्रस्ताव

थकबाकीदारांना आकारण्यात येणारे व्याज आणि दंड शंभर टक्के माफ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून ही सवलत ऑगस्ट ते डिसेंबर २०२६ या कालावधीत देण्याचे प्रस्तावित आहे. ...अधिक वाचा
17:10 (IST) 13 Aug 2026

Video: मुंबईकरांचा प्रवास होणार 'कूल'! २३८ नवीन एसी लोकल कधीपासून धावणार? मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि गतीमान करण्यासाठी रेल्वे ताफ्यात तब्बल २३८ नव्या वातानुकूलित (AC) लोकल गाड्या दाखल होणार आहेत. ...अधिक वाचा
16:34 (IST) 13 Aug 2026

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आजची सुनावणी संपली

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आजची सुनावणी संपली; मंगळवारी सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार

16:18 (IST) 13 Aug 2026

"३९ आमदारांना अपात्र ठरवले गेले असते, तर विधिमंडळातही आमचेच बहुमत असते"; कपिल सिब्बल

"पक्षाचे चिन्ह देण्याबाबत विधिमंडळ पक्षातील बहुमत निर्णायक ठरवण्याचा आयोगाचा निर्णय आला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे ५५ पैकी ४० आमदार होते, तर आमच्याकडे १५ होते. विधानपरिषदेत त्यांच्याकडे १२ पैकी एकही सदस्य नव्हता, सर्व १२ सदस्य आमच्याबरोबर होते. लोकसभेत त्यांच्याकडे १९ पैकी १३ खासदार होते, तर आमच्याकडे चार होते. राज्यसभेत त्यांच्याकडे एकही खासदार नव्हता आणि आमच्याकडे तीन होते. त्यामुळे आयोगाच्या स्वतःच्याच आकडेवारीनुसार, आमच्याकडे ३४ आमदार व खासदार होते, तर त्यांच्याकडे ५३ होते. पण ३९ आमदारांना अपात्र ठरवले गेले असते, तर विधिमंडळातही आमचेच बहुमत असते," असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

https://twitter.com/barandbench/status/2087850892167197137?s=20

16:06 (IST) 13 Aug 2026

"अपात्रता केली असती तर बहुमत आमचेच होते"; कपिल सिब्बल

"पक्ष संघटन महत्त्वाचे आहे असे म्हणत सादिक अली केसचा संदर्भ देण्यात आला आहे. प्रतिनिधी सभेनं पक्ष प्रमुखांची निवड केली. जर अपात्रता केली असती तर बहुमत आमचेच होते", असे सिब्बल म्हणाले.

https://twitter.com/barandbench/status/2087848487807537560?s=20

15:57 (IST) 13 Aug 2026
२०१८ च्या पक्षाच्या घटनेनुसार शिंदे आमदार, मंत्री झाले; सिब्बल

"२०१८ च्या पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदेंना पक्षाचे नेते केले, पक्षाने तिकीट दिले, २०१९ मध्ये निवडणूक लढवली, आणि त्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या आघाडी सरकारमध्ये मंत्री देखील झाले व २०२२ पर्यंत मंत्रीपदावर होते. फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही म्हणणे चुकीचे," असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

15:34 (IST) 13 Aug 2026

"प्रत्येक सत्ताधारी पक्ष अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होऊ नयेत, असाच प्रयत्न करत असतो"; सिब्बल

"संसद कायदे करू शकते, परंतु त्या कायद्यांची कसोटी इथेच लावली जाते. सत्तेवर कोणताही पक्ष असला तरी, प्रत्येक सत्ताधारी पक्ष अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होऊ नयेत, असाच प्रयत्न करत असतो. देशात कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर निकष निश्चित करण्याची संधी या न्यायालयाला आहे. केवळ न्यायालयच लोकशाहीचे रक्षण करू शकते", असे युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

https://twitter.com/barandbench/status/2087840728856793095?s=20

15:30 (IST) 13 Aug 2026

घटना अलोकतांत्रिक आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही - सिब्बल

आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देताच निवडणूक आयोगाने हा निष्कर्ष काढला आहे. याचा फायदा शिंदे गटाला झाला आहे. माझ्या बाजूने असलेला हाच निर्णय माझ्याच विरोधात वापरून प्रतिस्पर्ध्याला फायदा करून दिला गेला आहे. घटनाच 'अलोकतांत्रिक' आहे, हे मानण्याचे तत्त्व कुठले? घटना अलोकतांत्रिक आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. एखाद्या सदस्याला पक्षातून काढून टाकले आणि घटनेत विशिष्ट प्रक्रिया दिलेली असेल तर तो सदस्य निवडणूक आयोगाकडे जात नाही तो स्थानिक न्यायालयात जातो

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची जयंती

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची जयंती (फोटो - X - Devendra Fadanvis)