Maharashtra Politics Updates, 10 September 2026: महाराष्ट्रात सध्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भातील गुन्ह्यात पार्थ पवारांचं नाव का नाही? अशी विचारणा उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला केली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रारूप मतदार याद्यांमधील १ कोटी २२ लाख मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर SIR चा मुद्दादेखील तापल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून महिला खाली पडली

डोंबिवलीहून सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी लोकल दिवा व मुंब्रादरम्यान सिग्नल लागल्यामुळे थांबली असताना त्यातून एक महिला प्रवासी खाली पडल्याची घटना समोर आली आहे. सीएसएमटीच्या दिशेकडच्या पहिल्या महिला डब्ब्यातून ही महिला खाली पडली. लोकलमध्ये झालेल्या तुडुंब गर्दीमुळे दरवाज्यातही अनेक प्रवासी लटकल्याचं नेहमीचं चित्र या लोकलमध्ये दिसत होतं. तशीच गर्दी महिला डब्यातही होती. मात्र, गर्दी प्रमाणाच्या बाहेर गेल्यामुळे दारात लटकलेल्या अवस्थेतील सदर महिला हात सुटून खाली पडली. लोकल जागेवरच थांबलेली असल्यामुळे महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.

Live Updates

Today Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा...

18:30 (IST) 10 Sep 2026

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/2098021922584080628?s=20

17:45 (IST) 10 Sep 2026

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उद्यापासून ५ दिवस ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांना पूर्णतः बंदी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर विविध टप्प्यांत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ पासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या ट्रक, मल्टीॲक्सल, ट्रेलर, लॉरी आदी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी राहणार आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/2098020504653504620?s=20

16:52 (IST) 10 Sep 2026

नागपुरात ईद, दर्ग्यातील धार्मिक कार्यक्रम, संदलमध्ये डीजेबंदी; मुस्लिम समाजासाठी काढला फतवा

नागपुरात ईद, दर्ग्यांचे कार्यक्रम आणि संदलमध्ये डीजेचा वापर न करण्याचा महत्त्वपूर्ण फतवा दारुल उलूम अमजदियाकडून जारी करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 10 Sep 2026

RERA Badlapur Case: विकासकाने परवानगीविना केलेला बदल बेकायदा; बदलापुरातील बांधकाम व्यावसायिकाला रेरा न्यायाधिकरणाचा तडाखा

बदलापूरमधील पार्श्वधारा कॉम्प्लेक्स या गृहसंकुलाच्या रहिवाशांनी केकेल्या याचिकेवरून महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलीय न्यायाधिकरणाने या प्रकरणात विकासकाला तडाखा दिला. ...वाचा सविस्तर
15:47 (IST) 10 Sep 2026

MPSC : 'व्यवस्थेत भ्रष्टाचार आहे हे सिद्ध होते आहे,' सत्ताधारी आमदाराची थेट कबुली!

पुणे श्रमिक पत्रकार भवनात स्पर्धा परीक्षार्थ्यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी 'एमपीएससी'च्या कारभारावर आणि पेपर फुटण्याच्या प्रकारांवर थेट भाष्य केले. ...सविस्तर बातमी
15:22 (IST) 10 Sep 2026

दिवा-मुंब्रादरम्यान लोकलमधून महिला खाली पडली

डोंबिवलीहून सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांनी सीएसएमटीच्या दिशेनं जाणारी लोकल दिवा व मुंब्रादरम्यान सिग्नल लागल्यामुळे थांबली असताना त्यातून एक महिला प्रवासी खाली पडल्याची घटना समोर आली आहे. सीएसएमटीच्या दिशेकडच्या पहिल्या महिला डब्ब्यातून ही महिला खाली पडली. लोकलमध्ये झालेल्या तुडुंब गर्दीमुळे दरवाज्यातही अनेक प्रवासी लटकल्याचं नेहमीचं चित्र या लोकलमध्ये दिसत होतं. तशीच गर्दी महिला डब्यातही होती. मात्र, गर्दी प्रमाणाच्या बाहेर गेल्यामुळे दारात लटकलेल्या अवस्थेतील सदर महिला हात सुटून खाली पडली. लोकल जागेवरच थांबलेली असल्यामुळे महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.

15:17 (IST) 10 Sep 2026

हुक्का पार्लर संचालकांकडून पोलीस कारवाईचा 'विनोद'; निंबस लाऊंज तिसऱ्यांदा तर कुलाबा कॅफे दुसऱ्यांदा सुरू

नागपूरमधील निंबस लाऊंज आणि कुलाबा कॅफेवर पोलिसांनी वारंवार धाडी टाकूनही ही हुक्का पार्लर्स पुन्हा सुरू होत असल्याने पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...सविस्तर बातमी
15:17 (IST) 10 Sep 2026

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातला का? राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचा सोहळा रंगणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत एक सविस्तर पोस्ट केली आहे. मुंबई शहराचं महत्त्वं संपवण्याचा प्रयत्न होत असताना देशाच्या राजधानीचं जे महत्त्व आहे ते संपवण्याचाही प्रयत्न हळूहळू सुरु झाला आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

14:59 (IST) 10 Sep 2026

‘भाजपचे राजकारण काय असते, हे पार्थ पवारांना कळेल’; रोहित पवारांचा घणाघात

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पार्थ पवार यांच्याबाबत पोलिसांना विचारणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...सविस्तर बातमी
13:58 (IST) 10 Sep 2026

"आता पार्थ पवारांना भाजपाचं राजकारण जवळून कळेल", रोहित पवारांची मुंढवा जमीन प्रकरणी टिप्पणी!

Rohit Pawar targets CM: मुंढवा जमीन प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी चुलत बंधू पार्थ पवार यांना थेट पत्रकार परिषद घेण्याचे आवाहन केले आहे. ...वाचा सविस्तर
13:37 (IST) 10 Sep 2026

Hartalika Ganesh Chaturthi 2026: यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; बाप्पांची स्थापना नेमकी कधी? दा. कृ. सोमण यांनी सांगितली ‘ही’ वेळ

Hartalika and Ganesh Chaturthi on Same Day 2026 : हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते भिन्न असल्याने कोणतीही पूजा अगोदर किंवा नंतर केली तरी चालेल. सोमवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपत असली तरी त्या दिवशी हरतालिका पूजा सूर्योदयापासून मध्यान्हकालापर्यंत म्हणजे दुपारी १-४८ पर्यंत केली तरी चालेल, असे सोमण यांनी सांगितले. ...वाचा सविस्तर
13:26 (IST) 10 Sep 2026

पोळा विशेष : महाराष्ट्रातील एकमेव बैलजोडीचा 'पोळा चौक' नेमका कुठे आहे? उत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा ८५ वर्षांनंतरही कायम

महाराष्ट्रात एकमेव असलेला 'बैलजोडीचा पोळा चौक' ८५ वर्षांची समृद्ध परंपरा जपत आजही दिमाखात उभा आहे. ...सविस्तर वाचा
13:21 (IST) 10 Sep 2026

अबू सालेमला सुप्रीम कोर्टाचा झटका, सुटकेची याचिका फेटाळली

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेमला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. २५ वर्षाचा कारावास पूर्ण केल्याच्या आधारावर सुटका करण्याची विनंती करणारी याचिका अबू सालेमने कोर्टात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सालेमची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सालेमची तुरुंगातून वेळेच्या आधी कुसुटका होणार नाही तर त्याला तुरुंगातच रहावं लागणार आहे. कुख्यात गँगस्टर अबू सालेमसाठी हा झटका मानला जातो आहे

13:20 (IST) 10 Sep 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये केला 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा उल्लेख!

मला महाराष्ट्रात २५ मिलियनहून अधिक बहिणी आहेत. महिलांच्या बँक खात्यात आर्थिक मदत थेट जमा केली जाते. अल्प उत्पन्न कुटुंबांना याचा फायदा होतो. ही चॅरिटी नाही. यातून महिलांचं सबलीकरण होतं. त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो. त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

12:59 (IST) 10 Sep 2026

"लव्ह जिहादपेक्षाही भयंकर प्रकार", शाळेत कांदा, लसून आणण्यास मनाई केल्याने संजय राऊत संतापले

Sanjay Raut reacts strongly to school onion garlic : शाळेत विद्यार्थ्यांना डब्यात कांदा आणि लसून आणण्यास मनाई केल्याच्या प्रकारावर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ...अधिक वाचा
12:59 (IST) 10 Sep 2026

सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; माजी खासदारासह तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला…

गडचिरोली येथील सरकारी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत विषारी सापाच्या दंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. ...सविस्तर बातमी
12:43 (IST) 10 Sep 2026

सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा ‘खेळ’! तेलंगणा-आंध्र प्रदेशातून ग्राहक आणल्याचा आरोप; रमीसह अन्य जुगारप्रकार सुरू असल्याची स्थानिकांची तक्रार

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोनुर्ली येथे 'सोशल क्लब'च्या नावाखाली बेकायदेशीर जुगाराचा अड्डा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
12:42 (IST) 10 Sep 2026

कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसच्या खिडकीत हात घालून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

नातेवाईकांनी एक्सप्रेसच्या डब्याच्या दरवाजात येऊन चोर म्हणून मोठ्याने ओरडा केला. पण तोपर्यंत भुरटा चोर फलाटावरून गायब झाला होता. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ...अधिक वाचा
12:33 (IST) 10 Sep 2026

डोंबिवलीतील गायकवाड वाडीतील रस्त्यांची दुरवस्था, नागरिक हैराण

स्थानिक नगरसेवकांनी गायकवाड वाडीतील रस्ते, पायवाटा दुरवस्थेविषयी लक्ष घालून या भागातील खड्डे समस्या दूर करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. ...अधिक वाचा
12:23 (IST) 10 Sep 2026

७७ वर्ष वाट न अडवता, डीजेमुक्त वातावरणात साजरा होतो डोंबिवलीत टिळकनगरचा गणेशोत्सव

पर्यावरणस्नेही, पारंपारिक पध्दती आणि सामाजिक उपक्रम, सामाजिक भान ठेऊन उत्सव साजरा करण्यावर टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा सर्वाधिक भर असतो. ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 10 Sep 2026

MPSC Exam : 'एमपीएससी'कडून गट-क २०२६ संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली… नेमके कारण काय?

. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. ...सविस्तर बातमी
12:13 (IST) 10 Sep 2026

MPSC गोपनीय कागदपत्र प्रकरण: आयोगाच्या सहसचिवांचं नाव विनाकारण गोवल्याचा पोलीस अधिकाऱ्यावर आरोप, चौकशी सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) उत्पादन शुल्क परीक्षा गुणांकनाचे गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
12:06 (IST) 10 Sep 2026

रोहित पवार म्हणतात, "आता पार्थ पवारांना भाजपाचं राजकारण जवळून कळेल"

कोर्टानं पोलिसांना हे विचारलं आहे. पोलीस गृहखात्याचे अधिकारी आहेत. आता पार्थ पवारांना कळेल भाजपाचं राजकारण काय असतं. यात भाजपा मित्र पक्षाच्या नेत्याला कसं अडचणीत आणेल, हे येत्या काळात कळेल. यात नेमकं काय झालंय हे आम्हाला माहिती नाही. सध्या गृहखात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. अर्थखातं अजित पवारांच्या पक्षाकडे आहे. अजित पवार गेल्यानंतर अर्थखातं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे घेतलं आहे. या प्रकरणात वाटाघाटींमध्ये अर्थखातं कायमस्वरूपी भाजपाकडे जाईल असं मला वाटतंय. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या पक्षाला भाजपाचं राजकारण काय असतं हे फार जवळून कळेल - रोहित पवार

12:06 (IST) 10 Sep 2026

रोहित पवरांचं पार्थ पवारांना आवाहन - पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती सांगा!

मुंढवा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण मला एवढंच वाटतं की पार्थ पवारांनी लवकरात लवकर एक पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती लोकांना सांगावी. पूर्वी अजित पवार असताना ते स्वत: मीडियासमोर जाऊन काय वस्तुस्थिती आहे हे सांगत होते. त्यामुळे पार्थ पवारांना आता पत्रकार परिषद घ्यावी लागेल असं मला वाटतं - रोहित पवार

12:03 (IST) 10 Sep 2026

एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागाची अखेर झाडाझडती, उपजिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत १६ जणांवर कारवाई, आता केवळ प्रकल्पबाधितालाच कार्यालयात प्रवेश, दलालांना बंदी

महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बुधवारी अचानक सामाजिक विकास विभागाला भेट दिली आणि त्यांच्या कामकाजाची पाहणी केली. त्यावेळी या ठिकाणी प्रकल्पबाधितांऐवजी इतर व्यक्तींचा वावर (दलाल) आढळला. ...सविस्तर वाचा
12:02 (IST) 10 Sep 2026

काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी का घालता? केंद्रीय राज्यमंत्र्यांसमोर नगरसेवकांनी विचारला जाब…

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये बाहेरून औषधे विकत आणावी लागण्याच्या समस्येवर सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर बातमी
12:00 (IST) 10 Sep 2026

रोहित पवारांचं पार्थ पवारांना आवाहन, पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती सांगा!

मुंढवा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण मला एवढंच वाटतं की पार्थ पवारांनी लवकरात लवकर एक पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती लोकांना सांगावी. पूर्वी अजित पवार असताना ते स्वत: मीडियासमोर जाऊन काय वस्तुस्थिती आहे हे सांगत होते. त्यामुळे पार्थ पवारांना आता पत्रकार परिषद घ्यावी लागेल असं मला वाटतं - रोहित पवार

11:53 (IST) 10 Sep 2026

मनसेला बळ, भाजपला शह; कल्याण डोंबिवलीत शिंदे सेनेकडून नवे राजकीय समीकरण

कल्याण लोकसभा क्षेत्रातील राजकारणात शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत आणि रविंद्र चव्हाण यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु असल्याचे चित्र आहे. महापालिकेत सत्तास्थापनेनंतर काही काळ या दोन पक्षात बरे सुरु आहे असे वातावरण होते. दीड-दोन महिन्यांपासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन शिंदे-चव्हाणांमध्ये पुन्हा बिनसले आहे. ...वाचा सविस्तर
11:44 (IST) 10 Sep 2026

आता रुग्णालयात बाहेरची औषधं आणावी लागणार नाहीत? आरोग्य विभागाने जारी केल्या २ प्रकारच्या औषध याद्या!

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये बाहेरून औषधे विकत आणावी लागण्याच्या समस्येवर सार्वजनिक आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ...वाचा सविस्तर

मुंबई-गोवा महामार्ग कामावर नितीन गडकरींची तीव्र नाराजी

Today Marathi News Live Updates: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक घडामोडी