scorecardresearch

Premium

Maharashtra Breaking News : कंटेनरच्या धडकेमुळे भिंत अंगावर कोसळून तरूणाचा मृत्यू, चार जण जखमी; इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

maharashtra News : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा आढावा, वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Marathi News Live
महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट

Maharashtra news today Update, Jan 31 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे विरुद्ध ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. दोघांनी शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्याने हा वाद निवडणूक आयोगासमोर पोहोचला होता. दरम्यान, काल दोन्ही गटांनी यासंदर्भात लेखी युक्तिवाद सादर केला. उद्धव ठाकरे गटाने ई-मेलद्वारे भूमिका मांडली असून शिंदे गटाच्या वकिलांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन लेखी प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, यानंतर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे आज दिवस भर हा विषय चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
pune, society, history, political developments, cantonment board
वर्धानपनदिन विशेष : पुणे शहराच्या राजकारणाचा अंतरंग
yogendra yadav rahul gandhi marathi article, yogendra yadav bharat jodo nyay yatra marathi news
परिघावरचे लोक हाच इथल्या राजकारणाचा मुख्य प्रवाह…
money mantra marathi news, power of investment marathi news, investment article marathi news,
Money Mantra : गुंतवणुकीतील जोखमा आणि सामर्थ्य
Live Updates

Mumbai Pune News : बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून होणार सुरू

 

 
17:32 (IST) 31 Jan 2023
‘ललिता शिवाजी बाबर’ चित्रपटाच्या टीझरचे अनावरण

प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन ‘माणदेशी एक्सप्रेस’ म्हणजेच ‘ललिता शिवाजी बाबर’ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी ‘ललिता शिवाजी बाबर’ या चित्रपटाच्या टीझरचे अनावरण करण्यात आले.

सविस्तर वाचा

17:24 (IST) 31 Jan 2023
जयदत्त क्षीरसागर भाजपच्या उंबरठ्यावर

गेले काही दिवस राजकीय भूमिका स्पष्ट करण्यास विलंब लावणाऱ्या व तांत्रिकदृष्ट्या अजूनही शिवसेनेत असणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात त्यांचा कल भाजपकडेच असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना मदत केली.

सविस्तर वाचा

17:07 (IST) 31 Jan 2023
‘या’ गावात आहे धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा; साकडं पूर्ण करण्यासाठी भक्त करतात ‘अग्निदिव्य’

देवाचं साकडं पूर्ण करण्यासाठी धगधगत्या निखाऱ्यावरून चालण्याचे ‘अग्निदिव्य’ भक्त मोठ्या श्रद्धेने करतात. ही अनोखी परंपरा पातूर तालुक्यातील मळसूर गावात जोपासली जाते. अक्षरशः अंगावर शहारे आणणारी ही कृती शेकडो भक्त पूर्ण करतात.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 31 Jan 2023
कंटेनरच्या धडकेमुळे भिंत अंगावर कोसळून तरूणाचा मृत्यू चार जण जखमी

भिवंडी येथील राहनाळ भागात कंटेनरची धडक घराच्या भिंतीला बसल्याने भिंत अंगावर कोसळून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे.

सविस्तर वाचा

16:02 (IST) 31 Jan 2023
ठाणे : टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार ३१ बसगाड्या, ११ विजेवरील, तर २० सीएनजी बसगाड्यांचा समावेश

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत पर्यावरणपुरक विजेवरील बसगाड्यांच्या खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या निधीतून १२३ बसगाड्या ठाणे परिवहन उपक्रमाने खरेदी केल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या ११ बसगाड्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच, ९ फेब्रुवारीला लोकार्पण करण्याची तयारी परिवहन प्रशासनाने सुरू केली आहे.

सविस्तर वाचा…

15:53 (IST) 31 Jan 2023
शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव थांबवा, अनिल देशमुख यांचे फडणवीस यांना पत्र

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख विविध मुद्यांवर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून विविध प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.

सविस्तर वाचा

15:37 (IST) 31 Jan 2023
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उच्च न्यायालयाची नोटीस…”, दोन आठवड्यांत मागितले उत्तर

विद्यापीठांच्या अधिसभा आणि व्यवस्थापन परिषदांमध्ये राज्यपालांकडून करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्त्या आधीच वादात सापडल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा नवीन नियुक्तीवरून वादात सापडले आहे.

सविस्तर वाचा

15:20 (IST) 31 Jan 2023
‘साई बाबांच्या मंदिरात अतुलने मला वचन दिले’, वास्तूतज्ञ आनंद पिंपळकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा संगीतकार आणि गायक अजय गोगावले यांनी पहिल्यांदाच साई बाबांवरील गाणे गायले आहे. ‘तुमच्या आगामी चित्रपटात आमचे गाणे असेलच, असे वचन अतुल गोगावलेने मला साई बाबांच्या मंदिरात दिले होते आणि ते वचन पूर्ण केले.

सविस्तर वाचा

15:04 (IST) 31 Jan 2023
‘जय जय महाराष्ट्र माझा’, हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित

'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

14:56 (IST) 31 Jan 2023
साहित्य संमेलनाचे पावित्र्य टिकवण्यासाठी वर्धा पोलिसांचे ‘ऑपरेशन वॉश आऊट’; चार दिवसात ३५ लाख रुपयांचा दारू साठा जप्त

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पावित्र्य टिकावे म्हणून पोलिसांनी छेडलेल्या 'वॉश आऊट' मोहिमेत दैनंदिन लाखो रुपयांची दारू पकडल्या जात आहे. गेल्या चारच दिवसात ३५ लाख रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

14:53 (IST) 31 Jan 2023
परिवर्तन संस्थेच्या नाटकाची काला घोडा महोत्सवासाठी निवड

मुंबईतील प्रतिष्ठित काला घोडा महोत्सवासाठी शहरातील परिवर्तन संस्था निर्मित अमृता साहिर इमरोज या नाटकाची निवड करण्यात आली आहे. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. जळगावच्या हौशी रंगभूमीवरील नाटकाची प्रथमच या महोत्सवासाठी निवड झाली आहे.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 31 Jan 2023
मुंबईतील तापमानात किंचित घट, दोन दिवसात दोन अंशाने पाऱ्यात घसरण

गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात सुमारे २ अंशाने घट झाली असून त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी सौम्य गारवा आणि दुपारच्या वेळी उबदार वातावरणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र सध्याचे सरासरी कमाल तापमान २ अंशाने कमी आणि किमान तापमान २ अंशाने अधिक असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

सविस्तर वाचा

14:19 (IST) 31 Jan 2023
मुंबई : पुढील दोन महिन्यांमध्ये गोवर संसर्ग वाढण्याची शक्यता

गोवरच्या संसर्गाला साधारणपणे हिवाळ्यामध्ये सुरुवात होत असून सध्याचा काळ गोवर वाढीचा आहे. दरवर्षी मार्चपर्यंत गोवरचे रुग्ण आढळतात. परिणामी, सध्या गोवरचा प्रादुर्भाव आटोक्यात असला तरी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

सविस्तर वाचा

14:07 (IST) 31 Jan 2023
२०२५ पासून एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार, राज्य सरकारचा निर्णय

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होईल असा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.

13:42 (IST) 31 Jan 2023
‘कसबा’ पोटनिवडणूक बिनविरोध करा, भाजपाचे विरोधकांना पत्र

कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत प्रयत्न सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विरोधकांना तसे पत्र दिले आहे.

सविस्तर वाचा…

12:55 (IST) 31 Jan 2023
ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक, म्हाडाच्या कार्यालयात घुसून अनिल परब यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

शिवसैनिक अनिल परब यांच्या समर्थनार्थ मुंबईतील म्हाडा कार्यालयात घुसले आहेत. यावेळी शिवसैनिक परब यांच्या समर्थनार्थ तसेच किरीट सोमय्या याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत आहेत.

12:46 (IST) 31 Jan 2023
डोंबिवली पूर्वेत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी, मानपाडा रस्ता अडवून फेरीवाल्यांचा व्यवसाय

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील नेहरु रस्ता, फडके रस्ता, चिमणी गल्ली या पादचरी वर्दळीच्या भागात फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. आता तर सर्वाधिक वर्दळीचा मानपाडा रस्त्याची एक बाजू फेरीवाल्यांनी व्यापून व्यवसाय सुरू केला आहे.

सविस्तर वाचा

12:34 (IST) 31 Jan 2023
नाशिक : चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचे तत्व पाळले, प्रशांत दामले यांचे प्रतिपादन

एकदा केलेली चूक पुन्हा होणार नाही, हे तत्व कामात आणि अभिनयात तंतोतंत पाळले. पैसा खर्च करून नाटक बघण्यासाठी येणाऱ्या रसिकांना आपण बांधील आहोत, याची आपल्यासह सर्व कलाकार, रंगमंचामागील तंत्रज्ञानलाही कल्पना असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नाशिक येथे केले.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 31 Jan 2023
डोंबिवलीत अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून सात जणांची १९ लाखांची फसवणूक

अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून डोंबिवली शहर परिसरातील एकूण सात जणांची एका भामट्याने व्हाॅट्सपवर पाठविलेल्या जुळणी, लघुसंदेशांच्या माध्यमांमधून १८ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात खासगी विमा कंपनीत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याची फसवणूक झाली असल्याने हा प्रकार उघडकीला आला आहे.

सविस्तर वाचा

12:12 (IST) 31 Jan 2023
प्रियकर, ओळखीचे, नातेवाईकांकडूनच महिलांवर सर्वाधिक अत्याचार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मुंबईनंतर हे प्रमाण उपराजधानीत सर्वाधिक असून गेल्या पाच वर्षांत नागपुरातील ९९७ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या असून सर्वाधिक बलात्कार प्रियकर, ओळखीचे व्यक्ती आणि नातेवाईकांकडूनच झाल्याचे राज्य पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे.

सविस्तर वाचा

12:11 (IST) 31 Jan 2023
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : नागपूर – हावडा मार्गावर ८० तासांचा ‘मेगा ब्लॉक’

तिसऱ्या रेल्वेमार्गाचे (थर्ड लाईन) काम जलद गतीने करण्यासाठी नागपूर ते हावडा या महत्त्वाच्या आणि व्यस्त रेल्वेमार्गावर पुढील ८० तास ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यामुळे शिवनाथ एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस आणि इतर पाच गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर २० मिनिटे ते अडीच तास थांबवून ठेवण्यात येतील.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 31 Jan 2023
नागपूर : ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल…’ असा संदेश पतीला पाठवून चिमुकलीसह आईची तलावात उडी

एका २८ वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी घेतली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. कल्पना रवी पंडागळे आणि तिची मुलगी स्विटी अशी त्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

12:02 (IST) 31 Jan 2023
काँग्रेसच्या अप्रतिष्ठेस जबाबदार कोण ?

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढायची की महाविकास आघाडीतून लढायची याची काँग्रेसने अद्याप काहीच रणनीती अद्याप निश्चित केलेली नाही. काँग्रेसमधील या गोंधळाने पक्षाची ताकद कमीच होत जात आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 31 Jan 2023
वर्धा : साहित्य संमेलनात सहभागी सारस्वतांच्या सुश्रुशेसाठी शंभरावर डॉक्टरांची स्वयंस्फूर्त सेवा

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी सारस्वतांच्या प्रकृतीची अहोरात्र काळजी घेण्यासाठी विविध पाळ्यांत शंभरावर डॉक्टरांची स्वयंस्फूर्त सेवा लाभणार आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा व सावंगीचे आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच भारतीय वैद्यक संघटना व सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञांची चमू चोवीस तास सज्ज असेल.

सविस्तर वाचा

12:00 (IST) 31 Jan 2023
“आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार,” स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया, मात्र घातली ‘ही’ अट

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अभिमन्यू पवार सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 31 Jan 2023
मुंबई : उपनगरवासियांना पाण्यासाठी सायंकाळी ६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील पाणीपुरवठा सोमवारी २४ तासांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र जल अभियंता खात्याने हाती घेतलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊ न शकल्यामुळे २४ तासांनंतर उपनगरांतील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात मुंबई महानगरपालिकेला अपयश आले आहे.

सविस्तर वाचा

11:55 (IST) 31 Jan 2023
बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार

बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे या सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवारदरम्यान बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 31 Jan 2023
मुंबईतील गुटखा तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डकडे?, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तपास

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या आठड्यात डोंगरी परिसरात कारवाई करून गुटखा तस्करीशी संबंधित टोळीला अटक केली असून या तस्करीचे धागेदोरे अंडरवर्ल्डशी (अधोविश्व) जुळल्याचा संशय पोलिसांना आहे.

सविस्तर वाचा

11:52 (IST) 31 Jan 2023
मुंबईः शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेचे दागिने लुटले

मिठाई देणाच्या बहाण्याने घरात शिरलेल्या आरोपीने शस्त्राचा धाक दाखवून वृद्ध महिलेचे दागिने लुटल्याची घटना दादर परिसरात सोमवारी घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात जबरी चोरीसह शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा

11:36 (IST) 31 Jan 2023
पुणे : पीएमआरडीए क्षेत्रात विकासकामांना मिळणार वेग, आयुक्तांना १५ कोटी रुपयांपर्यंतच्या कामांना मंजुरी देण्याचे अधिकार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) क्षेत्रात १५ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार महानगर आयुक्तांना देण्याचा निर्णय कार्यकारी समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 31 Jan 2023
पुणे : जमिनींविषयक वाद कायमचे सोडविण्यासाठी नागरिकांना संधी, शासनाचे महाराजस्व अभियान

प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अतिक्रमण केलेले अथवा बंद असलेले पाणंद रस्ते मोकळे करणे, जमीन मोजणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी महसूल विभागाकडून महाराजस्व अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. हे अभियान २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत असणार आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 31 Jan 2023
“शिंदे गटाच्या उठावानंतर राज्यात राजकीय अस्थिरता”, बच्चू कडू यांचं विधान; म्हणाले, “काही दिवसांपूर्वी…”

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या राजकीय अस्थिरता आहे, असं विधान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यांसदर्भात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा असताना आता त्यांच्या या विधानावरून पुन्हा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सविस्तर वाचा

11:29 (IST) 31 Jan 2023
“त्यांनी एकदा स्पष्टपणे सांगावं की…”, संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र; दहिसरमधील भाषणाचाही केला उल्लेख!

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमकं कुणाला मिळणार? यासंदर्भातली उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. निवडणूक आयोगासमोर यासंदर्भात सध्या सुनावणी सुरू असून ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंनी आयोगासमोर युक्तिवाद केला आहे. आता आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्ही शिवसेना सोडली, असा दावा सातत्याने शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावर संजय राऊतांनी खोचक शब्दांत टीकास्र सोडलं आहे. सविस्तर वाचा

बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे या सेवेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील पहिली २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवारदरम्यान बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर धावणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Maharashtra news live shivsena bow and arrow sign dispute uddhav thackeray eknath shinde union budget 31 january 2023 spb

First published on: 31-01-2023 at 11:23 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×