Maharashtra News: खरी शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, यावरून ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला दिलेली अधिकृत मान्यता आणि धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या सुनावणीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
यात शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायपीठात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जयमाल्य बागची व न्या. व्ही. मोहना आहेत. यासोबतच शिंदे गटाला अधिकृत शिवसेना घोषित करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकाही सूचीबद्ध आहे.
मागील वेळेस उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. “केवळ आमदारांच्या संख्येवर राजकीय पक्षाची मालकी ठरवता येत नाही. पक्षाची संघटनात्मक रचना आणि पक्षाची घटना सर्वात महत्त्वाची असते,” असा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या थेट अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत…
Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing Live | शिवसेना व धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु, वाचा LIVE अपडेट्स
"पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि नंतर नकार दिला"
पक्षचिन्ह आणि पक्षाच्या घटनेचा दाखला देत सिब्बल म्हणाले, "ज्या चिन्हावर पक्षाचे प्रमुख उमेदवाराला एबी फॉर्म (AB Form) देतात, त्या चिन्हावर निवडणूक लढवून संबंधित व्यक्ती निवडून येते आणि मंत्रीही होते. मात्र, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष मात्र ती घटना आणि ते चिन्ह नाकारतात, हे अत्यंत विरोधाभासी आहे."
2018 मध्ये बदललेल्या पक्षाच्या घटनेचा उल्लेख करत सिब्बल यांनी स्पष्ट केले की, "2018 च्या पक्षाच्या घटनेनुसार ज्यांना सर्व राजकीय फायदे मिळाले, त्यांनीच नंतर त्या घटनेला मान्यता देण्यास नकार दिला. एकाच घटनेचा फायदा एका गटाला द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला मात्र केवळ आमदारांच्या बहुमताच्या जोरावर स्वतःलाच मूळ राजकीय पक्ष घोषित करायचे, हा निर्णय पूर्णपणे अयोग्य आहे."
"१९९९ च्या घटनेचा आधार घेत विधानसभा अध्यक्षांनी कोणता निर्णय घेतला?" – कपिल सिब्बल यांचा सवाल
युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांना कक्षेत नसतानाही त्यांनी राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना थेट 1999 मधील पक्षाच्या घटनेशी केली. त्यानंतर पक्षाचे सध्याचे नेतृत्व रचनेनुसार योग्य नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला. वास्तविक पाहता, असा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात येतोच कसा?"
कपिल सिब्बल यांनी पुढे नमूद केले की, "अध्यक्षांनी स्वतः हे मान्य केले आहे की मूळ राजकीय पक्ष कोणता आहे आणि पक्षाचे प्रमुख कोण आहेत. असे असताना 1999 च्या जुन्या घटनेचा आधार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे कोणतेही काल्पनिक किंवा केवळ अभ्यासापुरते प्रकरण नसून, प्रत्यक्ष राजकारणाशी जोडलेला महत्त्वाचा मुद्दा आहे."
कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर जोरदार हल्लाबोल
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या अपात्रतेच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर आणि निर्णयावर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची रचना ठरवताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेतल्याचा थेट आरोप त्यांनी न्यायालयात केला.
१९९९ च्या घटनेशी तुलना कशी काय? सिब्बल यांचा प्रश्न
न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले, "ज्या अध्यक्षांना अधिकारक्षेत्रच नाही, त्यांनी थेट राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना १९९९ च्या पक्षघटनेशी केली. या तुलनेच्या आधारे पक्षाची सध्याची नेतृत्वरचना ही पक्षघटनेला धरून नाही, असा निष्कर्ष अध्यक्षांनी काढला. वास्तविक पाहता, हा अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्राचा भाग कसा असू शकतो? सिब्बल यांनी पुढे स्पष्ट केले की, 'अध्यक्ष हे स्वतः मान्य करतात की मी राजकीय पक्ष आहे, ही माझी संरचना आहे आणि मीच पक्षप्रमुख आहे.' या गोष्टीवर अध्यक्षांचे कोणतेही दुमत नाही. मग असे असताना थेट १९९९ च्या घटनेकडे मागे जाण्याचा प्रश्नच येतो कुठे?"
'त्याच घटनेचा फायदा घेतला आणि नंतर विरोध केला'
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना सिब्बल यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत न्यायालयाचे लक्ष वेधले. "हा कोणताही शैक्षणिक सराव किंवा निव्वळ कागदी खेळ नाही, तर हे वास्तववादी राजकारण आहे. मी संबंधित नेत्याला पक्षाचे चिन्ह दिले, त्यांनी त्याच चिन्हावर निवडणूक लढवली आणि त्याच चिन्हाच्या जोरावर ते मंत्रीही झाले. परंतु, नंतर अध्यक्षांनी अचानक संपूर्ण भूमिका बदलली," असा आरोप त्यांनी केला.
२०१८ च्या सुधारित पक्षघटनेचा उल्लेख करत सिब्बल म्हणाले की, "२०१८ च्या पक्षघटनेनुसार जे काही निर्णय झाले, त्या सर्व गोष्टींचा आणि पदांचा पूर्ण फायदा या नेत्यांनी घेतला. ते त्याच घटनेनुसार निवडून आले होते. मात्र, निर्णय देताना हीच घटना बाजूला ठेवली गेली आणि पक्षातील एका गटाला या घटनेचा फायदा दिला गेला. त्यानंतर केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर 'आम्हीच मूळ राजकीय पक्ष आहोत' असा दावा केला गेला," असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अत्यंत चुकीचा
तसेच बंडखोर गटाने नियुक्त केलेला व्हीप आणि गटनेता वैध असल्याचा जो निर्णय अध्यक्षांनी दिला, तो पूर्णपणे घटनाविरोधी आहे. या निर्णयामुळे संविधानातील १० व्या अनुसूचीच्या मूळ गाभ्यालाच सुरुंग लागला आहे. ज्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर आणि तिकिटावर लोकप्रतिनिधी निवडून येतात, त्या पक्षाचे आदेश पाळणे लोकप्रतिनिधींवर बंधनकारक असते. मात्र, अध्यक्षांनी 'विधिमंडळ पक्ष' आणि 'मूळ राजकीय पक्ष' या दोन्ही वेगळ्या संकल्पनांची सरमिसळ करून हा अत्यंत चुकीचा निर्णय दिला आहे, असा थेट आरोप सिब्बल यांनी न्यायालयात केला.
'विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या १० व्या अनुसूचीच्या विरोधी'
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर बोट ठेवताना कपिल सिब्बल म्हणाले, "२१ जून रोजी पक्षाच्या मूळ संघटनेत कोणतेही बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली नव्हती. पक्षाच्या बहुसंख्य घटकांचा किंवा मूळ संघटनेचा आपल्याला पाठिंबा आहे, असा कोणताही दावाही बंडखोर गटाने २१ जूनला केला नव्हता. असा दावा त्यांनी थेट १९ जुलै रोजी पुढे केला. त्यामुळे २१ जून रोजी राजकीय पक्षात कोणतीही उभी फूट पडलेली नव्हती, हे स्पष्ट होते."
'सादिक अली' निकाल लागूच होत नाही'
शिवसेना सत्तासंघर्ष आणि पक्षचिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला. अध्यक्षांनी दिलेल्या निकालात 'सादिक अली' प्रकरणातील दाखला पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने वापरला असून तो या प्रकरणाला अजिबात लागू होत नाही, असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात मांडला.
घटनेचा वाद
शिवसेनेची १९९९ ची घटना आणि २०१८ मधील सुधारित घटना यावरून दोन्ही गटांत वाद आहे. अध्यक्षांनी १९९९ च्या घटनेचा दाखला देत शिंदे गटाच्या बाजूने निर्णय झुकवला होता, ज्याला सिब्बल यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले आहे.
अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप
ठाकरे गटाचा मुख्य आक्षेप असा आहे की, अपात्रतेचा निर्णय घेताना अध्यक्षांनी केवळ स्वतःसमोर आलेल्या पुराव्यांचा विचार करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डचा सहारा घेत पक्षाच्या घटनेचा आधार लावला, जे नियमानुसार अयोग्य आहे.
दोन स्वतंत्र घटनात्मक अधिकार
१० व्या अनुसूचीनुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार लवादाच्या भूमिकेत असलेल्या विधानसभा अध्यक्षांकडे असतात. तर राजकीय पक्ष कोणता आणि चिन्ह कोणाचे, याचा निर्णय निवडणूक आयोग घेतो.
सिब्बल यांचा युक्तिवाद
सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल म्हणाले, "जर निवडणूक आयोगाची (ECI) कारवाई आणि आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका या दोन पूर्णपणे भिन्न आणि स्वतंत्र गोष्टी आहेत, तर मग विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगासमोरील कागदपत्रे या सुनावणीत कशी काय ओढू शकतात? तसेच, १९९९ मधील पक्षाची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर उपलब्ध होती, असा युक्तिवाद करत अध्यक्ष त्यावर कसा काय निर्णय देऊ शकतात?"
सिब्बल यांच्या या युक्तिवादामुळे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय कायदेशीर चौकटीत कसा बसतो, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विधानसभा अध्यक्षांनी राजकीय पक्षाची व्याख्या बदलल्याचा आरोप करत सिब्बल म्हणाले, "घटनेच्या १०व्या अनुसूचीनुसार मिळालेल्या अधिकारांचे विधानसभा अध्यक्षांनी पूर्णपणे उल्लंघन केले आहे. आमच्या पक्षाच्या राजकीय नेतृत्वात झालेल्या बदलांकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. केवळ बहुसंख्य आमदार म्हणजेच मूळ राजकीय पक्ष, असा निकाल देऊन अध्यक्षांनी १०व्या अनुसूचीच्या मूळ आत्म्यालाच छेद दिला आहे."
अपात्रतेचा निर्णय आधीच होणे आवश्यक
आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होणे का गरजेचे आहे, हे पटवून देताना सिब्बल पुढे म्हणाले, "अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम निकाल आल्यानंतरच कोणता गट म्हणजेच कोणता पक्ष खरा, हे ठरवण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी. जर संबंधित आमदार अखेर अपात्र ठरले, तर सभागृहातील त्यांचे संख्याबळ पूर्णपणे विचारात न घेता अमान्य करावे लागेल."
'सुभाष देसाई प्रकरणातील निर्णयाचा अध्यक्षांना विसर'
विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निकालाचा हवाला दिला. "सुभाष देसाई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट भूमिका घेतली असताना विधानसभा अध्यक्ष पक्षाच्या घटनेची अशी तपासणी कशी काय करू शकतात? अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना एखादा गट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्षावर दावा सांगू शकतो, हे गृहीत धरले तरीही पक्षाबाबतचा निर्णय हा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागल्यानंतरच व्हायला हवा," असा युक्तिवाद त्यांनी केला.
मुख्य प्रश्न असा आहे की...
पक्षशिस्त आणि पक्षाचे नेतृत्त्व याबाबत भाष्य करताना सिब्बल म्हणाले, "संसदेत किंवा विधानसभेत पक्षाचा नेता कोण असेल, हे ठरवण्याचा आणि व्हीप (Whip) जारी करण्याचा अधिकार मूळ राजकीय पक्षालाच असतो. विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा लागेल. मुख्य प्रश्न असा आहे की, २०१८ मधील पक्षाची घटना, तिथली अधिकार रचना आणि पक्षनेतृत्त्व हे १९९९ च्या मूळ घटनेशी सुसंगत आहे का?"
"अध्यक्षांनी १०व्या अनुसूचीचा वापर करताना अधिकारांचे उल्लंघन केले"; कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या घटनात्मक अधिकारांची मर्यादा ओलांडून निर्णय दिल्याचा थेट आरोप सिब्बल यांनी न्यायालयात केला.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा 'बुढ्ढी के बाल' विक्रेत्यांनाही धसका; थेट रंगच बदलला, स्वत:हूनच करतायत सुधारणा!
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत ४०० होर्डिंग्ज अनधिकृत; १३ वर्षे फलकांसाठी निविदा नाही, ६० कोटीचे नुकसान
'मी म्हणजेच मूळ पक्ष' असा बचाव घेता येत नाही
आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर भाष्य करताना सिब्बल यांनी स्पष्ट केले की, जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीने किंवा आमदाराने स्वतःहून पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे, या कारणावरून अपात्रतेची याचिका दाखल केली जाते, तेव्हा तो आमदार 'मी म्हणजेच मूळ राजकीय पक्ष आहे' असा बचाव घेऊ शकत नाही. पक्षाचे सदस्यत्व सोडल्यानंतर मूळ पक्षावरच दावा सांगणे हा अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्याचा मार्ग असू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी कोर्टासमोर केला.
विधिमंडळ पक्षात फुटीची संकल्पना कायद्यात नाहीच
सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले की, "आम्ही आता आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करत आहोत. दहाव्या सूचीच्या तरतुदींनुसार विधिमंडळ पक्षात फूट पडली आहे, असा दावा करणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही. घटनात्मकदृष्ट्या अशा फुटीला कोणतीही मान्यता नाही."
"आमदार पक्षाचे सदस्यत्व स्वतः सोडतात तेव्हा 'मीच पक्ष आहे' असा बचाव घेता येत नाही", कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कोर्टात जोरदार बाजू मांडली. दहाव्या सूचीनुसार विधिमंडळ पक्षात उभी फूट पडणे ही संकल्पना कायद्याला मान्यच नाही, असा थेट दावा सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला.
'भ्रष्टाचारी, काळाबाजार करणारे लोक सुशिक्षित, बुद्धिमान; ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणी सदस्याचे विधान
'महापौर निवास' नाव बदलू नका, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी !
अमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; ‘महर्षी पब्लिक स्कूल’ मध्ये…
Pune Mayor Residence Name Change : ‘महापौर निवास’ की ‘रामदूत’? भाजपपुढे यक्षप्रश्न
कांदिवलीतील ३९ मजली टॉवरच्या बांधकामास स्थगिती ; १०५ घरखरेदीदार अडचणीत
'जा, मराठी नहीं बोलता’; मुदत संपूनही रिक्षाचालकाची मुजोरी, परिवहनमंत्र्यांना थेट आव्हान
बेस्ट वीजपुरवठ्यासाठी मोठ्या निवासी इमारतीच्या शोधात, पुरवठा सक्षम करण्यासाठी २०० कोटींची योजना
डॉक्टरांना देशभर वैद्यकीय व्यवसायासाठी एकच नोंदणी, एनएमसीकडून सुधारणा नियमांचा मसुदा

LIVE: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणाची सुनावणी (छायाचित्र: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
